Buy books of DR BR Ambedkar, Buddhism, Dalit, Adiwasi & Bahujan Topics

Powered by Blomming for nikhilsablania

Friday, January 1, 2016

25 डिसेंबर - डाॅ. आंबेडकर

25 डिसेंबर...
==========

01.) 25 डिसेंबर 1926:- "डाॅ. बाबासाहेब आंबेडकर" यांची मुंबई विधिमंडळावर निवड झाल्याबद्दल नायगावच्या "वाय. एम. सी. ए." च्या हाॅलमध्ये उभयतांचे जाहीर अभिनंदन करण्यात आले.

02.) 25 डिसेंबर 1927:- डाॅ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली विषमतेची शिकवण देणा-या "मनुस्मृती"या हिंदूंच्या पविञ ग्रंथाची बापुसाहेब सहस्ञबुद्धे यांच्या हस्ते परिषदेच्या मंडपासमोर खास तयार केलेल्या वेदीत दहन करण्यात आले.

03.) 25 -26 डिसेंबर 1927:- महाड सत्याग्रह परिषद डाॅ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली.

04.) 25 डिसेंबर 1946:- घटना समितीत डाॅ. आंबेडकरांनी प्रभावी भाषण करुन भारताच्या ऐक्यावर भर दिला. प्रसिद्ध तत्त्ववेत्ते एडमंड बर्क यांचे वचन (It is very easy to give power, but it is difficult to give wisdom ) उदधृत केले.

05.) 25-27 डिसेंबर 1946:- अखिल भारतीय शे. का. फे. विद्यार्थी फेडरेशनचे दुसरे अधिवेशन जोगेंद्रनाथ मंडल यांच्या अध्यक्षतेखाली भरले. वस्तुतः या अधिवेशनाचे नियोजित अध्यक्ष डाॅ. आंबेडकर होते. पण घटना समितीच्या कार्यबाहुल्यामुळे ते हजर राहू न शकल्याने त्यांनी मंडल यांना अध्यक्ष नेमले व आयोजक गेडाम यांना आपला संदेश पाठविला.

06.) 25 डिसेंबर 1953:- निपाणी येथे भरलेल्या सभेत बोलताना निवडणुकीच्या पराभवाने निराश न होता चळवळ जिवंत ठेवण्याचा अनुयायांना संदेश दिला.

07.) 25 डिसेंबर 1954:- डाॅ. आंबेडकरांनी देहू रोड (जि. पुणे) येथे बुद्ध विहाराचे उदघाटन केले. भाषणातच पंढरपुरच्या विठ्ठलाची मूर्ती ही बुद्धाचीच मूर्ती असल्याचे सांगीतले.

#...जय भिम..#..नमो बुद्धाय..#

No comments:

Post a Comment

T-shirt of Dr. Ambedkar

T-shirt of Dr. Ambedkar

Dr. Ambedkar's Books in Hindi

Dr. Ambedkar's Books in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Blog Archive

Popular Posts