🔵१४ जानेवारी नामांतर दिन🔵
"भीमरायाच्या नावासाठी रक्त सांडले राव .....असेल कोणी माईचा लाल तर पुसून दावा नाव .....पाहून भीमाची क्रांती, ती क्रांती सलत होती.....ज्ञानाचे पेरले मोती त्याचे नावच नव्हते वरती ....नामांतराने विद्यापीठाला जगात आला भाव ......असेल कोणी माईचा लाल तर पुसून दावा नाव .....गौतमने प्राण गमावला.....पोचीरामने लढा लढविला ...सुहासिनी आणि प्रतिभाने .....जातिवाद्यांना धडा बडवला .....बलिदानाचा महिमा गाईल इथले गाव अन गाव .....असेल कोणी माईचा लाल तर पुसून दावा नाव .....भीम नाव कमानी वरती ....पाहून भटोबा झुरती .......झुरता झुरता अर्धे मरती ....दवाखान्यात होती भरती ....नाव पुसाया येतील त्यांच्या वर्णी बसतील घाव ......असेल कोणी माईचा लाल तर पुसून दावा नाव ......आनंदी किशोर झाला......त्या नामांतर दिनाला आनंद भिडे गगनाला....सांगे पटवून दिन जनाला .....भीमरावांनी असा जिंकला हा नामांतर डाव .....असेल कोणी माईचा लाल तर पुसून दावा नाव ....नामांतर लढ्यात शहीद झालेल्या सर्व भीमसैनिकांना विनम्र अभिवादन व नामांतर दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा....
डॉं. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ, औरंगाबाद 22 व्या नामविस्तार वर्धापन
दिनाच्या आपणा सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा....
मराठवाड्याकड मन हे कुनाचं वळालं नसतं,
कधी त्या सरकाराला कळालं नसतं.
आरे लेकरु भिमाचं जर का जळालं नसतं,
नाव विद्यापिठाला बाबाचं कधिच मिळालं नसतं.
नामांतर लढ्यात शहीद झालेल्या सर्व
भीमसैनिकांना व या आंदोलनात सक्रीय सहभाग
घेणाऱ्या सर्व भीमसैनिकांना मानाचा जय भीम ...
नामांतर आंदोलनातील शहीद भीमसैनिक ...
1) गौतम वाघमारे,
2) पोचिराम कांबळे,
3) अविनाश डोंगरे,
4) दिलीप रामटेके,
5) रोशन बोरकर,
6) ज्ञानेश्वर साखरे,
7) डोमाजी कुत्तरमारे,
8) चंदर कांबळे,
9) जनार्दन मवाळे,
10) शब्बीर अली काजल हुसैन,
11) रतन मेंढे,
12) सुहासिनी बनसोड,
13) नारायण गायकवाड,
14) अब्दुल सत्तार,
15) दिवाकर थोरात,
16) जनार्दन मस्के,
17) भालचंद्र बोरकर,
18) शीला वाघमारे,
19) प्रतिभा तायडे,
20) गोविंद भुरेवार,
21) शरद पाटोळे,
22) मनोज वाघमारे
23) कैलास पंडित,
24) रतन परदेसी
No comments:
Post a Comment