मित्रांनो
आपला देश हा सहीष्णु आहे न्याय समतेवर आधारलेला आहे .मग या विरोधात जर काही गोष्टी होत असतील तर का नाही येणार मग चीड.काल परवा ती मंत्री बया म्हणे भगवद गीतेला राष्ट्रीय ग्रंथ घोषित करा जऩु काही ती त्याच ग्रंथामुळे मंत्री झाली ते विधान शमले न शमले पुन्हा तेच विधान एका महोदयाने केले . जणु काही बौद्ध मुसलमान ख्रीश्चन जैन शिख हे लोक राहतच नाहीत.आणि आहेत तर गुलाम.
हे असे का ? देश आमचा माणसं आमची शरीरं आमची डोके आमची आणि मेंदु तुमचा .
एकएक गोष्ट तुम्ही आमच्यापासुन हिरावुन घेत आहात आमच्या काही मुलनिवासी जाती स्वच्छेने तुम्हाला देत ही आहेत मेंदु गहान ठेउन.
तुम्ही आर्य आले आणि अनार्याला नागांना ईथल्या मुलनिवासीला जातीजातीत विभागुन एकमेकांच्या विरोधात उभे केले आणि आम्ही राहीलोही मेंदु गहान ठेउन.सम्राट अशोकाने संपुर्ण भारत बौद्धमय केला त्यास काल्पनिक राम पुष्पमित्र याने सुरुंग लावला बौद्ध धम्माचा अस्त म्हणुन दिवाळी चालु केलि आणि आम्हीही ती करतो मेंदु गहान ठेउन.
नंतर मुसलमान राज्यकर्ते आले त्याना यांनी विरोध केला नाही कारण ते कधी धर्मात पडलेच नाही थोतांड अनिष्ट रुढी यांच्याशी काही त्यांनी लेनेदेनेच ठेवले नाही पण त्यास विरोध करण्यास बहूजनांचे राजे छ.शिवरायांचा उदय झाला त्यांना मात्र शुद्र ठरवुन विरोध करणारे तुम्हीच का तर त्यांनी अनिष्ट रुढी थोतांडाला विरोध केला.पुढे कटकारस्थानाने पेशवाई आलि मग मात्र स्वराज्य.
ईग्रंज आले त्यांनी ही थोतांडाला विरोध करुन राज्य केले तेही मग तुम्हाला नकोशे स्वराज्य पेशवाई हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे .हे म्हणनारे तुम्हीच.शिवरायास अगोदर विरोध केला आणि फायदा नाही झाला म्हणुन भवानी मातेने तलवार दिली म्हणुन शिवराय स्वराज्य आणु शकले हे सांगनारे तुम्हीच काय तर शिवरायांचा तो पराक्रम नाही तर त्या तलवारीचा आहे .राष्ट्रपिता म.फुलेंनी समाधी शोधुन शिवजयंती सुरु केली त्याचे ही श्रेय घेतात दुसरे आणि तसे सांगनारे तुम्ही आणी ऐकनारे आम्ही मेंदु गहान ठेउन.खरे गुरु संत तुकोबा आणि ज्याच्यासोबत कधी उभ्या जीवनात भेट ही झाली नाही त्याला गुरु केले तुम्ही.तुकोबास न्यायला विमान आले व ते वैकुंठास गेले हे सांगनारे तुम्हीच तसेच समजनारे आम्ही मेंदु गहान ठेउन.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहायला नाही पाहीजे म्हणुन घटना समिती मध्ये घेण्यास विरोध करणारे तुम्हीच ईग्रंजानी तशी तरतुद करुन विश्वरत्नांना घेतले आणि पुन्हा त्याचे श्रेय घेण्यासाठी पुढे आले तुम्हीच. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त बौद्धापुरतेच कार्य केले ते हिंदुधर्म विरोधी होते हे सांगुन बहूजन लोंकापासुन दुर करणारे तुम्हीच. आणि तसेच ऐकुन विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना शत्रु समजनारे फक्त बौद्धपुरतेच कार्य केले असे समजनारे आम्ही मेंदु गहान ठेउन. कुठपर्यंत चालायचं हे असं आज सर्व बहूजन जाती एकत्र नाहीत म्हणुन मुलनिवासी येथला राज्यकर्ता नाही तो फक्त मताला दान करतो आणि वार होतो तो आपल्यावरच. केव्हा कळनार हे या बहूजन जातींना. का आज हे ते म्हणतील ती पुर्व दिशा समजुन वाटचाल करत आहेत कधी करु आम्ही स्वताच्या मेंदुचा वापर स्वता.
No comments:
Post a Comment