🍀 एकदा एक मुलगा आपल्या वडिला बरोबर डाँ. बाबासाहेब आंबेडकर
यांची मिरवणुकीस
गेला होता....
घरी परत आल्यावर तो काही प्रश्न आपल्या वडिलांना विचारतो.....
मुलगा:- पप्पा, डाँ. बाबासाहेब नेहमी सुटाबुटात
का असायचे..?
वडील:- बेटा, कारण त्यांना वाटत होते माझा समाज
सुद्धा सुटाबुटात राहायला पाहिजे....
जर मी सुटाबुटात राहिलो तर
माझा समाजही हि मला आदर्श मानून सुटाबुटात
येईल....
मुलगा:- ठीक आहे पप्पा डाँ. बाबासाहेबांच्या
खिश्याला नेहमी पेन का असतो..?
वडील:- खूप छान प्रश्न विचारला बेटा,
अरे तो फक्त
पेन नाही हजारो शोषित, दलित,
पिडीत लोकांना गुलामीतून
मोकळी करणारी ती आधुनिक
तलवार आहे....
त्याच पेन ने बाबासाहेबने भारतीय "संविधान लिहिले
आहे"
मुलगा :- पप्पा मी पण माझ्या खिश्याला पेन
लावणार....
पप्पा शेवटचा प्रश्न विचारतो तुम्ही थकून
आला असाल,
डाँ. बाबासाहेबांनी बोट कोठे दाखवले
आहे..?
व....
त्याच्या हातात कोणते पुस्तक आहे..?
वडील :- छान बेटा असाच rational प्रश्न विचारत
जा,
बेटा त्यांच्या हातात जे पुस्तक आहे त्याचे नाव आहे....
"भारतीय राज्यघटना" या घटनेवरून भारत देश चालतो,
याच घटनेमध्ये तुम्हाला स्वातंत्र्य,
समता,
आणि बंधुता
हि मानवी मुल्ये
दिली आहेत...
डाँ. बाबासाहेबांनी जे बोट दाखवले आहे...
ते म्हणतात,
"जर ह्या संविधानाची योग्य
अंमलबजावणी करायची असेल तर
योग्य लोक संसदेत गेली पाहिजे"
ते बोट करून सांगतात कि....
"तुमच्या हक्कासाठी संसदेत जा"....
मुलगा :- आभारी आहे पापा
मी पण डाँ. बाबासाहेबांच्या विचाराने वागेल,
आणि या देशाला खूप पुढे नेईल.....🍀
जर याच प्रमाणे प्रत्येक मुलाला आपल्या वडीलांकडून बाबासाहेब कळाले....
तर तो दिवस दुर नाही जेव्हा संसदेतच काय अख्ख्या जगात बाबांची लेकर नाव गाजवतील...🍀
.
.
प्रत्येक बापाकडून हीच अपेक्षा...👏
🙏जय भीम🙏
No comments:
Post a Comment