चला... किरकोळ जबाबदारी पार पाडू !
शेवटच्या श्वासापर्यंत जातीयवाद्यांशी रोहितने एकाकी झुंज दिली. अखेर लढाईचे सर्व सूत्रे आपल्याकडे सोपऊन तो गेला आहे. लढताना आपल्यावर कुटुंबाची जबादारी आहे, हा विचार त्याच्या कधी मनालाही शिवला नाही. ती एक अजिब दिवानगी होती. पण आपल्याला आता तरी शुद्धीवर यावे लागेल. रोहितने स्वतःचे बलिदान देऊन मरगळलेल्या आंबेडकरी चळवळीला नवी चेतना, नवी उर्जा ,नवी दिशा दिली आहे. आंबेडकरी समाज त्याच्या या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकणार नाही. पण त्याचे हे ऋण आपण मनोभावे अधोरेखित जरूर करू शकतो. समाजासाठी तो घर दार सोडून गेला. त्याच्या घराची जबाबदारी आता समाजावर आहे. रोहितच्या स्वाभिमानी आईने कुठलीही शासकीय आर्थिक मदत घेण्यास नकार दिला आहे. अशावेळी समाजाने सामाजिक बांधिलकीचा परिचय देण्याची गरज आहे. प्रत्येकाने शंभर - दोनशे रुपये जरी रोहितच्या आईच्या बॅन्क खात्यात जमा केले तरी तिचा आयुष्यभराचा प्रश्न मिटू शकतो. आणि एव्हढी कुवत आणि दानत आंबेडकरी समाजामध्ये निश्चितच आहे. रोहितच्या आईला मुलाच्या मृत्यूस जबाबदार असणारांपुढे हात पसरण्याची वेळ येऊ नये एवढेच अंतःकरणापासून वाटते. 'भीक नको पण कुत्रा आवर' हे मनुवादी सरकारला ठासून सांगण्याचे बळ तिला मिळाले पाहिजे. यानिमित्ताने आणखी एक होऊ शकतं. तिच्या बॅन्क खात्यात जमा झालेली रक्कम पाहून सरकारचे डोळे विस्फारू शकतात. त्याचे धाबे दणाणू शकतात. पायाखालची वाळू सरकू शकते. आणि म्हणून चालून आलेली ही संधी आपण घेऊ या. रोहितला सच्ची श्रद्धांजली अर्पण करू या...!
जय जय जय जय
जय भीम !!
खालील खात्यात आपण आपली कुवत आणि इच्छेनुसार रक्कम जमा करू शकता-
Name : Vemula Radhika
A/C No :20328905704
YFSC Code No :0844
State Bank of India,
Commercial Branch
Guntur 522004.
कृपया जास्तीत जास्त शेअर करा...संवेदनशीलतेचा परिचय द्या !
No comments:
Post a Comment