एका गावात एक नवीन मंदिर बांधण्यात आले. त्यानिमित्त गाडगेबाबांना कीर्तनासाठी बोलावण्यात आले. कीर्तन असे झालेः
गाडगेबाबा - गावात मंदिर बांधलं वाटतं, नाही रे ?
लोक - हो जी.....
गाडगेबाबा - आता काय करान?
लोक - देव आणून बसपू जी....
गाडगेबाबा - देव आनान कुठून?
लोक - बाजारातून.....
गाडगेबाबा - बाप्पाए, बाजारातून? इकत का फुकट?
लोक - इकत....
गाडगेबाबा - बाप्पा, देव इकत भेटते? थो का मेथीची भाजी हाये का, कांदे-बटाटे होये बाजारात इकत भेटाले ? बरं आणला कत, मग काय करान ?
लोक - देवाची आंघोय करून देऊ जी....
गाडगेबाबा - बाप्पा तुमच्या देवाले सोताची आंघोय नाही घालता येत? वा रे तुमचा देव ! बरं, मग काय करान ?
लोक - त्याच्यासमोर निवद ठेवू आन् काठी घेऊन बसू दरवाज्यात
गाडगेबाबा - काहून?
लोक - एकादं कुत्रं येऊ नये आन् देवाच्या निवदाला खावू नये म्हणून जी.
गाडगेबाबा - बाप्पा तुमच्या देवाले सोताच्या निवदावरलं कुत्रं नाही हाकलता येत, थो तुमच्यावर आलेलं गंडांतर कसं दूर करंन रे? म्हणून म्हनते, "देव देवळात नसते. देवळात पुजाऱ्याचं पोट असते.....!!!"
बाबा म्हणजे चालतं बोलतं विद्यापिठ...
No comments:
Post a Comment