"नकोय भिमराव नोटेवर"
नकोय भिमराव
आम्हा नोटेवर |
विकला जाईल
तो वाटेवर ||
आहेत समाजात
काही दरिंदे |
नाहीत ते
कुठलेच परिंदे ||
घेऊन जातील भिमराव
दारुच्या अड्यावर |
लावतील त्यालाही
सट्यावर ||
म्हणतील,
भिमराव
घ्या |
अन्
दारू द्या ||
होतील ते
पिऊन तराट |
माजवतील कल्लोळ
घरात ||
नाचणारींवर जाईल
पैसा उधळला |
नाचता-नाचता तोही
जाईल तुडवला ||
फोफावला आहे
भ्रष्टाचार |
नाही उरलेला
शिष्टाचार ||
भाटाच्या ताटी
जाईल थोपवला |
गणीकांच्या हाती
जाईल भिमराव सोपवला ||
खाटीकाच्या दुकानात
जातील घेऊन त्याला |
मंदिरात येतील
देवासमोर ठेवुन त्याला ||
नाही विकणाऱ्यांमधला तो |
नाही मांडायचा
आम्हाला त्याचा शो ||
फाटुन जाईल
हृदय आमचं |
नाही ऐकणार
आम्ही तुमचं ||
राहुद्या तुमचा
गांधीच नोटेवर ||
भिमराव आमचा
शोभतोय टाय अन् कोटावर ||
जयभिम
No comments:
Post a Comment