🌹आई माझी रमाई,
बाप माझा भिमा..
भिम सैनिकाची गोष्ट,
मी सांगतोय तुम्हा..!!🌹
🌹दलितांचा तो राजा,
हा विश्वरत्न माझा..
प्रत्येकाच्या हृदयात,
हा भिमराव माझा..!!🌹
🌹त्या चवदार तळ्याची,
मिठास त्याने चाखली..
मग दृष्ट ब्राह्मंणांची मान,
बाबासाहेबांपुढे वाकली..!!🌹
🌹अरे शुद्र लोकांनाही त्याने,बेधडक जगणं शिकवलं..
त्यांची अस्पुर्शता काढून,
जणु स्वर्गात त्यांना घडवलं..!!🌹
🌹जिथे दलितांना शिक्षण नव्हतं,बाबांनी मुलींना ही शिकवलं..माझ्या आई-बापामुळे जणु,
गरीबाघरी अमृतच पिकवलं..!!🌹
🌹आज अभिमानाने जगतोय,कारण बाबांची पुण्याई आहे..
एकदा "जय भिम" बोलण्यात पण,पदरात बाबांची कमाई आहे..!!🌹
🌹अरे महापुरुष तो माझा,
जो दलितांसाठी झिरपला..
पसरली जगात शोककळा,
तो विश्वरत्न माझा हरपला...!!!🌹
🌹....जय भिम....🌹
No comments:
Post a Comment