
कॉलेज मधे असतांना एक ठाकुर नावाची मैत्रीण कायम आपल्या जातीने राजपूत असण्यावर गर्वाने मिरवत म्हणायची "हम राजपूत है, वीरता हमारे खून में है " च्यायला तिचे हे वाक्य ऐकून लय underestimate झाल्यासारख वाटायच..तसे राजपूत नाव खुप ओवररेटेड करुन ठेवलाय पण
सिविल सर्विसेस ची तयारी करत असतांना कळले, राजपूत हे कधी वीर नव्हतेच,उलट त्यांच्या हारन्या मागे lack of strategy and unity होती..भारत कॉन्सेप्ट सोबत त्यांचे काही विशेष घेण् देन नव्हते.."अपना कुनबा और अपन"..त्यांच्यातील अंर्तगत/घरगुती वाद आणि द्वंद्व मुळे ब्रिटिशांना भारतात easy access मिळाला..!!

साधारण 2010-2011 ला पहिल्यांदा माझ्या वाचन्यात भीमा कोरेगाव गेले..सुरुवातीला खुप अतिशयोक्ति वाटली की, 500 लोक 28000 लोकांना कसे काय मारू शकतील..पण जसे जसे वाचन वाढले,खरा इतिहास वाचला तेव्हा कळले ,,खरच ते लोक खुप मोठे लढवय्ये होते..500 शूरवीर एकजुटीने 28000 लोकांचा खात्मा करुन विजय खेचून आणतात ,त्यामागे केवळ लढाई जिंकने हां उद्देश् नक्कीच नसू शकतो..पेशवाई चा उन्माद, ब्राम्हणवादाचा कळस आणि दलित बहुजनांवर झालेल्या अन्यायाचा बदला घेवून पेशवाईचा अंत करने..!! त्या शुरवीरांनी अनेक लढाया जिंकल्या असतील पण भीमा कोरेगाव युद्ध् त्यांच्यासाठी अस्मितेची लढाई होती..सळसळत्या रक्ताचे, डोक्यावर कफ़न बांधून निघालेल्या त्या शूरवीरांनी येणाऱ्या पिढ्यांसाठी स्वताच्या रक्ताने इतिहास लिहीला आणि हिम्मत असेल तर एक माणूस छप्पन लोकांवर पण भारी पडतो हे सिद्ध करुन दाखवले..!!!

बाबासाहेबांनी घडवलेल्या इतिहासा मागे भिमाकोरेगावचा खुप मोठा वाटा असावा.....!!!
तर एकंदरित काय...माझ्या पूर्वजांचा इतिहास खुप अभिमानास्पद व गौरवशाली आहे...यूनिटी आणि स्ट्रेटेजी चे उत्तम उदाहरण म्हणजे भीमा कोरेगाव..अस्मितेची लढाई म्हणजे भिमाकोरेगाव..अन्यायाच्या विरुद्धचे बंड म्हणजे भीमाकोरेगाव..छप्पन ला एक भारी म्हणजे भीमा कोरेगाव..
मला गर्व आहे माझ्या पूर्वजांवर..!!
मला गर्व आहे माझ्या पूर्वजांवर..!!
स्वताच्या जातिधर्मावर कधी गर्व करावसा वाटला नाही पण हां "वीरता हमारे खून में है....!!!! - by Chetana Sawai

No comments:
Post a Comment