२. बुद्ध कोण होता?
- इ.स.पु. ५६३ साली ईशान्य भारतातील एका राजघराण्यात एका राजकुमाराने जन्म घेतला. वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी शाक्य संघाने दिलेल्या शिक्षेमुळे त्याला गृहत्याग करावा लागला.. मनुष्याचे दुःख पाहुन अस्वस्थ झालेला सिद्धार्थ सत्याच्या शोधासाठी घोर अरण्यात गेला. सहा वर्षाच्या शिक्षणानंतर, तपश्चर्येनंतर त्याला ज्ञानप्राप्ती झाली. तो वैशाख पोर्णीमेचा दिवस होता. त्या दिवसापासुन तो राजपुत्र बुद्ध बनला, ह्या विश्वात बुद्ध म्हणुन ओळखला जावु लागला. त्यानंतर पंचेचाळीस वर्षाचा काळात त्या सम्यक संबुद्धाने संपुर्ण विश्वात मानवतेचा प्रसार केला. त्यामुळे त्या महाकारुणिकाचे लाखो अनुयायी बनले. असा हा विश्वाचा प्रकाशाचे वयाच्या ८० व्या वर्षी महपरिनिर्वाण झाले.
३. आपल्या बायको, मुलाला आणि परिवाराला सोडुन संन्यास घेणे हा सिद्धार्थाचा बेजबाबदारीपणा होता काय?
- सिद्धार्थाला आपल्या परिवाराला सोडुन संन्यास धर्म स्वीकारणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. त्याच्यासमोर दोन पर्याय होते, एक म्हणजे त्याचा परिवार आणि दुसरा हे जग.. त्यापैकी त्याने दुसरा पर्याय निवडला. त्याने जगाला करुणा शिकवली. त्याने त्यावेळेस केलेल्या त्यागामुळे आज संपुर्ण विश्वाला त्याच्या तत्त्वज्ञानाचा आधार मिळालेला आहे. त्यामुळे सिद्धार्थाचे ते कृत्य बेजबाबदारपणाचे नव्हते तर मानवाच्या कल्याणा करिता केलेल्या त्यागाचे ते सर्वोत्कृष्ट उदाहरण होते.
४. जर बुद्धाचे महापरिनिर्वाण झाले आहे, तर ते आपल्याला कसे काय मदत करु शकतात?
- फॅरेडे ज्याने विजेचा शोध लावला, तो मरण पावला, पण त्याने शोध लावलेली विज आत्ताही आपल्या उपयोगात येत आहे. लुईस पाश्चर ज्याने असाध्य आजारांवर मात करणार्या लसींचा शोध लावला,, तो आज आपल्या मध्ये नाही, पण त्याने लावलेले शोध आपल्याला मदत करतात. याचप्रमाणे अनेक संशोधक आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांच्या संशोधनांनी आपल्याला कुठुन कुठपर्यंत नेले...
होय. गौतम बुद्ध नावाचा प्रबुद्ध मानव आज आपल्यामध्ये नाही, पण अडीच हजार वर्षांपुर्वी त्याने सांगीतलेले तत्त्वज्ञान आजही आपल्याला मदत करतो. त्याचे उपदेश आजही आम्हाला प्रोत्साहन देतात. त्याचे शब्द आमच्या जीवनाची दिशाच बदलवुन टाकतात. हि अद्वितीय शक्ती इतक्या शतकांत केवळ बुद्धाकडेच आहे.
5. बुद्ध हा ईश्वर होता काय? कि त्याचा पुत्र अथवा देवदुत? त्याने असा कधी दावा केला आहे काय?
- नाही. तो परमेश्वर नव्हता, नाही त्याचा पुत्र अथवा दुत. आणि त्याने असा कधी दावाही केला नाही. ते एक मानव होते पण ते साधे मानव नव्हते तर एक प्रबुद्ध मानव होते. अरहंत, सम्यक संबुद्ध, विद्या व आचरणांनी युक्त असा सुगती प्राप्त केलेला लोकविधु अनुत्तर पुरुषांचा सारथी असा आधार देणारा देव व मनुष्यंचा गुरु भगवान बुद्ध. जर आपण त्याची शिकवण आचरणात आणु शकलो तर आपण सुद्धा बुद्ध बनु शकतो
बुद्धाचा हा खरा मानवी धर्म आहे. बुद्धाने आपण ईश्वराचे अवतार आहोत असे केव्हाही व कोठेही सांगितले नाही. म्हणुनच बौद्धधम्म हा मानवधम्म आहे, मानवाच्या संपुर्ण विकासासाठी तो प्रयत्नशील आहे. तो आमच्यासारख्या आधुनिक व अद्ययावत असलेल्या प्रत्येक मनुष्याला पटकन पटु शकतो. बुद्धाची शिकवण अगदे साध्या व स्पष्ट शब्दात मांडलेली आहे. या धम्मामध्ये मनुष्यास पुर्ण वैयक्तिक स्वातंत्र्य दिले आहे व मानवतेला आणि सदसद्विवेक बुद्धीला पटतील त्याच गोष्टी ग्राह्य मानण्यात आल्या आहेत.
६. जर बुद्ध परमेश्वर नाही, त्याचा संदेष्टा नाही तर आम्ही त्याची पुजा का करतो.?
- याविषायावर सविस्तर लेख वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.. बौद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज
७. धम्म म्हणजे काय?
- धम्म (संस्कृत : धर्म) याचे असंख्य अर्थ आहेत. पण बुद्ध धम्मात त्याचा उपयोग सत्यता, वास्तविकता या अर्थाने केला जातो. धम्म म्हणजे निती. धम्म म्हणजे तथागतांची मौल्यवान शिकवण
८. बुद्ध धम्मात नाताळासारखा महत्त्वाचा सण कोणता?
- परंपरेनुसार, वैशाख पोर्णीमेलाच सिद्धार्थाचा जन्म झाला, सिद्धार्थाला बुद्धत्व प्राप्ती वैशाख पोर्णीमेलाच झाली, आणि बुद्धाचे महापरिनिर्वाण सुद्धा वैशाख पोर्णीमेलाच झाले, त्यामुळे बुद्ध धम्मात या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
९. बुद्ध धर्माचे वेगवेगळे प्रकार का आहेत?
- आपण साखरेचे विविध प्रकार पाहतो, पण त्यांची चव मात्र गोडच असते. त्यांची निर्मीती वेगवेगळ्या प्रकारे करण्यात येते, त्यामुळे त्यांचा वापरही वेगळ्या प्रकारे केला जातो. बुद्ध धर्माचेही अगदी तसेच आहे, थेरवाद, महायान, वज्रयान, अशा विविध प्रकारे बुद्ध धर्म आज अस्तित्वात आहेत, पण तसे असले तरी सुद्धा त्यापासुन मिळणार्या फळाची चव मात्र सारखीच आहे - स्वांतत्र्याची चव, नैतिकतेची चव.
बुद्ध धर्म सध्या वेगवेगळ्या प्रकारात विभागला आहे, पण हे कसे घडले? बुद्ध धर्माचा उगम भारतात झाला आणि नंतर तो जेथे जेथे गेला तिथे तिथे तेथील परंपरांनुसार तो बदलत गेला म्हणुन प्रत्येक देशात तेथील परंपरांमुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बौद्ध धर्म पहायला मिळतात.
जरी बौद्ध धर्माचे विविध वेगवेगळे प्रकार असले तरी त्या सर्वांचे केंद्रस्थान हे चार आर्य सत्य व आर्य अष्टांगिक मार्ग हेच आहे.
बौद्ध धर्म आणि इतरांमध्ये हाच एक फरक आहे कि,, त्यांच्या शाखा वेगळ्या असल्या, धार्मिक बाबतीत अनेक मतभेद असले तरीही मनभेद नाही. त्यांच्या मनात सर्वांच्या प्रती असीम मैत्री आणि करुणेचं नातं आहे.
१०. काही लोकं म्हणतात कि सर्वच धर्म सारखे आहेत, बुद्धीस्टांना हे मान्य आहे काय?
- धर्म हि खुप व्यापक आणि संकुचित सुद्धा संकल्पना आहे त्याचा अर्थ कोणी कसा घ्यावा हे त्यावर अवलंबुन असते. बुद्धीस्टांच्या मते विचार केल्यास त्यांच्यानुसार हे सत्यही असु शकेल अथवा असत्यही...
बौद्ध धर्म शिकवतो कि जगाचा सृष्टीनिर्माता परमेश्वर नाही, पण ख्रिस्ती, इस्लाम, यहुदी, हिंदु, इत्यादी धर्म सांगतात कि, जगाचा निर्माता सर्वशक्तिमान ईश्वर आहे. बौद्ध धर्म शिकवतो कि, प्रत्येक व्यक्ती ज्याचे मन स्वच्छ व निर्मळ आहे तो निर्वाण प्राप्त करु शकतो, पण ख्रिस्ती धर्म शिकवतो कि मोक्ष मिळवायचा असेल तर त्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारावा, आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्यावरच अटळ श्रद्धा ठेवावी अन्यथा मोक्ष मिळणार नाही, याचप्रमाणे यहुदी धर्म शिकवतो कि मोझेस व विश्वास ठेवावा, इस्लाम सांगतो कि मुहम्मद हेच ईश्वराचे खरे दुत आहेत, इत्यादी, त्यांनाच सत्य माना अन्यथा मेल्यानंतर स्वर्ग मिळणार नाही.
मी माणसांच्या जिभांनी बोललो व देवदूतांच्यासुद्धा भाषेत बोलणे मला शक्य असेल, माइया ठायी प्रीति नसली तर मी वाजणारी थाळी किंवा मोठा आवाज करणारी झांज आहे.
जर मला देवासाठी संदेश देण्याची शक्ति असली आणि मला सर्व रहस्ये माहीत असली, सर्व दैवी ज्ञान असले आणि डोंगर ढळविता येतील असा दृढ विश्र्वास असला, परंतु माइया ठायी प्रीति नसली, तर मी काहीच नाही. आणि मी जर माझे सर्व धन गरजवांताच्या अन्नदानासाठी दिले आणि मी माझे शरीर जाळण्यासाठी दिले पण जर माइयात प्रीति नसली, तरी मी काहीच मिळवीत नाही. प्रीति गर्व करीत नाही.प्रीति सहनशील आहे, प्रीति दयाळू आहे, ती हेवा करीत नाही. प्रीति बढाई मारीत नाही. ती गर्वाने फुगत नाही. ती अयोग्य रीतीने वागत नाही. ती स्वार्थी नाही, ती चिडत नाही. तिच्याविरुद्ध केलेल्याची नोंद ती ठेवीत नाही, वाईटात ती आनंद मानीत नाही. परंतु सत्याविषयी इतरांबरोबर ती आनंद मानते. सर्व काही खरे मानण्यास सिध्द असते....
बौद्ध धम्म हाच सदाचार शिकवतो फरक इतकाच आहे कि ख्रिस्ती धर्माचा केंद्रबिंदु ईश्वर आहे तर बौद्ध धर्माचा केंद्रबिंदु मानव. ख्रिस्ती धर्मात ईश्वराच्या भितीने सदाचारी व्हावं लागतं तर बौद्ध धर्मात ईश्वराला स्थानच नाही, त्यामुळे त्याचा प्रश्न इथे येतच नाही.
११. बौद्ध धर्म विज्ञानवादी आहे काय?
- सर्वप्रथम विज्ञान म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ काय होतो? मी डिक्श्नरी बघितली तर तिथे लिहिलं होतं Knowledge can be made into a system which depends upon seeing and tasting facts and stating general and natural laws, a branch of such knowledge, anything that can be studied exactly. या व्याख्येत बुद्ध धर्म बसतो काय? नक्कीच... होय. चार आर्यसत्य ही बुद्ध धर्माची प्रमुख शिकवण आहे. बौद्ध धर्माचा आपण अभ्यास केल्यास आपल्याला कळुन येईल बौद्ध धर्म हा खराखुरा विज्ञानवादी धर्म आहे.
प्रसीद्ध कालाम सुत्तामध्ये भगवान बुद्ध म्हणतात,,, हे कालामांनो, तुम्ही जे ऐकता त्यावर विश्वास ठेवु नजा. जे केवळ पुष्कळ लोक सांगतात म्हणुन त्यावर विश्वास ठेवु नका, जे धर्मपुस्तकात लिहिलेले आहे म्हणुन त्यावर विश्वास ठेवु नका. जे केवळ तर्कशास्त्रानुसार आहे म्हणुन ते मानु नका. जे केवळ न्यायशास्थानुसार आहे म्हणुन ते मानु नका. जे केवळ सकृदर्शनी पटण्यासारखे आहे म्हणुन त्यावर विश्वास ठेवु नजा. जे बाह्यात्कारी सत्य म्हणुन त्यावर विश्वास ठेवु नका. एखादे वचन कोणा एका आचार्याने सांगीतले एवढ्यानेच त्यावर विशास ठेवु नका. जे केवळ ऐकीव आहे, परंपरागत आहे, ज्यात केवळ वादविवादाची कुशलता आहे किंवा तर्काची सुक्ष्मता आहे., तेवढ्यावरुनच त्यावर विश्वास ठेवु नका. जे केवळ वरवर पाहता विश्वसनीय वाटते म्हणुन मानु नका. ज्या समजुती आणि दृष्टीकोण केवळ अनुकुल वाटतात म्हणुन स्वीकारु नका. ते विद्वानाचे शब्द आहेत म्हणुन त्यावर भाळुन जाऊ नका, जेव्हा तुम्हांला आत्मानुभवाने वाटेल की, ह्या गोष्टी अहितकर, दोषार्ह, सुज्ञांनी निषिद्ध ठरविलेल्या किंवा परिणामी कष्टात आणि दुःखात नेणार्या आहेत, तेव्हा त्या गोष्टींचा तुम्ही त्याग केलापाहिजे. उपदेशिलेले विचार किंवा दृष्टीकोण हितकर आहेत कि निंदनीय आहेत, सदोष आहेत कि काय, कल्याणकारक आहेत कि अकल्याणकारक यांचा विचार करा. य्ब कसोटीवर उतरणारा कोणाचाही उपदेश मान्य करावयास हरकत नाही.
इतकेच नव्हे तर बौद्ध धर्माची शिकवण आणि सिद्धांत आधुनिक, बुद्धीसुसंगत आणि सदा समकालीन आहेत काहीच कट्टरपण नाही, त्यामुळे असे ठामपणे म्हणु शकतो कि बौद्ध धर्म हा विज्ञानवादीच नसुन त्यापेक्षाही पुढे आहे.
वैज्ञानीक अल्बर्ट आईनस्टाईन यांनी तर भगवान बुद्धाला जगातील पहिला वैज्ञानीक असे संबोधले होते.
"भविष्याचा धर्म हा विश्वव्यापी धर्म राहणार आहे. त्यामुळे माणसाचा वैयक्तिक ईश्वर मागे पडून आणि धार्मिक कट्टरता तसेच धर्मशास्र या गोष्टी मागे पडतील. तो धर्म भौतिक आणि आध्यात्मिक या दोन्ही विषयांना व्यापेल आणि तो धार्मिकदृष्टीने भौतिक आणि आध्यात्मिक बाबीँचे ऐक्य निर्माण करणारा अर्थपूर्ण असेल. बौध्द धर्म हा वरील कसोट्यांना पूर्णपणे उतरतो आणि जर कोणता धर्म आधूनिक विज्ञानाच्या कल्पनांशी सूसंगत असेल तर तो बौध्द धर्मच होय. बौद्ध धर्मात मानवाला व आधुनिक विज्ञानाला पडलेल्या सर्व गरजा भागविण्याचे सामर्थ्य आहे. माझा जन्म ख्रिश्चन धर्मात झालेला असला तरी मी धार्मिक व्यक्ति नाहीय. परंतू जर मी तसा(धार्मिक) झालो तर मी बौध्दच होईल !"
--अल्बर्ट आइनस्टाईन
बुद्धाचा धर्म म्हणजे नीती. बौद्ध धर्मात देवाची जागा नीतीने घेतली आहे. बौद्ध धर्म हा समतेसाठी उभा आहे. जर धर्म चालु राहावयाचा असेल तर तो बुद्धिप्रामाण्यवादी असला पाहिजे. विज्ञान हे बुद्धिप्रामाण्यवादाचे दुसरे नाव आहे.
१२.बौद्ध धर्म आणि हिंदु धर्म एकच आहेत काय?
- नाही. बौद्ध धर्म आणि हिंदु धर्म एकच आहे असे मानणे अगदी चुकीचे आहे..
बौद्ध धर्म व हिंदु धर्म यांची तुलना केल्यास आपणास असे दिसुन येते कि बौद्ध धर्माचा पाया नैतिक आचरण हा असुन हिंदु धर्माचा पाया कर्मकांडांचे आचरण हाच आहे. स्नानसंध्या, जपजाप्य, सोवळेओवळे व यज्ञयाग यात हिंदु धर्म सामावलेला आहे. तर केवळ नैतिक आचरण म्हणजेच बौद्ध धर्म होय. बौद्ध धर्मात देव नाही ही करी गोष्ट आहे. देवाची जागा बौद्ध धम्मात नैतिक आचरणाने भरुन काढलेली आहे. तत्कालीन ऐतिहासीक परिस्थीतीमुळे बौद्ध व हिंदु या दोन्ही परंपरांमध्ये सारख्या शब्दांचा वापर करण्यात आला.. उदा. कर्म, समाधी, निर्वाण आणि ह्या सर्व शब्दांचा उगम भारतातच झाला. त्यामुळे काही लोक समजतात कि, दोन्ही परंपरांमध्ये ह्या गोष्टी सारख्या अर्थाने वापरण्यात आल्या, पण तसे काही नाही, दोन्ही परंपरांमध्ये या संकल्पना अगदी वेगळ्या आहेत. उदा. हिंदु धर्म ईश्वरावर विश्वास ठेवतो तर बौद्ध धर्म ईश्वराचेअस्तित्व नाकारतो. जातिव्यवस्था हा हिंदु धर्माचा मुख्य आधार आहे, तर बौद्ध धर जातिव्यवस्था नाकारतो. कर्मकाण्ड हा हिंदु धर्माचा अविभाज्य अंग आहे, पण बौद्ध धर्म कर्मकाण्डासाठी बौद्ध धर्मात जागा नाही.
No comments:
Post a Comment