Buy books of DR BR Ambedkar, Buddhism, Dalit, Adiwasi & Bahujan Topics

Powered by Blomming for nikhilsablania

Monday, January 11, 2016

फुले , आंबेडकर आणि "गुलामगिरी"...


फुले , आंबेडकर आणि "गुलामगिरी"...

 "गुलामगिरी"
 या ग्रंथाचा अभ्यास करताना वाचकाने हा ग्रन्थ ज्या काळात लिहन्यात आला, त्या काळातील सामाजिक परस्थितिचा  आढावा घेणे प्रथमतः गरजेचे आहे . त्या काळातील बहुजन समाज हा विखुरलेला होता ,प्रत्येक जातींच्या मनात इतर जाती बाबत आकसभाव होता. समाज पोथ्या पुराणे यांच्यात गुरफटलेला होता , बहुजन समाज हा ब्राम्हणी विचारसरणीच्या वळचनीला पडून होता. बहुजन समाज पुराण कथाचे पठण करने म्हणजेच जीवनाचे सार्थक करने या विचाराने भारलेला होता. त्यांच्यात आत्मभान आणि संघ भावना नव्हती. पोथ्या पुरानावर विश्वास ठेवनारा हा बहुजन समाज  पुरानातील विशेषतः भागवत पुराणातील कथा वाचून आत्मसंन्मान गमावून बसला होता .  भागवत पुराणातिल प्रत्येक दशावतारात आर्य लोकांनी कशा प्रकारे अनार्य लोकांचा पराभव केला व अनार्य लोक कशा प्रकारे नैतिक आधारावर भ्रष्ट लोक होते याचे कपोलकल्पित कथा रंगवालेल्या आहेत . आशाप्रकारच्या पुराणातील कथामुळे शुद्र( बहुजन) समाजाने आत्मविश्वास गमावला होता. त्यांची स्वतः बाबत नकारात्मक व्यक्तिरेखा तयार झाली होती , तो आहे त्या परिस्थितीत स्वतःला आत्मसंतुष्ट मानित असे !..
उदा...

....ज्याप्रमाणे अकबर सारख्या सामर्थ्यशाली राजाला बीरबल सारखा ब्राम्हण कशा प्रकारे मुर्खात काढून त्याला नामोहरम करतो या कपोलकल्पित गोष्टी रंगवल्या जातात व बहुजन सामाजास मानसिक गुलामंगिरीच्या द्वंद्वात ढकलले जाते व ब्राम्हणांच्या श्रेष्ठत्व (?) जोपासले जाते ! त्याच प्रमाणे पुराणात शुद्र(बहुजन) राजांचा ( बळी) कश्या प्रमाणे पराभव करण्यात आल्या या भकड़कथा रचून शूद्राणां मानसिक गुलामगिरीत ढकलुन त्यांचे खच्चिकरण केले गेले.

त्यामुळे ,बहुजन समाजात पराकोटीची निराशा व अपराधिपनाची भावना निर्माण झाली होती .  अशा आत्मविश्वास गमावलेल्या लोकांमधे पुनः आत्मविश्वास संचारण्यास व त्यांना शुद्र( बहुजन) शक्तिला एकछत्रा खाली संघटित करण्यास पुराणकथांचाच वापर करुन बहुजनांत चेतना निर्माण करण्यास " गुलामगिरी " या ग्रंथाचि नितांत आवश्यकता होते !

थोडक्यात ...

बाबासहेबांचे वाक्य समर्पक ठरेल...

"गुलामाला गुलामीची जान करुण दया , म्हणजे तो बंड करुण उठेल !"

महात्मा फुल्यानी "गुलामगिरी" हा ग्रन्थ लिहून गुलामाला गुलामीची जान करुण दिली . गुलाम "शुद्र" या सज्ञे खाली एकवटला मात्र त्यांच्यात आत्मविश्वासाची उणीव होती . त्या समाजाला अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी एखाद्या संत महात्म्याचा आदर्श पुढे करणे संयुक्तिक नव्हते , किंबहुना संत , माहात्मे या बाबत फुल्यांचे मत तितकेशे चांगले नव्हते. शूद्रांमधे ऊर्जा संचारन्यासाठी म फुल्यांनी बहुजनांचे महापुरुष " शिवाजी महाराज" यांचा खरा इतिहास उघडकीस आणला !...

महात्मा फुल्यांनी "गुलामगिरी" हा ग्रन्थ लिहून तिन प्रकारे महत्कार्य केले , 1) शूद्राणां संघटित केले  2) शिवजिंचा इतिहास जागवुन त्यांच्यात आत्मविश्वास भरला , आणि 3) पुराणे हे बहुजन समाजाचे खच्चीकारन करण्याचे ब्राम्हणांचे साधन आहे अशी लोकभवना निर्माण करण्यात महात्मा फुले यशस्वी झाले !...

"गुलामगिरी" या ग्रंथामुळे...

शतकानुशतके धार्मिक गुलामगिरीचे ओझे वाहनारा बहुजन समाज ताठ मानेने उभा राहून मानेवरचे गुलामगिरीचे झूल झुगारून देण्यास सिद्ध झाला.

गुलामगिरी या ग्रंथाने तत्वनिष्ट बळी राजा रेखाटला, शुद्र समाज आदर्श राज बळीराजा हा आपला पूर्वज होता या विचारानी भरावुन गेला, तो समातावादि लाढयासाठी संघटित झाला. त्यामुळे बळीराजा    बाबत चिंतन करने आवश्यक वाटते...

सर्वच समाजामधे मिथकांची भूमिका महत्वाची असते कारण मिथकांच्या द्वारा प्रत्येक समाज भविष्य काळातील आपली धेयदृष्टि सर्वांसमोर माण्डित असतो. त्याकारणास्त्वच ज्योतिरावानि भागवत पुराणातील बळीराजाची व्यक्तिरेखा ही नव्याने जागवाली . 

बळीराजाची कथा महाभारत व भागवत पुराणात आढळते. दक्षिण भारतातील लोकपरम्परेत विशेषतः केरळात आणि महाराष्ट्रात बळीला शेतकऱ्यांचा राजा मानले जाते. महात्मा फुलेनि जुन्या मिथकात नवा आशय ओतण्याचे काम केले त्यामुळे बळी राजाच्या मिथकाकडे शूद्रांचा दृष्टिकोन हा सकारात्मक होऊ लागला. हेच महात्मा फुलेंच्या बळी राजाच्या संकल्पना मांडण्याचे गमक ठरले .

बळी राजाच्या मिथकाचे अस्तित्व भागवत पुराणात सापडते मात्र ते एक मिथक म्हणूनच पाहिले पाहिजे त्याला ऐतिहासिक संधर्भ नाही .  मात्र बळीराजाची व्यक्तिरेखा इतिहासात  अस्तित्वात नव्हती या युक्तिवादाला दुजोरा देणारी काहि कारणे पुढील प्रमाणे असू शकतात...

वैदिक धर्मात महत्वाचे दोन अद्द्य ग्रंथ मानले जातात...

पुराण आणि वेद 

वेदांचे पठन करण्यास मनुस्मृतिने शुद्र (बहुजन) सामाजास प्राचीन काळापासून मनाई होती...

मात्र ..

पुराण पोथ्या चे वाचन पठन करावे असे शास्त्र सांगते ...

असे का❓

विचार करा !

कारण , 

वेदामधे ब्राम्हणानि केलेले सर्व दुष्कृत्यांचा पंचनामा आहे मग त्यातिल ऋग्वेदात तर, ब्रम्हवृन्द यज्ञा कर्मकांडात गोमांस भक्षण कश्या प्रकारे करायचे याचे देखील सविस्तर वर्णन आहे !...

बळी संबंधी पुढील वेदातील संधर्भ ध्यानात घेन्यासारखा आहे...

" वैदिक सहित्यात वामनाची कथा सांगीतलेली आहे. ऋग्वेदात असे सांगितले आहे की आपल्या तिन पावलात तिन जगाना वामनाने व्यपुन टाकले . पण या कथेत बळीचा उल्लेख नाही"
( सदर्भं: चंदेल उमापतिराय, पौराणिक आख्यानों का विकासात्मक अध्ययन (कोणार्क) दिल्ली, 1975 पृ 158-59)

"ज्योतिराव फुले यांनी बळीराजाचे मिथक महाराष्ट्रातील ब्राम्हणेतर जातिना एक वेगळे सांस्कृतिक भान देण्यासाठी वापरले. कारण त्यांच्या मते भारतातील लोकशाही क्रांतिच्या यशस्वीतेसाठी हे करणे आवश्यक होते. सत्यशोधक समाजाच्या चळवळीत परम्परेशि फारकत न घेता नवा आशय ओतण्याचे त्यांचा प्रयत्न होता . त्यासाठी त्यांनी बळी राजाचे मिथक वेगवेगळ्या पद्धतीने वापरले ."
(संधर्भ: महात्मा फुले शोधाच्या नव्या वाटा पृ 202 प्रकाशक : महाराष्ट्र शासन )

महात्मा फुल्यांनी मिथकाचा उपयोग शुद्राणि गमावलेली गतकाळातील चेतना त्यांना पुनश्च प्राप्त होण्या करीता तसेच  भागवत पुराणातील बळी राजाच्या काल्पनिक मिथकीय अस्तित्वाला जागृत करुण फुल्यांनी समाताधिष्टित समाजरचना घडवन्याचे स्वप्न पाहिले . त्यांना या कार्यामुळे शुद्र ( बहुजन) समाजाची अस्मिता जागृत करण्यात यश प्राप्त झाले . 

ग्रन्थप्रमाण्यवादि नसलेल्या फुल्यांनी , पुराणाचा त्यातल्या त्यात बळी राजाची कथा आलेल्या भागवत पुराणाचा हत्यार म्हणून वापर केला. भागवत पुराणा सकट सर्वच पुराणांची म. फुल्यांनी टेर उडवली. 

"...शब्दप्रमाण्यावर आणि भागवत (पुराण ज्यात बळी राजाचे मिथक आहे) ग्रंथामधील अवतार कल्पनांवर तत्सम्बंधीच्या खोट्या कथांवर " मुले कुठार:" या न्यायाने फुल्यांनी प्रहार केले. ...

... तसेच ,

"भागवता (पुराण ज्यात बळी राजाचे मिथक आहे)मधील मनःकल्पित भाकड दन्तकथा पेक्षा इसापनीति(बोलत्या प्राण्यांच्या ग्रीक प्रदेशातील गोष्टी) हजार वाटयाने बरी म्हणावि लागेल . कारण तिच्या मधे मुलांची मने भ्रष्ट होणारी एकहि गोष्ट अढळत नाही ."

------ महात्मा जोतीराव फुले 
 (सन्दर्भ: महात्मा फुले गौरव ग्रन्थ , पृ 486 प्रकाशक: महाराष्ट्र शासन )

म. फुल्यांचे वरील वाक्य अतिशय सूचक आहे असे वाटते. म फुल्यांच्या वरील वाक्यावरुण सिद्ध होते की , महात्मा फुले हे भागवत पुराणाला कितपत इतिहासाचे मान्यता प्राप्त स्त्रोत मानत असावेत !...

बळीराजाला पर्यायाने भागवत पुराणाला ऐतिहासिक 
स्वरूप प्राप्त करुण देने म्हणजे पुराणे हे ऐतिहासिक दस्तऐवज आहेत असे मानाने होय .

महात्मा फुल्यांनी पुराण कथांचा उपयोग "साधन" म्हणून केला मात्र , त्या नंतर निपजलेल्या ब्राम्हणेतर चळवळीने , पुराण कथांचा संधर्भ म्हणजे आपले "साध्य" आहे असा चुकीचा समाज करुण घेतला , परिणामी ब्राम्हणेतर चळवळ अपल्या धेय्या पासून विचलित झाली .

काहि लोक वरपांगि विचार मांडून निष्कर्ष काढ़तात की , ज्या अर्थी डॉ बाबासाहेबांनी म फुल्यांना गुरु मानले , मग डॉ आंबेडकर यांना देखील बळीराजा ही संकल्पना मान्य असेल . अशा लोकांचा गैरसमज दूर करण्यासाठी एवढेच सांगावेसे वाटते की ...

महात्मा फुल्यांना जरी बाबासाहेबांनी गुरु मानले तरी , महात्मा फुल्यानी जी मूलनिवासी सदृश संकल्पना माण्डलि त्याच्या विरोधी संकल्पना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अनिहिलाशन ऑफ़ कास्ट मधे मांण्डली आहे ती माझ्या "मूलनिवासी "या पोस्ट मधून मी या आधीच दर्शवली आहे . महात्मा फुल्यानी भारतीय समाजव्यवस्था ही दोन प्रमुख वंशात विभागलि नामे, ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर असा युक्तिवाद केला . या सांकल्पनेशी फरकत घेवून बाबासाहेबांनी वेगळी संकल्पना माण्डलि त्याचा सार बाबासाहेबांच्या पुढील वाक्यात उमगतो 
"Caste system is a social division of people of the same race."                         

----- Dr. Bhimrao  Ambedkar          ( Chapter 5 Annihilation of cast)

अर्थात , जाती व्यवस्था ही एकाच वंशातील लोकांची सामाजिक विभागनि आहे.

गुरु मानने किंवा आदर्श मानने म्हणजे विचारां प्रति आदर बाळगने असे बौद्ध धम्मिय म्हणून आपणास अर्थ अपेक्षित आहे,  विचाराना शरण( surrender) जाने असा अर्थ घेवू नये .ज्या प्रमाने , म फुले हे आस्तिक होते त्यांनी निर्मिक( म्हणजेच ईश्वर) चे अस्तित्व मान्य केले होते मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ईश्वराचे अस्तित्व अमान्य केले, तसेच महात्मा फुले यांनी आपल्या सत्य वर्तनाच्या 33 नियमात मूर्तिपूजा करू नये सांगितले ( सं: म फुले गौरव ग्रन्थ पृ. 216) परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मूर्तिपूजा स्वीकारली ,त्या प्रमाणे प्रत्येक व्यक्ति व त्याचे विचार भिन्न असतात . डॉ . बाबासाहेबांनी म फुल्यांच्या विचारांचा आदर करुण आपले नविन्यपूर्ण(innovative) विचार मांडले आहेत , हेच बुद्धाला आणि त्यांच्या धम्माला अनुसरुण आहे . आपले स्वतःचे विचार मांडणे म्हणजे गुरुच्या किंवा अदर्शाच्या विचारांची अवहेलना करने असे होत नाही .


लेखाच्या शेवटी 

फुल्यांची पदरचना विचारात घेणे मार्मिक ठरेल...


कल्पनेचे देव कोरिले उदंड | रचिले पाखंड, हितासाठी ||

किन्नर गन्धर्व ग्रंथि नाचविले | अज्ञाना फसविले | कृत्रिमाने ||

निर्लज्ज सोवळे त्यांचे अधिष्ठान | भोंदिति निदान | शुद्रादिका 

---- महात्मा फुले समग्र वाड्मय पृ 356

जय जोतीराव !

जय भीमराव !


संकलन : आनंद आरकडे
             तथागत ग्रुप

No comments:

Post a Comment

T-shirt of Dr. Ambedkar

T-shirt of Dr. Ambedkar

Dr. Ambedkar's Books in Hindi

Dr. Ambedkar's Books in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Blog Archive

Popular Posts