Buy books of DR BR Ambedkar, Buddhism, Dalit, Adiwasi & Bahujan Topics

Powered by Blomming for nikhilsablania

Saturday, November 26, 2016

नोटबंदीवर मनमोहन सिंग यांचं म्हणणं काय आहे हे

नोटबंदीवर मनमोहन सिंग यांचं म्हणणं काय आहे हे जाणून घ्यायची सगळ्यांनाच उत्सुकता होती. ४ दिवसांपूर्वी आरबीआयचे माजी डेप्युटी गव्हर्नर डॉ. के सी चक्रवर्ती यांनी युपीए २ च्या काळातसुद्धा नोटबंदीचा निर्णय घ्यावा म्हणून अनौपचारिक प्रस्ताव आला होता असं 'द हिंदू'च्या मुलाखतीत  सांगितलं. त्यानंतर तर मनमोहन सिंग यांना अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी मुलाखतीसाठी विनंती केली होती. पण, अत्यंत विनम्रपणे सिंग यांनी ती नाकारली होती.

अधिवेशन सुरु असताना कोणत्या व्यासपीठाचा उपयोग आपलं म्हणणं मांडण्यासाठी करायचा याचं लोकतांत्रिक भान त्यांना होतं !

आज अखेर ते बोलले. पूर्वी बोलायचे तसेच. मुद्दा न सोडता. आवाज न वाढवता. ( किंवा कंठ दाटून आलाय वगैरे न दाखवता !)

देशात या निर्णयानंतरच्या आजच्या सोळाव्या दिवशीही जनजीवन पूर्वपदावर आलेले नाही. ग्रामीण काय शहरी भागातले लोकही त्रस्त आहेत. लोक शांत आहेत म्हणजे त्यांनी पाठींबा दिलाय असा सोयीस्कर आणि प्रचारी अर्थ सरकारने काढलाय. लोकांचे प्रश्न ऐकू येऊ नयेत म्हणून सगळ्या माध्यमांतून आपल्या राखीव फौजेच्या जीवावर वातावरण विखारी बनवले जात आहे. या सगळ्याचा सामाजिक पर्यावरणावर आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असतो हे समजण्याचा अभ्यास डॉ मनमोहन सिंग यांच्याकडे आहे.

पण, इतर जवळपास सगळेच वक्ते आणि राजकीय पक्ष हे बोलत असताना मनमोहन सिंग मुद्दा सोडून इकडे तिकडे सरकले नाहीत. संयत ! भूतकाळात प्रत्येक स्फोटक आणि नाजूक परिस्थितीत समोरच्या बाकांवरून काय आक्रस्ताळी विधाने केली गेली होती ते त्यांनाही आठवत नसेल असे नाही. पण डॉक्टरसाब मागच्या विरोधकांसारखे टीका करताना मतलबी झाले नाहीत !!

ते देशाच्या जीडीपीबद्दल बोलले. शेतकरी, असंघटित क्षेत्र हे भरडून जात आहेत त्याबद्दल बोलले. नियोजन शून्यता आहे हे स्पष्ट शब्दांत त्यांनी सुनावले. संघटित लूट चालली आहे असा गंभीर आरोप केला. बँका पैसे कसे नाकारू शकतात असा संवैधानिक प्रश्न त्यांनी विचारला. आरबीआय, अर्थ मंत्रालय आणि पीएमओ या तिन्ही संस्थाच्या ( ज्या तिन्हींशी भूतकाळात थेट संबंध आलेली एकमेव व्यक्ती ते आहेत !!)  प्रतिष्ठेबद्दल त्यांनी आवाज उठवला. आणि "भविष्यासाठी हा निर्णय आहे" असा जो एकमेव पोकळ दावा उरला होता त्याचाही समाचार केवळ एका 'कोट'मध्ये घेतला.

हे करताना कुठे अभिनिवेश होता ?
हे करताना त्यांनी नाहक टोमणे मारलेले ऐकलेत ?
राजकीय कुरघोडी करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न कुठे दिसला ?

सभ्यता, ऋजुता हि व्यक्तीची अंगभूत वैशिष्ट्ये असतात.

इतिहास माझे मूल्यमापन करेल असं ते नेहमी म्हणतात. संधी असूनसुद्धा आणि सभोवतालचे सगळेच त्या संधीमध्ये बेभान होत असताना असंस्कृत आणि बेजबाबदार होणं कसोशीने टाळलेला, वैयक्तिक मूल्यांना कधीही निसटू न दिलेला नेता हि त्यांची ओळख वर्तमानातसुद्धा ठाशीव आहे !

बाकी अर्थतज्ज्ञ म्हणून तुम्ही अजोड आहातच हे तुम्हाला ऐकायला विरोधकसुद्धा सभागृहात हजर होते यावरूनच सिद्ध होतं !!!


I support one of the finest brain on the planet  economics professor Manmohan singh

paytm कंपनीचे सत्य

नोटबंदीनंतर जो तो paytm ने पैसे भरा, वर्तमानपत्रात मोठमोठ्या paytm च्या जाहिराती. पण paytm कंपनी कुणाची आहे ह्याचा भारतीयांनी कधी विचार केला आहे का?

वाचा मग समजेल paytm कंपनीचे सत्य काय आहे.

पेटीएम (paytm) ह्या कंपनीमध्ये चीनची जवळपास ४५% (२५% अलीबाबा ग्रुप + २०% दुसऱ्या कंपन्या).  म्हणजेच जवळजवळ ४५% फायदा चीनला मिळणार. मग तोच पैसे चीन आपल्याविरुद्ध लढण्यात म्हणजेच चीन आणि पाकिस्तान दोघे मिळून आपल्या जवानांवर गोळ्या झाडणार. ते हि आपल्याच पैश्यात.

दुसरे म्हणजे ह्या *पेटीएममुळे कोण, कुठे, कधी, काय कशी आणि किती खरेदी करतो हे चीनला समजणार* आणि ते त्या जास्तीत जास्त वस्तूंचे उत्पादन करणार आणि स्वस्तात आपल्याला विकणार. म्हणजेच आपल्या देशातले उद्योग पण बंद आणि पैसा चीनला. पटत नाही ना? पण ह्यावर्षी गणपती मूर्तीपण चीनमधून आल्या होत्या, दिवाळीला पणत्या, फटाके, होळीला रंग, पतंग  पण चीनमधून येतात. माहिती कमी तेव्हा हे आणि विस्तृत माहिती मिळाल्यावर काय? पूर्ण बाजारपेठ ताब्यात. मग बसा बोंबलत.

माहिती खरी का खोटी हि खाली दिलेल्या लिंकवर तपासून पहा.
https://en.wikipedia.org/wiki/Paytm


प्रत्येक भारतीयांनी हा संदेश जास्तीत जास्त भारतीयांना पाठवला पाहिजे.

धन्यवाद.

Friday, October 21, 2016

माझे बाबासाहेब बहुजनासाठी लढले

 माझे बाबासाहेब बहुजनासाठी लढले
---------------------------------------   संकल्प भिमटायगर रत्नदिप
   कोणी ताज साठी लढले
   कोणी राज साठी लढले
    स्वभिमान आहे मला
    माझे बाबासाहेब या
     बहुजनासाठी लढले

जे होते जवळ ते भिमाने पेरले
       नेत्याने ते फक्त
    आपलेच घर भरले
      वाघ असुन स्वता
       घरा मध्ये दडले
   स्वभिमान आहे मला
    माझे बाबा साहेब
  बहुजनासाठी लढले

जे पाईक होते भिमाचे टी.व्ही
        बीवी आन
     खोलीसाठी लढले
    सुंदर ही बाग भिमाची
  तिचे पानोना पान झडले
    स्वभिमान आहे मला
     माझे बाबासाहेब
   बहुजनासाठी लढले

निवडणुकिच्या रिगनात
 जरी बाबासाहेब पडले
  घटना लिहुनी भीमाने
    सारे रेकार्ड तोडले
   स्वभिमान आहे मला
    माझे बाबासाहेब या
    बहुजनांसाठी लढले

     लिंगच्या युध्दात
   कित्येक ध्येय पडले
 आई बहीनीना आमच्या
    कित्येकांनी छळले
हक्क आणि शांतसाठी
फक्त बाबासाहेब लढले
 स्वभिमान आहे मला
  माझे बाबासाहेब या
  बहुजनांसाठी लढले

  विश्वामध्ये झाले आहे
    एकचं गोष्ट सिध्द
आचार विचार ऋनितीने
बुध्दांचा धम्म आहे शुध्द
पाहीजे फक्त भगवान बुध्द
  स्वभिमान आहे मला
    माझे बाबासाहेब
   बहुजनांसाठी लढले

     !!  जय भिम  !!

करोडपती असलेले *महात्मा फुले*

 🌋
*कृपया वेळ काढून अवश्य वाचा*

संदर्भ- *""किशन सूर्यवंशी""*
 यांच्या *महात्मा फुले* यांचे खरे वारसदार कोण?
या पुस्तकातून

1 - करोडपती असलेले *महात्मा फुले*
हे 1890 साली मरण पावतात ;
तेव्हा त्यांचे पार्थिव स्मशानभूमीत घेऊन जातात पण त्यांच्या चितेला अग्नी कोणीच देत नाहीत; याचे कारण म्हणजे या *महात्मा फुले* यांना जो मुलगा असतो तो दत्तक घेतलेला असतो त्या मुळे समाजातील काही कर्मठ लोक अग्नी देवू देत नव्हते;

यशवंत मुलगा अग्नी देण्यास पुढे जायचा पण पुरोहित व जातभाई लोक यशवंताला मागे ढकलून देत ;
हा खेळ बराच वेळा चालला;
*महात्मा फुले* यांचा पार्थिव पडून आहे ;
तर त्याला शेवटच्या क्षणी देखील धर्मग्रंथ आडवा आला शेवटी *सावित्रीबाई फुले* पुढाकार घेऊन प्रेताला अग्नी दिला

विचार करा जीवंतपणी फुल्यांच्या शरीराची विटंबना अपमान बामनांनी केला पण मेल्यावरही जातीतील लोकं देखील ब्राह्मणी विचाटधारेच्या प्रभावाने विटंबना करतात. यावर *फुले* अनुयायी विचार करतील काय?

2 - दुसरी एक घटना अशी की *महात्मा फुले* यांची सून म्हनजे यशवंताची पत्नी पुण्यात राहत होती ;
अतिशय गरीब अवस्थेत खायला अन्न नाही राहायला घर नाही ;
अशाच वेळेस एक दिवस असा आला घरातील सर्व अन्न संपले घरात कपाळावर लावायला एक रुपया नाही;

अशा वेळी त्या माऊलीने आपले घर शंभर रुपयात विकून टाकले व फुले यांनी लिहिलेले पुस्तके रद्दीत विकून दिवसाची गुजराण केली व दुसऱ्या दिवशी सकाळी मरण पावली;

तर मग तीचे प्रेत तसेच पडून आहे;
पण दफन करायला पुढे कोणीही आले नाही ;
दिवसभर ते प्रेत सडत आहे त्याचा वास येतोय; जातीचे लोक कोणीच तिकडे गेले नाही;
शेवटी पुणे महानगर पालिका ने ते प्रेत बेवारस म्हनून जाहीर केले व अंत्यसंसकार केला

विचार करा त्या काळात या फुल्यांच्या वडीलांचे मासिक उत्पन्न बारा लाख रुपये होते;

तर रतन टाटा यांच्या उत्पन्न फक्त वीस हजार रुपये होते म्हणजे *फुलेनकडे दोनशे एकर शेती होती* व काही प्रमाणात फुलझाडे लावत; संदर्भ (हरी नरके लिखित पुस्तक )

विचार करा आम्ही शिकून साहेब बनावे यासाठी *फुलेनी*
जीवनाची माती केली पण त्यांचा शेवट हा पशु प्रमाणे व्हावा ही बहुजनांना साठी शरमेची गोष्ट आहे;
जगाच्या पाठीवर फुले हालहाल होवून मेले मग आम्ही घरात त्यांचा फोटोदेखील लावत नसू तर हा किती कृतघ्नपणा करत आहोत याचा विचार केला पाहिजे;

एकदा *सावित्रीबाई फुले* आपल्या पतीला म्हणाल्या की आपण मेल्यावरही बहुजन समाजाचे कसे होईल? ही चळवळ पुढे कोण चालवणार? तेव्हा *फुले* उत्तर देताना
सांगितले की "" माझ्या शरीरात असलेल्या प्रत्येक *रक्ताच्या थेंबातून बहुजनाच्या घरात *महात्मा फुले* *जन्म घेतील* ""

विचार करा *फुलेनी* बहुजनावर किती विश्वास ठेवला
मग सांगा आतापर्यंत किती फुले जन्मले? एकही नाही

मग *महात्मा फुले* चुकीचे बोलले की त्यांचे अनुयायी चुकीचे वागले याचा आम्ही विचार केला पाहिजे

जर उदयोगपती असलेले हे *फुले*
यांनी  समाजाचा विचार केला नसता तर त्यांचे वारस जीवंत राहिले असते व आजचे रतन टाटा ;बिर्ला; अंबानी; सचिन तेंडुलकर व अमिताभ बच्चन या साऱ्या श्रीमंत लोकांना *महात्मा फुले* यांच्या वारसदाराने विकत घेऊन घरी पाणी भरायला लावले असते एवढे गर्भश्रीमंत राहीले असते
पण *फुलेंनी* समाज हितासाठी स्व वडीलोपार्जित सम्पत्तिचा त्याग केला आज आम्ही त्यांचे अनुयायी त्यांचा विचार देखील जोपासत नाही........

आणि यावर विचार ही करू नये

 🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
🏵येड्या गबाळ्याने वाचू नये🏵
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵

आणि यावर विचार ही करू नये

👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻
आपल्या देशातील लबाड माणसांचे प्रमाण अधिक आहे.. .


👶🏻ज्यांनी उत्तम *शेती* सांगितली त्यांनी कधीही शेती केली नाही.

👶🏻ज्यांनी *गाय* पवित्र आहे सांगितले त्यांनी कधीही गाय सांभाळली नाही की तीचे *शेण* काढले नाही.

👶🏻 ज्यांनी  *सत्यनारायण* सांगितला त्यांनी कधीही सत्यनारायण घातला नाही.

👶🏻ज्यांनी *अन्नदान* महादान सांगितले त्यांनी कधीही पुढ्यातला घास दुसर्‍याला भरवला नाही.

👶🏻ज्यांनी *शांती* सांगितली
त्यांनी कधीही शांती केली नाही.

👶🏻ज्यांनी *चारोधाम* सांगितले
त्यांनी कधीही चारोधाम केले नाहीत.

👶🏻ज्यांनी *फुले-सावित्रीमाई, डॉ. बाबासाहेब* यांच्या *महिला* शिक्षणाला विरोध केला
त्यांच्याच महिला सर्वात जास्त शिकल्या आहेत.

👶🏻ज्यांनी पोथ्यांमध्ये
*सिमोल्लंगन, परदेशगमनाला जाणे धर्मद्रोह किंवा पाप* आहे असे सांगितले आणि विरोध केला तेच सर्वात जास्त *एन आर आय* आहेत.

👶🏻 ज्यांनी सदा कनिष्ठ *नोकरी* म्हटले तेच सर्वात जास्त नोकरीत आहेत.

👶🏻 *मातृ-पितृ देवो भव* म्हणणाऱ्यांचेच *माता-पिता* अनाथ आश्रमात आहेत.

👶🏻 *एकादशी*ला अन्न खावू नका म्हणणारे चिवडा खावून टुम्म होतात.

👶🏻कधीही *मंदिर* न बांधणारे
कायम मंदिरात असतात आणि तिथे कायम *हक्क* गाजवित असतात.

👶🏻इतरांना *पारायण* सांगणारे
कधीही पारायण ऐकत नाहीत.

👶🏻 *परशुरामाला* माननारे
*श्रीरामाच्या* मंदिराचा वाद घालतात.

👶🏻शिवरायांची जन्मतारीख उपलब्ध असताना मुद्दामहुन शिवजयंतीचा तिथी आणि तारीख असा वाद पेटवितात व पावलोपावली शिवरायांचा अवमान करतात.

पण स्वतः मात्र आपल्या बापजाद्यांचे जन्मदिवस तारखेप्रमाणेच करतात.

👶🏻वारकऱ्यांना *दिंडीत* पायी पाठवणारे स्वतः *कार*ने प्रवास करतात.

👶🏻 *छत्रपतींना* राजा होण्यास विरोध करणारे यवनांचे पाय चाटतात.

👶🏻हिंदु राजा होण्यास *विरोध* करणारेच हिंदू राष्ट्राची मागणी करतात.

👶🏻धर्मांद पोपनी सॉक्रेटीस, कोपरनिकपस, गॅलीलिओ, येशू या विवेकवादी (विज्ञानवादी) महापुरुषांना सुळावर चढविल्याचे चूक आहे हे हळ-हळ व्यक्त करीत सांगतात.

स्वतः मात्र इथल्या विवेकवादचा चार्वाक, तुकोबा, रविदास, बसवेश्वर, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी करतात.

😳भारतातील लोक शिकले पण कधी बहुतांशी शहाणे झाले नाहीत
किंबहुना, शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांनीच शाळेत देवपूजा व तत्सम गोष्टींना प्राधान्य देऊन चेष्टा मांडली.

T-shirt of Dr. Ambedkar

T-shirt of Dr. Ambedkar

Dr. Ambedkar's Books in Hindi

Dr. Ambedkar's Books in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Popular Posts