राजर्षि शाहु महाराज आणि ज्योतिषी !!
एक दिवशी शाहु महाराजांच्या दरबारात एक ज्योतिषी आला आणि महाराजांना अस सांगण्यात आल की ज्योतिषी अत्यंत अत्यंत हहुशार आहे, त्याला भविष्य अत्यंत चांगलं कळत शाहु महाराजांचा यावर विश्वास नव्हता
त्यांनी ज्योतिष्याला भेटायला नकार दिला शेवटी दरबारी लोकांनी विनंती केली मग महाराजांनी सांगितलं जा आणि घेऊन या..
ज्योतिषी आला दरबारात त्यान शाहु महाराजांना मुजरा केला. महाराजांनी तिकड न बघताच सांगितलं जा रे याला बेड्या लावा आणि याला तुरुंगात ठेवा. महाराजांची आज्ञा तिथ कुणाच चालना महाराजांचा शब्द हाच कायदा त्याप्रमाणे त्याला चार दिवस तुरुंगात ठेवण्यात आलं.. चार दिवसांनी पुन्हा दरबार भरला आणि महाराजांना आठवल ते म्हणाले अरे त्या ज्योतिष्याला बोलवा त्याला बोलवल त्याच्या बेड्या काढल्या त्याला उच्यासनावर बसवल, त्याचा सत्कार केला.. पण ज्योतिष्याला काहि समजेना तो भाबांवून गेला
तो म्हणाला महाराज मला काही च कळत नाहि, चार दिवसापूर्वी दरबारात मी आलो मला अटक का केली हे कळत नाही आणि आज चार दिवसांनी माझी सुटका करुन सत्कार केला मला काहिच समजेना महाराज..
महाराज म्हणाले.. तुला काही कळत नाही हे तुला कळाव ऐवढ्यासाठी हे केल. तुला चार दिवसापूर्वी अटक होणार हे कळल नाही ,चार दिवसाने तुझी सुटका होणार हे कळल नाही तुला स्वताःच स्वताःला भविष्य कळना मग काय जगाची भविष्य सांगत फिरलास??
तात्पर्य- स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही स्वतः आपली परिस्तिथी पालटू शकता.
No comments:
Post a Comment