Buy books of DR BR Ambedkar, Buddhism, Dalit, Adiwasi & Bahujan Topics

Powered by Blomming for nikhilsablania

Saturday, January 16, 2016

खतरनाक माहीती

खतरनाक माहीती--—
 जे लोक नेहमी मराठ्यांच्या नावाने बोंबलतात की--- धनगरांना मराठ्यांनी वर येऊ दिले नाही, त्यांचे शोषण केले, त्यांच्यासाठी सणसणीत माहीती  --
धनगर, बहुजनांचे कंबरडे नेमके कोणी मोडले , ज्यांना आम्ही राष्ट्रपिता म्हणतो त्यांने कशी पाचर मारली ते डोळे फाडून वाचा उगाच बोंबलुन काही फायदा नाही😭😭
🙏🏻🙏🏻पुणे करार🙏🏻🙏🏻
   👇जरू२ वाचा👇

पुणे करार" परीणाम काय झाला. व पुणे करार झाला नसता तर त्याचा काय परिणाम असता...!
पुणे करारामध्ये डॉ. बाबासाहेबांनी मिळवलेले अधिकार खालीलप्रमाणे आहेत.
१) स्वतंत्र मतदार संघ (Separate Electorate) :-
SC.ST.OBC. आणि Minority साठी राखीव मतदार संघ. ज्यामध्ये SC.ST.OBC. आणि Minority च्या उमेदवाराला Vote देण्याचा अधिकार फक्त SC.ST.OBC. आणि Minority च्या लोकांनाच राहिल.
२) दुहेरी (दोन वेळा) मत देण्याचा अधिकार (Dual
Vote System) :- SC.ST.OBC. आणि Minority च्या
लोकांना दोन वेळा Vote देण्याचा व आपला प्रतिनीधी निवडण्याचा अधिकार राहील.
उदा.
एखाद्या विभागामध्ये Schudeld Cast चा उमेदवार उभा असेल तर त्याला फक्त Schudeld Cast चेच लोक Vote देऊ शकतील.
त्याचप्रमाणे ST.OBC. आणि Minority च्या उमेदवारालासुद्ध त्यांचेच लोक Vote देऊ शकतील.
आणि दुसर्या कोणत्याही जातीचा उमेदवार उभा असेल तर त्याला सुद्धा SC.ST.OBC. आणि Minority च्या लोकांना Vote देण्याचा अधिकार असेल.
३) प्रौढ मताधिकार (Adult Franchise) :- २१ वर्षे
पुर्ण प्रत्येक व्यक्तीला Vote देण्याचा अधिकार असेल. जेव्हा England च्या Parliment मध्ये Vote कुणी द्यायचे यावर चर्चा सुरु होती. या चर्चेसाठी इंग्रजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आमंत्रीत केले,
इंग्रजांनी असा मुद्दा मांडला कि जे लोक Income Tax भरत असतील तेच लोक Vote देतील. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, कि आमचे लोक अशिक्षित आहे.
त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची संपत्ती नाही. त्यामुळे Income Tax भरण्याचा प्रश्नच नाही. आणि भारतामध्ये शिक्षणाचा व संपत्ती साठवण्याचा अधिकार फक्त उच्च जाती कडे आहे.
तुम्ही जर असा कायदा पारीत केला तर कोणाला Vote द्यायचं व उमेदवार बनवायच हा निर्णय हेच करतील व आमचे लोक या अधिकारापासुन वंचित राहतील, त्यामुळे Vote देण्यासाठी Income Tax भरणार्याच्या ऐवजी २१ वर्ष वयाची अट ठेवावी. कारण माझा समाज हा अशिक्षित आहेत, ते किती वर्षापासुन जगताहेत, किती पावसाळे बघीतले एवढच त्याना कळते. त्यामुळे Vote देण्याची वयोमर्यादा २१ वर्ष असावी.
४) पर्याप्त प्रतीनिधीत्व (Adequate Representation): स्वतंत्र मतदार संघामध्ये SC.ST.OBC. आणि Minority यांच्या मधुन लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळणार होते. पण पुणे करारमुळे संयुक्त मतदार संघ लागु झाला आणि आजपर्यंत लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी नाही मिळाले. १९५२ च्या निवडणुकीत काश्मिरी पंडीत जवाहरलाल नेहरु नी ६०% ब्राह्मणांना टिकिट देऊन ५६% ब्राह्मण निवडुण आणले आणि स्वतंत्र भारतात पुन्हा ब्राह्मणशाही स्थापण केली.
आणि संपुर्ण भारतावर ब्राह्मणांनी वर्चस्व पुनस्थापित केले.
जेव्हा बाबासाहेबांनी हे चार अधिकार इंग्रजांकडुन मिळवुन घेतले तेव्हा गांधीजींनी बाबासाहेबांच्या विरोधात आमरण उपोशन सुरु केले. कारण या अधिकारांमुळे संसदेमध्ये खरे प्रतीनिधी (Real Representation) निवडले गेले असते.
त्यामुळे ब्राह्मणांना सुद्धा SC. ST. OBC. आणि Minority च्या Vote वर अवलंबुन राहावे लागले असते. पहिल्यांदा SC. ST. OBC.
आणि Minority च्या लोकानी आपले उमेदवार निवडले असते, व नंतर ३% ब्राह्मणाना.
"भारतामध्ये OBC ची संख्या जास्त असल्यामुळे १ नंबरला OBC (५२%) आले असते त्या खालोखाल Minority (१८%)नंबर २ ला आले असते, Schudeld Cast (१५%) नंबर ३ ला आले असते. व Schudeld Tribes (८%) नंबर ४ ला आले असते आणि नंतर शेवटी ब्राह्मण (३%) आले असते." यातुन "१, २ व ३ नंबरचे उमेदवार संसदेत निवडुन गेले असते यामध्ये ब्राह्मणांचा पत्ता साफ झाला असता."
याची खबरदारी गांधीजींनी घेतली व बाबासाहेबानी हे अधिकार घेऊ नये म्हणुन त्यांच्या विरोधात उपोषण सुरु केले.
गांधिजींचा PA देसाइ ने त्याच्या डायरीत गांधीजी व सरदार पटेल यांचा एक संवाद लिहुन ठेवला. गांधीजी म्हणतात कि "सरदार तुम मेरी नझर से देखो, भविष्य मे ये जो हरीजन गुंडे है,
हमारे लोगोंको बहोत पिट रहे है."
पुणे करार झाल्यामुळे स्वतंत्र मतदार संघ (Separate
Electorate) ऐवजी संयुक्त मतदार संघ (Join Electorate) लागु झाला. त्यामुळे आज पक्षाचे Suprimo उमेदवार निवडतात व नंतर आपण त्याला Vote देतो. पक्षाचे Suprimo उमेदवार निवडतांना उमेदवार किती नालायक आहे, ते समाजासोबत किती गद्दारी करतात हे बघतात व नंतरच ते उमेदवाराला टिकट देतात. त्यामुळे आपले खरे उमेदवार निवडले जात नाही. हा सर्व परीणाम पुणे कराराचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते कि मला ह्या समोरच्या खांबावर फाशी दिली तरी मी या करारावर सही करणार नाही.
गांधीजींनी बाबासाहेबाना सह्या करण्यासाठी मजबुर केलं. जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. गांधीजी बाबासाहेबाना म्हणाले, कि डॉ.आंबेडकर तुम्ही ज्या लोकांसाठी ज्या जातीसाठी हे अधिकार मिळवले ते सोडले नाही तर आम्ही संपुर्ण भारतात दंगली पेठवू, संपुर्ण जाती संपवू. मग मात्र बाबासाहेब नमले. ज्या लोकांसाठी अथवा जातींसाठी आपण हे अधिकार मिळवले ते उरलेच नाही तर हे अधिकार फक्त कागदावरच राहातील. आपले लोक जिवंत राहिले तर आपण असे अनेक अधिकार मिळवु. त्यामुळे बाबासाहेबानी ह्या करारावर सह्या केल्या.

Wednesday, January 13, 2016

पुढील बौध्द पिढी का घडत नाही

❗❗वाचा व विचार करा❗❗
 पुढील  बौध्द पिढी का घडत नाही. 

❗अशीक्षीत पालकांमुळे बौध्द धर्माची माहीती पुढील पिढीला पोहचलीच नाही.
❗पालकांनी माहीती जरी पोहचवली नाही तरी बौध्द युवकांना स्वता: चा धर्माची माहीती मिळवण्यात ईटंरेस्ट नाही.
❗अर्ध्या पेक्षा जास्त बौध्द युवकांना स्वत: बौध्द असल्याची जाणीवच नाही.
❗बौध्द धम्माचा प्रचार करायला आमच्या लोकांना लाज वाटते
❗सर्वधर्मसमभाव चे नाटक  करून सर्रास पणे हिंदु धर्माचा उदो उदो  करत फिरतात आणि बौध्द धर्माकडे अक्षरशः पाठ  फिरवितात.
❗समाजाचे प्रबोधन करायला कोणीही पुढे येत नाही आणि जरी कोणी येत असेल तर त्याला पाठींबां मुळीच देत नाहीत.
❗शिर्डी, तिरुपती, बालाजीला  हजारो रुपयॆ देवून  नवस करतील किवां दान करतील पण बुध्द विहारात 10 रुपये देतांना विचार करतील /अनेक  बहाणे सांगतील. 
❗आजुबाजुला गणपती बसतात म्हणुन ह्यांचा सुध्दा आराध्य दैवत गणपतीच होतो.
❗बाहेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुध्दांचे फोटो पण आत अनेक  देवांचा किचनमध्ये किंवा  महापुरुषांच्या फोटोच्या बाजूला  देव्हारा.
❗ देव्हा~यातील वात कधीही  विझू दिली जात नाही  , 
मात्र बाबासाहेबांच्या तसबिरीला साधा हार सुद्धा नाही. 
❗बुध्द विहारांची देखरेख तर सोडा  आठवड्यातून एकदा  विहारात वंदन करायला जायला  सुध्दा  यांना जमत नाही. 
❗घरात बौध्द ग्रंथ नाहीत.
वाचन व आचरण तर नाहीच नाही.
 
❗कुठल्याही  समाजाच्या मिटींगला जायला आम्हाला  जमत नाही किंवा  वेळच नाही. 
❗ अहो विहारात चिटपाखरूही नाही  मग श्रामणेर/ भंतेजी चारिकेसाठी कुणाकडून मागणार? 

❗बौध्दांचं अस्तीत्वच त्याच देशातून मिटन्याच्या मार्गावर  आहे ज्या देशात ह्या धम्माचा  ऊदय झाला.
❗  आपले अनेक लोक  फक्त लग्न, बारसे  ( नामकरणविधी )बौध्द पध्दतीने करतात लोकं नाव ठेवु नये म्हणुन.... 
आणि  पाया पडायला कुलदेवता,  देवळात ,  शिर्डीला जातात
❗परवाच रविवारी एक लांजा  तालुक्यातील एक छोटा मुलगा  (पहीलीतील )नातेवाईकांसोबत 
घरी आला. त्याने घर निरखून पाहिले व म्हणाला  घरात  बुध्दमुर्त्याच आहेत  पण  गणपती  कुठेय❓😂 पण मी त्याला  म्हणालो गणपतीच का?  तर म्हणाला  की घर मोठे आहे  मग मोठा  गणपती  बसवा. आमच्याकडे चाळीत  मोठ्या  जागेत गणपतीच 
🔵🔵 तेव्हा  आता विचार करा की  आमच्या  मुलांना  बुध्द कोणी  सांगायचा ❓❓🔵🔵
 
⭕आणि मग   आपण   इतर अधर्मिय  बौध्द बनवायचे सोडा🚫 पण बौद्ध धम्म घेतलेल्या   लोकांना  बुध्दीष्ट कसे  बनवणार❓❓❓

   🙏🙏 जय भिम 🙏🙏

बौद्ध धम्म स्वीकारून आज आपल्याला जवळपास साठ वर्ष झाले

आम्ही कोण ?????
.
.
.
.
.
बौद्ध धम्म स्वीकारून आज आपल्याला जवळपास साठ वर्ष झाले. या साठ वर्षात आमची एक पीढ़ी मातीत गेली. 1956 साली ज्याचा जन्म झाला आज तोही मोडकळीस आला.
मानवाच्या जीवनात साठ वर्ष म्हणजे पूर्ण आयुष्यच.
मंग माझा प्रश्न तमाम माझ्या बौद्ध बांधवांना आहे,
या साठ वर्षात आपण बौद्ध धम्म आत्मसात केला का ?
याचे उत्तर मला "नाही "हेच मिळेल.
पण, का नाही ?
बौद्ध धम्म आपल्या मेंदूपर्यंत पोचवण्या नेमके कमी कोण पडले ?
जर तुमचे उत्तर "हो " आहे तर, माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या !
का आपल्यावर उच्च जातीच्या हिंदू लोकांचे आजही हल्ले होतात ?
का आपल्याला आजही दलितच संबोधतात ?
का आपल्याला आजही काही उच्चवर्णी महार म्हणून हिणवतात ?
जर एखाद्या दलित हिंदू व्यक्तीने मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर त्यांच्यावर आपल्यासारखा अन्याय होतो का ?
मुळीच नाही !
मंग आपल्यावरच का ?
जर एखाद्यानी मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर तो तन मन धनाने तो धर्म अंगी कारतो.त्याच्या गळ्यात, खिशात, घरात, दारात त्या त्या धर्मगुरुचेच फोटो दिसतील. धर्मांतर केल्यानंतर त्यानी अगोदरच्या धर्माला पूर्णतः सोडलेले असते.
जर त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला तर तो नियमित मस्ज़िदला जाणार व त्या धर्माचे काटेकोरपणे पालन करणार.
जर त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असेल तर तो नियमित चर्च मधे जाऊन प्रार्थना करणार व धर्माचे पालन करणार.
मंग मला प्रश्न असा उद्भवतो, आपण धर्मांतर करून बौद्ध झालो.
काय आपण बौद्ध तत्वाचे पालन करतो ?
बौद्ध धम्मासोबत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञाचे पालन करतो ?
1956 साली आपण हिंदू धर्म जरूर सोडला पण हिंदू धर्माचे देव, सण,चालीरीती मात्र सोडल्या नाही.
ज्या मंदिरात आपल्याला प्रवेश नाही त्या मंदिरात आपण बाहेरून हात जोडून दर्शन घेतो पण विहारात कधी ढुंकूनही बघत नाही.
कुणी आपल्याला कुलदैवत विचारले तर आपण खंडोबा सांगतो.
दसरा,दिवाळी,होळी,पंचमी,रक्षाबंधन सारे सण न चुकता धुमधडाक्यात साजरे करतो.
शिर्डी शेगांवच्या देवस्थानात जास्त आम्हींच गर्दी करतो.
मंग आम्ही कोण ?
बौद्ध की महार ?
जर आपण बौद्ध धम्माचे तत्व न पाळता हिंदू धर्माचेच तत्व पाळत असणार तर आपल्याला उच्च वर्णी हिंदू दिन दलित मागासलेला महार समजणारच व आपल्यावर पूर्वीसारखाच अन्याय अत्याचार करणार.
हिंदू धर्मातील कित्येकानी पूर्वी मुस्लिम व ख्रिश्चन धर्म स्वीकारला. मंग त्यांच्यावर का उच्च हिंदू अन्याय अत्याचार करीत नाहीत.
कारण ते आता हिंदू नाहीच !
त्यांचा देव वेगळा आहे.धर्म वेगळा आहे. सण वेगळा आहे.कुलदैवत वेगळे आहे.
जर ते हिंदू नाहीत तर उच्च नीच लेखण्याचे काहीएक कारण नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर बोलले होते, आपल्या समाजाला नुसते नामांतर करून काहीही फायदा होणार नाही. आपल्याला जर शूद्र नावाची घाण आपल्यातून उखाडून फेकायची असेल तर आपल्याला धर्मांतर शिवाय गत्यंतर नाही.
ते आपल्या भाषणात हिंदूतून धर्मांतर केलेल्या काही जातीचे पुरावेही दाखवत होते.एका शूद्र जातीतील जेंव्हा ते हिंदू होते तेंव्हा त्यांना गावातल्या विहीरीत सवर्णा बरोबर पाणी भरण्या मनाई होती पण त्यानी धर्मांतर केल्यावर त्यांना आपोआप त्या विहिरीवर पाणी भरण्याचा अधिकार मिळाला.
ही आहे धर्मांतराची ताकत. मंग ती अध्यापही आपल्याला का लागू झाली नाही. आजही खेड्यापाड्यात आमच्या बांधवाना गावात उच्च वर्णाच्या विहीरीवर पाणी भरण्यास मनाई आहे.
आजही आम्हांला गावात खालचा दर्जा आहे.
याचे कारण एकच, आपण बौद्ध धम्म स्वीकारला पण अंगीकारला नाही.
त्यामुळे सवर्णाला आजही आम्ही महारच दिसतो.
जो पर्यंत तुम्ही बौद्ध धम्माचे तत्व व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा अंगीकारत नाही. तो पर्यंत तुम्हांला बौद्ध म्हणून सांगण्याचा अधिकारच नाही.

उचाळे पाटीलबा यांची कविता विधानसभा आणि विधान परिषदेत गाजली.

उचाळे पाटीलबा  यांची कविता विधानसभा आणि विधान परिषदेत गाजली.
विधानसभेत सिन्नरचे आमदार आणि विधान परिषदेत आमदार जयंत जाधव यांनी वाचून दाखविली.
गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रातील  लाखो शेतकऱ्यांची मुले आणि त्यांच्या कष्टाचा सन्मान करणार्‍या संवेदनशील नागरिकांनी ही पोस्ट शेअर केली म्हणून विधिमंडळात पोहोचली.


मेला माझा नवरा जरी
मला नका भेटू.
माझ्या पोरा संग बसून
नका काढू फोटू..
.
लाल दिव्याच्या गाडीतून
येईल तुमचा ताफा..
कॅमेर्‍यात बघून बघून
मारल्या जातील थापा..

पांढरा धोट रुमाल काढून
डोळेसुद्धा पुसाल..
पोरक्या माझ्या पोरांना
खेटून खेटून बसाल..

खोटाखोटा कंठ तुमचा
नका देऊ दाटू..
माझ्या पोरा संग बसून
नका काढू फोटू..

धनी माझं गुणाचं
शेतामधी खपायचं..
अर्ध्या पोटी राहून सुद्धा
इभ्रतीला जपायचं..

काळ्या माईची वटीभराया
कर्ज थोडं काढलं..
पीक गेलं जळून पण
कर्ज मात्र वाढलं..

सावकार लागला छळू
तवा धीर लागला सुटू..
माझ्या पोरा संग बसून
नका काढू फोटू..

पोरगं जातय साळात
त्याची फीस नाही भरायला..
जनावरं दारात उभी
चारा नाही चारायला..

विहीर कधीच आटून गेली
बोरला नाही पाणी..
करपलेल्या पिकाकडं
पाहत राहायचं धनी..

सरकार झालय कोडगं
अन सावकार लागलेत लुटू..
माझ्या पोरा संग बसून
नका काढू फोटू..
.
रातच्याला जवळ घेऊन
लई गोड बोललं..
डोळ्यांत दिसलं पाणी
तवा काळीज माझं हलल..

जाग आली पाहटं तवा
जवळ नाही दिसलं..
फंख्याला फाशी घेऊन
कुंक माझं पुसलं..

खोटे अश्रू डोळ्यात आणून
आता नका चुटपूटू..
माझ्या पोरा संग बसून
नका काढू फोटू..

धनी होतं तवा कुणी
धीर नाही दिला..
आता किती तातडीने
पंचनामा बी केला..

कॅमेरे घेऊन पांढर्‍या गाड्या
आल्या दारामंदी..
आभाळ फाटलंय आमच
यांना प्रसिद्धीची संधी..

म्हणे जग लई सुधारलय
परं माणुसकी लागलीय आटू..
माझ्या पोरा संग बसून
नका काढू फोटू..

होईल घोषणा पॅकेजची
मदतीचा चेक येईल..
माझ्या लेकरांचा बाप
कोण आणून देईल..

धनी जरी गेलं तरी
मी न्हाई हारायची..
पोरांना करून पोरकं
मी न्हाई मरायची..

तुमचं मात्र थांबवा ढोंग
मला नका भेटू..
माझ्या 
पोरा संग बसून
नका काढू फोटू....
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अनेकांना ही कविता पाठवा व शेतकरयांचया व्यथा कळू दया

आंबेडकर मोठे अन महान

कोण आहे आंबेडकर 
अन काय केलंय
आंबेडकरांनी????

अरे बापरे!!!
.
.
.
खूप काही केलंय रे बाबा...

पण तुला
थोडक्यात सांगायचं तर....
थोडक्यात कळतील ते 

आंबेडकर कसले म्हणा, 
पण
काही
मुर्खांसाठी छोटी उदाहरणे दिली जाऊ
शकतात म्हणून...

मित्रा,
तू कोणत्या जातीचा धर्माचा याच्याशी
काही देणे घेणे नाही पण तू ज्या कुठल्या
ठिकाणी काम करतोयेस ना त्या ठिकाणी
तू आज १४ तासांच्या ऐवजी ८ तासांची
ड्यूटी करतोयेस ते १४ चे ८ तास ज्यांनी केले ते
आहेत "आंबेडकर"
.
.
.
.
तुझी बहिण, बायको ज्या ठिकाणी काम
करतायेत त्यांना स्त्री म्हणून मिळणाऱ्या
सोयी किंवा मुभा असतात, किंवा त्या
गरोदर असताना मिळणाऱ्या सुट्ट्या देऊ
करणारे कायदे निर्माण केलेत ते आहेत
"आंबेडकर", 
.
.
.
त्यांना सर्वात जास्ती सक्षम
बनवण्यासाठी आरक्षणात महिलांना
अधिक प्राधान्य दिले ते आहेत आंबेडकर..
.
.
.
ज्यांच्या आराखड्यावर मजबूत आणि
ज्यांच्या कल्पनेतून 'The Reserve Bank Of
India' आधारली आहे ते आहेत आंबेडकर...
.
.
.
.
तूला, मला अन आपल्या प्रेत्येकाला जो पी.
एफ. मिळतो ना ते ज्यांच्यामुळे आहेत ते आहेत
"आंबेडकर"
.
.
.
.....आंबेडकर तर तुझे माझे नंतर आहेत
 
ते सर्वात आधी
या देशाचे आहेत.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या देशाची
सूत्र कोणच्या हातात देयचे हे ठरवण्याचा
हक्क "मतदान" हे ज्यांनी तुला मिळवून दिले
ते आहेत आंबेडकर...
.
.
.
अजून एक... 
.
.
.
.
ज्या मनुवादी विचारांनी
शिवपुत्र संभाजी महाराजांना अनायत
यातना देऊन मारलं त्या शंभूराजांच्या
खुनाचा बदला म्हणून "मनुस्मृती"
रायगडाच्या
पायथ्याला नेऊन ज्यांनी जाळली ते आहेत
"आंबेडकर "...
.
.
.
आंबेडकर महान आहेत, कित्येक गोष्टींचे
निर्माते आहेत ज्या तुला माहितही
असतील पण त्या कोणामुळे आहेत हे तुला
माहित नसेल, 

.
.
आंबेडकर मोठे अन महान
आहेतच पण जातीयवाद्यांनी अन बिकावू
मिडिया ने अजनुही आंबेडकर पुरेपूर आपल्या
परेंत पोहोचू दिले नाही 
म्हणून 
तू आज
विचारतोय कोण आहेत आंबेडकर 
अन काय
केलय आंबडेकरांनी..
😠

Tuesday, January 12, 2016

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नदीजोड प्रकल्प

Real god of india 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
           आणि
       नदीजोड प्रकल्प
➖➖➖➖➖➖➖➖➖➖


पाण्यापासून ठेवले होते वंचित, त्याच नेत्याने सर्वप्रथम मांडली नदीजोड संकल्पना

जगात तिसरे महायुद्ध हे पाण्यावरुन होईल असे अनेक तज्ज्ञ वारंवार सांगत आहेत. 

याचे भान 2015 मध्ये सरकारला आले आणि नदीजोड प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. 

कृष्णा आणि गोदावरी या दोन नद्यांना एकमेकांशी जोडून 17 सप्टेंबर रोजी देशात नदीजोड प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. 

मात्र नदीजोड प्रकल्प ही कल्पना आजची नाही तर  पुढील 50 वर्षांनंतर देशाची लोकसंख्या किती असेल आणि त्यासाठी किती पाणी लागेल याचे नियोजन एका दृष्ट्या नेत्याने स्वातंत्र्याआधीच केले होते. त्यांचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

ज्यावेळी उत्तर भारतात महापूर असतो तेव्हा महाराष्ट्रात पाण्याची चिंता सतावत असते. एवढेच काय कोकणात लाखो लिटर पावसाचे पाणी वाहून जाते आणि मराठवाडा हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकत असतो. 

आज आपण जल आणि ऊर्जासाक्षरता या शब्दांचा सर्रास प्रयोग करतो पण या शब्दांमागील भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 मध्येच व्यक्त केली होती. 

पाण्याच्या समस्येवर कायमचा तोडगा हा नदीजोड प्रकल्पच असल्याचे त्यांनी सांगून ठेवले होते. हे वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शतकोत्तर रौप्यमोहत्सवी जयंती वर्ष म्हणून देशभर साजरे होते आहे. 

केंद्र सरकारने देखील त्याची जय्यत तयारी केली आहे आणि याच वर्षी नदीजोड प्रकल्पाला सुरुवात व्हावी हा मोठा योगायोग आहे. 

ज्या समाजाला हजारो वर्षे पाण्यापासून दूर ठेवले त्याच समाजातील बाबासाहेबांनी देशवासीयांना मुबलक पाणी आणि वीज मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले.  2000 मध्ये भारताला किती पाणी लागेल याचे नियोजन त्यांनी त्याच वेळी केले होते. 

पाण्यापासून ठेवले होते वंचित, त्याच नेत्याने सर्वप्रथम मांडली नदीजोड संकल्पना

कधी झाला पहिला प्रयत्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्हाईसरायच्या मुंबई कौन्सिलचे सदस्य असताना पाण्याचे व सिंचनाचे नियोजन कसे करावे याचा आराखडा तयार केला होता. केंद्रीय पाटबंधारे मंत्री होते तेव्हा त्यांनी नदीजोड प्रकल्प आणला होता. दामोदर व्हॅली प्रकल्प, शेतीविषयी योजना आणि वीज याबद्दल आपले धोरण स्पष्ट केले होते.
 
डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे अभ्यासक हरी नरके म्हणतात ज्या समाजाला पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले त्याच समाजातील बाबासाहेबांनी देशवासियांसाठी पाण्याचे नियोजन करणे हा काळाने घेतलेला वेगळ्या प्रकारचा 'सूड' आहे.

केंद्रीय पाटबंधारे मंत्री असताना देशातील मोठ्या नद्या जोडण्याचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे आणला. दामोदर, महानदी, कोसी, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीवरील धरणे आणि विजनिर्मिती प्रकल्प त्यांनी हाती घेतले.

आज ज्या प्रमाणे उत्तर भारतात पूरस्थिती असते तेव्हाही तिच स्थिती होती. या पूराचा सकारात्मक उपयोग करुन घेण्याच्या दृष्टीने मोठे विद्युत प्रकल्प उभारावेत. 

नद्यांना कालवे काढून दुष्काळी भागात पाणी घेऊन जावे, धरणे बांधून समुद्रात जाणारे पाणी अडवून त्याचा उपयोग शेतीला, उद्योगधंद्यांना करता येईल व पुरात होणारी जीवित आणि आर्थिक हानी टाळता येईल याकडे डॉ. आंबेडकरांनी सरकारचे लक्ष वेधले होते.

आज ज्या राज्यांमध्ये मुबलक पाणी आणि वीज आहे त्या राज्यांची भरभराट होताना दिसत आहे. उद्योगांचे प्राधान्य अशाच राज्यांना आहे. ही काळाची पावले बाबासाहेबांनी ओळखली होती. 

1942 मध्ये त्यांनी सिंचन, वीजनिर्मीती, जलवाहतूकीचा विकास आणि विस्तार या गोष्टी एकमेकांना पुरक असल्याचे सांगत त्यांच्या विकासावर भर देण्याचे सुचवले होते.

एका भाषणात बाबासाहेब म्हणाले होते, या देशातली लोकांना स्वस्त वीज नको आहे, तर जगातील सर्वात स्वस्त वीज या देशातील लोकांना मिळाली पाहिजे.

डॉ. बाबासाहेबांच्या दूरदृष्टीबद्दल अमेरिकन अभ्यासकाने लिहून ठेवले आहे.  

प्रो. हर्ट या अमेरिकन अभ्यासकानं त्यांच्या पुस्तकात भारतात पाटबंधारे विकास आणि व्यवस्थापनाची राजकीय इच्छाशक्ती डॉ. आंबेडकर या मंत्र्यांनी दाखविली नसती तर पुढची 25-30 वर्षे भारतात या क्षेत्राचा विकास खुरटला असता, असे म्हटले आहे. 

नदीजोड प्रकल्पाची संकल्पनाही देशात सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनींच 1942मध्ये मांडली होती.

देवांच्या अवताराची कहाणी

II देवांच्या अवताराची कहाणी II 
बुवा सांगत आपल्याच देशात लय युगं आले,
हरेक युगांत देवादिकांचे अवतारं खुप झाले (धृ)
विष्णुन तर म्हणे कधी संपच नाही केला;
प्रत्येक युगांत एक तरी अवतार त्याचा झाला,
असं म्हणून बुवा आपले पुराणात गेले (1)
कच्छ,मच्छ,वराह झाला म्हणे कधी झाला नरसिंह;
तोंड होतं सिंहाचं म्हणे माणसाचा त्याचा देह,
मग प्रश्न पडला नरसिंहाचे शेपूट कोणी नेले? (2)
परशुराम,राम,मोहिनी कधी झाला किशन;
बायकांना छेडण्याचं फक्त त्याच मिशन,
कळे नाही सोळासहस्त्र बायकांचे त्याने रेकाॅर्ड कसे केले? (3)
आता म्हणे अवतार त्याचा सुरु आहे कली;
जो चालेल ईमानानं त्याचाच जाईल बली,
बेईमानांना सांभाळण्याचे काम आता कलीवरती आले. (4)
कलीपायीच म्हणे हे खूनखराबे होतात;
म्हणून लोकं भीतात अन् देवळामंधी जातात,
पण शस्त्रांपासून देवांचेही हात होत नाही वाले. (5)
सगळं ऐकून माझा पारा आधीच खूप चढला;
उकरुन त्यात मुद्दा बुवानं ब्रम्हदेवाचा काढला,
म्हणे ब्रम्हदेवानं तर मायबापहो हे जग निर्माण केले. (6)
कथा त्याची ऐकतांना एक बाब ध्यानात आली;
की, ब्रम्हदेवाला गर्भधारणा कोणापासून झाली?
पण ऐकावं आधी म्हणल मग कराव बुवाला खुले. (7)
बुवा सांगे ब्रम्हदेव म्हणजे सृष्टीची माय;
त्या देवाची कहाणी लय अजब गजब हाय,
कुत्र्यावाणी म्हणे त्याले चार पिल्लं झाले.(8)
पुढे सांगे बुवा म्हणे ब्रम्हदेव व्याला;
ब्राम्हण,क्षत्रिय,वैश्य,शुद्र या चौघांची माय झाला,
कळत नव्हतं ब्रम्हानं बाईचे कसबचं कसे केले? (9) 
वैश्य निघाला मांडीतून म्हणे क्षत्रिय निघाला दंडातून;
शुद्र निघाला पायातून तर ब्राम्हण निघाला तोंडातून,
चार ठिकाणी जननद्वारं ब्रम्हाला कसे आले? (10)
पुन्हा एक प्रश्न मग ऐरणीवरती आला;
विचार करत होतो ब्रम्हानं नवरा कधी केला?
विचारलं जेव्हा याबद्दल कोणीच नाही बोले.(11)
एकच मुल देतांना माय देते किती कळा;
चार जंदताना ब्रम्हाने कुठे शिंपला रक्ताचा सळा(सडा),
नऊ महिण्याचे डोहाळे याचे पुरे कोणी केले? (12)
विचार करता करता एक अजून ध्यानात आलं; की गर्भपिशवीचं रोपणं ब्रम्हाच्या उदरात कोणी केलं?
टेस्ट ट्यूब बेबीचे तेव्हा टेक्निक नव्हते आले. (13)
स्त्रियांसारखा मासिक धर्म आधी ब्रम्हालाही आला;
म्हणूनच ब्रम्हदेव गर्भवती झाला,
अरे सव्वा महिण्याचे पत्थ्य कसे यानं केले? (14)
अरे तंत्रज्ञानाचा मित्रहो काळ एवढा आला;
पण अजूनही हिजडा मायबाप नाही झाला,
मग ब्रम्हालाच जंदायचे(व्यायचे)टेक्निक कसे आले? (15)                     
आपल्या देशांतच देवांचे अवतारचं कसे झाले?

T-shirt of Dr. Ambedkar

T-shirt of Dr. Ambedkar

Dr. Ambedkar's Books in Hindi

Dr. Ambedkar's Books in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Popular Posts