Buy books of DR BR Ambedkar, Buddhism, Dalit, Adiwasi & Bahujan Topics

Powered by Blomming for nikhilsablania

Thursday, January 28, 2016

मित्रांनो उदया आहे २६ जानेवारी, म्हणजेच आपला प्रजासत्ताक दिन.
आता हा प्रजासत्ताक दिन म्हणजे काय. 
नक्की वाचा आपल्या देशासाठी आणि आपल्या पुढील पीढ़ीसाठी


प्रजासत्ताक म्हणजे काय ओ  ?

प्रजासत्ताक म्हणजे एक प्रकारचे स्वातंत्र्य. ते स्वातंत्र्यदिनाशी संबंधित आहे…… 
हे उत्तर मिळाले जेव्हा वरील प्रश्न विचारला. बर हे उत्तर देणारा कोण ? तर तो होता IIT चा एक विद्यार्धी.

प्रजासत्ताक दिन म्हणजे आपल्या साठी आणखीन एक सुट्टी एवढाच संबंध उरलाय की काय अस वाटू लागल आहे

त्याच प्रमाणे अनेक तरुण नागरिकांची उत्तर आश्चर्यकारक नव्हे तर लाजिरवाणी होती.

एका खाजगी कार्यालयात काम करणारा म्हाणाला या दिवशी स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशाबरोबर कोणता तरी करार झाला होता.

तर एकाला विचारले आपण किती दिवस झाले प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत ? तर त्याने उलट अस विचारलं माझा फोटो छापून येणार असेल तर सांगतो.

तर आजून एकाला प्रश्न विचारला तर त्याने सांगितले हा दिवस गांधीजीच्या संबंधित आहे.

एकजण वन्दे मातरम गात होता, त्याला विचारले वन्दे मातरम  गातो आहेस मग २६ जानेवारीला काय झाले, त्याने सांगितले २३ जानेवारी आहे म्हणून गातोय, 
आता बोला.     

आणखी एकाला विचरले, तर त्याने तो प्रश्न आपल्या सहकाऱ्या मित्रावर टोलवला.

तर आणखी एकाने सांगितलं या दिवशी असहकार चळवळ सुरु झाली होती.

पेशाने शिक्षक असलेल्या एका तरुणाने सांगितल भाषण स्वाततांत्र्याचा हक्क मिळाला म्हणून हा दिवस साजरा केला जातो. 

एकाने सांगितले मला असले फालतू प्रश्न नका विचारू.

तर एकाने सांगितलं हा काय सामान्य ज्ञानाचा तास आहे का ?     

तर अस आहे आजच्या तरुण भारताच्या दृष्टीने आपल्या प्रजासत्ताक दिनाच महत्व. 

ठीक आहे, चला आपण पाहूया प्रजासत्ताक म्हणजे काय ? आणि तो का साजरा केला जातो ? 

१५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. परवशतेचे पाश तुटले… आणि स्वतंत्र भारताच्या पुढील योजना काय असतील, देश कोणत्या वाटेनं वाटचाल करेल. लोकांच्या कल्याणाच्या कोणत्या योजना राबवल्या जातील हे सारं ठरवण्यासाठी तत्कालीन नेते, पुढारी सुपुत्र ह्यांनी आपल्या देशाची एक राज्यघटना बनवली. ह्या राज्य घटनेची आखणी मांडणी करण्यासाठी एक समिती नेमली होती. जवाहरलाल नेहरू,

डॉ राजेन्द्र प्रसाद, सरदार वल्लभ भाई पटेल, मौलाना अबुल कलाम आजाद  हे या समितीचे प्रमुख सदस्य होते.त्या समितीचे अध्यक्ष होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर. या समितीचे काम २९ऑगस्ट १९४७ रोजी सुरु झाले आणि अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ ला मंजूर झाला.या समितीने हि राज्य घटना २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसात पूर्ण केली, संविधानात मुख्य भाग आणि १२ परीशिष्टे आहेत तसेच २२ उपविभाग आहेत. सध्या राज्यघटनेत ४४७ कलमे असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते. या साठी ११४ वेळा समितीच्या वेग वेगळ्या बैठका झाल्या. या बैठका मध्ये पत्रकार तसेच सामान्य जनतेला देखील सहभागी करून घेतले होते. राज्यघटना तयार करण्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सिहांचा वाटा आहे, म्हणूनच स्वतंत्र भारताच्या राज्य घटनेचे शिल्पकार हा बहुमान त्यांना आम जनतेने बहाल केला आहे. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम (Sovereign) , समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular), लोकशाही (Democratic) प्रजासत्ताक(Republic) गणराज्य आहे. 

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा दरवर्षी जानेवारी २६ रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. भारताची राज्यघटना घटना समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी अंमलात आली. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला. देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.२६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवसांपैकी एक आहे. (इतर दोनः स्वातंत्र्य दिवस: ऑगस्ट १५ व गांधी जयंती: ऑक्टोबर २). ह्या दिवशी भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते.

भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी)समवेत संचलन करतात. भारतीय राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात.या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात.

दरवर्षी २६ जानेवारीला लालकिल्ल्यावरून भारताचे पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करतात. त्यात गतवर्षाचा आढावा घेत नववर्षाच्या नव योजना जाहीर केल्या जातात. देखणं संचलनही सादर केले जाते. स्वातंत्र्यासाठी बलीदान दिलेल्या राष्ट्रवीरांना आदरांजली वाहिली जाते. हा राष्ट्रीय सण प्रत्येक भारतवासीय मोठा अभिमानाने आणि आनंदाने साजरा करतो.

कृपया हि माहिती जास्ती जास्त लोकांना पाठवा जेणे करून पुढील वर्षी कोणी हि विचारणार नाही कि प्रजासत्ताक म्हणजे काय ओे ?

धन्यवाद ………. 
भारत माता की जय ,🇮🇳🇮🇳
जय जवान जय किसान 🇮🇳🇮🇳

No comments:

Post a Comment

T-shirt of Dr. Ambedkar

T-shirt of Dr. Ambedkar

Dr. Ambedkar's Books in Hindi

Dr. Ambedkar's Books in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Blog Archive

Popular Posts