Buy books of DR BR Ambedkar, Buddhism, Dalit, Adiwasi & Bahujan Topics

Powered by Blomming for nikhilsablania

Friday, January 1, 2016

िशवाजी महाराज आणि बाबासाहेब


प्रतेक अम्बेडकरी व्यक्तिनी जरुर वाचावे ...खुप गैरसमज आहेत शिवाजी अणि बाबासाहेबाबद्दल.....

मुद्दामपणे शिवाजी ,बाबासाहेब आंबेडकर मराठा समाज ह्या गोष्टी घुसडवण्याचा प्रयत्न कुठलीही अभ्यास नसलेली व्यक्तीच करू शकते . प्रत्येक महापुरुषाची स्वतःची ओळख वेगळीच असते त्या त्या काळाची परिस्थिती त्यातील बदल त्या काळानुरूप महापुरुषाकडून होतात .शिवरायांनी मावळ्यांना एकत्र करून राजकीय बदल केला परंतु त्यांना धार्मिकतेचा डोंब ब्राह्मणी परंपरा असल्याने सामाजिक बदल ते करू शकले नाहीत हे एक सत्य आहे .

"1:- महाडच्या चवदार तळ्याच्या सत्यागृहावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जावून शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यानी "जय शिवरायच्या" घोषणा दिल्या. बाबासाहेबांनी महाड चवदार तळ्याच्या सत्यागृहाची सुरुवात शिवरायांचे दर्शन घेवून केली."

- --> सदर पहिला मुद्दा पोष्ट करणाऱ्याने टाकलेला आहे .यात सत्याग्रहाची सुरुवात शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेऊन केली हे म्हणणे अगदी अज्ञानी वृत्तीने आणि कुठलीही माहिती न घेता केलेले आहे .महाडचा ऐतिहासिक चवदार तळ्याचा सत्याग्रह २० मार्च १९२७ ला झाला .अनेक इतिहासाची पाने चाळली अनेक खंड जरी चाळून बघितले तरी बाबासाहेब चवदार तळ्याच्या सात्याग्रहापुर्वी रायगडावर गेलेच नव्हते त्यामुळे रायगडावर जाऊन दर्शन घेऊन सत्याग्रहाची सुरुवात केली हे चुकीचे आहे .बाबासाहेब रायगड किल्ला बघण्यासाठी आपल्या अनेक लोकांसोबत २९ डिसेंबर १९२७ ला गेले होते तेंव्हा रात्री आपल्या अनुयायासोबत मुक्काम केला असता ,बाबासाहेब आंबेडकर यांचावर प्राणघातक हल्ला करण्यासाठी ५० ते ६० मराठा लोक बंदुकी ,हत्यारे घेऊन गडाच्या दिशेने निघाल्याची बातमी महार कार्यकर्त्यांना कळाली तेंव्हा रात्री गडाच्या पायथ्याशी बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर जमल्यामुळे मराठा समाजातील हल्लेखोर तिथे भीतीने येउच शकले नाही .( संदर्भ – भीमराव रामजी आंबेडकर खंड ३ ,ले .चांगदेव भगवानराव खैरमोडे , पा.नं .२१३ ). उलट हा प्रकार होऊन केसरी या वृत्तपत्राने तत्कालीन आमदार नारायण गुंजाळ यांचे बाबासाहेबांच्या वरील आक्षेपार्ह्य भाषण छापून आंबेडकर यांनी शिवाजीच्या सिंहांसणावर बसून सिंहासन भ्रष्ट केले .त्यावर बाबासाहेबांनी नारायण गुंजाळ आणि केसरी चे संपादक नरसोपंत केळकर यांना नोटीस पाठवली .त्याही नंतर "कुलाबा समाचार " या वृत्तपत्राने "डॉ .आंबेडकरांच्या रायगडावरील लीला " असे हेडिंग देऊन आगपाखड केली .यानंतर रा .चित्रे ,सहस्त्रबुद्धे या सारख्या ब्राह्मणमंडळींनी बाबासाहेबांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी मराठा समाजाला समजवण्यासाठी व्याख्याने दिली .

"2:- बेळगाव येथे शिवरायांच्या ३०० व्या जन्मशताब्दीनिमित्त प्रमुख पाहूने
म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर उपस्थितहोते."

---> माझ्या माहितीप्रमाणे अस कुठलही व्याख्यान बाबासाहेबांनी दिलेलं नाही जर असेल त्याचा संदर्भ द्यावा .

"3:- बाबासाहेब आंबेडकर पत्र लिहतांना पत्राची सुरुवात
"जय शिवराय" लिहून करत होते. महाराष्ट्र शासनाने हि पत्रे प्रकाशित केलेली आहेत."

---> महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या या खंडात एकूण २३६पत्रे आहेत.या ग्रंथाची एकुण पृष्ठ संख्या ४३४ आहे. त्यातल्या नेमक्या कोणत्या पत्राची सुरूवात बाबासाहेबांनी "जय शिवराय" लिहून केलीय हे समजून घ्यायला मला आवडेल.निदान या खंडात तरी असे एकही पत्र नाही. मी बाबासाहेंबांची इतरही प्रकाशित / अप्रकाशित पत्रे पाहिलेली व वाचलेली आहेत. माझ्या पाहण्यात तरी असे कोणतेही पत्र आलेले नाही. हे खुद्द महाराष्ट्र शासनाच्या "डॉ .बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे" प्रसिध्द करणाऱ्या प्रा .हरी नरके यांच मत आहे त्यामुळे बाबासाहेबांना कनिष्ठ दाखविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे .दोन्ही महापुरुष आपापल्या योग्य ठिकाणी आहेत पण वर्णव्यवस्थेत शुद्र ठरलेल्या जातीसाठी हा प्रकार करणे अगदी चुकीचा आहे .

"4:- ज्या मनुस्मृती या विषमतावादी ग्रंथामुळे शिवरायांचा राज्याभिषेक ब्राम्हणांनी नाकारला होता.तो मनुस्मृती हा ग्रंथ बाबासाहेबांनी रायगडाच्या पायथ्याशी जाळून शिवरायांच्या अपमानाचा बदला घेतला."

- --> वरील मुद्दाही अगदी हास्यास्पद आहे . शिवरायांच स्वराज्य ,बहुजन मावळ्यांना सोबत घेऊन मिळविलेल स्वराज्य राजकीयदृष्ट्या अगदी सत्य आणि आदरणीय असल तरी त्याकाळी धार्मिक सत्ता जे ठरवील वैदिक परंपरा जे सांगेल तेच केल्याशिवाय त्याला मान्यता नव्हती . याबद्दल खुद्द डॉ .बाबासाहेब आंबेडकर आपल्या Who were Shudras? अर्थात शुद्र पूर्वी कोण होते ? या ग्रंथात पान.क्र. १९५ वर लिहितात कि " शिवाजी एका स्वतंत्र राज्याचा राज्यकर्ता होता व त्यानी स्वत :ला महाराजा व छत्रपती हे खिताब घेतलेले होते .त्याच्या प्रजेपैकी बरेचसे ब्राम्हण होते .अशी परिस्थिती होती तरीसुद्धा आपला राज्याभिषेक विधी करवून घेण्याच्या बाबतीत शिवाजीला एकाही ब्राम्हणावर सत्ता गाजविता आली नाही .राज्यभिषेकाचा विधी जर कायदेशीर ठरवायचा असेल तर तो ब्राम्हणाच्या हातून झाला पाहिजे ही गोष्ट शिवाजीच्या उदाहरणावरून स्पष्ट झालेली आहे ,म्हणून ते उदाहरण महत्वाचे आहे .राज्याभिषेकाचा विधी जर ब्राम्हणेतराच्या हातून करण्यात आला तर तो विधी सफल होत नसतो .म्हणजे तो वांझ ठरतो ." यावरून ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना चातुर्वर्ण वैदिक परंपरेत मनुस्मृती नुसार शुद्र ठरविले होते परंतु शिवाजी महाराजांनी काशीच्या गागा भट ला अमाप संपत्ती देऊन हा विधी घडवून आणला होता एकंदरीत ब्राह्मणी व्यवस्था तोडण्याऐवजी शिवाजी महाराजांनी त्याच व्यवस्थेत राहून त्याच पालन राज्याभिषेकासाठी करणे उचित मानले होते त्यासाठी होणारा विरोध असून पण त्या वर्णव्यवस्थेच्या बेड्या तोडण्याऐवजी त्यात राहणेच उचित समजले होते .हे ही ऐतिहासिक सत्य आहे त्यामुळे वरील मुद्द्यातील राज्यभिषेक आणि मनुस्मृती दहन याचा कसलाच सबंध नव्हता .मनुस्मृती मधील अमानवीय गोष्टीना विरोध म्हणून मनुस्मृतीने दहन केले होते .

"5:- बाबासाहेब म्हणतात संविधान लिहते वेळी मला जास्त ञास झाला नाही कारण छञपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होते.म्हणूनच मी संविधान लिहु शकलो."

- --> वरील मुद्दाही अगदी हास्यास्पद आणि खोडसाळपणाचा आहे . डॉ .बाबासाहेबांनी भारताचे संविधान लिहिताना अत्यंत कष्ट घेतले होते प्रचंड अभ्यास केला होता .५२ देशांच्या घटनांचा अभ्यास तसेच बाबासाहेबांच्या लिखाणात वाचनात बुद्धकालीन इतिहास होता त्यामुळे बुद्धकालीन गणराज्य पद्धती जी लोकशाही मार्गाने निर्णय घेत असत त्यात अनेक गणराज्य होती लीच्छ्वी सारखी गणराज्ये होती जी लोकशाही पद्धतीने राज्य करीत होती .तसेच भगवान बुद्धाच्या समता ,स्वातंत्र्य ,बंधुत्व ,न्याय या तत्वांचा अंतर्भाव राज्यघटनेत बाबासाहेबांनी केलेला होता . त्यामुळे शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते म्हणून संविधान लिहू शकलो ही वाक्ये टाकणे म्हणजे हा मूर्खपणा आणि खोडसाळपणा आहे असे मी समजतो यात शिवाजी महाराजांचा विरोध आजीबात नाहीच पण अशा पोष्ट प्रसारित करणाऱ्या मूर्ख लोकांच्या अडाणीपणाची कीव वाटते . शिवाजी महाराजांचं स्वराज्य राजकीयदृष्ट्या सत्य जरी असलं तरी धार्मिक ,सामाजिक ,शैक्षणिक दृष्ट्या अस्पृश्य ,शुद्रातीशुद्र लोकांना जातीयव्यवस्थेच्या पायथ्याशीच राहावे लागत होते . निवडक प्रतिनिधित्व किल्लेदार ,जहागीरदार महार ,अस्पृश्य लोक जरी असले तरी त्यांच प्रमाण प्रातिनिधिक स्वरुपात होत . शिवाजी महाराजांना राजकीयदृष्ट्या अधिकार जरी असले तरी सामाजिक ,धार्मिक ,शैक्षणिक बदल करण्याचा अधिकार नव्हता . अस्पृश्य महार लोक निवडक किल्लेदार ,जहागीरदार जरी असले तरी त्यांना अष्टप्रधानमंडळात कुठे स्थान होत ? अष्टप्रधानात असलेली मंत्रीमंडळात मोरोपंत त्रिंबक पिंगळे , रामचंद्र निलकंठ, अण्णाजीपंत दत्तो, दत्ताजीपंत त्रिंबक, हंबीरराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, निराजीपंत रावजी, रघुनाथराव पंडीत या सारख्या मंडळीमध्ये अस्पृश्य शुद्रांतीशुद्र वर्ग कुठे होता ? आजची पडका सिंहगड किल्ला निरखून पहिला असता "महार टाके" ,"मराठा टाके" असे पिण्याचे पाण्याचे हौद त्याकाळी वेगवेगळ्या स्वरुपात होते त्यामुळे शिवाशिव ,बाट ,अस्पृश्यता त्याकाळी होतीच एक राजा म्हणून एक आदेश जर शिवरायांनी दिला असता तर एका आदेशाने अस्पृश्यता जातीयता नष्ट होऊन समानता निर्माण झाली असती तिथे खरच स्वराज्य समानतेवर असत तर तिथे बाबासाहेबांना हालापेष्टा सहन कराव्या लागल्या नसत्या ,तिथे खरच स्वराज्य समोर असत तर संविधान लिहिण्याची गरजही पडली नसती .

"6:- बाबासाहेब आंबेडकर लहान असतांना "कृष्णराव. अर्जुन केळुस्कर" गुरुजींनी त्यांना "बुद्ध चरित्र"
भेट दिले होते. या चरित्रामुळे बाबासाहेबांना धर्मांतराची प्रेरणा मिळाली. केळुस्कर गुरुजी जन्माने"मराठा" होते."

---> हे जरी खर असलं केळुस्कर गुरुजींनी शालेय जीवनात बाबासाहेबांना सदैव प्रेरणा दिली पण त्यांची जात मराठा होती म्हणून जातीसाठी अशा पोष्ट्द्वारे गवगवा करणे योग्य वाटत नाही . बाबासाहेबांनी पुढे चालून प्रत्येक धर्माचा अभ्यास केला बौद्ध धर्माची निवड केली त्यामुळे मराठा जातीमुळे केळुस्कर श्रेष्ठ ठरले आणि त्यांनी बुद्धचरित्र भेट दिल म्हणून बाबासाहेबांना धर्मांतर करण्याची प्रेरणा मिळाली असे म्हणणे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी होय .अस असेल तर केळुस्कर गुरुजींनी अगोदरच बौद्ध धर्म स्वीकारला नसता का ?

"7:-छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर "बैरीस्टर" झाल्यावर, त्यांची कोल्हापूर शहरात रथातून मिरवणूक काढून फुले उधळली होती."

---> अगदी बरोबर शाहू महाराजांनी जे बाबासाहेबांना जातीच्या बाहेर जाऊन हेरल होत ते सवर्ण जातीत अडकणारे जातीचाच विचार करू शकतात त्याही काळात शाहू महाराज अस्पृश्यांसाठी सामाजिक बदल करीत होते तेंव्हा आता जे त्यांना जातीत गोठवण्याचा प्रकार करणारे लोक त्यांना "धेडांचे महारांचे राजे" म्हणून उल्लेख करत .

"8:-राजा सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना परदेशात शिक्षणासाठी सहाय्य केले होते. सयाजीराव गायकवाड जन्माने मराठा होते....."

---> परत इथे जातीच्या किडलेल्या मनाचा दुर्गंध येतो सायाजीरांवाना जातीच्या बेड्यात अडकवून केवळ ते मराठा होते म्हणून श्रेष्ठ होते आणि त्यांनी बाबासाहेबांना परदेशात जाण्यासाठी सहाय्य केल .मुळात सयाजीराव गायकवाड यांच्या प्रशासनात नियम होता कि जे जे विद्यार्थी निष्णात आहेत ,हुशार आहेत मग ते जातीने ,कुळाने कुणीही असो त्यांना शिक्षणानासाठी आर्थिक सहाय्य करणे अर्थात आजच्या भाषेत बँकाप्रमाणे ऋण लोन देणे आणि त्याची परतफेड आपल्या संस्थानामध्ये नोकरीमधून त्या विद्यार्थाचे कर्ज परतफेड घेणे अर्थात बाबासाहेबांनी परदेशातून परत आल्यावर पिता रामजीचा विरोध पत्कारून बडोदा संस्थानात प्रचंड जातिवाद असताना सुद्धा नोकरी करून त्यांचे ऋण फेडले अर्थात रामजीबाबाना बडोदा मधील हे जातीचे चटके त्रास माहित होता म्हणून ते बाबासाहेबांना जाण्यापासून रोखत होते .तरीसुद्धा बाबासाहेबांनी चटके सहन करून संस्थानाच्या कराराच पालन केल .

"9:- बाबासाहेब आंबेडकरांनी शिका आणि संघटीत व्हा हा संदेश मराठा बहुजनांना दिला.
"चांभार घराण्यात जन्माला आलेला नेपोलीयन बोनापार्ट अर्ध्या युरोप खंडाचा बादशाह झाला. अरे ज्याच्या आई बापाचा पत्ता नाही तो रेंसमन हेरॉलड ब्रीटन चा पंतप्रधान झाला. लाहनपणी कोळशाच्या खाणीत काम करणारा अब्राहम लिंकन अमेरीकेचा राषट्राध्यक्ष झाला अरे पण मानुसकी नाकारलेल्या समाजात जन्मलेला आपला " भिमराव " या देशाचा शिल्पकार झाला..........! "

- --> सदर मुद्यात बाबासाहेब देशाचे शिल्पकार आहेत हे डोळे लावून सत्य असलं तरी शिका ,संघटीत व्हा ,संघर्ष करा हा संदेश समस्त भारतीयास दिला त्यालाही विशिष्ट जातीलाच दिला किंवा केवळ मराठा बहुजनांना दिला असा नाही तर भारतातील प्रत्येक नागरिकास दिलेला आहे . युरोप खंडात जातीव्यवस्था किंवा जात नावाची गोष्ट अस्तित्वात नव्हती ना आहे ही जातीयव्यवस्था आणि चातुर्वर्णव्यवस्थेत शुद्राती शुद्र ठरविलेली जात नेपोलीयन बोनापार्ट ला लावणे केवळ हास्यास्पद गोष्ट आहे .

सदर पोष्ट अनेक महिन्यापासून सोशल मिडिया मध्ये फिरतात आणि काही जण अभ्यास न करता इतिहासाची जाण न ठेवता सदर मजकूरच प्रमाण आहे असे मानून तोच खरा इतिहास मानत असतील तर हा निव्वळ अडाणीपणा आहे .इथे बाबासाहेब आंबेडकर ,शाहू महाराज यांना जातीचे लेबल लावून एकमेकांवर अप्रत्यक्षपणे उपकार केलेले आहे अस भासवून जातीचा अंहभाव दाखविणे आणि महापुरुषाचा जय जयकार करणे दोन्हीही विरोधाभासी आहे . बाबासाहेब असो कि शाहूमहाराज त्या त्या काळानुरूप या महापुरुषांनी काळाचा विचार करून पाऊले उचलली आहेत .शिवाजी महाराजांची सामाजिक बदलापेक्षा स्वराज्य मिळवणे अग्रणीय मानले ती त्या काळाची गरज म्हणून आणि बाबासाहेबांनी सामाजिक बदलासह मानवजातीच्या अधिकारासाठी मानवमुक्तीचा लढा दिला तोही मोठा श्रेष्ठच आहे .त्यामुळे सदर अश्या अनेक पोष्ट  आहेत ज्यात बाबासाहेबंशी जोडुन दुसर्याला मोठ करण्यात आलेले आहेत  म्हणून मला खोट्या आधार नसलेल्या गोष्टींचा गवगवा यांचे खंडण करावे वाटले म्हणून हा सदर लेख .

महार शब्दाची निर्मिती कशी झाली?

महार शब्दाची निर्मिती कशी झाली?
मित्रहो सनातनी जातिवादी लोक
बहुजनाना महार
म्हणून संबोधित
करत .ह्या शब्दाची निर्मोती कशी झाली ते
आपण पाहू
१ महर नागांचा विदर्भ प्रदेशात प्रवेश
प्राचीन काळी महर नाग लोकानी इ .स
पूर्व १०००
च्या सुमारास हस्तिनापुर वर आपले
राज्य प्रस्थापित
केले होते .
महर नाग आणि वैदिक आर्य
यांच्याता सत्ता व
संस्कृति संघर्ष अधिकाधिक तीव्र होत
गेला उत्तर
भारतात नाग लोकानी आपली अनेक
राज्ये स्थापन केलि होती .त्यातील
महर
नागांनी मध्यप्रदेश - बिलासपुर
जिल्हा -येथील मल्हार
भागातून विदार्भाच्या भूमित
मोठ्या संखेनी प्रवेश
केला व आपल्या वसाहती कायम
केल्या त्यात
नयाकुंड ,महुरझरी ,भागिमहारी ,पवनार ,etc .या वासहतिचे
केंद्र स्थान नागपुर हे होते .विदर्भातील
लोकानी बौद्ध धम्माचा स्वीकार
तथागत जिवंत असतानाच केला होता .

२ महाराष्ट्रात बौद्ध धम्माचा प्रचार
सम्राट अशोकाने तिसरया धम्म
संगीति नंतर
महाधम्मरक्खित नावाचा भिक्कू महारठ
(महाराष्ट्र )
येथे
पाठवला होता .त्यानी अशोकाच्या अदेशाचे
शिलालेख व स्तूप निर्माण केले . त्यात
चंद्रपुर
जिल्ह्यातील देवटेक आणि ठाने
जिल्ह्यातील
सोपारा ,कान्हेरी येथील गुहेत बुद्ध
मुर्त्या प्राप्त झाल्या .

 ३ महर ह्या शब्दाचे अपभ्रंश रूप महार असे झाले
महर ह्या शब्दाचे अपभ्रंश रूप महार असे
झाले त्यावरून
या भूमीला महाराष्ट्र हे नाव पडले .
महर या शब्दाचा अर्थ सरदार ,नायक
असा होतो .ही एक
श्रेष्ट उपाधि आहे .कालांतराने
वाकाट्काच्या काळ पासून
येथील बौद्ध असलेल्या महर नागा वर
अन्याय व जुलुम करण्यात आले भिक्षु
संघाला हाकलून देण्यात आले .याच
भिक्षु संघाने पुढे महाराष्ट्रात इतरत्र
पलायन करुन
उत्कृष्ट अश्या बौद्ध लेण्या कोरुन बुद्ध
धम्म जिवंत
ठेवला .ज्या महर नाग
लोकानी आपला बौद्ध धम्म
सोडन्यास नकार दिला त्यांच्या वर
हिन्दू कडून अनेक
अन्याय करण्यात आले व त्याना महार
या तुच्छ नावाने संबोधण्यात येऊ
लागले .त्यांच्या कडून उत्पन्नाची सर्व
साधने काढून
घेण्यात आली प अस्पृश्य म्हणून
त्याना गावा बाहेर
राहण्यास भाग पाडले
तेच खरे नाग लोक होते .आणि म्हनुनच
विश्वरत्न
डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र
परिवर्तानाकारिता नागपुर या
शहराची निवड केलि .
तर मित्रहो जातिवाद्याना दाखवून
दया की ज्याना तुम्ही महार म्हणून
हिनवले ते
तुमच्यापेक्षा श्रेष्ठ अश्या नाग वंशाचे
आहेत .आम्ही आधीही हिन्
नव्हतो आणि आता ही नाही
गर्व असुद्या बुद्धिस्ट असल्याचा.

👊 स्वाभिमानी जयभीम 👊

बौध्दांनी 31 डिसेंबर साजरा करू नये


बौध्दांनी 31 डिसेंबर साजरा करू नये...
=======================
आप णास सर्वांना नम्र विनंती करतो  की,
३१डिसेंबर दारू पार्टी करने मौज मजा म्हणून
साजरा करु नका, कारण याचं दिवशी आपल्या
५०० सैनिकांनी रात्री पायी प्रवास करुनं
भिमा नदीच्या तिरावर पोहचले, व भुकेने
व्याकुळ होऊन सुद्धा आपल्या जिवाची पर्वा
न करता २८००० पेशव्यांना चरचर कापले,सोबतं
असलेले इंग्रज सैनिक २८००० पेशवे सैनीकांना बघुन
माघारी परतले,...
फक्त आपल्या ५०० सैनिकांनी हिम्मत न हारता
लढले. १ जानेवारीची लढाई जिंकली,....
आणी कोणी ही कोणाला नवीन इंग्रजी
वर्षाच्या शुभेच्छा देऊ नका, कारणं ही
गुलामीची निशाणी आहे, ती जपु नका,...
आपलं नवीन वर्षे २१ मे (२०१६)बुद्ध पौर्णिमेला सुरु
होतयं तेव्हा सदिच्छा द्या, तेव्हा अख्ख्या
भारताला कळेल बुद्ध वर्षे कायं आहे ते, हा संदेश
३१ डिसेंबर पर्यन्त प्रत्येक व्यक्ती पर्यन्त
पोहचला पाहीजे, समाज जागृत झाला पाहिजे....
आपल्याला या दिवसाचा इतिहास कायं आहे,
हे समजु नये, यासाठी मनुवादी लोकं
दारु,पार्ट्या करण्यात गुरफटुन ठेवतं असतात,तरी
तुम्ही कोनाच्या दारु व पार्ट्या करण्यात
खाण्यास बळी पडु नका, गुरफटतं बसु नका,आपली
संस्कृती कायं आहे, हे जाणुन घेण्याचा प्रयत्न करा.
आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भिमाकोरेगाव
येथे शूर शहीद सैनिकांना मानवंदना देण्यास न चुकता दरवर्षी जात असत.
म्हणून आपण देखील आपला स्वाभिमान गहान न ठेवता स्वाभिमानाने १ जानेवारी
शूर शहीद सैनिकांना मानवंदना देण्यास गेलेच पाहिजे .
बदल नक्कीचं घडेल,...
फक्त स्वत:पासुन सुरुवात करा,..
! जयभीम ! !! नमोबुद्धाय!! !!! जयभारत!!!
डॉ. आंबेडकर आणि विवेकानंद लवकरच नोटांवर दिसणार !

नवी दिल्ली | भारतात चलनी नोटांवर लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांचे छायाचित्र दिसणार आहेत. तसा प्रस्ताव राष्ट्रीय सल्लागार परिषदेने केंद्राकडे पाठविला आहे. शिक्षण, अर्थ, आणि नियोजन विषयातील तज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी या नोटांवर महात्मा गांधी यांच्याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांची छायाचित्रे असावीत अशी सूचना केली आहे.
कोणत्याही देशातील करन्सीवर त्या देशांतील दिग्गज नेत्यांची छायाचित्रे असतात. भारतात १९९६ पूर्वी नोटांवर महात्मा गांधीव्यतिरिक्त अशोक स्तंभाचा फोटो छापण्यात येत होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून सर्व नोटांवर महात्मा गांधींचे फोटो आहेत. यात बदल करून डॉ. आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांचे फोटो छापले जावेत. असे मत जाधव यांनी बैठकीत व्यक्त केले. समितीच्या पहिल्याच बैठकीमध्ये मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही सूचना केली आहे, असे जाधव यांनी सांगितले आहे. 
जाधव यांनी केलेली सूचना केंद्र सरकार मान्य करेल की नाही यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. मात्र, नुकतीच सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्रे असलेली नाणी जारी केली आहेत. भारतीय नोटांवर डॉ. आंबेडकर यांचा फोटो असणे हे एक महत्वाचे पाऊल असेल, असे जाधव यांचे मत आहे.
सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली एनएसीमधील जाधव हे एकमेव सदस्य आहेत ज्यांना मोदी सरकारमध्ये महत्वाचे स्थान दिले आहे. 
-- 
#आधी विचार जन्म घेतात, मग कृती ! - स्वामी विवेकानंद

जागतिक किर्तीच्या भारतीय शुर सैनिकांच्या शौर्य दिनांच्या आणि नवीन वर्षीच्या आपणास खुप खुप सदिच्छा

जागतिक किर्तीच्या भारतीय शुर सैनिकांच्या
शौर्य दिनांच्या आणि नवीन वर्षीच्या आपणास खुप खुप सदिच्छा 

सविनय जय भिम 
1 जानेवारी नवीन वर्ष आणि भारतीय शुर  सैनिकांनी विजय प्राप्त केलेला शौर्य दिवस म्हणजे 
      " पुणे जिल्ह्यातील  भिमा कोरेगाव " येथे उभारण्यात आलेला विजय स्तंभ या आपल्या पुर्वजांनी केलेल्या शौर्याला आपण मानवंदना देण्यासाठी येत असतो 
बाबासाहेब जीवंत असे पर्यत प्रत्येक वर्षाच्या 1 जानेवारीला न चुकता भिमा कोरेगाव ला येत असत " 
अन्याय सहन करण्याची ही एक मर्यादा असते त्या काळात पेशवाईने बहूजनांना जगणे मुश्किल केले होते किती अन्याय अत्याचार करत होते 
मग एकदाचा का अन्याय सहन करण्यपलीकडे गेला तर मग भिमा कोरेगाव घडला जातो "
म्हणजे 500 सैनिककांनी 25000 ते 28000 पेशव्यांच्या सैनिकांना मारणे जीवंत कापणे हे कोणा गबाळ्याचे काम नाही 
या आधी आणि नंतर हि कोणत्या सैनिकांनी अशी कामगिरी केली नाही 

म्हणुन आता ही आमच्यावर अन्याय अत्याचार करणारयांनी आमचा इतिहास पहा 
आमच्या गरीब बांधवांचे छळ करत आहे कितीतरी खेड्यात काहीचे प्राण गमवावे लागले आहेत.  आमची आमच्या तरुण पिढीची सहनशक्ती संपल्यावर तरुण पिढीचे नेतृत्व हे सुशिक्षित नव युवकाच्या आणि कोणाला मँनेज न होणारयाच्या हातात राजकारणाचे नेतृत्व करील त्या दिवशी नक्की पुन्हा एकदा भिमा कोरेगाव घडवु . 
आणि एकदा तरी नक्कीच 
भिमा कोरेगाव सारखा इतिहास घडवावा लागेल तो पर्यत आपल्यावरील  अन्याय अत्याचार संपणार नाही असे दिसते 

आणि आजच्या दिवशी या शौर्य दिनी एकच सांगुशी वाटतेय 
शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणुन जगा " असे बाबासाहेब बोलले होते 
म्हणजेच कोणावर अन्याय अत्याचार करत असेल तर त्यांनी त्याच्यावरील अन्याय दुर करण्यास कोण तरी नेता येईल हा पक्ष आंदोलन करील तो आम्हाला न्याय मिळवून देईल   किंवा ते सहन करण्यापेक्षा एक दिवस जगा पण जे असे अन्याय अत्याचार करत असेल त्याची पुर्ण मुळेच काढुन तोडुन टाका कि परत त्या मुळाना कधीच पालवी येणार नाही त्या मुळाना कधीच कोंब पण येणार नाही 
मगा  छत्रपती शिवाजी राजे गनिमी कावा करुण  ज्या प्रमाणे करुन शत्रुवर विजय मिळवत होते त्याप्रमाणे करा किंवा वाघासारखे समोरा समोर येऊन हल्ला करा पण अशा अन्याय अत्याचार करण्यची मुळे आपणच तोडुन टाका 

आणि जे भिमा कोरेगाव ला 1 जानेवारी या दिवशी या शुर सैन्यांच्या पराक्रमाला त्या विजयस्तभांला अभिवादन करण्यास येतात ते नक्कीच कधीच कोणता अन्यय सहन करणार नाही आणि त्यांनी कधीच अन्याय सहन ही करु नये 
कारण आपले पुर्वज हे भिमा कोरेगावचे शुर सैनिक होते हे विसरु नका 
कळावे 
यश -सिध्दी

फडणवीस आणि ढोंगी पुरोगामी

फडणवीस आणि ढोंगी पुरोगामी

- विजय चोरमारे,December 31

कोणतीही व्यक्ती 'आपल्या' माणसात आली की जरा मोकळी ढाकळी होते. औपचारिकता बाजूला ठेवून बोलण्यात मोकळेपणा येतो. मोठ्या पदावरील व्यक्ती असेल तर काहीकाळ पदाचा विसर पडतो. मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तसेच होत असावे बहुधा. मुंबईच्या कमालीच्या उकाड्यातही जाकिट घातल्यामुळे गुदमरत असणार. परंतु नागपूरला रास्वसंघाच्या दसरा मेळाव्यात संघाची हाफपँट घातल्यावर मोकळे मोकळे वाटत असणार. अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मिळणारा सन्मान हवाहवासा वाटत असला तरी विदर्भवाद्यांच्या बैठकीत त्यांना जरा आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांमध्ये आल्यासारखे वाटत असणार. असाच त्यांचा आणखी एक परिवार म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. अलीकडेच अभाविपचे सुवर्ण महोत्सवी प्रदेश अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला ते आवर्जून उपस्थित राहिले. कार्यकर्त्यांच्या या मेळाव्यामुळे अभाविपमधील मंतरलेले दिवस जिवंतपणे अनुभवायला मिळाले, अशी भावनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखविली. ते स्वाभाविकही आहे म्हणा. त्यांनी कोणत्या कार्यक्रमांना जावे, कुणासोबत ऊठबस करावी हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर जी जबाबदारी येते, त्या जबाबदारीने त्यांनी बोलावे, अशी अपेक्षा बाळगली तर ती चुकीची ठरू नये.

प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार अभाविपच्या अधिवेशनात त्यांनी भाषणाचा जो सूर लावला, तो जरा काळजी वाढवणारा होता. ढोंगी पुरोगामित्वाच्या विरोधात ठामपणे उभे राहण्याचे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले. त्यांच्या म्हणण्यानुसार 'समाजात ढोंगी पुरोगामित्वाचा पुरस्कार करणारी मनोवृत्ती वाढत आहे. राष्ट्रवादी विचार म्हणजे मागास विचार, बुरसटलेले विचार असा समज पसरविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. अशा ढोंगी पुरोगामित्वाच्या विरोधात ठामपणे उभे राहावे लागेल.'

इंग्रजांनी पुरोगामी व आधुनिकतेचे चित्र निर्माण केले. तर, स्वातंत्र्यानंतर विरोधकांनी पुरोगामी, प्रतिगामी अशी लेबले चिकटवून समाजात अपसमज निर्माण केल्याची टीका त्यांनी केली. ज्यांना समाजकारण व राजकारणात स्वत:चे प्रभुत्व आणि तरुण नेतृत्व निर्माण करता आले नाही, अशांनी काही क्षेत्रातील वर्चस्वाच्या जोरावर समाजात अपसमज पसरविण्याचा जोरदार प्रयत्न केला. यामुळे आपल्या शिक्षण व्यवस्थेलाच धक्का बसला असून, या धक्क्यातून सावरण्याचे कार्य अभाविपच करू शकते.' असेही फडणवीस यांना वाटते.

अर्थात फडणवीस यांना काय वाटावे, हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. परंतु जे फडणवीस यांना वाटते, तेच जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर ते चिंताजनक म्हणावे लागेल. कारण त्यांनी थेट पुरोगामी विचारधारेवर हल्ला केला आहे. पुरोगामी विचारधारेचा पुरस्कार करणाऱ्या लोकांची ढोंगी म्हणून संभावना केली आहे. आतापर्यंत रास्व संघ, सनातन, विश्वहिंदू परिषदेचे नेते-प्रवक्ते पुरोगाम्यांना ढोंगी म्हणत होते. आता तीच भाषा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वापरत आहेत.

गेल्या दोन वर्षांतील महाराष्ट्रातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या वक्तव्यांकडे पाहताना त्यातील 'बिट्विन द लाइन्सही' पाहाव्या लागतात. त्यांच्या मतानुसार संघाचे विचार, अभाविपचे विचार, भाजपचे विचार हे राष्ट्रवादी विचार आहेत. या विचारांवर टीका करणारे सगळे ढोंगी पुरोगामी आहेत. त्याअर्थाने पाहिले तर त्यांचा रोख थेटपणे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्याकडे जातो. दाभोलकर आणि पानसरे यांनी धर्माच्या नावावर लोकांच्या मनात विद्वेषाच्या भिंती निर्माण करणाऱ्या, धर्माच्या नावावर लोकांची लुबाडणूक आणि शोषण करणाऱ्या शक्तिंविरोधात लढा दिला. पानसरे यांचा लढा अधिक व्यापक आणि जगण्याच्या अनेक अंगांना स्पर्श करणारा होता. महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुरामी प्रवृत्तीच्या धोक्यांबाबत ते समाजात जाणीवजागृती करीत होते. हे असे काम करणाऱ्या लोकांच्या वाट्याला काय आले, तर गोळ्या घालून मृत्यू. दोघांच्याही हत्या झाल्यानंतर थोडेच दिवस संशयितांच्या कॅम्पमध्ये शुकशुकाट होता. थोडे दिवस गेल्यानंतर सगळे पुन्हा हालचाल करू लागले. आडून आडून दाभोलकर, पानसरे यांच्यावर टीका करू लागले. पुरोगामी हा शब्द शिवीसारखा वापरू लागले. जातीयवादी आणि धर्मवादी शक्तिंच्या विरोधात लढणाऱ्या लोकांना ढोंगी पुरोगामी म्हणू लागले. हत्येच्या आरोपावरून अटक केलेल्यांच्या निषेधार्थ मोर्चे निघू लागले. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे त्यांच्याच विचारांची सत्ता असल्यामुळे हे राष्ट्रवादी विचारांचे लोक रस्त्यावर उतरून खुलेआम संशयित हल्लेखोरांचे समर्थन करू लागले.

संघपरिवारातल्या नेत्यांनी, प्रवक्त्यांनी ही भाषा वापरली तर समजू शकते. परंतु जेव्हा राज्याचे मुख्यमंत्रीच ढोंगी पुरोगाम्यांचा समाचार घेतात, तेव्हा त्यांना कोणता संदेश द्यायचा आहे, हे लक्षात येते. राज्याच्या प्रमुखांची वैचारिक दिशा कोणती आहे, हेही स्पष्ट होते. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या नियंत्रणाखालील यंत्रणांकडून नीट तपास होईल, यावर विश्वास कसा ठेवायचा ?

प्रतिगामी शक्तिंचा उन्माद आणि हिंसक कृत्ये देशाने पाहिली आहेत. तरीही राज्याचे मुख्यमंत्री ढोंगी पुरोगामित्वाला आव्हान देतात. संघपरिवारातल्या विद्यार्थी संघटनेपुढे जाऊन ढोंगी पुरोगामित्वाविरुद्ध उभे राहण्याचे आवाहन करतात. मुख्यमंत्र्यांनी फक्त विरोधात उभे राहण्याचेच आवाहन केले. थोडे पुढे जाऊन ढोंगी पुरोगाम्यांना नेस्तनाबूत करा, असे म्हणाले नाहीत, हे महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीवर त्यांचे उपकारच म्हणावे लागतील.

माझ्या पूर्वजांचा इतिहास खुप अभिमानास्पद व गौरवशाली आहे


कॉलेज मधे असतांना एक ठाकुर नावाची मैत्रीण कायम आपल्या जातीने राजपूत असण्यावर गर्वाने मिरवत म्हणायची "हम राजपूत है, वीरता हमारे खून में है " च्यायला तिचे हे वाक्य ऐकून लय underestimate झाल्यासारख वाटायच..तसे राजपूत नाव खुप ओवररेटेड करुन ठेवलाय पण
सिविल सर्विसेस ची तयारी करत असतांना कळले, राजपूत हे कधी वीर नव्हतेच,उलट त्यांच्या हारन्या मागे lack of strategy and unity होती..भारत कॉन्सेप्ट सोबत त्यांचे काही विशेष घेण् देन नव्हते.."अपना कुनबा और अपन"..त्यांच्यातील अंर्तगत/घरगुती वाद आणि द्वंद्व मुळे ब्रिटिशांना भारतात easy access मिळाला..!!
www.cfmedia.in
साधारण 2010-2011 ला पहिल्यांदा माझ्या वाचन्यात भीमा कोरेगाव गेले..सुरुवातीला खुप अतिशयोक्ति वाटली की, 500 लोक 28000 लोकांना कसे काय मारू शकतील..पण जसे जसे वाचन वाढले,खरा इतिहास वाचला तेव्हा कळले ,,खरच ते लोक खुप मोठे लढवय्ये होते..500 शूरवीर एकजुटीने 28000 लोकांचा खात्मा करुन विजय खेचून आणतात ,त्यामागे केवळ लढाई जिंकने हां उद्देश् नक्कीच नसू शकतो..पेशवाई चा उन्माद, ब्राम्हणवादाचा कळस आणि दलित बहुजनांवर झालेल्या अन्यायाचा बदला घेवून पेशवाईचा अंत करने..!! त्या शुरवीरांनी अनेक लढाया जिंकल्या असतील पण भीमा कोरेगाव युद्ध् त्यांच्यासाठी अस्मितेची लढाई होती..सळसळत्या रक्ताचे, डोक्यावर कफ़न बांधून निघालेल्या त्या शूरवीरांनी येणाऱ्या पिढ्यांसाठी स्वताच्या रक्ताने इतिहास लिहीला आणि हिम्मत असेल तर एक माणूस छप्पन लोकांवर पण भारी पडतो हे सिद्ध करुन दाखवले..!!! 
बाबासाहेबांनी घडवलेल्या इतिहासा मागे भिमाकोरेगावचा खुप मोठा वाटा असावा.....!!!
तर एकंदरित काय...माझ्या पूर्वजांचा इतिहास खुप अभिमानास्पद व गौरवशाली आहे...यूनिटी आणि स्ट्रेटेजी चे उत्तम उदाहरण म्हणजे भीमा कोरेगाव..अस्मितेची लढाई म्हणजे भिमाकोरेगाव..अन्यायाच्या विरुद्धचे बंड म्हणजे भीमाकोरेगाव..छप्पन ला एक भारी म्हणजे भीमा कोरेगाव..
मला गर्व आहे माझ्या पूर्वजांवर..!!
स्वताच्या जातिधर्मावर कधी गर्व करावसा वाटला नाही पण हां "वीरता हमारे खून में है....!!!! - by Chetana Sawai

T-shirt of Dr. Ambedkar

T-shirt of Dr. Ambedkar

Dr. Ambedkar's Books in Hindi

Dr. Ambedkar's Books in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Popular Posts