Buy books of DR BR Ambedkar, Buddhism, Dalit, Adiwasi & Bahujan Topics

Powered by Blomming for nikhilsablania

Friday, January 8, 2016

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरिनिर्वाण’ दिनाचा उल्लेख

पुणे - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'महापरिनिर्वाण' दिनाचा उल्लेख 'पुण्यतिथी' करणार्या कालनिर्णय विरोधात न्यायालयात 
याचिका दाखल करण्यात आली आहे.

राजेश नारायण खडके (वय - ४१, रा. मध्यवर्ती शासकीय इमारत, कर्मचारी वसाहत) यांनी कालनिर्णयचे व्यवस्थापक व संपादक शिवराम
जयंत साळगावकर (वय - ४२, रा. एमआयडीसी, मुंबई, महाराष्ट्र) यांच्या विरोधात एस. डी. गुलाने यांच्या न्यायालयात अॅड. वाजेद खान
(बीडकर) यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.

६ डिसेंबर दिवस संपूर्ण भारतभर
'महापरिनिर्वाण' दिन म्हणून उल्लेख ला जातो.

कालनिर्णय या दिनदर्शिकेत याचा उल्लेख 'पुण्यतिथी' असा करण्यात आला आहे. 
या शब्दाला याचिकाकर्त्यानी आक्षेप
दर्शविला आहे. कालनिर्णय ही दिनदर्शिका संपूर्ण महाराष्ट्रात वितरित व प्रसिद्ध केली जाते. 

६ डिसेंबर १९५६ मध्ये डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांचे निधन झाले. त्यांचे अनुयायी हा दिवस 'महापरिनिर्वाण' दिन म्हणून साजरा करतात. 

१९५६ मध्ये त्यांनी 'बौद्ध धर्माचा'
स्वीकार केला होता. त्या मुळे 'पुण्यतिथी' हा शब्द त्यांच्या निधनाच्या दिवशी वापरले जाणे हे गैर कायदेशीर असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

पाली भाषेत या दिनाला 'परिनिब्बान' तर संस्कृतमध्ये 'परिनिर्वाण' म्हटले जाते. 

६ डिसेंबर हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 'महापरिनिर्वाण' दिन म्हणून समजला जातो. 

डॉ. आंबेडकर हे महामानव होते. म्हणून त्यांच्या 'महापरिनिर्वाण' दिनी
'पुण्यतिथी' उल्लेख कालनिर्णय दिनदर्शिकेवर केला असल्याने अर्जदारांच्या भावाना दुखावल्या आहेत. 

त्यामुळे ही दिनदर्शिकेवरील चूक दुरूस्त करून दिनदर्शिका वितरित करणे आवश्यक असल्याचे याचिका कर्त्याचे म्हणणे आहे. 

ही चूक सुधारली गेल्यास याला
याचिका कर्त्याचा कोणत्याही प्रकारे
आक्षेप राहणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अशा वादग्रस्त शब्दामुळे समाजातील शांतता भंग होण्याची भितीही याचिका कर्त्यांनी व्यक्त केली आहे.

जय भीम

No comments:

Post a Comment

T-shirt of Dr. Ambedkar

T-shirt of Dr. Ambedkar

Dr. Ambedkar's Books in Hindi

Dr. Ambedkar's Books in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Blog Archive

Popular Posts