हा लेख सर्वांनी नक्की वाचावे, तुमच्या डोळयातुन पाणी आल्याशिवाय राहणार नाही...#
!!....भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न, विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनानिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम...!!
६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे प्रचंड वादळ शांत झाले. भारतीय राजकारणातील आयुष्यभर उन्हात उभे राहून तमाम दलितांना मायेची सावली देणारी कोट्यवधी दलितांची माऊली पोरके करून निघून गेली. पण जाताना भारताला "राज्यघटना आणि अशोक चक्राची" देणगी देऊन गेली. धर्म नसलेल्या माणसाला धम्म देऊन गेली. आयुष्यभर संघर्ष करून मिळवून दिलेल्या अधिकाराचे जतन करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाची मांडणी करून गेली. 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ऐतिहासिक ग्रंथाला पूर्णत्व देऊनच आपल्या ऐहिक जीवनाची समाप्ती केली.
गुरुवार, दि. ६ डिसेंबर १९५६ रोजी सकाळी सहा वाजता एक पाय उशीवर, डोक्याजवळ हस्तलिखित कागद काही महत्त्वपूर्ण ग्रंथ, चष्मा, एक इंजेक्शन सिरिज, एक औषधाची बाटली या अवस्थेत माईसाहेबांनी बाबासाहेबांना पाहिले. निद्रावस्थेत बाबांचे देहावसान झाले होते. हे कळल्यावर सात कोटी दलितांच्या अनभिषिक्त राजाच्या अंतिम क्षणी कुणीही नसावे असे म्हणून जगजीवन राम "बाबासाहेबांचे" पाय धरून ओक्साबोक्सी रडले.
६डिसेंबर १९५६रोजी सकाळीच बाबासाहेब निघून गेल्याची बातमी स्वयंपाकी सुदामबाबांनी दिली. नानकचंदांनी दिल्लीच्या प्रसारमाध्यमांना ही बातमी दिली. सकाळी ११.५५वा. मुंबईच्या पी.ई सोसायटीच्या ऑफिसमध्ये फोन केला. घनशाम तळवटकर यांना प्रथम बातमी दिली. त्यानंतर औरंगाबादला फोन करून बळवंतराव वराळे यांना ही दुःखद बातमी सांगितली. त्यानंतर वा-यासारखी ही बातमी सर्वत्र पसरली. दिल्लीच्या निवासस्थानी तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू इतर मंत्री यांनी भेट दिली. सायंकाळी ४.३० वा. बाबासाहेबांचा पार्थिव देह ट्रकने दिल्ली विमानतळावर आणला. बाबासाहेबांच्या अंतिम प्रवासाची सुरुवात झाली. रात्री ९.०० वा. हे विमान नागपूरला उतरण्यात आले. ज्या ठिकणी दीक्षा समारंभ झाला, त्या ठिकाणी त्यांचा देह अंतिम दर्शनासाठी ९ ते १२ वा.पर्यंत ठेवण्यात आला. १२ वा. हे विमान नागपूरहून निघाले व रात्री १.५० वा. मुंबईच्या" सांताक्रुझ" विमानतळावर पोहोचले. त्या ठिकाणी लाखोंचा जनसमुदाय जमलेला होता. त्या ठिकाणाहून डाॅ. बाबासाहेबांना राजगृहावर आणण्यात आले. त्या ठिकाणी प्रचंड आक्रोश सुरू होता. अन्त्यसंस्काराला जागा दिली नाही. बाबासाहेबांच्या अंतिम संस्काराची व्यवस्था सुरू करण्याची वेळ येऊन ठेपली. हिंदू कॉलनीच्या हिंदू स्मशानभूमीत अन्त्यसंस्कार करू न देण्याची हळूच चर्चा सवर्णात असल्याची जाणीव झाली. तेव्हा कार्यकर्ते अस्वस्थ झाले. पण त्यांनी निर्णय घेतला. "मी हिंदू म्हणून मरणार नाही."अशी प्रतिज्ञा करणा-या बाबासाहेबांचा अंतिम संस्कार हिंदूच्या स्मशानभूमीत कशाला?? व प्रचंड गर्दी लक्षात घेता त्यांचा अंतिम संस्कार "शिवाजी पार्कवर" करण्यावर एकमत झाले. पण तत्कालीन म्युनिसिपल कमिशनर पी. आर. नायकयांनी विरोध केला व परवानगी नाकारली. त्यानंतर सध्या "मुंबईत असलेल्या आंबेडकर महाविद्यालयाच्या" ठिकाणी मोकळे मैदान होते तेथे अन्त्यसंस्कार करण्याचे ठरले. पण ती जागादेण्यासाठी काँग्रेसने विरोध केला तेव्हा "बाबासाहेबांच्या जवळचे कार्यकर्ते "सी. के. बोले यांच्या मालकीची जमीन" होती. त्या जमिनीवर अंत्यसंस्कार करण्यास सांगितले व त्या ठिकाणी "बौद्ध धम्म विधिनुसार भिक्खू एच धर्मानंद" यांच्या उपस्थितीत "भदन्त आनंद कौशल्य" यांच्या हस्ते हा अंत्यसंस्कार "7 डिसेंबर 1956" रोजी पार पडला...!!
बाबा आपणास ञिवार अभिवादन....💐💐💐
#..जय भीम नमो बुध्दाय..#
No comments:
Post a Comment