डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,
"मी माझ्या आयुष्याची ५५ वर्षे जर
सरकारी नोकरीत असतो, तर मला आता सेवानिवृत्ती होणे भागच पडले असते .परंतु मी माझ्या आयुष्यातील एकमेव धेय्याखातीर बड्या पगाराच्या नोक-या नाकारल्या आहेत .
हे सांगत असतांना पुढे बाबासाहेब म्हणाले,
"इकॉनाॅमिक्स विषयातील परदेशातील पदवी घेऊन भारतात परतलेला मी केवळ
अनुसूचित जातीमधुनच नव्हे, तर
संपूर्ण भारतातून पहिला होतो.
मुंबईत पाय टेकताच मुंबई सरकारने
मला राजकीय अर्थशास्त्राचे
प्राध्यापकपद
स्वीकारण्याची विंनती केली. मी जर
ती मान्य केली असती तर आज मला लठ्ठ
पगार मिळाला असता. पण मी ती नाकारली. कारण सरकारी नोकर
व्हायचे म्हणजे
आपल्या लोकांच्या उन्नतीसाठी काम
करायच्या तुमच्या इच्छेवर
स्वाभाविकच मर्यादा पडतात.
त्यानंतर पुन्हा मी पुढील शिक्षण
घेण्यासाठी इंग्लंडला गेलो. तेथून पात्रता संपादन करून आल्यावर पुन्हा मला जिल्हा न्यायाधीशाचे
पद देऊ करण्यात आले. तीन वर्षात
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर नेमण्याचे आश्वासनही त्यासोबत दिलेले होते.
त्यावेळी मला धड शंभर रुपये हि मिळत
नव्हते. अत्यंत गरीब
लोकांसाठी बांधलेल्या चाळीतील एका खोलीत मी तेव्हा राहत होतो. तरीही मी तो देकार नाकारला. जर
मी ती नोकरी केली असती, तर
सुखवस्तूपणाची हमी मिळाली असती. पण
माझ्या सहबांधवांच्या कल्याणाचे व उन्नतीचे प्रयत्न करण्याचे
माझ्या आयुष्याचे ध्येय सफल
करण्याच्या मार्गात त्या नोकरीमुळे
अडथळे उत्पन्न झाले असते. या एकाच
करणाने मी नकार दिला.
१९४२ साली पुन्हा माझ्यासमोर एक
पर्याय आला होता. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी माझी नियुक्ती होऊ
घातली होती. ती झाली असती तर मी आर्थिकदृष्ट्या तर श्रीमंत झालोच असतो, शिवाय दहा वर्षानंतरच्या सेवेनंतर
मी सुखाची जिंदगी जगली असती. पण
"माझ्या लहानपणापासून
जेव्हा मला आयुष्याचा अर्थ समजू लागला, तेव्हापासून मी जीवनाचे एक तत्व सतत अनुसरत आलो. ते म्हणजे माझ्या समाज बांधवांची सेवा करण्याचे. एव्हढे
लक्ष मी कधीच दुस-या प्रश्नाकडे दिले नाही. अस्पृश्यांचे हितसंबंध मला सुरक्षित केलेच पाहिजेत. माझ्या आजवरच्या आयुष्याचे तेच
ध्येय होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जेंव्हा माझा मुलगा यशवंतचा मृत्यु झाला होता, तेंव्हा कांही लोक माझ्याकडे येऊन यशवंतसाठी 'कफन' आणायला पैसे मागायला आले होते. पण माझ्याकडे स्वतःच्या मुलाला कफन विकत आणण्यापूरते सुध्दा पैसे नव्हते. शेवटी माझी पत्नी, रमाबाईने, आपल्या स्वतः च्या अंगावरील साडीचा एक पदर फाडून दिला आणि मग आम्ही यशवंतला त्यामध्ये गुंडाळून स्मशानात घेऊन गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, या मी जेवढी गरीबी अनुभवली आहे, तेवढी गरीबी कदाचित भारतातील एकाही नेत्याने आनुभवली नसेल.मी गरीब असूनही कधी गरीबीचे कारण सांगून माझा स्वाभिमान व माझे आंदोलन कधीच कमी पडू दिले नाही. एवढी गरीबी असूनही मी पैशासाठी विकलो गेलो नाही आणि यापुढील आयुष्याचेही तेच ध्येय राहणार आहे आणि हेच ध्येय प्रत्येकाने आपल्या डोळ्यासमोर ठेवून
आपल्या प्रत्येक रक्ताच्या माणसांसाठी काम करीतच रहावे. प्रत्येकाने आपल्या समोर एक धेय बनवा आणि आपल्या बांधवाना एकत्रीत करा. कारण तुम्ही एकत्र आल्याशीवाय तुम्ही कोणालाही लढा देऊ शकत नाहीत. कारण एकीचे बळ हे कोणीही जगात मोडू शकत नाही. म्हणून खूप शिका, संघटीत व्हा, आणि संघर्ष करा.
"गरीबीमुळे स्वाभिमान गहान टाकू नका."
विचार करा.. देश घडवा...
Please Change the Name Yeshwant to Rajratna.
ReplyDelete