गांधी बाबासाहेबांना एकदा म्हणाले
होते....,
मी हरीजन समाजाला रोटी कपडा मकान देवू शकतो. तुम्ही सुट बुट घालून या समाजात कसा बदल घडवणार ?
तेव्हा बाबासाहेब म्हणाले, मिस्टर गांधी,मी सुट बुट यासाठी घालतो कारण माझा समाज माझं
अनुकरण करुन उद्या तो सुट बुटात फिरणार आहे.
.
-डॉ.बाबासाहेब आंबेडकर ...
डॉक्टर ....!
पण
कशाचे डॉक्टर .....?
बाबासाहेब एकदा भाषणामध्ये म्हणाले होते, जर का मी कॉंग्रेस बरोबर तडजोड केली असती, तर या देशाचा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू नव्हे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले असते,
पण
बाबासाहेबांनी कधी सत्याशी आणि तत्वांशी तडजोड केली नाही.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,
डॉक्टर......
कशाचे डॉक्टर .....?
अरे,
ब्रेन वर शस्रक्रिया करणारे अनेक
डॉक्टर या इंडिया मध्ये आहेत,
काळजावर शस्रक्रिया करणारे अनेक डॉक्टर या इंडिया मध्ये आहेत,
हृदयावर शस्रक्रिया करणारे अनेक डॉक्टरया इंडिया मध्ये आहेत,
परंतु
बाबसाहेब ही डॉक्टर होते...
कशाचे डॉक्टर .....?
मेलेल्या माणसाला उठवून बसविणारे डॉक्टर.....!
मुर्द्याला जागविणारे
डॉक्टर....!
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर....!
हजारो वर्षापूर्वी, भीम जन्मण्यापूर्वी आम्ही जिवंत होतो की मेलो होतो हे आमच आम्हालाच ठाऊक नव्हतं, एखादया मुर्द्यासारखे आम्ही हिंदू दलदलीत फसलेलो होतो, तथागत गौतम बुद्धांची धम्मरूपी संजीवनी बाबासाहेबांनी या मुर्द्यांवर
शिंपडली, मुर्दे पटापट उठून बसले,
तुम्हाला आम्हाला वाचवलं...
अरे तुम्हाला आम्हाला उठवून बसवलच बसवलं, पण या देशाचं ऑंपरेशन बाबासाहेबांनी केलं.
या देशाला झालेला जातीयतेचा कॅन्सर बाबासाहेबांनी चरचर ....चरचर.....कापला.
इंडियाच ऑंपरेशन केलं,
देशाचं ऑंपरेशन केलं, आणि ३९५ कलमाच एकच इंजेक्शन दिलं, लांबच केले वळवळणारे किडे,
रोगमुक्त केलं भारताला.
असे होते डॉक्टर...
डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर...
माझ्या राजाला दगडाच्या मंदिराची गरज नाही..! माझ्या राजाला रोज
पुजाव लागत नाही..!
माझ्या राजाला दुध-तुपाचा
अभिषेक करावा लागत नाही..!
माझ्या राजाला कधी नवस बोलावा लागत नाही..! माझ्या राजाला सोने- चांदीचासाज ही चढवावा लागत नाही..!
एवढ असुनही जे जगातील
अब्जवधी लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतात असे एकमेव युगपुरुष...!
॥ बाबासाहेब ॥
आमचे बाबा माणसातले
देव आहेत हे सिध्द करायची
गरज नाही इतिहास आहे साक्षीला...
दोन्ही हात जोडून नमस्कार घालतो
भीममुर्तीला आणि प्रणाम त्यांच्या महान किर्तीला...
!!जय भीम!!
हजारो संकटे आली तरी भिम
माझा झुकलाच नाही . उपाशी पोटी राहीला पण कधी सुकलाच नाही .
अरे, ३३ कोटी देवतांना लाजवेल
असा भिम शिकला तसा कोणी शिकलाच नाही .
म्हणून माझ्या भिमापुढे कोणी माई
का लाल कधी टिकलाच नाही ....
... "जय भिम... जय बुध्द... जय भारत.......
No comments:
Post a Comment