तु असतास तर भिमा,
समाज माझा विखुरला नसता..
अनोळखी वाटेवर चुकलेल्यांना
भेटलाच असता रस्ता..
तु असतास तर भिमा,
आकाशही आम्ही पेलले असते
तुझ्या ज्ञान प्रकाशात
सारे एक झाले असते..
तु असतास तर भिमा,
रथ आमचा अडकला नसता..
नेता कोण खरा अजूनही
शोधत समाज राहिला नसता..
तु असतास तर भिमा,
अजूनही जळावे लागले नसते
तूझ्याच घटनेमध्ये न्यायासाठी लढावे लागले नसते..
तु असतास तर भिमा,
मानवतेचा अर्थ कळला असता,
धर्म जातीच्या या देशात
भारत बौद्धमय झाला असता..
माझ्या समाजाला भिमा
तु पून्हा हवा आहेस..........!!!
तुटक्या या घराला
शिल्यकार हवा आहेस......!!!
No comments:
Post a Comment