त्या शुराना फक्त आदरांजली देऊन भागणार नाही...
आंबेडकरी युवकांच्या धमन्यात त्या वीर शूरांचे रक्त सळसळते, आज प्रत्येक युवकांनी भीमा कोरेगाव च्या त्या शूरांच्या शूर्याची, त्यागाची आणि विरत्वाची प्रेरणा आणि शपथ घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करावी. कारण ज्या बिकट परिस्थितीतून आज आंबेडकरी समाज जात आहे, ज्या प्रमाणात अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे, हे सर्व चित्र डोळ्या समोर उभे असून जर आपण "समाजासाठी वांझ कळा" देत घरात बसून जर दोषारोपन करत राहू तर आपल्या बापाच्या,आपल्या पूर्वजांच्या त्यागाला काही अर्थ उरणार नाही.
आज प्रत्येक युवकांनी स्वतःची जिम्मेदारी समजून स्वतःला लढण्यासाठी सज्ज केले पाहिजे असे मी मानतो. आपण जे सुख भोगत आहोत ते आपल्या पूर्वजांच्या त्यागाचे फलित आहे हे आपण विसरता काम नये. जीवनाच्या प्रत्येक वळणावर हे आठवत राहावं. जो घास आपण खातो,जे पाणी आपण पितो,जे जीवन आपण जगतो हे आपले नसून आपल्या "बापाच्या" त्यागाचे फलित आहे.
निश्चितच स्वतःच्या फॅमिली बद्दल आपलि कर्तव्य असतातच,त्यांना संपूर्ण न्याय देऊन,उरलेला वेळ हा आंबेडकरी आंदोलनाला समर्पित कराल हि अशा व्यक्त करतो.
2016 हे वर्ष भीमा कोरेगाव युद्धामध्ये शाहिद झालेल्या शुराना त्यांच्या त्यागाला समर्पित करून आंबेडकरी आंदोलनाला निळा ध्वज कुठल्याही संकटाची,मानाची पर्वा न करता स्वतःला आंदोलना साठी समर्पित करण्याचा संकल्प आणखी जास्त दृढ करत ह्या नवीन वर्षाची सुरुवात करत आहे।
जय भीम...
No comments:
Post a Comment