Buy books of DR BR Ambedkar, Buddhism, Dalit, Adiwasi & Bahujan Topics

Powered by Blomming for nikhilsablania

Friday, January 1, 2016

डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणता

डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,
"मी माझ्या आयुष्याची ५५ वर्षे जर
सरकारी नोकरीत असतो, तर मला आता सेवानिवृत्ती होणे भागच पडले असते .परंतु मी माझ्या आयुष्यातील एकमेव धेय्याखातीर बड्या पगाराच्या नोक-या नाकारल्या आहेत .
हे सांगत असतांना पुढे बाबासाहेब म्हणाले,
"इकॉनाॅमिक्स विषयातील परदेशातील पदवी घेऊन भारतात परतलेला मी केवळ
अनुसूचित जातीमधुनच नव्हे, तर
संपूर्ण भारतातून पहिला होतो.
मुंबईत पाय टेकताच मुंबई सरकारने
मला राजकीय अर्थशास्त्राचे
प्राध्यापकपद
स्वीकारण्याची विंनती केली. मी जर
ती मान्य केली असती तर आज मला लठ्ठ
पगार मिळाला असता. पण मी ती नाकारली. कारण सरकारी नोकर
व्हायचे म्हणजे
आपल्या लोकांच्या उन्नतीसाठी काम
करायच्या तुमच्या इच्छेवर
स्वाभाविकच मर्यादा पडतात.
त्यानंतर पुन्हा मी पुढील शिक्षण
घेण्यासाठी इंग्लंडला गेलो. तेथून पात्रता संपादन करून आल्यावर पुन्हा मला जिल्हा न्यायाधीशाचे
पद देऊ करण्यात आले. तीन वर्षात
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर नेमण्याचे आश्वासनही त्यासोबत दिलेले होते.
त्यावेळी मला धड शंभर रुपये हि मिळत
नव्हते. अत्यंत गरीब
लोकांसाठी बांधलेल्या चाळीतील एका खोलीत मी तेव्हा राहत होतो. तरीही मी तो देकार नाकारला. जर
मी ती नोकरी केली असती, तर
सुखवस्तूपणाची हमी मिळाली असती. पण
माझ्या सहबांधवांच्या कल्याणाचे व उन्नतीचे प्रयत्न करण्याचे
माझ्या आयुष्याचे ध्येय सफल
करण्याच्या मार्गात त्या नोकरीमुळे
अडथळे उत्पन्न झाले असते. या एकाच
करणाने मी नकार दिला.
१९४२ साली पुन्हा माझ्यासमोर एक
पर्याय आला होता. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी माझी नियुक्ती होऊ
घातली होती. ती झाली असती तर मी आर्थिकदृष्ट्या तर श्रीमंत झालोच असतो, शिवाय दहा वर्षानंतरच्या सेवेनंतर
मी सुखाची जिंदगी जगली असती. पण
"माझ्या लहानपणापासून
जेव्हा मला आयुष्याचा अर्थ समजू लागला, तेव्हापासून मी जीवनाचे एक तत्व सतत अनुसरत आलो. ते म्हणजे माझ्या समाज बांधवांची सेवा करण्याचे. एव्हढे
लक्ष मी कधीच दुस-या प्रश्नाकडे दिले नाही. अस्पृश्यांचे हितसंबंध मला सुरक्षित केलेच पाहिजेत. माझ्या आजवरच्या आयुष्याचे तेच
ध्येय होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जेंव्हा माझा मुलगा यशवंतचा मृत्यु झाला होता, तेंव्हा कांही लोक माझ्याकडे येऊन यशवंतसाठी 'कफन' आणायला पैसे मागायला आले होते. पण माझ्याकडे स्वतःच्या मुलाला कफन विकत आणण्यापूरते सुध्दा पैसे नव्हते. शेवटी माझी पत्नी, रमाबाईने, आपल्या स्वतः च्या अंगावरील साडीचा एक पदर फाडून दिला आणि मग आम्ही यशवंतला त्यामध्ये गुंडाळून स्मशानात घेऊन गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, या मी जेवढी गरीबी अनुभवली आहे, तेवढी गरीबी कदाचित भारतातील एकाही नेत्याने आनुभवली नसेल.मी गरीब असूनही कधी गरीबीचे कारण सांगून माझा स्वाभिमान व माझे आंदोलन कधीच कमी पडू दिले नाही. एवढी गरीबी असूनही मी पैशासाठी विकलो गेलो नाही आणि यापुढील आयुष्याचेही तेच ध्येय राहणार आहे आणि हेच ध्येय प्रत्येकाने आपल्या डोळ्यासमोर ठेवून
आपल्या प्रत्येक रक्ताच्या माणसांसाठी काम करीतच रहावे. प्रत्येकाने आपल्या समोर एक धेय बनवा आणि आपल्या बांधवाना एकत्रीत करा. कारण तुम्ही एकत्र आल्याशीवाय तुम्ही कोणालाही लढा देऊ शकत नाहीत. कारण एकीचे बळ हे कोणीही जगात मोडू शकत नाही. म्हणून खूप शिका, संघटीत व्हा, आणि संघर्ष करा.
"गरीबीमुळे स्वाभिमान गहान टाकू नका."
विचार करा.. देश घडवा...

जात प्रतिबंध कायदा.( अॅट्रासिटी अॅक्ट) SC, ST आत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989.

💥जात प्रतिबंध कायदा.( अॅट्रासिटी अॅक्ट)💥
SC, ST आत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989.

जात प्रतिबंध कायदा हे फार मोठे हत्यार SC,ST यांना दिले आहे. या कायद्यांची प्रखर पणे आमलबजावनी व्हावी व दलितांवर आन्याय होउ नये यासाठी हा कायदा तयार केला. 👉फक्त जाती वाचक बोलले म्हणजे अॅट्रासिटी लागते आसा गैरसमज आहे पण 
👉21 मुद्द्यावर हे कलम लागू होते. हा कायद मेडियात पाठवन्याचा माझा उद्देश आसा आहे की लोकांना या कायद्यांची जानीवी जागृती व्हावी व गुन्हा करनार्याला कायदा कळावा आसे गुन्हे घडणार नाहीत.हाच उद्देश.

कलम 3(1)1:- योग्य व अयोग्य पदार्थ खान्या- पिन्याची सक्ती करणे.

कलम 3(1)2:- इजा,अपमान करणे व ञास देने.

कलम 3(1)3:- नग्न धिंड काडने, मानवी अप्रतिष्ठा करणे.

कलम 3(1)4:- जमीनीचा गैर प्रकारे उपभोग करने.

कलम 3(1)5:- मालकीच्या जमिन, जागा पाणी, वापरात अडथळा निर्माण करने.

कलम 3(1)6:- बिगारीची कामे करन्यास सक्ती/भाग पाडणे.

कलम 3(1)7:- मतदान करण्यास भाग पाडणे, धाक दाखवणे.

कलम 3(1)8:- खोटी केस, खोटी फौजदारी करने.


कलम 3(1)9:- लोक सेवकास खोटी माहिती पुरवणे.

कलम 3(1)10:- सार्वजनिक ठिकाणी अपमान करने.

कलम 3(1)11:- महिलांचे विनयभंग करने.

कलम 3(1)12:- महिलेचे लैंगिक छळ करने.

कलम 3(1)13:- पिण्याचे पाणि दुषित करने किंवा घान करने.


कलम 3(1)14:- सार्वजनिक ठिकानी प्रवेश नाकारणे.

  कलम 3(1)15:- घर, गांव सोडण्यास भाग पाडणे.


कलम 3(2)1,2:- खोटी साक्षा व पुरावा देने.

कलम 3(2)3:- नुकसान करन्यासाठी आग लावणे.

कलम 3(2)4:- प्रार्थना स्थळ अथवा निवार्यासआग लावणे.

कलम 3(2)5:- IPC नुसार 10 वर्ष दंडाची खोटी केस करने.

कलम 3(2)6:- पुरावा नाहिसा करने.

कलम 3(2)7:- लोकसेवकाने कोणताही अपराध करने.

एवढया प्रकारे जात प्रतिबंध कायदा लावता येतो.

👉🔧फिर्याद नोंदवितांना घ्यावयाची काळजी.🔧


●●फिर्याद दाखल करावयास आल्यानंतर ठ!णेदाराने विना विलंब तक्रार नोंदउन घ्यावी.

●FIR मध्ये फिर्यादीचे व आरोपीचे नाव, जात, पत्ता काळजी पुर्वक स्पष्ट लिहावा. घटना कोनत्या कारणावरून घडली होती ते स्पष्ट नमूद करावे. फिर्याद उशीरा दाखल केली आसल्यास उशीराचे कारण लिहावे.जातीवाचक शिवीगाळ अथवा दुसरा कोनताही प्रकार आसेल त्याचा स्पष्ट उल्लेख करावा.
आरोपीच्या जातीच्या पुराव्यासाठी त्याच्या TC दाखला, पोलिस पाटील, तलाठी, सरपंच, ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र.
फिर्यादीची व आरोपीची वैद्यकीय तपासनी करून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे.

गुन्हा नोंद झाल्या नंतर त्याच दिवसी जिल्हा पोलीस अधीक्षक , DOS,SDM, तहसिलदार व विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांना दुरध्वनी/फोन व्दारे संबंधित पोलीस स्टेशनने कळवावे.

जिल्हा समाजकल्याण अधिकारी कडे खालील कागदपत्रे त्वरित पाटवावीत.

1) FIR . 
2) घटणा स्थळ पंचनामा. 
3) आत्याचार ग्रसतांचा जातीचा दाखला.
 4) अरोपीच्या जाती बाबत TC. तलाठी, ग्रामसेवक यांचे प्रमाणपञ.
5) अत्याचार ग्रसताचा वैद्यकीय तपासनी अहवाल व आरोपपत्र.आथिर्क मदतकसाठी वरील कागलपञ देने/ दाखल गरजेचे आहे.
हि माहिती मी माहितीच्या अधिकाराखाली मिळवली आहे तरी सर्वानी या साठी एकत्रीत येणे गरजेचे आहे ...

कायदा माझ्या भीमाचा

________कायदा  माझ्या  भीमाचा ______  

कलम १- कायद्याचे नाव.
कलम २- भारतात केलेल्या अपराधास शिक्षा.
कलम ३- भारताच्या हद्दी बाहेर केलल्या अपराधाची चौकशी / शिक्षा.
कलम ४- परमुलकी अपराधास हा कायदा लागू.
कलम ५- अमुक कायद्यास हा अधिनियम लागू नाही.
कलम ६- ह्या कायद्यातील लक्षणांस अपवाद.
कलम ७- अर्थपूर्ण शब्द.
कलम ८- लिंग.
कलम ९-वचन.
कलम १०- पुरूष - स्त्री हया शब्दाचा अर्थ.
कलम ११- मनुष्य.
कलम १२- साधारण सर्व लोक.
कलम १३- हुकुमशाही / राजेशाही  रद्द .
कलम १४- शासकीय सेवक.
कलम १५/१६- रद्द.
कलम १७- सरकार.
कलम १८- भारत.
कलम १९- जज्ज.
कलम २०- न्यायाचे कोर्ट.
कलम २१- लोकसेवक.
कलम २२- जंगल मालमत्ता.
कलम २३- गैरलाभ / गैरहानी.
कलम २४- लबाडीने.
कलम २५- कपटाने.
कलम २६- समजण्यास कारण.
कलम २७- बायको.
कलम २८-नकली पदार्थ.
कलम २९- दस्तावेज.
कलम २९(अ)- विदूत नोंदी.
कलम ३०- मुल्यवान रोखा.
कलम ३१- मृत्यूलेख.
कलम ३२- कृत्याच्या करण्यास / वर्जनास लागू शब्द.
कलम ३३- कृती, अकृती.
कलम ३४- सामायिक इरादा.
कलम ३५- गुन्ह्याच्या इराद्यानं कृत्य.
कलम ३६- अंशतः समजून कृत्य.
कलम ३७- अपराधांना सामील होणे.
कलम ३८- अपराधांचा दोष येणे.
कलम ३९- आपरकशीने / इजापुर्वक.
कलम ४०- अपराध.
कलम ४१- विशेष कायदा.
कलम ४२- स्थलविशेषाचा कायदा.
कलम ४३- गैरफायदा, कायद्याने करणे पात्र.
कलम ४४- क्षती / हानी.
कलम ४५- जीव.
कलम ४६- मरण.
कलम ४७- प्राणी.
कलम ४८- नाव.
कलम ४९- वर्ष.
कलम ५०- कलम.
कलम ५१- शपथ.
कलम ५२- इनामाने / शुद्ध हेतूने.
कलम ५२(अ)- आसरा देणे / आश्रय अपवाद.
कलम ७६- कायदेशीर बांधील असलेल्या व्यक्तीने
                 तथ्य विषयक चुकभुलीमुळे केलेली कृती
                 अपवाद होत नाही.
कलम ८२- सात वर्षे वयाखालिल बालकाने केलेली
                 कृती.
कलम ८३- सात वर्षावरील व बारा वर्षा खालील.
                अपरिपक्व समजशक्ती असलेल्या
                 बालकाने केलेली कृती.
कलम ८४- वेड्या मनुष्याने केलेले कृत्य.
कलम ९०- भीतीमूळे दिलेली संमती.
कलम ९६- खासगीरीत्या बचाव करण्याचा अोघात
                 केलेली गोष्ट.
कलम ९७- शरीराचा व मालमत्तेचा खासगीरीत्या 
                 बचाव करण्याचा हक्क.
कलम १००- शरीराचा खासगीरीत्या बचाव 
                   करण्याचा हक्क हा मृत्यू घडून
                   आणण्याईतपत केव्हा व्यापक
                    असतो.
कलम १०१- असा हक्क मृत्यूहून अन्य अपाय
                   करण्याइतपत केंव्हा व्यापक
                    असतो.
कलम १०२- शरीराचा खासगीरीत्या बचाव
                   करण्याचा हक्क सुरू होणे व
                   चालू राहाणे.

******साह्य करण्या विषयी. *******     

कलम १०७- एखादे कृत्य करण्या विषयी साह्य.
कलम १०८- अप्रेरक.
कलम १०९- अपप्रेरकामूळे परिणामत: .
कलम ११४- अपराधाचे वेळी साह्य करणारा
                   जवळ असणे. 
कलम १४१- बेकायदेशीर जमाव.
कलम १४२- बेकायदेशीर जमावाचा घटक असणे.
कलम १४३- शिक्षा.
कलम १४४- प्राणघातक हत्त्यारासह बेकायदेशीर
                   जमावात सामील होणे.
कलम १४५- बेकायदेशीर जमावाला पांगविण्याचा
                   आदेश झाल्याने माहीत असूनही 
                    सामील होणे.                          
कलम १४६- दंगा भरणे.
कलम १४७- दंगा करण्याबद्दल शिक्षा.
कलम १४९- विधिनीयूक्त जबाबदारी.
कलम १५१- ५ किवा अधिक व्यक्तींना पांगण्याचा
                   आदेश मिळाल्यानंतर जाणीवपूर्वक
                    थांबून राहणे.
कलम १५३(अ)- धर्म, वंश,जन्म, निवास, भाषा ई.
                      कारणावरून निरनिराळ्या गटांमध्ये
                      शत्रुत्व वाढविणे.
कलम १५९- दंगल.
कलम १६०- दंगली बद्दल शिक्षा.
कलम १७०- लोकसेवकाची बतावणी करून
                   तोतयागीरी करणे.
कलम १७१- लोकसेवक वापरतो तशी गर्दी किवा
                   अोळख चिन्ह कपट करण्याच्या 
                    उद्देशाने वापरणे परिधान करणे.

*****लोकसेवकांच्या कायदेशीर अधिकाराच्या
           अपमाना विषयी *******

कलम १७२- समन्सची बजावणी किवा इतर
                  कारवाई टाळण्यासाठी फरारी होणे.
कलम १८१- लोकसेवक यांच्या समोर शपथेवर
                  खोटे कथन करणे.
कलम १८८- लोकसेवकाने जारी केलेला आदेश न
                   माणने.

***** खोटा पुरावा आणि सार्वजनिक न्यायाच्या
             विरोधी अपराध *****

कलम २०१- अपराध्याला वाचवण्यासाठी
                    अपराध्याचा पुरावा नाहीसा करणे
                    किवा कोटी माहिती देणे.
कलम २२३- लोकसेवकाने हयगयीने कोणास
                  कैदेतून पळून जाऊ देणे.
कलम २७९- सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीर
                  वाहन चालविणे.
कलम २९२- अश्र्लिल पुस्तके ई. विक्री करणे.
कलम २९५- कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान
                   करण्याच्या उद्देशाने उपासना स्थानांचे
                   नुकसान करणे किवा ते अपवित्र करणे.
कलम २९५(अ)- कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किवा
                    धार्मिक श्रद्धांचा अपमान करून 
                    धार्मिक भावनांवर अत्याचार 
                    करण्याचा उद्देशाने कृती करणे.
कलम २९८- धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देशाने
                   जाणीव पुर्वक शब्द उच्चारणे.
कलम २९९- सदोष मनुष्यवध.
कलम ३००- खून.
कलम ३०२- खुना बद्दल शिक्षा.
कलम ३०४- सदोष मनुष्यवधाबद्दल शिक्षा.
कलम ३०४(अ)- हयगयीने मृत्यूस कारण.
कलम ३०४(ब)- हुंडाबळी.
कलम ३०६- आत्महत्येला अपप्रेरणा देणे.
कलम ३०७- खुनाचा प्रयत्न करणे.
कलम ३२३- इच्छापुर्ण दुखापत पोहोचण्या बद्दल
                   शिक्षा.
कलम ३२४- घातक हत्त्याराने किवा साधनांनी 
                   इच्छापुर्वक जबर दुखापत पोहचवणे.
कलम ३२५- इच्छापुर्वक जबर दुखापत
                  पोहचवण्याबद्दल शिक्षा.
कलम ३२६- घातक हत्त्याराने किवा साधनांनी
                   इच्छापुर्वक जबर दुखापत
                   पोहचवीणे.
कलम ३२६(अ)- अॅसिड ई. वापर करून इच्छापुर्वक
                     जबर दुखापत पोहचवीणे.
कलम ३२६(ब)- इच्छापुर्वक अॅसिड फेकणे अथवा
                    फेकण्याचा प्रयत्न करणे.
कलम ३२८- अपराध करण्याच्या उद्देशाने विष ई.
                  सहाय्याने दुखापत करणे.
कलम ३३०- कबुलीजबाब जबरीने घेण्यासाठी,
                   गेलेला माल परत घेण्यासाठी 
                  इच्छापुर्वक दुखापत करणे.
कलम ३३२- लोकसेवकाला धारकाने त्याच्या
                  कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी
                  इच्छापुर्वक दुखापत करणे.
कलम ३३६- इतरांचे जीवित किवा व्यक्तिगत
                  सुरक्षितता धोक्यात आणणारी
                  कृती.
कलम ३३७- इतराचे जीवित किवा व्यक्तीगत
                   सुरक्षितता धोक्यात आणणार्या
                    कृतीने दुखापत पोहचवीणे.
कलम ३३८- इतरांचे जीवित किवा व्यक्तिगत
                   सुरक्षितता धोक्यात आणणार्या
                    कृतीने जबर दुखापत पोहचवीणे.
कलम ३३९- गैरनिरोध / अन्यायाने प्रतिबंध 
                    करणे.
कलम ३४०- अन्यायाने कैदेत ठेवणे.
कलम ३४१- गैरनिरोधाबद्दल शिक्षा.
कलम ३४२- फौजदारी पात्र बलप्रयोगाबद्दल शिक्षा.
कलम ३४९- बलप्रयोग.
कलम ३५०- फौजदारी पात्र बलप्रयोग.
कलम ३५१- हल्ला / अंगावर जाणे.
कलम ३५२- फौजदारी पात्र बलप्रयोगाबद्दल शिक्षा.
कलम ३५३- लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून
                  धाकाने प्रारूप्त करण्यासाठी फौजदारी
                   पात्र बलप्रयोग करणे.
कलम ३५४- स्त्रिची विनयभंगकरण्याच्या उद्देशाने
                   तिच्यावर हमला किवा फौजदारीपात्र
                   बलप्रयोग.
कलम ३५४(अ)- लैगिक छळाबद्दल शिक्षा.
कलम ३५४(ब)- निर्वस्त्र करण्याच्या उद्देशाने
                     तिच्यावर हमला किवा फौजदारी
                     बलप्रयोग करणे.
कलम ३५४(क)- चोरून अश्लील चित्रण करणे.
कलम ३५४(ड)- चोरून पाठलाग करणे.
कलम ३४९- अपहरण / मनुष्य चोरून नेणे.
कलम ३६२- अपहरण / पळवून नेणे.
कलम ३६३- अपहरणाबद्दल शिक्षा.
कलम ३७०- व्यक्तीचा गुलाम व्यापार करणे.
कलम ३७५- बलात्कार.
कलम ३७६- बलात्काराबद्दल शिक्षा.
कलम ३७७- अनैसर्गिक संभोग शिक्षा.
कलम ३७८- चोरी.
कलम ३७९- चोरीबद्दल शिक्षा.
कलम ३८०- राहते घर वैगेरे ठिकाणी चोरी.
कलम ३८३- जुलमाने घेणे.
कलम ३८४- शिक्षा.
कलम ३९०- जबरी चोरी.
कलम ३९१- दरोडा.
कलम ३९२- जबरी चोरीबद्दल शिक्षा.
कलम ३९३- जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणे.
कलम ३९५- दरोड्याबद्दल शिक्षा.
कलम ४०५- फौजदारी विश्र्वासघात.
कलम ४०६- शिक्षा.
कलम ४०९- लोकसेवकाने, सावकार,एजेंट यांनी
                   अन्यायाने विश्र्वासघात करणे.
कलम ४१०- चोरीची मालमत्ता.
कलम ४११- अप्रामाणिकपणे चोरीची मालमत्ता
                   स्वीकारणे.
कलम ४१५- ठगवणूक.
कलम ४१७- ठगवणूक करण्याबद्दल शिक्षा.
कलम ४२०- ठगवणूक करणे आणि मालमत्ता
                   देण्यास नकार देणे.
कलम ४२५- अपक्रीया.
कलम ४२६- अपक्रीया बद्दल शिक्षा.
कलम ४३५- १००रू. पर्यंतच्या किवा शेतमालाच्या
                    १०रू.किमतीच्या नुकसान करण्याच्या
                    उद्देशाने स्फोटक पदार्थ अथवा विस्तव
                   याद्वारे आगळीक करणे.
कलम ४४१- फौजदारी पात्र अतिक्रमण किवा
                    घराविषयी आगळीक.
कलम ४४२- गृह अतिक्रमण किवा घराविषयी 
                   आगळीक.
कलम ४४३- चोरटेगृह अतिक्रमण.
कलम ४४४- रात्रीच्यावेळी चोरटेगृह अतिक्रमण
                    करणे.
कलम ४४५- घरफोडी.
कलम ४४७- फौजदारी पात्र अतिक्रमणाबद्दल शिक्षा.
कलम ४४८- घर अतिक्रमणाबद्दल शिक्षा.
कलम ४५२- दुखापत, हमला,करण्याची पूर्वतयारी
                   करून नंतर गृह अतिक्रमण करणे.
कलम ४५४- कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या
                   अपराध करण्यासाठी चोरटेगृह
                    अतिक्रमण किवा घरफोडी करणे.
कलम ४५७- कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या
                    अपराध करण्यासाठी रात्रीच्या वेळी
                     चोरटे गृह अतिक्रमण किवा घरफोडी
                      करणे.
कलम ४६३- बनावटी लेख करणे.
कलम ४६५- बनावटी करण्याबद्दल शिक्षा.
कलम ४६८- फसवणूक करण्यासाठी बनावटी करणे. कलम ४९८(अ)- एखाद्या स्त्रीच्या पतीने किवा
                      नातेवाईकाने तिला क्रूर वागणूक देणे. कलम ५०४- शांतताभंग करण्याच्या उद्देशाने अपमान
                    करणे.
कलम ५०६- फौजदारी पात्र धाकदपटशाबद्दल शिक्षा.
कलम ५०९- विनयभंग करण्याच्या उद्देशाने हावभाव
                   किवा शब्दचोर करणे.
कलम ५११- अाजिवन कारावासाच्या किवा अन्य
                   कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेले
                    अपराध करण्याचा प्रयत्न करण्या
                    बद्दल शिक्षा.
          
                   असे माझ्या भीमानं श्रिमंतांपासून गरीबांपर्यंत, सर्वसामान्यांपर्यंत सर्वांना समान कायदा देऊन, कायद्यापुढे सर्व समानता,ह्या भारताला जगातील सर्वात मोठे, धर्मनिरपेक्ष, लोकशाही राष्ट्र बनवून संविधान बहाल कले.        
                    म्हणूनच तर भारताच्या संविधानाचा जगात जय-जय कार होतो.हे अलीकडच्या काळात नेपाळ या देशाने भारताचा आदर्श ठेवून लोकशाही राष्ट्र घोषित केले हे उत्तम उदाहरण आहे.been 
.....जय-भिम .....जय भारत ...😉

महात्मा जोतिराव फुले


महात्मा जोतिराव फुले        म्हणतात

      महार मांग निंदा 
      ठावी नाही व्यथा
      जाळा मनू ग्रंथा
      अग्नी मध्ये ll
ज्या मनुस्मृतीने माणसाला जनावरापेक्षा ही हीन वागणुक दिली स्ञीयांवर अमानवी बंधने लादली.बहुजनांना नैसर्गिक हक्क अधिकार नाकारले आणि गुलामी करण्यास भाग पाडले .अशी मनुस्मृती जाळा  हि इच्छा महात्मा फुलेंनी  व्यक्त केली आणि २७ डिसेंबर  १९२७ रोजी डा. बाबासाहेब आंबेडकरांनी  रायगडाच्या पायथ्याशी महाड येथे छञपती शिवरायांच्या नामघोषात  मनुस्मृतीचे दहन केले .आणि हजारो वर्षाची बहुजनाची गुलामगिरी, स्ञीयांवरील बंधने ,छञपती शिवरायांचा शुद्र म्हणुन नाकारलेला राज्याभिषेक ,छञपती  संभाजी राजांना हालहाल करुन केलेली हत्या ,तुकारामांची हत्या ,महर्षी शंबुकांची हत्या ,एकलव्याचा कापलेला आंगठा आणि आपल्या वाणी ने बहुजनांना जागृत करणाऱ्या अनेक संतांच्या धर्म ग्रंथाच्या नावाखाली  केलेल्या हत्या यांचा एकञित बदला 
मनुस्मृती हा ब्राम्हणी धर्म ग्रंथ जाळून घेतला आणि महात्मा फुलेंची इच्छा पुर्ण केली.

   बाबासाहेब म्हणतात जो समाज आपला इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही आणि २५ डिसेंबर १९२७ हा आपल्या बहुजनासाठी  ब्राम्हणी गुलामीतून मुक्त झालेला ऐतिहासिक  दिवस आज त्याला ८८ वर्ष पुर्ण होत आहे .या निमित्तानं त्या ऐतिहासिक क्षणाची आठवण रहावी  म्हणून  आणि जे पुन्हा मनुस्मृती कायदा लागु करण्याच्या तयारीत आहेत अशांना आम्ही इतिहास विसलो नाही याचा इशारा देण्यासाठी २५ डिसेंबर हा "मनुस्मृती दहन दिन  " सर्वांनी मनूचा पुतळा जाळून साजरा  करावा .कारण
  राजस्थान हायकोर्ट परिसरात मनू चा पुतळा बसवून  येथिल ब्राम्हणी सरकार पुन्हा मनुस्मृती राज्याची आस लावून बसले आहे.तरी हा पुतळा काढावा अशी मागणी करुन गावागावात मनूच्या पुतळ्याचे सार्वजनिक दहन करावे .हिच खरी बाबासाहेबांना आदरांजली ठरेल .

    हा मेसेज वाचून प्रतिक्रिया द्या .आणि हा मेसेज २५ डिसेंबर पर्यंत सर्व बहुजनांपर्यंत  पोहोचेल  अशी अपेक्षा करतो.
      जय भिम

पुणे करार


इ.स. १९२० च्या दशकाच्या अखेरीस आंबेडकर दलितांचे एक नामवंत राजकीय नेते बनले होते. जातिसंस्थेविरुद्ध काहीही न करणऱ्या पक्षांना त्यांनी आपल्या टीकेचे लक्ष बनवले. महात्मा गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस यांच्यावर दलितांना दयनीय परिस्थितीत ढकलल्याचा आरोप केला. ब्रिटिश सरकारावरही ते नाराज होते व त्यांनी दलितांसाठी एक नवीन राजकीय आघाडी काढली. ८ ऑगस्ट १९३० साली मागासवर्गीयांच्या सभेमध्ये आंबेडकरांनी आपला राजकीय दृष्टिकोन लोकांसमोर जाहीर केला, मागासवर्गीयांनी काँग्रेस व ब्रिटिश यांपासून स्वतंत्र झाल्याशिवाय ते सुरक्षित होणार नाहीत असे त्यानी सांगितले. या भाषणात त्यांनी मिठाच्या सत्याग्रहाचा समाचार घेतला. या टीकेमुळे सनातनी हिंदू संतापले.

पुणे करार (संक्षिप्त मसुदा)

१) प्रांतीय विधानसभांमध्ये साधारण निवडणूक क्षेत्रांमधील जागांपैकी दलित वर्गासाठी ज्या राखीव जागा ठेवण्यात येतील त्या येणेप्रमाणे : मद्रास-३०, मुंबई व सिंध मिळून-१५, पंजाब-७, बिहार व ओरिसा-१८, मध्यभारत-२०, आसाम-७, बंगाल-३०, मध्यप्रांत-२० अशा प्रकारे एकूण १४८ जागा अस्पृश्यांसाठी देण्यात येतील.

२)या जागांची निवडणूक संयुक्त निवडणूक संघ पद्धतीद्वारे केली जाईल. प्रत्येक राखीव जागेसाठी दलित वर्गातील ४ उमेदवारांचे पॅनल निवडले जाईल. या चार उमेदवारांतून ज्याला सर्वाधिक मते मिळतील तो विजयी उमेदवार जाहीर होईल.

३)केंद्रीय कार्यकारिणीमध्ये दलित वर्गाचे प्रतिनिधित्व वरील कलम दोननुसार होईल.

४)केंद्रीय कारिणीमध्ये दलित वर्गाच्या राखीव जागांची संख्या १८% असेल आणि त्यांची निवड वरील प्रकारे होईल.

५)उमेदवारांच्या पॅनलच्या प्राथमिक निवडींची व्यवस्था ज्यांचा वर उल्लेख केला आहे अशा केंद्रीय तसेच प्रांतिक कार्यकारिणींसाठी पहिल्या १० वर्षांनंतर समाप्त होईल.

६)जोपर्यंत दोन्ही संबंधित पक्षांद्वारा आपसांत समझौता होऊन दलितांच्या प्रतिनिधीस हटविण्याचा सर्वसंमत निर्णय होत नाही, तोपर्यंत प्रांतीय व केंद्रीय कार्यकारिणीमध्ये दलितांच्या जागांचे प्रतिनिधित्व कलम १ व ४ मध्ये दिले आहे त्याप्रमाणे अंमलात असेल.

७)केंद्रीय व प्रांतिक कार्यकारिणींच्या निवडणुकीत दलितांचा मतदानाचा अधिकार लोथियन समितीच्या अहवालानुसार असेल.

८)दलिताना स्थानिक निवडणुका व सरकारी नोकरीसाठी जातीय कारणामुळे डावलल्या जाऊ नयेत. पात्रता असलेल्या प्रत्येक दलितास नोकरीत घ्यावे.

९)सर्व प्रांतांत शैक्षणिक अनुदान देऊन दलितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करण्यात यावे.

असा होता पुणे करार :-

मसुदा तयार झाला, आता सह्या करण्याची वेळ आली तेवढ्यात मद्रासच्या अस्पृश्यानी एम.सी. राजा यानी करारावर सही केल्यास आम्ही बाबासाहेबांना सही करू देणार नाही अशी विरोधाची भूमिका घेतली. कारण या एम.सी. राजांनी मुंजेसोबत जो करार केला होता तो अस्पृश्यांचा घात करणारा होता. त्यामुळे अशा अस्पृश्यद्रोहींनी या करारावर सही करू नये अशी मद्रासच्या दलितांची मागणी होती. शेवटी यातही तडजोड करण्यात आली व सह्या करण्यात आल्या. अस्पृश्य वर्गाच्या वतीने बाबासाहेबानी मुख्य सही केली तर सवर्णांच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी सही केली.
इतर सर्व सभासदांनीही सह्या केल्या. अन तिकडे तुरुंगांतही एकच जल्लोष उडाला. गांधीनी उपोषण सोडले. त्यांनी बाबासाहेबांचे अभिनंदन केले.अस्पृश्यतानिवारणा बाबत गांधीजी आणि आंबेडकर ह्यांच्यात मतभेद होते. म्हणून साम्राज्याशाहीविरोधी पातळीवर कॉग्रेसची आणि आंबेडकरांची एकजूट होऊ शकली नाही. तथापि, गांधीजीबद्दल मनात विरोधाची एवढी भावना असताना केवळ त्यांचे प्राण वाचविण्यासाठी म्हणून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आपली मागणी त्यांनी मागे घेतली. आणि पुणे 'करारा' वर सही केली.

शिर्डी आक्रोश मोर्चाच्या प्रचंड दणक्याने , पँथर्सना चेतना मिळुन महाराष्ट्रातील बर्याच जिल्हा पातळीवर सर्व पक्षीय मोर्चा निघाले

* शिर्डी आक्रोश मोर्चाच्या प्रचंड दणक्याने , पँथर्सना चेतना मिळुन  महाराष्ट्रातील बर्याच जिल्हा पातळीवर सर्व पक्षीय मोर्चा निघाले.. 
* संविधान गौरव दिन देखील बहुतांश ठिकाणी सर्व पक्षीय साजरा केला गेला...
* हल्लीच औरंगाबाद मधिल मोर्चा देखील सर्व पक्षीय प्रचंड मोठ्या ताकदीने पँथर्स  चळवळीत रस्त्यांवर उतरायला लागलेत ..
आंबेडकरी चळवळीत  ह्या सर्व मोर्च्यांमधे  मोठ्या प्रमाणात apx  ७०% तरुण व ३०% अनुभवी पँथर सक्रिय होताना दिसलेत...

तरुणांच्या मनातील खंत खदखद...  खुलेआम दिसायला लागलिय , 
 एकत्र येवुन एकच साहेब - बाबासाहेब  म्हणत हातउंचावत  अन्यायावर मुठउगारत खुलेआम प्राणांची पर्वा न करता रस्त्यांवर सुशिक्षीत तरुण तरुणीं देखील सहभागी होताना दिसतायत....

फेसबुक , व्हाट्सप चा प्रभावी उपयोग व अंमंलबजावणीस हातभार लागतोय हे मी स्वत शिर्डी व आझादमैदान सर्वपक्षीय मोर्चा वेळेस अनुभवलेय. 

मित्रांनो , आंबेडकरी चळवळीने कात टाकायला थोडा उशीर जरी केला...बरंच पणी पुला खालुन जरी वाहुन गेलं असलं तरीही ... जहासे जागे ,वहासें सबेरा... प्रमाणे , 
 मी तरी म्हणेल की ,
येस ... आंबेडकरी चळवळीने मरगळ आलेली कात टाकलीय... !!

येस... तरुण तरुणीं देखील प्रभावी पणे सडेतोड उत्तरं देवु लागलेंत मग ते काव्य , लेख , मजकुर , पोस्ट , टु लाईनर ट्विट  असो की पिक्स असो की पँथर्सचे जाज्वल्य ईतिहास. शेयर करुलागलेत एकत्र येवुन रस्तयांवर उतरु लागलेत अन्याविरुद्ध ...!!

लाल झालरींच्या माकंडाच्या मुळे आंबेडकरी चळवळीती तरुण तरुणींना  सहज तरुंगात डांबु शकण्याचे कुटिल डावपेचात काही भरकटलेले ,
पण , 
आता नाही ...
ह्या पुढे नाही .... 
आंबेडकरी तरुण सजग झालेत लाल माकडांपेक्षा चांगल्या प्रकारेे पथनाट्य असु की ललकारी देत शाहीरी म्हणा ... बाबासाहेब बुद्धच सांगताना दिसु लागलेयत ...

आमच्या बापाने दिलेला बाबासाहेबांनी दिलेला निळा आम्ही अभिमानाने फडकवुन ह्या जातियवादी संघाच्या  मनसुब्यास हाणुन पाडतीलच 

कात टाकुन सळसळणार्या निळ्या रंगाची धमक व जरब जातीवाद्यांना जयभीम ची ताकद पुन्हा दिसेलच...!!
👊 स्वाभिमानी जयभीम 👊

25 डिसेंबर - डाॅ. आंबेडकर

25 डिसेंबर...
==========

01.) 25 डिसेंबर 1926:- "डाॅ. बाबासाहेब आंबेडकर" यांची मुंबई विधिमंडळावर निवड झाल्याबद्दल नायगावच्या "वाय. एम. सी. ए." च्या हाॅलमध्ये उभयतांचे जाहीर अभिनंदन करण्यात आले.

02.) 25 डिसेंबर 1927:- डाॅ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली विषमतेची शिकवण देणा-या "मनुस्मृती"या हिंदूंच्या पविञ ग्रंथाची बापुसाहेब सहस्ञबुद्धे यांच्या हस्ते परिषदेच्या मंडपासमोर खास तयार केलेल्या वेदीत दहन करण्यात आले.

03.) 25 -26 डिसेंबर 1927:- महाड सत्याग्रह परिषद डाॅ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली.

04.) 25 डिसेंबर 1946:- घटना समितीत डाॅ. आंबेडकरांनी प्रभावी भाषण करुन भारताच्या ऐक्यावर भर दिला. प्रसिद्ध तत्त्ववेत्ते एडमंड बर्क यांचे वचन (It is very easy to give power, but it is difficult to give wisdom ) उदधृत केले.

05.) 25-27 डिसेंबर 1946:- अखिल भारतीय शे. का. फे. विद्यार्थी फेडरेशनचे दुसरे अधिवेशन जोगेंद्रनाथ मंडल यांच्या अध्यक्षतेखाली भरले. वस्तुतः या अधिवेशनाचे नियोजित अध्यक्ष डाॅ. आंबेडकर होते. पण घटना समितीच्या कार्यबाहुल्यामुळे ते हजर राहू न शकल्याने त्यांनी मंडल यांना अध्यक्ष नेमले व आयोजक गेडाम यांना आपला संदेश पाठविला.

06.) 25 डिसेंबर 1953:- निपाणी येथे भरलेल्या सभेत बोलताना निवडणुकीच्या पराभवाने निराश न होता चळवळ जिवंत ठेवण्याचा अनुयायांना संदेश दिला.

07.) 25 डिसेंबर 1954:- डाॅ. आंबेडकरांनी देहू रोड (जि. पुणे) येथे बुद्ध विहाराचे उदघाटन केले. भाषणातच पंढरपुरच्या विठ्ठलाची मूर्ती ही बुद्धाचीच मूर्ती असल्याचे सांगीतले.

#...जय भिम..#..नमो बुद्धाय..#

T-shirt of Dr. Ambedkar

T-shirt of Dr. Ambedkar

Dr. Ambedkar's Books in Hindi

Dr. Ambedkar's Books in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Popular Posts