महार मांग निंदा
ठावी नाही व्यथा
जाळा मनू ग्रंथा
अग्नी मध्ये ll
ज्या मनुस्मृतीने माणसाला जनावरापेक्षा ही हीन वागणुक दिली स्ञीयांवर अमानवी बंधने लादली.बहुजनांना नैसर्गिक हक्क अधिकार नाकारले आणि गुलामी करण्यास भाग पाडले .अशी मनुस्मृती जाळा हि इच्छा महात्मा फुलेंनी व्यक्त केली आणि २७ डिसेंबर १९२७ रोजी डा. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी महाड येथे छञपती शिवरायांच्या नामघोषात मनुस्मृतीचे दहन केले .आणि हजारो वर्षाची बहुजनाची गुलामगिरी, स्ञीयांवरील बंधने ,छञपती शिवरायांचा शुद्र म्हणुन नाकारलेला राज्याभिषेक ,छञपती संभाजी राजांना हालहाल करुन केलेली हत्या ,तुकारामांची हत्या ,महर्षी शंबुकांची हत्या ,एकलव्याचा कापलेला आंगठा आणि आपल्या वाणी ने बहुजनांना जागृत करणाऱ्या अनेक संतांच्या धर्म ग्रंथाच्या नावाखाली केलेल्या हत्या यांचा एकञित बदला
मनुस्मृती हा ब्राम्हणी धर्म ग्रंथ जाळून घेतला आणि महात्मा फुलेंची इच्छा पुर्ण केली.
बाबासाहेब म्हणतात जो समाज आपला इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही आणि २५ डिसेंबर १९२७ हा आपल्या बहुजनासाठी ब्राम्हणी गुलामीतून मुक्त झालेला ऐतिहासिक दिवस आज त्याला ८८ वर्ष पुर्ण होत आहे .या निमित्तानं त्या ऐतिहासिक क्षणाची आठवण रहावी म्हणून आणि जे पुन्हा मनुस्मृती कायदा लागु करण्याच्या तयारीत आहेत अशांना आम्ही इतिहास विसलो नाही याचा इशारा देण्यासाठी २५ डिसेंबर हा "मनुस्मृती दहन दिन " सर्वांनी मनूचा पुतळा जाळून साजरा करावा .कारण
राजस्थान हायकोर्ट परिसरात मनू चा पुतळा बसवून येथिल ब्राम्हणी सरकार पुन्हा मनुस्मृती राज्याची आस लावून बसले आहे.तरी हा पुतळा काढावा अशी मागणी करुन गावागावात मनूच्या पुतळ्याचे सार्वजनिक दहन करावे .हिच खरी बाबासाहेबांना आदरांजली ठरेल .
हा मेसेज वाचून प्रतिक्रिया द्या .आणि हा मेसेज २५ डिसेंबर पर्यंत सर्व बहुजनांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा करतो.
जय भिम
No comments:
Post a Comment