संक्रात या सणाचा खरा इतिहास माहिती करुन घ्या..
प्राचीन काळी संक्रात आणि किंक्रात नावाच्या ब्राह्मण सख्या बहिणी होत्या. या दोन मुलींच्या वाढदिवसानिमित्त ब्राम्हणांनी राजा शंकेसुराला (बळी राजाचा नातु) आमंत्रित केले. दोघी बहिणी गायन , नृत्यकलेत खूप प्रवीण होत्या. नृत्यगृहात प्रवेश करताक्षणीच नृपूराच्या मंद आणि तबल्याच्या तालबद्द ध्वनिवर नृत्य करीत होत्या. राजासह सारेजण मंत्रमुग्ध झाले होते. नृत्यगृहाच्या दोन्ही कोपरयात अगोदरच दोन भाले आणून ठेवलेले होते. नृत्याने गुंग झालेल्या राजाला पाहून संक्रांत आणि किंक्रात या दोन्ही मुलींनी कोपरयात ठेवलेले भाले उचलले आणि दांडपट्टा खेळतात त्याप्रमाणे भाले घेऊन त्याच्या सहभोवताली फिरत असता एकीने पोटातुन दुसरीने पाठीतून भाले खुपसले अन दोघी बहिणींनी रक्ताचा टीळा कपाळी लावला. कुंकू हे शंकेसुराच्या रक्ताचे चिन्ह आहे.
अशा प्रकारे नागांचे पूर्वज ब्राह्मणांनी कट करून मारले व त्या प्रित्यर्थ आनंदोत्सव साजरा करतात.
बरयाच लोकांना राक्षस , असुर , दास हे कुणीतरी वेगळे असे लोक वाटतात .
आणि ते देवांचे वैरी होते ... लोकांना त्रास देत होते असे ब्राम्हणी इतिहास संशोधकांनी इतिहासात लीहुन ठेवले आणि तेच बहुजन समाजतील शिक्षित लोकांनी वाचले आणि त्याचाच स्विकार केला. खरे काय नी खोटे काय याची साधी समिक्षा , चिकित्सा वा तर्क करण्याचा प्रयत्न केला नाही ... आज आम्ही टी. वी. वर दाखवल्या जाणारया मालिका दररोज पाहतो. त्यात देव , देवी , लक्ष्मी या सारख्या पात्राद्वारे राक्षस , असुर अश्या पात्रांचा वध केल्याचे पाहतो आणि टाळ्या ही वाजवतो ... कारण वध हा राक्षसाचा असुराचा झालेला असतो ... आता राक्षस हे खरे पाहता आपलेच नागवंशीय पुर्वज आहेत ... हे खरा इतिहास वाचला तर समजते नाहीतर आपणच आपल्या पुर्वजांचे मृत्यु दिवस सण म्हणुन साजरे करीत राहतो.
ही एक परंपरा म्हणून आपण करीत आहोत पण त्यामागील कारण काय याचा विचार करीत नाही ... याचा अर्थ आपण आपली गुलामी आनंदोत्सव म्हणून साजरी करीत आहोत याचे भान ना समाजातील लोकांना आहे ना समाजातील लोकांना आहे ...शंकेसुर हा बळी राजाचा नातु जो नागवंशीय होता .... आपण म्हणजेच बहुजन समाज ; म्हणजेच ब्राम्हणेत्तर सारा समाज हा नागवंशीय आहे ... पाहीजे तर खात्री करा ...आपली जन्म पत्रिका तपासुन पहा. त्यात आपला वर्ण क्षुद्र ... गण राक्षस ... योनी अंत्यज आणि वंश नाग असेल ....
टिप :आपणांस विश्वास नसेलतर पंचागामध्ये असलेले शंकेसुराचे चित्र अवश्य पाहावे.
जय शिवराय जय भिमराय
जय मूलनिवासी ...
No comments:
Post a Comment