**** पोस्ट नः 100 *****
बुध्द आणि त्यांचा धम्म
दुसरा खंडः भाग तिसरा
३) सारीपुत्त आणि मोग्गलान यांची धम्मदीक्षा
*******************
1) तथागत राजगृहात राहत असताना तेथे संजय नावाचा एक प्रसिद्ध मनुष्य तेथे राहत होता सुमारे अडीचशे परिव्राजक त्याचे शिष्य म्हणून त्याच्याबरोबर राहत होते
2) त्याच्या या शिष्यावर्गात सारीपुत्त आणि मोग्गलान या नावाने दोन तरुण ब्राम्हण होते .
3) संजयच्या उपदेशाने सारीपुत्त आणि मोग्गलान यांचे समाधान झाले नव्हते आणि ते यापेक्षा चांगल्या तत्वज्ञानाच्या शोधात होते
4) एके दिवशी सकाळी पंचवर्गीय भिक्खुपैंकी स्थविर अश्वजित आपले चीवर परिधान करुन आणि भिक्षापात्र व दुसरे चीवर हाती घेऊन राजगृह नगरात भिक्षेसाठी आला
5) अश्वजितची धीर गंभीर चालचलणुक पाहुन सारीपुत्त चकित झाला वंदनीय अश्वजितास पाहिल्यावर सारीपुत्त स्वतःशीच विचार करु लागला खरोखर हा पुरुष म्हणजे जगातील महान योग्यतेचा भिक्खु आहे जर मी या भिक्खुकडे गेलो आणि मित्रा तु कुणामुळे है वैराग्य प्राप्त करुन घेतलेस ? तुझा गुरु कोण? तु कोणता धम्म मानतोस ? आसे मी जर त्याला विचारले तर काय हरकत आहे
6) परंतु मग सारीपुत्त मनाशी म्हणाला ह्या भिक्खुला हे विचारण्याची ही वेळ नव्हे तो भिक्षेसाठी एका घराच्या आतल्या आवारात शिरला आहे याचकांना उचित अशा पध्दतीने मी जर यांच्या मागोमाग गेलो तर काय हरकत आहे
7) आणि राजगृहातील आपली भिक्षायात्रा संपविल्यानंतर वंदनीय अश्वजित मिळालेले अन्न घेऊन परत फिरलो नंतर ते ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सारीपुत्त गेला त्यांच्यासमोर जाऊन त्यांनी त्याला अभिवादन केले आणि अदबीने त्यांच्याशी बोलून तो त्यांच्या जवळ उभा राहिला
8) अश्वजितच्या जवळ उभा राहुन परिव्राजक सारीपुत्ताने त्याला विचारले मित्रा आपली मुद्रा शांत आहे आपले रुप शुध्द आणि तेजस्वी आहे आपण कोणामुळे हे वैराग्य धारण केले आहे आपला गुरु कोण आपण कोणता धम्म मानता
9) अश्वजित म्हणाला मित्रा शाक्यकुळात जन्मलेला एक महान श्रमन आहे त्याच्याच नावाने मी ही परिव्राज्या धारण केली आहे तोच माझा गुरु आहे आणि त्याच्यांत धम्मालाषमी अनुसरले आहे
10) वंदणीय महाराज आपल्या गुरुचा कोणता सिध्दांत आहे आणि त्यांनी आपणाला कोणता उपदेश दिला आहे
11) मित्रा मी एक तरुण शिष्य आहे मी नुकतीच दिक्षा घेतली आहे आणि त्यांचा धम्म आणि त्यांची शिष्यत्व मी नव्यानेच पत्करले आहे मी तुला धम्माची तपशीलवार माहीती देऊ शकणार नाही पण त्याचा अर्थ काय हे मी तुला थोडक्यात सांगेन
क्रमशः
रोज वाचा
" बुध्द आणि त्यांचा धम्म "
" समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द विहारात सकाळी गेलेच पाहिजे "
भावनेच्या भरात कोणता ही निर्णय घेऊ नये .
बाबासाहेबांचा उल्लेख नेहमी
" विश्वरत्न बाबासाहेब " असाच करावा
काळजीपुर्वक वाचा आणि विचार करा आणि पुढे फाँरवर्ड करा
**********************************
विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर
[M.A.,P.HD.,D.sc.,L.L.D.,D.LITT.,BARRISTER -AT-LAW ]
*********************************
No comments:
Post a Comment