•● रमा - भीमाच्या....लग्नाची गोष्ट ●•----•●•----•
सन 1906 च्या त्यावेळेच्या प्रथे नुसार बाबासाहेबांचा विवाह लहानपनीच झाला होता. लग्नाच्या वेळी भिमरावांचे वय 14 तर रमाचे वय 9 वर्षे होते....!
नवरा-नवरीसह भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये टाकलेल्या मांडवात उभे असतांना एवढ्यात भीमरावांची बहीण पुढं येवून म्हणाली, `आधी नवर्याच नाव घे. असे म्हणून तिने नवरा-नवरीला अडवलं. भीमराव हे पाहून गलातल्या गालात हतस होता. नऊ वर्षाची रमा एकदम घाबरली. खूप लाजलीही. तिला ऊखाना आठवेना. थोडा विचार करुन रमाने नाव घेतलं -
"चांदीच्या निरंजनात लावली तुपाची फुलवात,
भीमरावांचं नाव घ्यायला करते आजपासून सुरूवात"
वा.... गं .... वहिनी, भलतीच आमच्या भाऊरायांना येड लावणारी.....
जमलेल्या सार्याजणी खळखळून हसल्या. भीमरावही हसला.
दुसरी बहीण म्हणाली, वहिनी अजून एक घ्या ना
रमाने घाबरत घाबरत दुसर नाव घेतलं....
"खुतणीच्या चोळीवर पुतळीच लेणं.......
भीमरावांच्या जीवावर मला काय उणं....."
सारेच मग जोरजोराने खुदुखुदु हसू लागले.
एक चेष्टेखोर सवाष्णी म्हणाली, ` नवरीन नवर्याच नाव घेतले हे आम्ही काही ऐकलं नाही, तवा नवरीन परत नवर्याच नाव घ्यावं`
रमा आता वैतागली, पण इलाज नव्हता.
रमान पुन्हा नाव घेतलं......
"सोन्याच्या कानफुलांना मोत्याचं झुंब,
भीमरावांची वाट बघत सारं गाव उभं..."
एवढ्यात रामजी बाबा रमाच्या मदतीला धावून आले, कशाला बिचारीला छळता अजून लहान आहे ती. रमान सुटकेचा श्वास टाकला.
लग्नात भव्य लग्न मंडप नव्हतं. पंचपक्वान्नाच जेवण नव्हतं. झगमग रोशनाई नव्हती. गाड्यांचा ताफा नव्हता. किंवा वरातितील लोकं भरझरीचे कपडे घालुन हिंडत नव्हते. यातलं काहीच नव्हतं तरी मला व्यक्तीश: हे लग्न जागातील कुठल्याही लग्नापेक्षा एक भव्य लग्नच वाटतं. कारण जरी हे सगळं नव्हतं पण तिथे नवरदेव म्हणुन जो माणुस उभा होता ना, तो जगातला न भुतो न भविष्य असा दिव्य पुरुष होता. अन त्याच्या शेजारी जी नववधु होती ती या तेजोमय पुरुषाला पाठिमागुन बळदेणारी महामाया होती. मग अशा दोन महान विभुतींच्या ऋणानुबंधाची गाठ घालाणारा तो सोहळा मला जगातील कुठल्याही सोहळ्यापेक्षा हजारोपटीने मोठा वाटतो.
भायखळ्याच्या बाजारात हे लग्न पार पडले. अशा प्रकारे कोटी कोटी उपेक्षीतांसाठी एकटाच झगडणा-या भिमाच्या आयुष्यात आज सोबत करणारी एक जिवन संगिनी प्रवेश करते. भिमाच्या हातात हाथ देताना ती नुसतं हात देत नाही. ती देते प्रेमाची शाश्वती, मायेच्या उबेची शाश्वती, सदैव पाठीशी उभं राहण्याची शाश्वती, समाजानी अपमानीत केल्यावर जेंव्हा जेंव्हा मन विदिर्ण होईल, रुक्ष होईल तेंव्हा त्या मनाला प्रेमाच्या स्पर्शाने प्रफुल्लीत करण्याची शाश्वती.
जेंव्हा केंव्हा लढता लढता आपल्याच लोकांच्या वागण्यामुळे खिन्न होऊन जाण्याची वेळ येईल, खचुन जाण्याची वेळ येईल तेंव्हा याच कुशीत उल्हासाचे झरे दिसतील. ती शाश्वती देते की तुम्ही आता लढा, पुर्ण ताकतीनीशी लढा, त्यासाठीच तर मी आले आहे. मला कुठे करायचा आहे सुखाचा संसार. तुमच्या घरचा डोलारा आता माझ्यावर सोपवा अन खुशाल नविन आघाड्या उघडा. असेच काही असावे ते मुक शब्द रमाच्या मनात.....?
संदर्भ - "रमाई", लेखक - यशवंत मनोहर...!
No comments:
Post a Comment