Buy books of DR BR Ambedkar, Buddhism, Dalit, Adiwasi & Bahujan Topics

Powered by Blomming for nikhilsablania

Saturday, November 26, 2016

नोटबंदीवर मनमोहन सिंग यांचं म्हणणं काय आहे हे

नोटबंदीवर मनमोहन सिंग यांचं म्हणणं काय आहे हे जाणून घ्यायची सगळ्यांनाच उत्सुकता होती. ४ दिवसांपूर्वी आरबीआयचे माजी डेप्युटी गव्हर्नर डॉ. के सी चक्रवर्ती यांनी युपीए २ च्या काळातसुद्धा नोटबंदीचा निर्णय घ्यावा म्हणून अनौपचारिक प्रस्ताव आला होता असं 'द हिंदू'च्या मुलाखतीत  सांगितलं. त्यानंतर तर मनमोहन सिंग यांना अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी मुलाखतीसाठी विनंती केली होती. पण, अत्यंत विनम्रपणे सिंग यांनी ती नाकारली होती.

अधिवेशन सुरु असताना कोणत्या व्यासपीठाचा उपयोग आपलं म्हणणं मांडण्यासाठी करायचा याचं लोकतांत्रिक भान त्यांना होतं !

आज अखेर ते बोलले. पूर्वी बोलायचे तसेच. मुद्दा न सोडता. आवाज न वाढवता. ( किंवा कंठ दाटून आलाय वगैरे न दाखवता !)

देशात या निर्णयानंतरच्या आजच्या सोळाव्या दिवशीही जनजीवन पूर्वपदावर आलेले नाही. ग्रामीण काय शहरी भागातले लोकही त्रस्त आहेत. लोक शांत आहेत म्हणजे त्यांनी पाठींबा दिलाय असा सोयीस्कर आणि प्रचारी अर्थ सरकारने काढलाय. लोकांचे प्रश्न ऐकू येऊ नयेत म्हणून सगळ्या माध्यमांतून आपल्या राखीव फौजेच्या जीवावर वातावरण विखारी बनवले जात आहे. या सगळ्याचा सामाजिक पर्यावरणावर आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असतो हे समजण्याचा अभ्यास डॉ मनमोहन सिंग यांच्याकडे आहे.

पण, इतर जवळपास सगळेच वक्ते आणि राजकीय पक्ष हे बोलत असताना मनमोहन सिंग मुद्दा सोडून इकडे तिकडे सरकले नाहीत. संयत ! भूतकाळात प्रत्येक स्फोटक आणि नाजूक परिस्थितीत समोरच्या बाकांवरून काय आक्रस्ताळी विधाने केली गेली होती ते त्यांनाही आठवत नसेल असे नाही. पण डॉक्टरसाब मागच्या विरोधकांसारखे टीका करताना मतलबी झाले नाहीत !!

ते देशाच्या जीडीपीबद्दल बोलले. शेतकरी, असंघटित क्षेत्र हे भरडून जात आहेत त्याबद्दल बोलले. नियोजन शून्यता आहे हे स्पष्ट शब्दांत त्यांनी सुनावले. संघटित लूट चालली आहे असा गंभीर आरोप केला. बँका पैसे कसे नाकारू शकतात असा संवैधानिक प्रश्न त्यांनी विचारला. आरबीआय, अर्थ मंत्रालय आणि पीएमओ या तिन्ही संस्थाच्या ( ज्या तिन्हींशी भूतकाळात थेट संबंध आलेली एकमेव व्यक्ती ते आहेत !!)  प्रतिष्ठेबद्दल त्यांनी आवाज उठवला. आणि "भविष्यासाठी हा निर्णय आहे" असा जो एकमेव पोकळ दावा उरला होता त्याचाही समाचार केवळ एका 'कोट'मध्ये घेतला.

हे करताना कुठे अभिनिवेश होता ?
हे करताना त्यांनी नाहक टोमणे मारलेले ऐकलेत ?
राजकीय कुरघोडी करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न कुठे दिसला ?

सभ्यता, ऋजुता हि व्यक्तीची अंगभूत वैशिष्ट्ये असतात.

इतिहास माझे मूल्यमापन करेल असं ते नेहमी म्हणतात. संधी असूनसुद्धा आणि सभोवतालचे सगळेच त्या संधीमध्ये बेभान होत असताना असंस्कृत आणि बेजबाबदार होणं कसोशीने टाळलेला, वैयक्तिक मूल्यांना कधीही निसटू न दिलेला नेता हि त्यांची ओळख वर्तमानातसुद्धा ठाशीव आहे !

बाकी अर्थतज्ज्ञ म्हणून तुम्ही अजोड आहातच हे तुम्हाला ऐकायला विरोधकसुद्धा सभागृहात हजर होते यावरूनच सिद्ध होतं !!!


I support one of the finest brain on the planet  economics professor Manmohan singh

No comments:

Post a Comment

T-shirt of Dr. Ambedkar

T-shirt of Dr. Ambedkar

Dr. Ambedkar's Books in Hindi

Dr. Ambedkar's Books in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Popular Posts