Buy books of DR BR Ambedkar, Buddhism, Dalit, Adiwasi & Bahujan Topics

Powered by Blomming for nikhilsablania

Thursday, January 28, 2016

"मी संपूर्ण भारत बुध्दमय करीन"-: डाँ.बाबासाहेब आंबेडकर

🔹"मी संपूर्ण भारत बुध्दमय करीन"-: डाँ.बाबासाहेब आंबेडकर,

     -:१५ ऑगस्ट १९४७ रोजी
देश स्वतंत्र झाला.
२६ जानेवारी,१९५० रोजी
देशाचे बारसे करण्यात आले.

भारतीय संविधानाच्या माध्यमातून,
बुद्धांच्या देशाला
सम्राट अशोकाच्या देशाला
नव्या रुपात
घटनेचे शिल्पकार
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
जगासमोर मांडले.

भारताची जी ओळख
जगाला ठाऊक होती,
तीच ओळख
भारतीय संविधानाने
जगासमोर पुनर्स्थापित केली.

आपल्या देशाची संपूर्ण ओळख,
बुद्ध धम्माची ओळख झाली.
उदा...

🔵*बुद्ध धम्माचे प्रतिक
आकाशी निळ्या रंगाला
राष्ट्रीय रंगाची मान्यता देण्यात आली,

🌷*धम्माचे प्रतिक
कमळाचे फूल
आपले राष्ट्रीय फूल झाले,

🌳*बोधीवृक्ष अर्थात पिंपळाच्या वृक्षाला
राष्ट्रीय वृक्षाची मान्यता मिळाली.
*बुद्धधम्माच्या धम्मचकाला
राष्ट्रीय चिन्ह घोषित करुन
राष्ट्रीय ध्वजावर अंकीत करण्यात
आले.

*सम्राट अशोकाची राजधानी सारनाथ
येथील चारसिंह ही राजमुद्रा,
भारताची राजमुद्रा घोषित झाली.

*समता, स्वातंत्र्य, न्याय व विश्व बंधुत्व हे बुद्ध धम्माचे तत्त्व
भारतीय संविधानाचे तत्त्व
म्हणून स्विकारण्यात आले,

*`सत्यमेव जयते'हे
सम्राट अशोकाचे घोषवाक्य,
भारतीय शासनव्यवस्थेचे
ब्रीद वाक्य म्हणून मानांकीत झाले.

एवढेच नाही तर
आपल्या देशाची प्रत्येक ओळख ही
बौद्ध संस्कृतीशी संबंधित झाली.

*आपल्या राष्ट्रीय ध्वज तिरंग्यातील
सर्वात पहिला रंग ज्याला आपण
लाल, केशरी, भगवा, लाल, नारंगी म्हणतो.
त्या रंगाला
भारतीय घटनेचे एका विशेष नावाने
वर्णित केले आहे.
इंग्रजीत त्याला
`ओशर'असे नाव आहे.
ओशर म्हणजे-
लालसर पिवळ्या मातीचा रंग,जो
बौद्ध भिक्षुंच्या चिवराचा रंग असतो.
चिवर हे बौद्ध भिक्षुंचे वस्त्र आहे.
जे त्यागाचे प्रतिक आहे.

*दुसरा रंग पांढरा
ज्या रंगाला बुद्ध धम्मात विशेष महत्त्व आहे.
पांढरा रंग हा शांती व सत्याचा प्रतिक म्हणून बौद्ध उपासक शील ग्रहण करताना पांढरे वस्त्र परिधान करतात.

*तिसरा रंग हिरवा जो
निसर्गावर, प्राणीमात्रावर प्रेम करण्याचा बुद्ध धम्माचा
पंचशीलेची शिकवण देणारा रंग

*तिरंग्याच्या मधोमध
बुद्ध धम्मतेचे प्रतिक
निळे धम्मचक आहे.
जे
सार्‍या विश्वाला
बुद्ध धम्माची ओळख देते.

असा सर्वांगीण बुद्ध
धम्माची प्रचिती देणारा
आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा,
राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
देशाला बहाल केला.

भारताच्या सर्वोच्च नागरीक पुरस्काराचे नावही
बुद्ध धम्माशी संबंधित आहे.

*`भारतरत्न'
रत्नही बुद्ध धर्माची पदवी.
बुद्ध, धम्म, संघ
म्हणजे बुद्ध धम्मातील त्रिरत्न.
बुद्ध धर्मात
सर्वश्रेष्ठ व्यक्तीला"रत्न"
ही पदवी बहाल केली जाते.
अनेक बौद्ध भिक्षूंच्या नावात
रत्न ह्या शब्दाचा उल्लेख असतो.
उद...भन्ते ज्योतीरत्न, भन्ते संघरत्न, भन्ते शांतीरत्न वगैरे.
रत्न ह्या महान शब्दाचा
बाबासाहेबांवर खूप प्रभाव होता.
बाबासाहेबांनी आपल्या एक
लाडक्या मुलाचे नावदेखील रत्न
शब्दांशी संबंधित राजरत्न ठेवले होते.
त्या रत्न महान शब्दावरुनच
देशाच्या सर्वोच्च नागरीक पुरस्काराचे
नाव भारतरत्न ठेवण्यात आले आहे.
त्या पुरस्काराचे
चिन्ह स्वरुप देखील
बुद्ध धम्माशी निगडीत आहे.
बोधीवृक्षाच्या पिंपळाचे सोनेरी पान,
ज्यावर
पुरस्कार स्विकारणाऱया व्यक्तीचे सोनेरी अक्षरात नाव कोरले जाते
व दुसऱया बाजूला
चार सिंह ही राजमुद्रा
व धम्मचक असते.

*बुद्ध धम्माचे
मैत्री, प्रेम व करुणेचे प्रतिक असलेल्या कमळाचे फुलाला
घटनाकारांनी राष्ट्रीय फुलाची मान्यता दिली.
थायलंड, श्रीलंका, बर्मा इ.
बौद्धराष्ट्रात भगवान बुद्धांच्या चरणी
कमळाचे फूल अर्पण करतात.

कमळाच्या फुलाला
पाली भाषेत `पदम'असे म्हणतात.

*भारतरत्न पुरस्काराच्या
खालोखाल तीन प्रमुख पुरस्कार आहेत,त्या पुरस्कारांची नावे
पद्म म्हणजे कमळाचे चिन्ह असते,
कमळाच्या एका बाजूस
पद्म व दुसऱया बाजूस
विभूषण, भूषण किंवा श्री
लिहिले असते.

*युद्ध शौर्यातील
तीन प्रमुख पुरस्कार
परमवीर चक व वीरचक
या पुरस्कारांवर देखील
कमळाचे फूल प्रामुख्याने असते.

*युद्ध शौर्यातील
प्रमुख पुरस्काराचे नाव
अशोक चक्र आहे.

*भारताच्या राष्ट्रपती भवनातील
प्रमुख दिवाणखान्याचे नाव
अशोक हॉल आहे.

*आपल्या केंद्रियमंत्री मंडळाच्या
निवासस्थान परीसराचे नाव देखील
बुद्ध संस्कृतीवर ठेवले आहे.
सम्राट अशोकाच्या
मंत्री मंडळाच्या नगरीचे नाव
जनपथ होते.
तेच जनपथ नाव आपल्या
केंद्रिय मंत्री निवास स्थानाचे आहे.
उदा... ७ जनपथ,१० जनपथ,११ जनपथ.

अशी
भारताची ओळख असणाऱया
प्रत्येक गोष्टीचा
बुद्ध धम्माशी संबंध आहे.
बुद्ध संस्कृतीशी नातं आहे.
घटना समितीच्या सदस्यांपैकी
प्रत्येकाने ती मान्य केली.
कारण ते सत्य आहे आणि
जे सत्य असते ते
कधीच अमान्य होऊ शकत नाही.

अशाप्रकारे बाबासाहेबांनी
सर्व भारत बौद्धमय केला.
हा

बुद्ध धम्माचा विजय.
सम्राट अशोकाचा विजय.
बोधीसत्व भारतरत्न
डॉ. बाबासाहेबांचा विजय.
हाच
भारतीय संविधानाचा विजय.
💐🙏जय भीम.🙏💐
"आवडल्यास पुढे शेयर करा"

No comments:

Post a Comment

T-shirt of Dr. Ambedkar

T-shirt of Dr. Ambedkar

Dr. Ambedkar's Books in Hindi

Dr. Ambedkar's Books in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Blog Archive

Popular Posts