Buy books of DR BR Ambedkar, Buddhism, Dalit, Adiwasi & Bahujan Topics

Powered by Blomming for nikhilsablania

Friday, January 8, 2016

पंचशील ध्वज

धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी संपूर्ण जगातील बौध्दांचे एकच प्रतीक असावे , या विचाराने सन १८८० मध्ये श्रीलंकेचे अनागारिक देवमित्र धम्मपाल , महास्थविर गुणानंद , सुमंगल , बौध्द विव्दान जी . आर. डिसिल्वा इत्यादिनी मिळून निळा , पिवळा , लाल , पांढरा व केसरी अशा पाच रंगाच्या उभ्या व आडव्या पट्ट्यामध्ये ' विश्व बौध्द ध्वजा ' ची निर्मिती केली आहे . कालांतराने त्याला विश्व मान्यता प्राप्त झाली . याला पाली भाषेत ' षडरोशनी ध्वज ' किंवा ' धम्म ध्वज ' असे म्हणतात . 

हा पाच रंगाचा ध्वज आहे म्हणून याला ' पंचशील ध्वज ' किंवा ' पंचरंगी ध्वज ' असे कदापी म्हणू नये .

पाच रंग 
१) निळा :--- शांती व प्रेमाचे 
प्रतीक .
२) पिवळा :--- तेज व उत्साहाचे 
प्रतीक . 
३) लाल :--- शौर्य व धैर्याचे 
प्रतीक .
४) पांढरा :--- शुध्दता व निर्मळ-
- तेचे प्रतीक . 
५) केसरी :--- त्याग , दया व 
करुणेचे प्रतीक .

४) याचे प्रमाण उभे ५० सें . मी . व आडवे ७० सें . मी . आहे .

५) हा ' धम्मध्वज ' बौध्द जनांनी
आपले घर , विहार , स्मारक , भवन , धमिम परिषद , धम्म लभेचा मंच धम्म उत्साहाचे स्थळ इत्यादी ठिकाणी सर्वांत उंच असेल असा फडकवावा .

हा ' धम्म ध्वज ' बुध्द पोर्णिमा ' , धम्मचक्र प्रवर्तन दिन , धम्मक्रांती दिन व धम्म परिषदांचे वेळी ध्वजस्तंभावर फडकवून वंदना करावी .

प्रत्येक बौध्द व्यक्तिने धम्म ध्वजाचा सन्मान व अभिमान बाळगावा .

धम्मध्वज वंदना (मराठी अनुवाद ) 

वज्रासारखा अभेद देह धारण करणाऱ्‍या भगवान बुद्धाच्या डोक्यावरील व दाढीवरील केसातून व डोळ्याच्या नीलस्थानातुन प्रभावित होणारा निळा रंग , समुद्र , धरती व आकाशात व्यापून राहीला आहे ।।१।। 

वज्रासारखा अभेद देह धारण करणाऱ्‍या भगवान बुद्धाच्या पिवळसर त्वचेतून व डोळ्यातील पिवळ्या स्थानातून प्रभावित होणार पिवळा रंग , समुद्र , धरती व आकाशात व्यापून राहीला आहे ।।२।। 

वज्रासारखा अभेद देह धारण करणाऱ्‍या भगवान बुद्धाच्या मांसातील व डोळ्यातील रक्त वर्ण स्थानांतील आणि रक्तातून प्रभावित होणारा लाल रंग , समुद्र , धरती व आकाशात व्यापून राहीला आहे ।।३।। 

वज्रासारखा अभेद देह धारण कराणाऱ्‍या भगवान बुद्धाच्या दातांतून , अस्थितून , डोळ्यातील पांढऱ्‍या स्थळांतून प्रभावित होणारा शुभ्र रंग , समुद्र , धरती व आकाशात व्यापुन राहीला आहे ।।४।। 

वज्रासारखा अभेद देह धारण करणाऱ्‍या भगवान बुद्धाच्या निरनिराळ्या अवयवात मन प्रभावीत होणारा केसरी रंग , समुद्र , धरती व आकाशात व्यापून राहीला आहे ।।५।। 

वज्रासारखा अभेद्य देह आणि वरील रंगानी परिपूर्ण असलेल्या अनंतामध्ये फडकणाऱ्‍या व सदैव मनोहर दिसणाऱ्‍या भगवान बुद्धाच्या धम्मध्वजाला आम्ही काया , वाचा व मनाने वंदन करतो ।।६।।


सर्व धम्म बांधवाना-भगिनींना जागतिक धम्मध्वज दिनाच्या हार्दिक मंगलमय कामना.......

जयभिम 🙏🙏🙏
नमो बुद्धाय 🌹🌹🌹

No comments:

Post a Comment

T-shirt of Dr. Ambedkar

T-shirt of Dr. Ambedkar

Dr. Ambedkar's Books in Hindi

Dr. Ambedkar's Books in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Blog Archive

Popular Posts