Buy books of DR BR Ambedkar, Buddhism, Dalit, Adiwasi & Bahujan Topics

Powered by Blomming for nikhilsablania

Thursday, January 28, 2016

संविधान लिहिल्या नंतर आंबेडकरांच्या डोळ्यात आले अश्रु

संविधान लिहिल्या नंतर आंबेडकरांच्या डोळ्यात आले अश्रु



संविधान  म्हणजे भारताचा आत्मा ;
 
1📘📖 - विश्वरत्न  डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान 395 कलमाचे का लिहले ??  ; 
394 किंवा 396 कलमाचे का लिहले नाहीत? तर त्याला कारण महात्मा फुले हे गुरू कारणीभूत आहेत ते कसे ?? तर  
2📘📖- महात्मा फुले यांनी  बहुजन समाजाला  शिक्षण  ज्या पुण्यातील भिडे वाडयातून दिले ; शाळा चालू केले ; त्या शाळेचा क्रमांक 395 होता ; त्याची व आपल्या गुरूविषयी कृतज्ञता म्हणून संविधान 395 कलमाचे लिहले   

3 📘📖- संविधानाच्या या मसूदा समितीवर  सात लोकांची निवड करण्यात आली होती 
त्यापैकी दोघांनी राजीनामा दिला ; एकाचा मृत्यू झाला; एक विदेशात गेला ; एकाची तब्येत ठीक नव्हती;  एक राजकारणात अडकला  

4📖- त्या मुळे मसुदा समिती अध्यक्ष या म्हणून  संविधान लिहण्याची सर्वस्वी जबाबदारी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर येवून पडलीय व ती त्यांनी समर्थपणे एकट्यानेच  पार पाडली म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे "संविधानाचे शिल्पकार" आहेत   

5📘-संविधानाची सुरूवात कशी करावी ? यावरून वाद चालू होता 
त्यात मौलाना हजरत मोहली म्हणून लागले की ;संविधान "अल्लाहच्या "नावाने सुरू करावे 
पंडीत मालवीय म्हणाले की; "ओम नम शिवाय" यां नावाने सुरू करा 
एच :पी :कामत म्हणाले की -"ईश्वर "नावाने सुरू करा 
 
मग शेवटी बाबासाहेब आंबेडकर म्हणाले " लोक" नावाने सुरू करा 
 मग
  यावर मतदान झाले  
मग बाबासाहेब आंबेडकर यांना 68 मते पडली 
तर देवाच्या नावाने 41 मते पडलीय 
संविधानाची सुरुवात  "आम्ही भारताचे लोक "
या नावाने झाली ; 

पहिल्याच मतदानात देव हरले व माणूस जिंकला 
 
6📘 - संविधानाचा कच्चा मसूदा बाबासाहेब आंबेडकर घरी लिहत बसले होते ; 
त्या वेळी  बॅ: पंजाबराव देशमुख हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी आले 
 
7📘- यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यां चे स्वागत केले ; 
तसेच संविधानाचा लिहत असलेला कच्चा मसूदा  बॅ: पंजाबराव देशमुख  यांना दाखवून  म्हणाले ; "की दादा यावर थोडी नजर मारा व काही सूचना असतील तर सूचवा " मी थोडयावेळात येतो" 
 असे म्हणून बाबासाहेब बाहेर गेले  

8📘- परत आले तर बॅ :देशमुख यांच्या डोळ्यात अश्रू पाहून बाबासाहेब  म्हणतात की दादा तुम्ही का रडताय ? 
 यावर देशमुख यांनी सांगितले की  बाबासाहेब  " माझ्या मराठा कुणबी(obc) समाजाच्या आरक्षणाची तरतूद करा " हे सांगण्यासाठी बाबासाहेब मी तुमच्याकडे  आलो होतो;  
पण तुम्ही किती महान आहात की मी येण्याच्या अगोदरच तुम्ही तो मसूदा तयार करून ठेवलाय ; यामुळे मला आनंदाश्रू आवरत नाहीत  

9📕- महात्मा फुले यांनी असे भाकित केले होते की ज्या वेळी बहुजन समाज मनुवादी धर्मग्रंथ वाचेल ;त्यादिवशी तो जाळल्याशिवाय राहणार नाही ; 
पहा बाबासाहेबानी मनुस्मृती नावाचा विकृत ग्रंथ जाहीरपणे जाळला व फुलेचा विश्वास खरा केला व फुले यांनी म्हटले होते की दुसरा राजग्रंथ निर्माण करेल ;
मग तो राजग्रंथ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान  लिहून पूर्ण केला   

10 📙- अमेरिकेतील कोलंबिया विदयापीठाने एक अहवाल तयार केला की त्या कालेजमधे शिकुन गेलेल्या 200 वर्षाच्या इतिहासात जगात सर्वात विदवान कोण ?  त्यांनी जाहीर केले होते की जगात  डाॅ :बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न ; विदवान आहेत ; father of modern India is Dr  ambedkar

11📕- कोलंबिया विद्यापीठाच्या मैदानात बाबासाहेब आंबेडकर यांचा ब्रांझ धातूचा पुतळा बनविला आहे व त्यात खाली लिहले होते की    "SYMBOL OF KNOWLEDGE "

12-📙 तेथील  कुलगूरूच्या कार्यालयात बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे 
व खाली लिहिले आहे की "आम्हाला गर्व आहे की आमच्या काॅलेजमधे शिकून गेलेला आमचा विद्यार्थी एका देशाचा संविधान शिल्पकार ठरला  " 

13-📙 नेल्सन  मंडेला म्हणतात की भारताकडून घेण्यासारखा एकच गोष्ट ती म्हणजे आंबेडकर यांनी लिहलेले संविधान   

14 📕- संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर  एका पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला की डाॅ बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला संविधान लिहताना काही अडचण येत होती का ? यावर बाबासाहेब आंबेडकर यांनी लगेच उत्तर दिले, की माझ्या  डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य उभे होते  
म्हणून मला अडचण आली नाही  "

15📙-बाबासाहेब म्हणाले की संविधान कितीही चांगलेच असू दया पण राबवणारे हात वाईट असेल तर ते संविधान  कुचकामी ठरते  ; म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांच्या हताश मनाचा मानबिंदू म्हणजे संविधान   

16📕- संविधान  लिहून झाल्यावर  बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोळ्यात अश्रू आले त्या वेळी तेथील पत्रकाराने विचारले की बाबासाहेब तुम्ही मनासारखे संविधान लिहून तुम्ही नाराज का आहात ? यावर बाबासाहेब आंबेडकर त्या पत्रकाराला उत्तर देताना सांगितले की ;" मी बहुजनाच्या  कल्याणाचा जाहीरनामा लागू करण्यासाठी ज्यांच्या हातात देत आहे ते लोक माझे बहुजन नाहीत " ;  
मला यांच्यावर विश्वास बसत नाही  की ते संविधान  जशाच्या तसे लागू करतील  

संविधान  निर्मितीची वरील घडामोडी व कर्मकहाणी सगळी कडे पोहचवा व संविधान विषयी कृतज्ञता बाळगा.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

नक्कि वाचा १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला.

नक्कि वाचा
१५ ऑगस्ट १९४७ रोजी
देश स्वतंत्र झाला.
२६ जानेवारी,१९५० रोजी
देशाचे बारसे करण्यात आले.
भारतीय संविधानाच्या माध्यमातून,
बुद्धांच्या देशाला
सम्राट अशोकाच्या देशाला
नव्या रुपात
घटनेचे शिल्पकार
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
जगासमोर मांडले.
भारताची जी ओळख
जगाला ठाऊक होती,
तीच ओळख
भारतीय संविधानाने
जगासमोर पुनर्स्थापित केली.
आपल्या देशाची संपूर्ण ओळख,
बुद्ध धम्माची ओळख झाली.
उदा...
*बुद्ध धम्माचे प्रतिक
आकाशी निळ्या रंगाला
राष्ट्रीय रंगाची मान्यता देण्यात आली,
*धम्माचे प्रतिक
कमळाचे फूल
आपले राष्ट्रीय फूल झाले,
*बोधीवृक्ष अर्थात पिंपळाच्या वृक्षाला
राष्ट्रीय वृक्षाची मान्यता मिळाली.
*बुद्धधम्माच्या धम्मचकाला
राष्ट्रीय चिन्ह घोषित करुन
राष्ट्रीय ध्वजावर अंकीत करण्यात
आले.
*सम्राट अशोकाची राजधानी सारनाथ
येथील चारसिंह ही राजमुद्रा,
भारताची राजमुद्रा घोषित झाली.
*समता, स्वातंत्र्य, न्याय व विश्व बंधुत्व हे
बुद्ध धम्माचे तत्त्व
भारतीय संविधानाचे तत्त्व
म्हणून स्विकारण्यात आले,
*`सत्यमेव जयते' हे
सम्राट अशोकाचे घोषवाक्य,
भारतीय शासनव्यवस्थेचे
ब्रीद वाक्य म्हणून मानांकीत झाले.
एवढेच नाही तर
आपल्या देशाची प्रत्येक ओळख ही
बौद्ध संस्कृतीशी संबंधित झाली.
*आपल्या राष्ट्रीय ध्वज तिरंग्यातील
सर्वात पहिला रंग ज्याला आपण
लाल, केशरी, भगवा, लाल, नारंगी म्हणतो.
त्या रंगाला
भारतीय घटनेचे एका विशेष नावाने
वर्णित केले आहे.
इंग्रजीत त्याला
`ओशर' असे नाव आहे.
ओशर म्हणजे-
लालसर पिवळ्या मातीचा रंग,जो
बौद्ध भिक्षुंच्या चिवराचा रंग असतो.
चिवर हे बौद्ध भिक्षुंचे वस्त्र आहे.
जे त्यागाचे प्रतिक आहे.
*दुसरा रंग पांढरा
ज्या रंगाला बुद्ध धम्मात विशेष महत्त्व
आहे.
पांढरा रंग हा शांती व सत्याचा प्रतिक
म्हणून बौद्ध उपासक शील ग्रहण करताना
पांढरे वस्त्र परिधान करतात.
*तिसरा रंग हिरवा जो
निसर्गावर, प्राणीमात्रावर प्रेम
करण्याचा बुद्ध धम्माचा
पंचशीलेची शिकवण देणारा रंग
*तिरंग्याच्या मधोमध
बुद्ध धम्मतेचे प्रतिक
निळे धम्मचक आहे.
जे
सार्या विश्वाला
बुद्ध धम्माची ओळख देते.
असा सर्वांगीण बुद्ध
धम्माची प्रचिती देणारा
आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा,
राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
देशाला बहाल केला.
भारताच्या सर्वोच्च नागरीक
पुरस्काराचे नावही
बुद्ध धम्माशी संबंधित आहे.
*`भारतरत्न'
रत्नही बुद्ध धर्माची पदवी.
बुद्ध, धम्म, संघ
म्हणजे बुद्ध धम्मातील त्रिरत्न.
बुद्ध धर्मात
सर्वश्रेष्ठ व्यक्तीला "रत्न "
ही पदवी बहाल केली जाते.
अनेक बौद्ध भिक्षूंच्या नावात
रत्न ह्या शब्दाचा उल्लेख असतो.
उद...भन्ते ज्योतीरत्न, भन्ते संघरत्न, भन्ते
शांतीरत्न वगैरे.
रत्न ह्या महान शब्दाचा
बाबासाहेबांवर खूप प्रभाव होता.
बाबासाहेबांनी आपल्या एक
लाडक्या मुलाचे नावदेखील रत्न
शब्दांशी संबंधित राजरत्न ठेवले होते.
त्या रत्न महान शब्दावरुनच
देशाच्या सर्वोच्च नागरीक पुरस्काराचे
नाव भारतरत्न ठेवण्यात आले आहे.
त्या पुरस्काराचे
चिन्ह स्वरुप देखील
बुद्ध धम्माशी निगडीत आहे.
बोधीवृक्षाच्या पिंपळाचे सोनेरी पान,
ज्यावर
पुरस्कार स्विकारणाऱया व्यक्तीचे
सोनेरी अक्षरात नाव कोरले जाते
व दुसऱया बाजूला
चार सिंह ही राजमुद्रा
व धम्मचक असते.
*बुद्ध धम्माचे
मैत्री, प्रेम व करुणेचे प्रतिक असलेल्या
कमळाचे फुलाला
घटनाकारांनी राष्ट्रीय फुलाची
मान्यता दिली.
थायलंड, श्रीलंका, बर्मा इ.
बौद्धराष्ट्रात भगवान बुद्धांच्या चरणी
कमळाचे फूल अर्पण करतात.
कमळाच्या फुलाला
पाली भाषेत `पदम' असे म्हणतात.
*भारतरत्न पुरस्काराच्या
खालोखाल तीन प्रमुख पुरस्कार आहेत,त्या
पुरस्कारांची नावे
पद्म म्हणजे कमळाचे चिन्ह असते,
कमळाच्या एका बाजूस
पद्म व दुसऱया बाजूस
विभूषण, भूषण किंवा श्री
लिहिले असते.
*युद्ध शौर्यातील
तीन प्रमुख पुरस्कार
परमवीर चक व वीरचक
या पुरस्कारांवर देखील
कमळाचे फूल प्रामुख्याने असते.
*युद्ध शौर्यातील
प्रमुख पुरस्काराचे नाव
अशोक चक्र आहे.
*भारताच्या राष्ट्रपती भवनातील
प्रमुख दिवाणखान्याचे नाव
अशोक हॉल आहे.
*आपल्या केंद्रियमंत्री मंडळाच्या
निवासस्थान परीसराचे नाव देखील
बुद्ध संस्कृतीवर ठेवले आहे.
सम्राट अशोकाच्या
मंत्री मंडळाच्या नगरीचे नाव
जनपथ होते.
तेच जनपथ नाव आपल्या
केंद्रिय मंत्री निवास स्थानाचे आहे.
उदा... ७ जनपथ,१० जनपथ,११ जनपथ.
अशी
भारताची ओळख असणाऱया
प्रत्येक गोष्टीचा
बुद्ध धम्माशी संबंध आहे.
बुद्ध संस्कृतीशी नातं आहे.
घटना समितीच्या सदस्यांपैकी
प्रत्येकाने ती मान्य केली.
कारण ते सत्य आहे आणि
जे सत्य असते ते
कधीच अमान्य होऊ शकत नाही.
अशाप्रकारे बाबासाहेबांनी
सर्व भारत बौद्धमय केला.
हा
बुद्ध धम्माचा विजय.
सम्राट अशोकाचा विजय.
बोधीसत्व भारतरत्न
डॉ. बाबासाहेबांचा विजय.
हाच
भारतीय सविधानचा विजय
With 
आकाश साखरे

26 जानेवारी 1950 पासुन भारतात संविधान लाजु करण्यात आले. संविधान लिहिले कुणी..?

[1/26, 10:09 PM] ‪+91 82377 71979‬: 26 जानेवारी 1950 पासुन भारतात संविधान लाजु करण्यात आले.
संविधान लिहिले कुणी..?? भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
यांनी 2 वर्षे 11 महीने 18 दिवस सतत सखोल अभ्यास करुन
भारतीय संविधानाची निर्मिती केली. संविधान लिहितांना
डाॅ. बाबासाहेबांना आपल्या स्वतःच्या तब्बेतीची काळजी
घेतली नाही. आणि त्यामुळे त्यांचे आयुष्य कमी होऊन 6 डिसेंबर
1956 ला त्यांचे महापरिनिर्वाण झाले. तरीही देखिल 26
जानेवारी च्या दिवशी काही शिक्षक विद्यार्थ्यांना खरी
माहिती देत नाही. किंवा डाॅ. बाबासाहेब आंबेडकराचा
जयघोष करायला सांगत नाही हे मोठे दुर्देव आहे.
26 जानेवारी 1950 पासुन भारत देश प्रजासत्ताक झाला.
म्हणजेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील प्रत्येकाला
एक मत देण्याचा अधिकार देवून त्या मताच्या आधारेच प्रजेची
सत्ता निर्माण केली. स्वातंञ्यापूर्वी भारतात राजा हा
राणीच्या पोटातुन जन्म घेत असे. परंतु प्रजासत्ताक दिनापासुन
राजा हा मताच्या पेटीतुन निघतो. एवढ्या मोठ्या
परिवर्तनाच्या जनकाचे आपण 26 जानेवारी च्या दिवशी
जयघोष करीत नाही. हे खेदजनक आहे.
परिवर्तवादी जबाबदार शिक्षकाने, अधिका-याने प्रत्येक 26
जानेवारीला राष्ट्रध्वजाखाली डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची
प्रतिमा ठेवुनच ध्वजारोहण करावे. हि विनंती.
सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....जय भिम
[1/26, 10:09 PM] ‪+91 82377 71979‬: ताश के पत्तो से महल नही बन सकता,
नदी को रोकने से समंदर नही बन सकता,
दुनिया मेँ अभी भी बहुत कलम चलाने वाले है,
लेकीन कोई कलम चलाने वाला संविधान नही लिख सकता,
हो गया एक ही शेर,
अभी कोई भी,
डॉ.भीमराव आंबेडकर नही बन सकता...
..........................................
भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्त संविधान निर्माते,
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी
प्रणाम...!!!

जर रस्त्यावरील दुकानात शिवाजी आणि बाबासाहेबांचा फोटो असता तर मी त्यातून बाबासाहेबांचा फोटो उचलला असता.आपणही माझ्या मताशी सहमत असावे अशी माझी जबरदस्ती नाही

🙏जय भिम🙏

 जर रस्त्यावरील दुकानात शिवाजी आणि बाबासाहेबांचा फोटो असता तर मी त्यातून बाबासाहेबांचा फोटो उचलला असता.आपणही माझ्या मताशी सहमत असावे अशी माझी जबरदस्ती नाही.

🙏जय भिम🙏

मी शिवाजी पेक्षा बाबासाहेबांचाच फोटो उचलला असता आणि उचलनारच.100%

का ? की शिवाजीबद्दल मला आदर नाही. आहे तर तो कितपत असावा ? का तो आदर बाबासाहेबांपेक्षा जास्त असावा का ? आणि असावा तर तो का असावा?
असल्या प्रश्नाना माझे उत्तर असे आहे की, शिवाजीना मी सम्राट अशोक पेक्षा महान समजत नाही.माझ्यासाठी शिवाजी फक्त एक उत्तम राजे होते. एक राजे म्हणून त्यांची जनतेबद्दलची जागृकता नक्कीच चांगली होती.पण या जागृतीचा फायदा कुनाला झाला.?  महारांची स्थिती तर शिवाजीच्या काळात तशीच होती.ब्राम्हणाचे वर्चस्वही तेच होते.?

प्रश्न हा आहे की, आमचे दैवत कोन ? कुनी आमच्या दु:खाला वाचा फोडली.?  कोण आमच्या दु:खासाठी लढले ? कुनी आमची हजारो वर्षाची गुलामी नष्ट केली ? तेली ,कुनबी, माळ्याना कुनी हक्क अधिकार आणि हक्क प्राप्त करुन दिले ? कोन होते ते ज्यानी आमच्या दु:खासाठी स्वत:च्या पत्नीचा आणि मुलाचाही बळी दिला ? कोन होते ते ज्यांच्या  नजरेसमोर क्षण आणि क्षण आमचे भुकेले चेहरे ,उघडे अंग ,भिकारी अवस्था रात्रंदिवस रेंगाळत होते.

काय ते शिवाजी होते ? 

नाही ते बाबासाहेब होते.शिवाजीच्या कोणत्याच लढ्याने आमचे दु:ख दुर झाले नाही.उलट शिवाजीच्या राज्यात महारांची स्थिती भिकारीच होती. 
ज्या बाबासाहेबानीच शिवाजीला नाकारले तिथे तुम्ही आम्ही कोन चिल्लर लागलोत शिवाजीला स्विकारायला. शिवाजी एक उत्तम राजे होते याव्यतिरिक्त आम्ही त्यांच्याकडून काय घ्यायचे. ते लढले मुस्लीमांविरुद्ध.त्यात ते जिंकलेही.पण ब्राम्हणाला तर ते अधिनच गेले. ब्राम्हणांच्या पायाच्या अंगठ्याने स्वत:चा राज्यभिषेक करुन घेणे याला काय आम्ही संबोधावे.असो त्या विषयी मला बोलायचे नाही.कारण त्यांची तितकी समिक्षा करने हेही माझी लायकी नाही.

असे असले तरी माझे आदर्श बाबासाहेब आहेत.कारण मी आणि माझा समाज आज त्यांच्यामुळे आहोत.बाबासाहेब नसते तर आमच्या अंगावर आज कुत्रही मुतलं नसतं.हे मी डंकेच्या चोट वर म्हणू शकतो.

तुम्हाला वाटते तर तुम्ही खुशाल बाळगा आदर्श हवे त्यांचे.अभिव्यक्ती आहे तुम्हास.पण माझ्या अभिव्यक्तीवर तुम्हाला चारान्याचाही प्रश्न उभा करन्याचा अधिकार नाही हे तुम्ही नक्कीच ध्यानात घ्यावे.

शेवटी हेच बाबासाहेबानी कधीच त्यांच्या लढ्यात, कार्यात, राजकारणात शिवाजींचा उदो केला नाही.बाबासाहेबांचे आदर्श तत्वझान फक्त बुद्ध होते याशिवाय काहीच नाही.

तरुणपणी बाबासाहेबांनी त्यांच्या समोरच्या रुम मध्ये शिवाजींचा फोटो लावला होता.अधिक अभ्यासानंतर तो त्यानी उतरुन खाली ठेवला. काय कारण असावे याला ? कारण बाबासाहेबाना कळले होते अस्पृष्यांच्या कल्यानासाठी लढन्याचा शिवाजींचा कोनताच इतिहास नाही. अस्पृष्याना हिनतेचे जीवन देनारया ब्राम्हणांच्या विरोधात शिवाजीने काहीच केले नव्हते.
स्वता बाबासाहेब म्हणतात," शिव छत्रपतीला ब्राम्हण्य नष्ट करता आले नाही.आपल्या राज्यभिषकासाठी सोने देउन काशीहून गागाभट्टाला आनावे लागले.ब्राम्हणांची नांगी शिवाजीला तोडता आली नाही. त्यामुळे ब्राम्हण्य नष्ट केल्याशिवाय समाजाची उन्नती नाही.

मला शिवाजीप्रिय आहे पण त्यापेक्षाही एक राजे  म्हणून सम्राट अशोक प्रिय आहे. 
बाकी आता आपली व्यभिव्यक्ती....
🔵एक कट्टर भिम योद्धा🔵

🙏जय भिम🙏

"मी संपूर्ण भारत बुध्दमय करीन"-: डाँ.बाबासाहेब आंबेडकर

🔹"मी संपूर्ण भारत बुध्दमय करीन"-: डाँ.बाबासाहेब आंबेडकर,

     -:१५ ऑगस्ट १९४७ रोजी
देश स्वतंत्र झाला.
२६ जानेवारी,१९५० रोजी
देशाचे बारसे करण्यात आले.

भारतीय संविधानाच्या माध्यमातून,
बुद्धांच्या देशाला
सम्राट अशोकाच्या देशाला
नव्या रुपात
घटनेचे शिल्पकार
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
जगासमोर मांडले.

भारताची जी ओळख
जगाला ठाऊक होती,
तीच ओळख
भारतीय संविधानाने
जगासमोर पुनर्स्थापित केली.

आपल्या देशाची संपूर्ण ओळख,
बुद्ध धम्माची ओळख झाली.
उदा...

🔵*बुद्ध धम्माचे प्रतिक
आकाशी निळ्या रंगाला
राष्ट्रीय रंगाची मान्यता देण्यात आली,

🌷*धम्माचे प्रतिक
कमळाचे फूल
आपले राष्ट्रीय फूल झाले,

🌳*बोधीवृक्ष अर्थात पिंपळाच्या वृक्षाला
राष्ट्रीय वृक्षाची मान्यता मिळाली.
*बुद्धधम्माच्या धम्मचकाला
राष्ट्रीय चिन्ह घोषित करुन
राष्ट्रीय ध्वजावर अंकीत करण्यात
आले.

*सम्राट अशोकाची राजधानी सारनाथ
येथील चारसिंह ही राजमुद्रा,
भारताची राजमुद्रा घोषित झाली.

*समता, स्वातंत्र्य, न्याय व विश्व बंधुत्व हे बुद्ध धम्माचे तत्त्व
भारतीय संविधानाचे तत्त्व
म्हणून स्विकारण्यात आले,

*`सत्यमेव जयते'हे
सम्राट अशोकाचे घोषवाक्य,
भारतीय शासनव्यवस्थेचे
ब्रीद वाक्य म्हणून मानांकीत झाले.

एवढेच नाही तर
आपल्या देशाची प्रत्येक ओळख ही
बौद्ध संस्कृतीशी संबंधित झाली.

*आपल्या राष्ट्रीय ध्वज तिरंग्यातील
सर्वात पहिला रंग ज्याला आपण
लाल, केशरी, भगवा, लाल, नारंगी म्हणतो.
त्या रंगाला
भारतीय घटनेचे एका विशेष नावाने
वर्णित केले आहे.
इंग्रजीत त्याला
`ओशर'असे नाव आहे.
ओशर म्हणजे-
लालसर पिवळ्या मातीचा रंग,जो
बौद्ध भिक्षुंच्या चिवराचा रंग असतो.
चिवर हे बौद्ध भिक्षुंचे वस्त्र आहे.
जे त्यागाचे प्रतिक आहे.

*दुसरा रंग पांढरा
ज्या रंगाला बुद्ध धम्मात विशेष महत्त्व आहे.
पांढरा रंग हा शांती व सत्याचा प्रतिक म्हणून बौद्ध उपासक शील ग्रहण करताना पांढरे वस्त्र परिधान करतात.

*तिसरा रंग हिरवा जो
निसर्गावर, प्राणीमात्रावर प्रेम करण्याचा बुद्ध धम्माचा
पंचशीलेची शिकवण देणारा रंग

*तिरंग्याच्या मधोमध
बुद्ध धम्मतेचे प्रतिक
निळे धम्मचक आहे.
जे
सार्‍या विश्वाला
बुद्ध धम्माची ओळख देते.

असा सर्वांगीण बुद्ध
धम्माची प्रचिती देणारा
आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा,
राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
देशाला बहाल केला.

भारताच्या सर्वोच्च नागरीक पुरस्काराचे नावही
बुद्ध धम्माशी संबंधित आहे.

*`भारतरत्न'
रत्नही बुद्ध धर्माची पदवी.
बुद्ध, धम्म, संघ
म्हणजे बुद्ध धम्मातील त्रिरत्न.
बुद्ध धर्मात
सर्वश्रेष्ठ व्यक्तीला"रत्न"
ही पदवी बहाल केली जाते.
अनेक बौद्ध भिक्षूंच्या नावात
रत्न ह्या शब्दाचा उल्लेख असतो.
उद...भन्ते ज्योतीरत्न, भन्ते संघरत्न, भन्ते शांतीरत्न वगैरे.
रत्न ह्या महान शब्दाचा
बाबासाहेबांवर खूप प्रभाव होता.
बाबासाहेबांनी आपल्या एक
लाडक्या मुलाचे नावदेखील रत्न
शब्दांशी संबंधित राजरत्न ठेवले होते.
त्या रत्न महान शब्दावरुनच
देशाच्या सर्वोच्च नागरीक पुरस्काराचे
नाव भारतरत्न ठेवण्यात आले आहे.
त्या पुरस्काराचे
चिन्ह स्वरुप देखील
बुद्ध धम्माशी निगडीत आहे.
बोधीवृक्षाच्या पिंपळाचे सोनेरी पान,
ज्यावर
पुरस्कार स्विकारणाऱया व्यक्तीचे सोनेरी अक्षरात नाव कोरले जाते
व दुसऱया बाजूला
चार सिंह ही राजमुद्रा
व धम्मचक असते.

*बुद्ध धम्माचे
मैत्री, प्रेम व करुणेचे प्रतिक असलेल्या कमळाचे फुलाला
घटनाकारांनी राष्ट्रीय फुलाची मान्यता दिली.
थायलंड, श्रीलंका, बर्मा इ.
बौद्धराष्ट्रात भगवान बुद्धांच्या चरणी
कमळाचे फूल अर्पण करतात.

कमळाच्या फुलाला
पाली भाषेत `पदम'असे म्हणतात.

*भारतरत्न पुरस्काराच्या
खालोखाल तीन प्रमुख पुरस्कार आहेत,त्या पुरस्कारांची नावे
पद्म म्हणजे कमळाचे चिन्ह असते,
कमळाच्या एका बाजूस
पद्म व दुसऱया बाजूस
विभूषण, भूषण किंवा श्री
लिहिले असते.

*युद्ध शौर्यातील
तीन प्रमुख पुरस्कार
परमवीर चक व वीरचक
या पुरस्कारांवर देखील
कमळाचे फूल प्रामुख्याने असते.

*युद्ध शौर्यातील
प्रमुख पुरस्काराचे नाव
अशोक चक्र आहे.

*भारताच्या राष्ट्रपती भवनातील
प्रमुख दिवाणखान्याचे नाव
अशोक हॉल आहे.

*आपल्या केंद्रियमंत्री मंडळाच्या
निवासस्थान परीसराचे नाव देखील
बुद्ध संस्कृतीवर ठेवले आहे.
सम्राट अशोकाच्या
मंत्री मंडळाच्या नगरीचे नाव
जनपथ होते.
तेच जनपथ नाव आपल्या
केंद्रिय मंत्री निवास स्थानाचे आहे.
उदा... ७ जनपथ,१० जनपथ,११ जनपथ.

अशी
भारताची ओळख असणाऱया
प्रत्येक गोष्टीचा
बुद्ध धम्माशी संबंध आहे.
बुद्ध संस्कृतीशी नातं आहे.
घटना समितीच्या सदस्यांपैकी
प्रत्येकाने ती मान्य केली.
कारण ते सत्य आहे आणि
जे सत्य असते ते
कधीच अमान्य होऊ शकत नाही.

अशाप्रकारे बाबासाहेबांनी
सर्व भारत बौद्धमय केला.
हा

बुद्ध धम्माचा विजय.
सम्राट अशोकाचा विजय.
बोधीसत्व भारतरत्न
डॉ. बाबासाहेबांचा विजय.
हाच
भारतीय संविधानाचा विजय.
💐🙏जय भीम.🙏💐
"आवडल्यास पुढे शेयर करा"

रोहित वेमुलाचं शेवटचं पत्र

रोहित वेमुलाचं शेवटचं पत्र
गुड मॉर्निंग,
तुम्ही जेव्हा हे पत्र वाचत असाल तेव्हा मी नसेल, माझ्यावर नाराज होऊ नका, कारण अनेकांना माझी परवा होती, तुम्ही माझ्यावर प्रेम करत होते, आणि माझी काळजीही घेत होते. माझी कुणाबद्दलही तक्रार नाही. मला नेहमीच माझ्याबद्दल अडचण होती. मी माझा आत्मा आणि शरीर यांच्यात निर्माण झालेली दरी वाढताना पाहतोय. मी एक राक्षस झालो आहे. मी एक लेखक होऊ इच्छीत होतो. विज्ञानावर लिहिणारा, कार्ल सगान सारखा. शेवटी अखेर मी एक पत्र लिहितोय.

माझं विज्ञानावर प्रेम होतं, ताऱ्यांवर, निसर्गावर, लोकांवरही मी प्रेम केलं, पण हे समजलं नाही, त्यांनी कधी निसर्गाला फारकत दिली. आपल्या भावना दुय्यम दर्जाच्या झाल्या आहेत. आपलं प्रेम नकली आहे, आपल्या मान्यता खोट्या आहे. आपली मूल्य वैध आहेत फक्त कृत्रिम कलेच्या माध्यमातून. हे फार कठीण झालं आहे, आपण प्रेम करावं आणि दु:खी होऊ नये.

एका व्यक्तीची किंमत त्याची तत्कालीन ओळख आणि जवळच्या शक्यतेवर मर्यादीत करण्यात आली आहे. एका मतापर्यंत. माणूस एक आकडा झाला आहे. फक्त एक वस्तू. कधीही माणसाला त्याच्या मेंदूनुसार मोजलं गेलं नाही. एक अशी वस्तू जी स्टारडस्टपासून तयार झाली होती. प्रत्येक क्षेत्रात, अभ्यासाने, गल्ल्यांमध्ये, राजकारणात, मरणात आणि जगण्यात.

मी पहिल्यांदा अशा प्रकारचं पत्र लिहित आहे, पहिल्यांदा शेवटचं पत्र लिहित आहे, मला माफ करा, जर याचा कोणताही अर्थ निघत असेल. 

असं होऊ शकतं की मी चुकीचा असेल, जग समजून घेण्यासाठी, प्रेम, जीवन, यातना आणि मृत्यू समजून घेण्यात. मी कोणत्याही गडबडीत नव्हतो, पण मी नेहमीच घाईत होतो. बेचैन होतो, जीवन सुरू करण्यात. या संपूर्ण कार्यकाळात जीवन माझ्यासारख्या लोकांसाठी एक अभिशाप होता. माझा जन्म एक भीषण दुर्घटना होती. मी जन्मापासून एकटेपणातून बाहेर येऊ शकलो नाही. बालपणाचं प्रेम मला कुणापासूनही मिळालं नाही.

मी दु:खी नाहीय. मी फक्त खाली-खाली आहे. मला स्वत:ची चिंता नाही. हे दयनीय आहे, आणि याचचं कारण आहे की मी आत्महत्या करतोय.

लोक मला कायर संबोधतील. स्वार्थीही, मूर्ख सुद्धा, जेव्हा मी निघून गेलो असेल, मला काहीही फरक पडणार नाही, मला लोक काय म्हणतायत. मेल्यानंतर भूत-प्रेताच्या गोष्टींमध्ये मी विश्वास करत नाही. जर कोणत्या गोष्टीत माझा विश्वास आहे, तर तो म्हणजे, मी ताऱ्यांपर्यंत प्रवास करू शकेल, आणि जाणून घेऊ शकेल की दुसरं जग कसं आहे.

जर तुम्ही माझं पत्र वाचत असाल, तर माझ्यासाठी एवढंच करा, माझी सात महिन्याची फेलोशीप मिळणे बाकी आहे. १ लाख ७५ हजार रूपये. कृपया ते माझ्या परिवारापर्यंत पोहोचवा. मला रामजी यांना ४० हजार रूपये द्यायचे होते, त्यांनी पैसे कधीच परत मागितले नाहीत. पण कृपया त्यांना फेलोशीपच्या पैशातून पैसे द्या.

माझी इच्छा आहे की, माझी शेवटची प्रेतयात्रा शांततेत निघावी. असं वाटू द्या की मी आलो होतो, आणि निघून गेलो. माझ्यासाठी अश्रू गाळू नका, फक्त एवढं ध्यानात ठेवा, मी आनंदी आहे जगण्यापेक्षा मरणाने.

उमा अन्ना मी हे काम तुमच्या रूममध्ये केलं म्हणून मी माफी मागतो. आंबेडकर स्टुंडंट असोसिएशन परिवार, तुम्हाला सर्वांना निराश करतोय, मला माफ करा. तुम्ही सर्वांनी माझ्यावर नितांत प्रेम केलं, सर्वांना भविष्यासाठी शुभेच्छा!

सर्वांना शेवटचा...

जय भीम!
मी काही औपचारीक गोष्टी लिहिणं विसरलो, मी स्वत:ला संपवतोय, या कृत्यासाठी कुणीही जबाबदार नाहीय.
कुणीही मला असं करण्यासाठी भडकवलेलं नाही, कुणीही असं कृत्य केलेलं नाही, किंवा शब्द वापरले नाहीत, ज्यामुळे मी असं केलं.
हा माझा निर्णय आहे, आणि यासाठी मी जबाबदार आहे. मी गेल्यानंतर माझ्या मित्रांना आणि शत्रुंनाही त्रास देऊ नका.

रोहित वेमूला हत्याप्रकरण हि स्टोरी प्रत्येकाने काळजीपूर्वक वाचा,ज्यांना प्रश्नपडले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे यात आहेत

: 🇮🇳आजचा दैनिक मी मराठी live 🇮🇳

    रोहित वेमूला हत्याप्रकरण हि स्टोरी प्रत्येकाने काळजीपूर्वक वाचा,ज्यांना प्रश्नपडले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे यात आहेत.... वाचा शेअर करा..लाईक करू नका..माहिती जास्तीतजास्त लोकांना शेअर होऊ द्या.
आता पेटून उठले पाहिजे !!

हैदराबाद केंद्रीय विद्यापीठात विज्ञान हा विषय घेऊन पीएचडी करत असलेल्या २८ वर्षीय रोहित वेमूला या स्कॉलर विद्यार्थ्यावर २१व्या शतकातही सामाजिक बहिष्कृततेला सामोरे जावे लागल्याने मानसिकदृष्ट्या खचून जाऊन वसतीगृहातील खोलीतच रविवारी रात्री गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपविले आहे.रोहित वेमूला आणि इतर चार विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासन आणि सरकारमधील काही मंत्री,हिंदुत्ववादी विद्यार्थ्यी संघटना यांच्यामार्फत जातीयद्वेषातून अन्यायकारक अशी सामाजिक बहिष्कृतता लादून विद्यापीठाची प्रशासकीय इमारत, वसतीगृह, कॅन्टिन, ग्रंथालयासह विद्यापीठातील अनेक ठिकाणी प्रवेशास बंदी करण्यात आली होती.या घटनेमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थी संघटनांनी आक्रमक होत सोमवारी सकाळपासून यास जबाबदार असलेल्या विद्यीपीठ प्रशासन आणि भाजपचे केंद्रीय श्रममंत्री व आरएसएस सदस्य बंडारु दत्तात्रय यांच्यावर कारवाईसाठी निदर्शने सुरु केली असून तेलंगणा बंदची हाक देण्यात आली आहे.
प्रकरण काय आहे पाहूया.
रोहित वेमूला हा (ASA) आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचा अध्यक्ष होता.
३० जुलैला याकुब मेननला फाशी देण्यात आली तेव्हा देशात फाशीची शिक्षा असावी कि नसावी हा वाद बराच रंगला होता,त्यानिमित्ताने एक चर्चासत्र हैदराबाद विद्यापीठात आयोजित करण्यात आले होते.सदर चर्चासत्रात ASA आंबेडकर स्टुडंट असोसिएशन आणि ABVP अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,हि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थ्यीविंग आहे.यांच्यात फाशीच्या मुद्यावरून मतभेद झाले होते.आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचे असे म्हणने होते कि याकुबला सश्रम कारावास जन्मठेप दिली जावी.त्याच्याकडून आणखी काही माहिती धागे-दोरे मिळतात का हे पाहिले जावे.तर दुसरीकडे ABVP चे म्हणने होते याकुबला फाशीच व्हायला हवी.गुन्हेगारांना फाशी द्यावी कि न द्यावी याविषयी देशात अनेक वेगवेगळी मते आहेत.याकूबची फाईल दहाव्या नबंरवर असताना सरकारने याकुबला फासावर लटकाविण्याची घाई केली.ABVP संघटना हि भाजपासरकारचाच एक भाग असल्यामुळे त्यांनी याकूबच्या फाशीवर जोर देणे स्वाभाविक आहे.देशातील सत्तांतरामुळे देशात असहिष्णुतेचे वातावारण असल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील काही विद्यार्थ्यांनी आंबेडकर स्टुडंट असोसिएशनवर फाशीला विरोध करतात म्हणून देशद्रोही असल्याची टिप्पणी केली.यामुळे दोघांमध्ये खटका उडाला होता.
याविषयीचा वाद विद्यार्थ्यांच्या फेसबुकवरपेजवरही काही दिवस पहायला मिळत होता.पुढे ऑगस्ट 03/08/2015 आणि 04/08/2015 ला दिल्ली विद्यापीठात "मुझ्झफरनगर अभी बाकी है" ह्या बहुचर्चित माहितीपटाचे प्रदर्शन आंबेडकर स्टुडंट असोसिएशनने आयोजित केले होते,ते होऊ नये यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी विरोध करत हिंसक निदर्शने केली होती.हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा होता.त्यामुळे पुन्हा दोघांत संघर्षाची ठिणगी उडाली.
माहितीपटाचे प्रदर्शन झाल्यामुळे चिडलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष सुशीलकुमार याने आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या विद्यार्थ्यांना फेसबुकपेजवर अपशब्द वापरले.त्याची तक्रार विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केली.सदर प्रकाराबाबत विद्यापीठ सुरक्षा प्रशासन अधिकार्यांच्यासमोर सुशीलकुमारने माफी मागितली खरी परंतु तो राग मनात ठेवून सुशीलकुमारने त्याच रात्री स्वत:ला हैद्राबादमधील अर्चना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले.पोलिसांत आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याची खोटी तक्रार दाखल केली.यात ज्या पाच विद्यार्थ्यांची नावे नोंदवली गेली ते या प्रकरणात कुठेच हजर देखील नव्हते.विद्यापीठ सुरक्षा प्रशासन अधिकारी प्रा.आलोक पांडे यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून सुशीलकुमारवर कुणीही शारीरिक मारहाण किंवा हल्ला केला नसल्याचा अहवाल दिला.परंतु तरीही अनाकलनीयपद्धतीने संबंधित विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रशासनाकडून निलंबनाचे आदेश दिले गेले.या आदेशाच्या विरोधात सर्व पुरोगामी आणि लोकशाहीवादी विद्यार्थ्यी संघटनानी विद्यापीठ प्रशासनाचा निषेध केला.तेव्हा माजी कुलगुरू प्रा.पि शर्मा यांनी सदर विद्यार्थ्यांचे निलंबन रद्द केले पुन्हा नव्याने चौकशीसाठी आणखी एक समिती नेमली.
याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थ्यी केंद्रीय श्रममंत्री बंडारु दत्तात्रय यांच्याकडे गेले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हि भाजापाचीच विद्यार्थ्यी विंग असल्यामुळे बंडारु दत्तात्रय यांनी यात जातीने लक्ष घालून ताबडतोब केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री स्मृती इराणी यांना १७/०८/२०१५ ला पत्र लिहून विद्यापीठाला सदर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावेत अशा आशयाचे पत्र पाठवले, त्यानुसार केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने सदर विद्यापीठाला तत्काळ स्पष्टीकरण मागत चौकशी करून कारवायी करण्याचे आदेश पत्रात दिले.यावर पुन्हा अगोदरच्या समिती बरखास्त करत नविन दोन सदस्यीय समिती नेमली गेली.दोन पोलीस दोन सुरक्षा रक्षक आणि दोन तक्रारदार यांच्या जबानीवर विद्यार्थ्यांचे म्हणने ऐकून न घेता एकतर्फी निर्णय घेत विद्यापीठ प्रशासन सदर विद्यार्थ्यांना अन्यायकारकरित्या सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत केले.विद्यापीठाची प्रशासकीय इमारत, वसतीगृह, कॅन्टिन, ग्रंथालय यासह विद्यापीठातील अनेक ठिकाणी प्रवेशास बंदी करण्यात आले. विद्यापीठ प्रशासन,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,भाजपाचे मंत्री यांच्या संगनमताने या विद्यार्थ्यांना रस्त्यावर दिवस काढावे लागले.विद्यापीठीय राजकारणाने निरपराध विद्यार्थ्याना उध्वस्त करत त्यांच्या करिअरचा बळी घेतलाच त्यात एकाचे आयुष्यही हिरावून घेतले गेले. याविरोधात आता तेलंगणाच्या सर्व विद्यार्थी संघटनांनी बंद पुकारला आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थींनी संघटनांनीही रोहितच्या आत्महत्येचा निषेध केला आहे.
सर्वच स्तरातून शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रात गलीच्छ राजकारण दंडेली आणि दहशत निर्माण करणाऱ्या ABVP म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेवर बंदी घालण्याची जोरदार मागणी होत आहे.सदर संघटना हि घटना विरोधी कृत्यात अनेकदा सहभागी असल्याचे दिसून येते. काही ठळक घटना पाहिल्या तर चेन्नई मधील IIT संस्थेत एका कार्यक्रमात मोदी सरकारच्या गोमांस भक्षण आणि हिंदीप्रभुत्ववादाच्या धोरणाबद्दल चर्चा झाली आणि त्यातून या मुद्द्यांना विरोध झाला आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कल या विध्यार्थी संघटनेविरुद्ध ABVP संघटनेने बंदीची मागणी घातली सदर कार्यक्रमाचे रिपोर्टिंग थेट मनुष्यबळ मंत्रालयाला केले गेले आणि तिथून ताबडतोब बंदीचे आदेश निघाले या बंदीला झालेल्या जोरदार विरोधामुळे सरकारने शेवटी माघार घेतली.त्यानंतर एफटीआयआयमध्ये सरकारपुरस्कृत गजेंद्र चौहान आणि अजून पाच सदस्यांच्या नियुक्तीवर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत उपोषण केले,त्यांना धमकावण्याचे काम या संघटनेने केले आहे. मागे मुंबईतील सेंटझेवियर्समध्ये शाहीर शितल साठेचा कार्यक्रम होता तो धमक्या मनगटशाहीच्या जोरावर ABVP संघटनेने होऊ दिला नाही. त्यानंतर तीन तारखेला सोलापूर येथील सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमातही अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घालून कार्यक्रम उधळून लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.तेथील उपस्थित कार्यकर्त्यांनीच चोप देवून त्यांना पळवून लावले. यावरून सदर संघटना शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत धोकादायक आहे हे स्पष्ट होते.घटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य या संघटनेला मान्य नाही.तसेच तीला सत्ताधारी सरकारचे पाठबळ असणे हे अत्यंत घातक आहे.या सर्वांचा नीट विचार केला तर असे दिसून येते कि भाजपासरकार पद्धतशीरपणे इथे विशिष्ट विचारसरणी रूजवू पहात आहे.
आणि मागासवर्गांना शिक्षणापासून तोडण्याचे उद्योग करत आहे.
एकीकडे सबका साथ विकासच्या गप्पा करायच्या आणि दुसरीकडे सामाजिक बहिष्कृततेच्या प्रथा शिक्षणक्षेत्रात राबवायच्या,आरक्षणाला विरोध नाही म्हणायचे आणि आरक्षणाची समीक्षा करण्याचा आग्रह धरायचा,मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला कात्री लावायची आणि दुसरीकडे शिक्षणक्षेत्रात गुंड संघटना वाढवून मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर दहशत निर्माण करायची त्रास द्यायचा हिंदुत्ववादी अजेंडे राबवत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे उद्योग करायचे.रोहित वेमूला आणि इतर चार विद्यार्थ्यांवर विद्यापीठाच्या प्रोक्टोरियल चौकशीत कोणत्याही प्रकारचा गुन्हा सिद्ध झालेला नसताना त्यांना गुंड म्हणायचे त्यांनी याकूबला समर्थन दिले म्हणून देशद्रोही म्हणायचे असे खोटेच प्रचार आता हि संघटना करत असून त्यांच्या राजकारणाने झालेल्या खुनाचे एक प्रकारे समर्थन करण्याचा उद्योग चालू झाला आहे.भाजपा आरएसएसचे धार्मिक आणि जातीय धृवीकरण देशाला नविन नाही.हे सर्व पाहता हि ब्राह्मण्यवादी विचारसरणी आहे असे म्हणता येते. हिंदुत्ववाद हाच राष्ट्रवाद आहे. आणि जे घटक विचारसरणी यास विरोध करेल ते राष्ट्रद्रोही आहेत.हि भाजपा संघ परिवार आणि हिंदुत्ववादी संघटना यांची संकल्पना आहे.याच खुळचट भावनेतून आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या विद्यार्थ्यांवर अन्यायकारक कारवायी केली गेलीय.त्यामुळे विद्यापीठ प्रशासन आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमधील नेत्यांच्या संगनमताने घडवून आणलेला हा खून आहे असे विविध पुरोगामी डाव्या आणि मागासवर्गीय संघटनाचे म्हणने आहे. भाजपासरकार संबंधित नेत्यांचे राजीनामे घेऊन त्यांना शासन करणार कि नाही? त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नोंदवला जाऊ नये? अशा संघटनावर बंदी घालून शिक्षणक्षेत्र दहशतमुक्त करणार कि नाही?
चंद्रशेखर आझाद इंग्रजांशी लढताना जेव्हा त्यांच्या तटबंदीत सापडले तेव्हा त्यांनी शेवटची गोळी स्वत:च्या मस्तकात झाडून घेऊन ते शहिद झाले,चन्द्रशेखर आझाद यांची हि आत्महत्या नाही. रोहित वेमूलाने हेच केले.अशी भावना आता देशभरातील विद्यार्थ्यांच्या मनात जोर धरू लागली आहे.भडकलेली हि तरुणांची आग सरकारला अडचणीचे ठरेल यात शंका नाही.
सोशल मीडियातही तरुण वर्गाने तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध केला आहे. ‪#‎universityofhyderabad‬ ‪#‎Rohit_Vemula‬ ‪#‎BanABVP‬ हे हॅशटॅग ट्रेंड दिवसभर दिसत होते, त्यामुळे तरुणांची भावना लक्षात येते. दिल्ली युनिव्हर्सिटी मुंबई कलिना युनिव्हर्सिटीसह देशभरात ठिकठिकाणी निदर्शने करण्यासाठी तरुण एकवटले आहेत.
एका निरपराध विद्यार्थ्याला अशा प्रकारे आपले जीवन संपावायला लागणे हे तरूणांची संख्या जास्त असलेल्या देशासाठी लाजिरवाणे आहे.

‪#‎SAYNOTOBJP‬ #BANABVP ‪#‎BANBJP‬ ‪#‎RIP_RohitVemula‬ #banABVP #universityofhyderabad #Rohit_Vemula 

T-shirt of Dr. Ambedkar

T-shirt of Dr. Ambedkar

Dr. Ambedkar's Books in Hindi

Dr. Ambedkar's Books in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Popular Posts