दया पवार यांच्या 'बलुतं' या कादंबरीतील हृदयस्पर्शी उतारा...
बाबासाहेबांचं पुन्हा दर्शन झाले ते निर्वाणाच्यावेळी. नेहमीसारखाच मी सकाळी कामाला निघालेलो. वर्तमानपत्रात पहिल्याच पानावर बातमी वाचली. धरणी दुभंगावी तसं वाटलं .घरातील माणसाचं निधन व्हावं ,तसा गलबलुन गेलो.घराच्या चौकटीला धरुन रडू लागलो. आईला बायकोला कळेना, की मी पेपर पाहताच का रडतोय म्हणून. घरातील मंडळीँना सागताच सारं घर रडायला लागलं. बाहेर येवून बघतो तो लोक जथ्यानं चर्चा करीत आहेत. बाबासाहेबांचे निधन दिल्लीला झालेलं असतं संध्याकाळपर्यँत त्यांचं शव विमानानं येणार असतं.
मी नोकरीला लागुण दोन तीन महिण्याचा काळ गेलेला. रजा काढण्याकरता व्हेटरनरी कॉलेजात गेलो. अर्जातील कारण पाहताच साहेब भडकले. म्हणाले, "अरे, रजेच्या अर्जात असं कारण कशाला लिहीलंस? आंबेडकर हे राजकीय पुढारी आहेत आणि तु एक सरकारी नोकर. काहीतरी प्रायवेट कारण लिही" तसा मी स्वभावान खुपच शांत पण त्या दिवशी त्या अर्जातील कारण बदललं नाही एवढ निश्चित. साहेबांना उलट सांगितलं की, "साहेब, ते आमच्या घरातीलच एक होते. कुठल्या अंधाराच्या गुहेतुन त्यांनी आम्हाला बाहेर काढलंय याची तुम्हाला कल्पणा कशी येणार?" आपल्या नोकरीचं काय होणार रजा पास केली की नाही याची मुळीच काळजी न करतामी राजगृहाकडे धावलो.
पाण्याचा लोँढा सारखा वाहात राहावा तसे लोक राजगृहाच्या पुढील मैदानात जमत होते जाताना तिकीट खरेदी करावं याचही भान त्यावेळी त्यांना नव्हतं. रात्रभर आम्ही घरी आलो नाही. राजगृहाच्या पुढील गवतावरच अंग टाकलं. सकाळी पहातो तरी एखाद्या महासागराच्या लाटेसारखा लोकांचा लोँढा येतच असतो. सर्वाँना रांगेनं दर्शन मिळणार असतं. एक-दोन तास रांगेत थांबून बाबांचं दर्शन झालं झोपलेल्या अवस्थेत दिसावे ते शांतपणे पहुडलेले होते. त्यांच्या नाकात कापसाचे बोळे घातलेले त्यांच्या पायावर लोक फुले वाहत होते.
दुपारी त्यांची शवयात्रा निघाली वर सुर्य आग ओकीत होता आणि आम्ही भारावलेल्या अंतःकरणाने शवयात्रेत मुंगीच्या गतीने पुढे सरकत होतो. एका उंच पुलावरुन गर्दिचा मागचा-पुढचा अंदाज घेतला, वारुळ फुटावं तसे लोक .नजर ठरत नव्हती. त्या दिवशी लोकांच्या हेलावत्या भावनांचं जे दर्शन घडलं, ते कधीच विसरता येणार नाही. अनेक स्रिया-पुरुष दुःखाच्या आकांताने आपलं उर पिटत होते. तर काहीँच्या डोळ्यातील अश्रू आवरत नव्हते.
विश्वरत्न बाबासाहेब यांना कोटी कोटी प्रणाम
भारतात कितीही आणि कोणत्याही नेत्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यांसोबत स्वतःचे आणि जातबांधवांचे पुतळे उभारुन मोठेपणा दाखविण्याचा केविलवानी प्रयत्न केला तरी विश्वरत्न महामानवाची थोडीशी सरही त्यांच्या वाट्याला येणार नाही हेच एकमेव सत्य आहे.
मानाचा जय भीम
No comments:
Post a Comment