रोहित वेमुलाचं शेवटचं पत्र
गुड मॉर्निंग,
तुम्ही जेव्हा हे पत्र वाचत असाल तेव्हा मी नसेल, माझ्यावर नाराज होऊ नका, कारण अनेकांना माझी परवा होती, तुम्ही माझ्यावर प्रेम करत होते, आणि माझी काळजीही घेत होते. माझी कुणाबद्दलही तक्रार नाही. मला नेहमीच माझ्याबद्दल अडचण होती. मी माझा आत्मा आणि शरीर यांच्यात निर्माण झालेली दरी वाढताना पाहतोय. मी एक राक्षस झालो आहे. मी एक लेखक होऊ इच्छीत होतो. विज्ञानावर लिहिणारा, कार्ल सगान सारखा. शेवटी अखेर मी एक पत्र लिहितोय.
माझं विज्ञानावर प्रेम होतं, ताऱ्यांवर, निसर्गावर, लोकांवरही मी प्रेम केलं, पण हे समजलं नाही, त्यांनी कधी निसर्गाला फारकत दिली. आपल्या भावना दुय्यम दर्जाच्या झाल्या आहेत. आपलं प्रेम नकली आहे, आपल्या मान्यता खोट्या आहे. आपली मूल्य वैध आहेत फक्त कृत्रिम कलेच्या माध्यमातून. हे फार कठीण झालं आहे, आपण प्रेम करावं आणि दु:खी होऊ नये.
एका व्यक्तीची किंमत त्याची तत्कालीन ओळख आणि जवळच्या शक्यतेवर मर्यादीत करण्यात आली आहे. एका मतापर्यंत. माणूस एक आकडा झाला आहे. फक्त एक वस्तू. कधीही माणसाला त्याच्या मेंदूनुसार मोजलं गेलं नाही. एक अशी वस्तू जी स्टारडस्टपासून तयार झाली होती. प्रत्येक क्षेत्रात, अभ्यासाने, गल्ल्यांमध्ये, राजकारणात, मरणात आणि जगण्यात.
मी पहिल्यांदा अशा प्रकारचं पत्र लिहित आहे, पहिल्यांदा शेवटचं पत्र लिहित आहे, मला माफ करा, जर याचा कोणताही अर्थ निघत असेल.
असं होऊ शकतं की मी चुकीचा असेल, जग समजून घेण्यासाठी, प्रेम, जीवन, यातना आणि मृत्यू समजून घेण्यात. मी कोणत्याही गडबडीत नव्हतो, पण मी नेहमीच घाईत होतो. बेचैन होतो, जीवन सुरू करण्यात. या संपूर्ण कार्यकाळात जीवन माझ्यासारख्या लोकांसाठी एक अभिशाप होता. माझा जन्म एक भीषण दुर्घटना होती. मी जन्मापासून एकटेपणातून बाहेर येऊ शकलो नाही. बालपणाचं प्रेम मला कुणापासूनही मिळालं नाही.
मी दु:खी नाहीय. मी फक्त खाली-खाली आहे. मला स्वत:ची चिंता नाही. हे दयनीय आहे, आणि याचचं कारण आहे की मी आत्महत्या करतोय.
लोक मला कायर संबोधतील. स्वार्थीही, मूर्ख सुद्धा, जेव्हा मी निघून गेलो असेल, मला काहीही फरक पडणार नाही, मला लोक काय म्हणतायत. मेल्यानंतर भूत-प्रेताच्या गोष्टींमध्ये मी विश्वास करत नाही. जर कोणत्या गोष्टीत माझा विश्वास आहे, तर तो म्हणजे, मी ताऱ्यांपर्यंत प्रवास करू शकेल, आणि जाणून घेऊ शकेल की दुसरं जग कसं आहे.
जर तुम्ही माझं पत्र वाचत असाल, तर माझ्यासाठी एवढंच करा, माझी सात महिन्याची फेलोशीप मिळणे बाकी आहे. १ लाख ७५ हजार रूपये. कृपया ते माझ्या परिवारापर्यंत पोहोचवा. मला रामजी यांना ४० हजार रूपये द्यायचे होते, त्यांनी पैसे कधीच परत मागितले नाहीत. पण कृपया त्यांना फेलोशीपच्या पैशातून पैसे द्या.
माझी इच्छा आहे की, माझी शेवटची प्रेतयात्रा शांततेत निघावी. असं वाटू द्या की मी आलो होतो, आणि निघून गेलो. माझ्यासाठी अश्रू गाळू नका, फक्त एवढं ध्यानात ठेवा, मी आनंदी आहे जगण्यापेक्षा मरणाने.
उमा अन्ना मी हे काम तुमच्या रूममध्ये केलं म्हणून मी माफी मागतो. आंबेडकर स्टुंडंट असोसिएशन परिवार, तुम्हाला सर्वांना निराश करतोय, मला माफ करा. तुम्ही सर्वांनी माझ्यावर नितांत प्रेम केलं, सर्वांना भविष्यासाठी शुभेच्छा!
सर्वांना शेवटचा...
जय भीम!
मी काही औपचारीक गोष्टी लिहिणं विसरलो, मी स्वत:ला संपवतोय, या कृत्यासाठी कुणीही जबाबदार नाहीय.
कुणीही मला असं करण्यासाठी भडकवलेलं नाही, कुणीही असं कृत्य केलेलं नाही, किंवा शब्द वापरले नाहीत, ज्यामुळे मी असं केलं.
हा माझा निर्णय आहे, आणि यासाठी मी जबाबदार आहे. मी गेल्यानंतर माझ्या मित्रांना आणि शत्रुंनाही त्रास देऊ नका.
No comments:
Post a Comment