📎 जगणं 📎
बाबासाहेब समजले नाही म्हणून
एकत्र कधी येत नाही
एकाच घरात राहून आम्ही,
एकमेकांस दिसत नाही.
हरवला तो आपसांतला,
जिव्हाळ्याचा संवाद.
एकमेकांस दोष देऊन,
नित्य चाले वादविवाद.
धाव धाव धावतो आहे,
दिशा मात्र कळत नाही.
ह्रदयाचे पाऊल कधी,
ह्रदयाकडे वळत नाही.
इतकं जगून झालं पण,
जगायला वेळ नाही.
जगतो आहोत कशासाठी,
कशालाच कशाचा मेळ नाही.
क्षण एक येईल असा,
घेऊन जाईल हा श्वास.
अर्ध्यावरच थांबलेला,
असेल जीवन प्रवास.
अजूनही वेळ आहे,
बाबासाहेंबाना समजुन घ्या,
बा भिमाचे स्वप्न साकार करण्यास निळ्या वादळाचा आरंभ,
या परिवारात सामिल व्हा,
भिम सैनिकाने एक व्हावे
भिम सैनिकाने एक व्हा!!!!
ll 🙏🏼 जयभिम 🙏🏼 ll
No comments:
Post a Comment