***** अयोध्येचे गौडबंगाल *****
सर्वप्रथम आपणा सर्वांना मनःपुर्वक जयभीम, नमो बुद्धाय..!
कालच आपल्या व्हाट्स अॅपवरील तीन-चार गृपवर अयोध्येबाबत चर्चा झाली.यात प्रामुख्याने आयोध्या कुणाची ..?? यावर चर्चा केली गेली.या चर्चेत आयोध्या रामाची,बाबरची की बुद्धाची ..?? हा प्रश्न उपस्थित केला असता अनेक पुराव्यासह आयोध्या बुद्धाचीच असल्याचे निष्पन्न झाले आणि याच बुद्धाच्या अयोध्येवर शंका घैणार्या माझ्या विरोधकांना खुद्द अयोध्येत पुरावे उपलब्ध आहेत.
रामायन हे महाकाव्य आहे हे मान्य करावे लागेलच पण ते महाकाव्य सत्य नसुन काल्पनिक आहे हेदेखील पुराव्यानीशी सिद्ध करता येऊ शकते.प्रत्यक्ष आयोध्या ही बाबरची अथवा रामाची नसुन बुद्धाचीच आहे. आता "अयोध्या" या शब्दाचा विग्रह करता,"अ+योध्धा= अयोध्दा(म्हणजैच जिथै कोणताही योद्धा तयार झालेला नाही)" असा वीग्रह तयार होतो.पण राम आणि बाबरला योद्धा म्हणुन बघितले जाते त्यामुळे अयोध्या ही बुद्धाचीच असल्याचे आजही सिद्ध होते.त्याचप्रमाणे राह हा एक काल्पनिक पाञ आहे.ते काल्पनिक पाञ वाल्मिकी रामायणातील कथेत इजीप्तमधील रामेसु राजा आणि हीटालियन यांची कथेतील पाञ आहे.तसेच रामायण ही आर्यांच्या दक्षिणेकडील प्रवासवर्णन कथा असल्याचे पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या डीस्कव्हरी ऑफ इंडीया या पुस्तकात पेज नंबर 62 येथे दिलेले आहे.आयोध्येत उत्खनन करता तेथे सर्वञ बुद्धच सापडल्याचे आढळते.सम्राट अशोकाने बुद्ध धम्माचा स्विकार केल्यानंतर अनेक बुद्धविहारे बांधली,त्यातील अयोध्या हे एक.शिवाय कोल्हापुरचे महालक्ष्मी मंदीर,पंढरपुरचे विठ्ठलमंदिर,तिरुपतीचे बालाजी मंदिर हे बुद्धविहारेच असल्याचे प्रबोधनकार ठाकरे (बाळ ठाकरेचे वडील) यांच्या "देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे" या पुस्तकात पुराव्यानिशी सिद्ध करण्यात आलेले आहे.
म्हणजेच अयोध्या हे पुर्वी बुद्धविहार होते याचे पुरावे तिथे मिळतात पण रामाच्या बाबतीत तिथे कोणत्याच प्रकारचे पुरावे आजपर्यंत सापडलेले नाहीत व सापडणारही नाही,कारण राम हा एक काल्पनिक पाञ आहे.यावरुन बुद्धाचा इतिहास हा खरा सत्य असुन रामाचा इतिहास काल्पनिक आहे.मग सत्य इतिहास आणि काल्पनिक इतिहास कसा समजून घ्यायचा..? इतिहास,विज्ञान आणि पुराण यांचा समेट घडवुन आणणे हा आपल्या जीवनातील अत्यंत गुंतागुंतीचा प्रश्न आहे.इतिहासाला घटनाक्रम असते,विशिष्ट गुणवैशिष्ट्ये असतात,ज्याप्रमाणे बुद्धाला आहेत.पण रामायणातील काल्पनिक पाञांना कोणताही घटनाक्रम नाही.रामावर हींदुंची तर बाबरवर मुस्लिमांची श्रद्धा आहेच हे आम्ही जाणुन आहोत त्याबद्दल आमचा कुणालाही विरोध नाही.कारण श्रद्धा ही काही प्रमाणात नैसर्गिक असतेच.पण मोठ्या प्रमाणात आपले राजकीय इस्पित साध्य करण्यासाठी श्रध्देचा बुरखा घातला जातो,हेच काम आजचा भाजप-शिवसेना करत आहे.
आजच्या भाजप-शिवसेनेला आणि या दोघांवर नियंञण ठेवणार्या आरएसएस रुपी रिमोट कंट्रोलला फक्त सत्ता हवी आहे,त्यासाठी देशात शांततेला ते महत्व देत नाहीत.धर्माच्या नावावर "व्होट बँक" निर्माण करुन सत्ता काबिज करायची आणि त्यावर आपली पोळी भाजुन घ्यायची हे आरएसएस प्रणित भाजप-शिवसेनेला चांगलेच जमते.तसेच आरएसएसदेखील हींदुंच्या नावाने बुरखा घालुन हीन्दु-मुस्लिम दंगे घडवुन बुद्धांचा शांततेचा प्रतिकक असणारा जंबुद्वीप भारत देश नेहमी अशांततेत राहावा म्हणुन मंदिर-मस्जिद वाद निर्माण करीत आहे.कारण विविध हींदुत्ववादी संघटनेत ब्राम्हण हाच सरसंचालक असुन तो केवळ सर्वसाधारण बहुजनांना भडकाविण्याचे काम करीत असतो.मागिल मंदिर-मस्जिद दंग्यात 67000 बहूजन मेले होते पण त्यात एकही ब्राम्हण नाही.मग मंदीर बांधुन भले ब्राम्हणाचे होईल की बहुजनांचे हे माझ्या हींदु मिञांनी जाणुन घ्यायला हवे.आज मंदिर तयार होण्यासाठी बहूजन मरतील आणि ब्राम्हण पुजारी बनून आरामशीर खातील याचा अर्थ "मरायला/लढायला बहुजन,चरायला ब्राम्हण" हाच आहे हे समजुन घ्या.
राममंदिरावर विश्वास करणार्यांना जर राम सिद्ध करायचा असेल तर बाहेर बोंबलत फिरण्यापेक्षा न्यायालयात पुरावे सादर करायला हवा.पण असे पुरावे सादर करण्याऐवजी हीन्दुत्ववादी संघटना बहूजनांच्या भावना भडकावुन देशात अराजकता माजविण्याचा प्रयत्न करीत आहे.सामाजिक,धार्मिक व जातीय तेढ निर्माण करून अशा हीन्दुत्ववादी देशद्रोही संघटना देशात अशांतता निर्माण करीत आहेत.
पुर्वी अटलबीहारी वाजपेयीच्या काळात न्यायालयाच्या आदेशावरुन अयोध्येतील याच ठीकाणी उत्खननास सुरुवात झाली होती.त्यात केवळ बुद्धाचेच पुरावे सापडले असुन रामायणातील काल्पनिक कथेच्या आधारे कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत व आढळणारही नाहीत.कारण रामायण हा इतिहास नसुन भाजप-शिवसेना व आरएसएस यांनी सर्वसामान्य बहूजनांशी खेळलेला खेळ आहे,हे आता आपण जाणुन घ्यायला हवे.
जयभीम
✏ आयु.संदिप आशा भिमराव जगताप,चाळीसगांव
No comments:
Post a Comment