जगात अनेक धर्मसंस्थापक होऊन गेले त्यापैकी चार धर्मसंस्थापक म्हणजे, तथागत गौतम बुध्द, येशुख्रिस्त, महंमद पैगंबर, कृष्ण होत.या चौघांच्या व्यक्तीमत्वाची आणि धर्मप्रसाराची तुलना केल्यास एका बाजूला बुध्द आणि दुस-या बाजूला इतर तिघे हे स्पष्ट होते.कारण काही मुद्याबाबत त्यांच्यात बरीच तफावत आणि विरोध असल्याचे आढळून येते.व्यक्तीगत महात्म्य याबाबतीत मात्र इतर तिंघापेक्षा बुध्दांचे नाव वेगळे घेतले जाते.
→★बायबल या ग्रंथात येशुख्रिस्त मी देवाचा पूत्र असल्याचे ठासून सांगतो आणि ज्या कुणाला देवाच्या राज्यात प्रवेश मिळवायचा असेल त्याने तसे मानले तरच देवाच्या राज्यात प्रवेश मिळेल, अन्यथा नाही.
→★महंमद पैगंबर त्याच्याही पुढे पाऊल टाकतो.येशुख्रिस्ताप्रमाणे तोही देवाचा प्रेषित असल्याचे सांगतोच, पण तो देवाचा शेवटचा प्रेषित असल्याचा दावा करतो आणि त्याआधारावर तो जाहीर करतो की,ज्या कुणाला मुक्ती हवी आहे त्याने केवळ नुसताच प्रेषित न मानता तो शेवटचा प्रेषित असल्याचे मानले पाहिजे.
→★कृष्ण तर या दोघांच्या पुढे आणखी दोन पावले टाकतो.केवळ देवाचा पुत्र अथवा प्रेषित म्हणवून घेण्यात त्याला समाधान वाटत नाही.इतकेच नव्हे तर देवाचा शेवटचा प्रेषित घेण्यातही तो समाधानी नाहीच.स्वतःला देव म्हणवून घेण्यातही त्याला रस नाही तर तो स्वतःला आपण परमेश्वर असल्याचा दावा करतो.त्याचे शिष्य तर देवाधिदेव (देवांचा देव) असं वर्णन करतात.
बुध्दांने मात्र स्वतःला अशी गैरवाजवी कुठली उपाधी लावून घेतली नाही.तो मानवपूत्र म्हणून जन्मला आणि सर्वसामान्य माणूस म्हणून राहण्यास व सर्वसामान्य माणसाचे तत्वज्ञान सांगण्यात त्याने समाधान मानले.आपण कुणी अतिशय महान असा
*अकृत्रिम*नैसर्गिक शक्ती असल्याचा दावा त्याने कधीही केला नाही.किंवा आपण तसे आहोत यासाठी त्याने कसलाही चमत्कार करून दाखविला नाही.
★बुध्दांनी मोक्षदाता आणि मार्गदाता यातील फरक स्पष्टपणे दाखवून दिला.येशू, महंमद, कृष्ण हे आपण मोक्षदाता असल्याचा दावा करतात.तर आपण मार्गदाता असण्यावरच बुध्द समाधान मानतो.या चार धर्म संस्थापकात आणखी एक फरक आहे तो म्हणजे आम्ही जे काही सांगितले आहे ते अगदी अचुक असून त्याच्या अचूकपणाबद्दल कुणालाही प्रश्न करता येणार नाही.ते प्रश्नापलिकडे आहे; असा येशु आणि महमंद दावा करतात.स्वतःला देव म्हणवून घेणारा कृष्ण तर त्याने जे काही सांगितले आहे ते मूळचे आणि शेवटचे असल्याने त्याच्या अचूकपणाबद्दल प्रश्नच निर्माण होऊ शकत नाही असे म्हणतो.बुध्दाने मात्र त्याने जे काही शिकविले आहे ते अगदी अचूक असल्याचा दावा केलेला नाही.
महापरिनिब्बाण सुत्तात त्यांने त्याचा शिष्य आनंद याला सांगितले आहे की, माझा धम्म अनुभव व कारणे यावर आधारित आहे. त्यामुळे माझी शिकवण केवळ मी सांगितली, माझ्याकडून निर्माण झाली म्हणून ती अचूक बरोबर आहे, ती आपणांस बंधकारक आहे असं समजून माझ्या शिष्यांनी ती स्विकारू नये.तर ती कारण आणि अनुभवावर असल्याने काळ आणि परिस्थिती प्रमाणे तिच्यात दुरस्ती करणे अथवा तिला सोडून देण्याचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे.ऐवढे प्रचंड धैर्य कुठल्याही धर्म संस्थापकाने दाखविलेल नाही.त्यांच्या धर्मात दुरस्ती करण्याचे त्यांना भय वाटते.बुध्दांचे मात्र तसे नव्हते. त्यांच्या धम्माच्या मजबूत पायाबद्दलची त्यांना पूर्ण खात्री होती.म्हणूनच त्याचा धम्म एखाद्या ओसाड जंगलासारखा नसुन तो सदैव हिरवागार राहिला आहे. त्यामुळे हे अगदी स्पष्ट आहे की, एखादा कितीही जुनाट रूढ समजूतीचा विध्वंसक त्यांच्या धम्माचा कुठल्याही प्रकारे नाश करू शकणार नाही असे आहे बुध्दांचे अद्धितीय स्थान!
↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑
■जयभीम नमो बुध्दाय■
↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑
{14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर दिक्षाभुमी येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जनतेला उद्देशून भाषण.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
No comments:
Post a Comment