Buy books of DR BR Ambedkar, Buddhism, Dalit, Adiwasi & Bahujan Topics

Powered by Blomming for nikhilsablania

Tuesday, January 5, 2016

डॉ.नरेन्द्र दाभोळकर सरांची एक निर्भीड कविता

डॉ.नरेन्द्र दाभोळकर सरांची एक निर्भीड कविता ....
मुर्त्यांना पुजण्यापेक्षा, माणूसकिला पूजतो मी !
काल्पनिक देवांना न मानता, फुले,शाहू,आंबेडकरांना वाचतो मी !
छाती ठोकून सांगतोय, असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी !
पोथ्या,पुराणे वाचण्यापेक्षा शिवरायांना वाचतो मी !
दगडासमोर त्या कशाला झुकू ? जिजाई,सावित्री,रमाईपुढे नतमस्तक होतो मी !
छाती ठोकून सांगतोय, असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी !
घामाचे पैसे दानपेटीत टाकून, भटांची घरे भरत नाही मी !
तहानलेल्यांना पाणी, भूकेलेल्यांना अन्न देऊन, त्यांच्यातच देव शोधतो मी !
छाती ठोकून सांगतोय, असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी !
हिंदू,मुस्लिम,सिख,ईसाई म्हणून जगण्यापेक्षा, माणूस म्हणून जगतो मी !
धर्मातील पाखंडांना न जपता, माणूसपणालाच जपतो मी !
छाती ठोकून सांगतोय, असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी !
कर्तुत्ववान माणसापेक्षा, दगडाला श्रेष्ठ समजत नाही मी !
मंत्र,होमहवन,कर्मकांड यांना पायाखाली तुडवून, मनगटावर भरवसा ठेवतो मी !
छाती ठोकून सांगतोय, असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी !
मांजर आडवी गेली म्हणून न थांबता, थेट माझ्या ध्येयाजवळ त्या पोहोचतो मी !
अंधश्रद्धेला मातीत लोळवून, विज्ञानवाद स्विकारतो मी !
छाती ठोकून सांगतोय, असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी !
-डॉ.नरेन्द्र दाभोळकर

☝🏻...

7 comments:

  1. हि कविता दाभोळकरांची नाही.

    ReplyDelete
  2. माफ करा..... पण ही कविता डाॅ. नरेंद्र दाभोळकर सरांची नाही..... दाभोळकर सरांनी कविता केल्याचे माझ्यातरी वाचण्यात नाही.... वरील कविता ही नव युवा कवी अर्जुन सुर्वे यांची आहे. अर्जुन सुर्वे हेच या निर्भीड कवितेचे खरे कवी आहेत. पण, कोणीतरी खोडसाळपणे, भोळसटपणे, वा चुकून अर्जुन सुर्वेंच्या या कवितेखाली डाॅ. नरेंद्र दाभोळकरांचे नाव लिहिले. आणि सोशल मिडीया, इंटरनेटवर प्रसारित केली. त्या एकाने केलेली चुक मात्र या कवितेच्या मुळ कवीवर अन्याय करणारी ठरली. आणि सद्या तर सर्वत्र ही कविता डाॅ. नरेंद्र दाभोळकर सर यांचेच नावाने Whats app, Instagram, Facebook, Blogs, इ. सोशल मिडीया व इंटरनेटवर प्रसारित होत आहे... किती चुकीची ही गोष्ट.... कारण, ग्रामिण भागात राहणार्‍या एका सामान्य बहुजन कुटुंबातील अजुन सुर्वे नामक युवा विद्रोही कवीची ही रचना, या कवितेचे मुळ व खरे कवी हे अर्जुन सुर्वेच आहेत. पण, .....
    तेंव्हा आपणास विनंती की, कोणीतरी एकाने केलेली चूक आपणही का करावी.... कृपया ही कविता मुळ कवी असलेल्या अर्जुन सुर्वे यांचेच नाव टाकून प्रसारित व्हावी.......चुकीची दुरूस्ती व्हावी ही अपेक्षा.........

    "असत्य नाकारणारा नास्तीक आहे मी..."या निर्भिड कवितेचे कवी आहेत ..... अर्जुन भिमरावजी सुर्वे, मोब्ईल नंबर... 9130217296

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. यह एक घोर अन्याय है.... इस कविता कवी पर.... "नास्तिक आहे मी " इस नाम से कवी अर्जुन सुर्वे ने लिखी है| कवीता के रचियेता एक सामान्य परिवार के प्रतिभावान कवी अर्जुन भिमराव सुर्वे है। एक ग्रामिण भाग मे रहनेवाले एव् बहुजन समाज के अर्जुन सुर्वे नामक कवीने लिखी यह कविता किसी ने जानबुझकर नरेंद्र दाभोलकर के नाम से प्रसारित की। अह एक अपराध है। और वही अब सब दौरहा रहे है । यह एक बहुजन कवी पर अन्याय है।
    मै विनती करूंगा कृपया, तूरंत यह कविता हटाई जाये या तो फिर उसके कवीका नाम डाला जाये।
    धन्यवाद..... जय भिम.......

    ReplyDelete
  5. https://samaybuddha.wordpress.com/2016/08/18/dr-narendra-dhabolkar-poem/

    ReplyDelete

T-shirt of Dr. Ambedkar

T-shirt of Dr. Ambedkar

Dr. Ambedkar's Books in Hindi

Dr. Ambedkar's Books in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Blog Archive

Popular Posts