Buy books of DR BR Ambedkar, Buddhism, Dalit, Adiwasi & Bahujan Topics

Powered by Blomming for nikhilsablania

Wednesday, January 13, 2016

पुढील बौध्द पिढी का घडत नाही

❗❗वाचा व विचार करा❗❗
 पुढील  बौध्द पिढी का घडत नाही. 

❗अशीक्षीत पालकांमुळे बौध्द धर्माची माहीती पुढील पिढीला पोहचलीच नाही.
❗पालकांनी माहीती जरी पोहचवली नाही तरी बौध्द युवकांना स्वता: चा धर्माची माहीती मिळवण्यात ईटंरेस्ट नाही.
❗अर्ध्या पेक्षा जास्त बौध्द युवकांना स्वत: बौध्द असल्याची जाणीवच नाही.
❗बौध्द धम्माचा प्रचार करायला आमच्या लोकांना लाज वाटते
❗सर्वधर्मसमभाव चे नाटक  करून सर्रास पणे हिंदु धर्माचा उदो उदो  करत फिरतात आणि बौध्द धर्माकडे अक्षरशः पाठ  फिरवितात.
❗समाजाचे प्रबोधन करायला कोणीही पुढे येत नाही आणि जरी कोणी येत असेल तर त्याला पाठींबां मुळीच देत नाहीत.
❗शिर्डी, तिरुपती, बालाजीला  हजारो रुपयॆ देवून  नवस करतील किवां दान करतील पण बुध्द विहारात 10 रुपये देतांना विचार करतील /अनेक  बहाणे सांगतील. 
❗आजुबाजुला गणपती बसतात म्हणुन ह्यांचा सुध्दा आराध्य दैवत गणपतीच होतो.
❗बाहेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुध्दांचे फोटो पण आत अनेक  देवांचा किचनमध्ये किंवा  महापुरुषांच्या फोटोच्या बाजूला  देव्हारा.
❗ देव्हा~यातील वात कधीही  विझू दिली जात नाही  , 
मात्र बाबासाहेबांच्या तसबिरीला साधा हार सुद्धा नाही. 
❗बुध्द विहारांची देखरेख तर सोडा  आठवड्यातून एकदा  विहारात वंदन करायला जायला  सुध्दा  यांना जमत नाही. 
❗घरात बौध्द ग्रंथ नाहीत.
वाचन व आचरण तर नाहीच नाही.
 
❗कुठल्याही  समाजाच्या मिटींगला जायला आम्हाला  जमत नाही किंवा  वेळच नाही. 
❗ अहो विहारात चिटपाखरूही नाही  मग श्रामणेर/ भंतेजी चारिकेसाठी कुणाकडून मागणार? 

❗बौध्दांचं अस्तीत्वच त्याच देशातून मिटन्याच्या मार्गावर  आहे ज्या देशात ह्या धम्माचा  ऊदय झाला.
❗  आपले अनेक लोक  फक्त लग्न, बारसे  ( नामकरणविधी )बौध्द पध्दतीने करतात लोकं नाव ठेवु नये म्हणुन.... 
आणि  पाया पडायला कुलदेवता,  देवळात ,  शिर्डीला जातात
❗परवाच रविवारी एक लांजा  तालुक्यातील एक छोटा मुलगा  (पहीलीतील )नातेवाईकांसोबत 
घरी आला. त्याने घर निरखून पाहिले व म्हणाला  घरात  बुध्दमुर्त्याच आहेत  पण  गणपती  कुठेय❓😂 पण मी त्याला  म्हणालो गणपतीच का?  तर म्हणाला  की घर मोठे आहे  मग मोठा  गणपती  बसवा. आमच्याकडे चाळीत  मोठ्या  जागेत गणपतीच 
🔵🔵 तेव्हा  आता विचार करा की  आमच्या  मुलांना  बुध्द कोणी  सांगायचा ❓❓🔵🔵
 
⭕आणि मग   आपण   इतर अधर्मिय  बौध्द बनवायचे सोडा🚫 पण बौद्ध धम्म घेतलेल्या   लोकांना  बुध्दीष्ट कसे  बनवणार❓❓❓

   🙏🙏 जय भिम 🙏🙏

No comments:

Post a Comment

T-shirt of Dr. Ambedkar

T-shirt of Dr. Ambedkar

Dr. Ambedkar's Books in Hindi

Dr. Ambedkar's Books in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Blog Archive

Popular Posts