मकर 'संक्रात' नव्हे, तर मकर 'संक्रमण'! बौद्ध लोकांनी वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासावा..
सूर्य या दिवशी मकर राशीत प्रवेश होण्याच्या क्षणाला मकर संक्रमण म्हणतात.मकर संक्रात नाही. २२ डिसेंबरच्या सुमारास अवष्टंभ बिंदूवर वसंतसंपात बिंदूपासून २७० अंशांवर सूर्य येतो. त्यावेळी सूर्याची दक्षिण क्रांती (खगोलीय विषुववृत्तापासूनचे कोनीय अंतर) सर्वांत अधिक म्हणजे २३° २७' असते. या वेळी सूर्य खगोलीय विषुववृत्ताच्या जास्तीत जास्त दक्षिणेस दिसतो, त्यानंतर तो उत्तरेकडे सरकू लागतो म्हणजे ⇨उत्तरायण सुरू होते म्हणून यास मकर संक्रमण म्हणतात. ,बाकी हिंदुस्थानात ,मकर संक्रात,किंक्रांत, भोगी हे जे काय सण म्हणून साजरे करतात याला मनुवादी महा षड्यंत्र म्हणतात. केवळ "बडव्या" ना दान,देण्याकरिता बहुजनांनी महायज्ञ, असंख्य देवांची सत्यनारायण, पूजा अर्चा करून द्यावे. यासाठीच हा उपक्रम आणि दुसरं काय? केवळ श्रद्धेच्या नावाखाली मानसिक गुलामी अंधश्रद्धेचीच,हाच कायम विळखा हिंदुस्थानातच? देवांच्या नावावर भिक (दान) मागून गरीब मागसालेल्या श्रदाळू लोकांना लुबाडणारे.मात्र आधुनिक भारतात असं हीन प्रकार होत नाहीत. कारण आता सुजाण, विज्ञान,बुद्धिवादी लोक भारतात वास्तव्य करत असून तो चंद्रावर पाऊल ठेवत आहे...अर्थात पोहचलं आहे.
भारतातील मागील शतकात लोक पावसाळ्यात शेती करून अमाप पिक घेत सुगीच्या हंगामात अन्नधान्याची कोठारे पूर्ण भरून ठेवलेली असत. पुढील वर्षभर मेहनतीनं घामानं केललं रुजविलेल पिकं, अन्न आनंदानं पोटाची खळगी भरेल एवढं साठा निर्माण केलेला असे. त्यामुळे कुटुंब आनंदानं वर्षभर अन्न धन्यानं सुखी राहून नाच गाणी करीत कुटुंबातील पुरुषमंडळी, अधिक विशेषतः तरुण पुरुष, शक्यतो एक नदी जवळ, शेतावर जाऊ सुगीच्या हंगामानंतर एका छोट्याशा झोपडी कॉटेज तयार करून रात्री ते अन्न तयार करून सर्व कुटुंबाना खाण्यापिण्या करिता तयार करून आनंद उत्सव साजरा करीत असत. यावेळी गोड आणि एकमेकांना शुभेच्छा देवाण-घेवाण करीत असत संपूर्ण रात्री ढोल, ड्रम किंवा मैदानी खेळ करून लोक संगीत गात,दिवसा या दिवशी बैल यांची पूजा करीत असत. नागराची,पिकवलेल्या अन्नाची पूजा करीत असत.
आज याला मनुवादी पंडितांनी पैशाच्या अमिषापायी नको तो उद्योग निर्मिला असून सामान्यांना ब्राम्हण बडव्यांनी मकर संक्रातीचा प्रवेश हत्ती वरून होत आहे ती लाल रंगाची वस्त्र व हातात धनुष्य घेवून येणार आहे .ती दुध पिवून अगदी तरुण दिसणार आहे असणार आहे व ती आपल्या करिता शुभ असून आपण दान पुण्य करा असा संदेश देणारी आहे असा बिनबुडाचा संदेश पोथी वाचून देतात. यात सामान्य बिन अकलेचा कांदा भरडला जातो.हे मात्र हिंदुस्थानातील बहुजनाच्या टाळक्यात काही जात नाही.बहुजन सावकार आहे ना तो? देतो या भविष्य पोथी पुराण सांगणाऱ्या बडव्याला मागील तेवढे दक्षिणा, दान ? केवळ हा लुटांरु टोळ्यांचाच भाग आहे.पहा दरोडे टाकणारे अस्सल गुन्हेगार रात्री दरोडे घालतात.मात्र मानव बुद्दीवंत प्राणी ब्राम्हण हा सामान्यांना अगदी पोथी माध्यमांतून रात्री दिवसा कधी लुटतो, डाका टाकतो. अगदी उघड्या डोळ्यानं नाही का? तरी बहुजन समाज जागृत होत नाही.बेडर कुटला?
शेवटी बहुजन बेअकलेचा कांदाच म्हणायला हव. तो स्वतः रडतो कमावतो,मेहनत करतो घाम गाळतो व तो दुसरांच्या हातात स्वताचा हात ठेवत पोथीनुसार भविष्य सांगणाऱ्याच्या अगदी 'भरभरून' ठेवतो.आणि मरेपर्यंत अगदी सरणावर चढवे पर्यंत दक्षिणा देत असतो.असाच प्रकार मकरसंक्रातीचा आहे.हे संक्रमण असून सूर्य यादिवशी मकर राशीत प्रवेश होण्याच्या क्षणाला मकर संक्रमण म्हणतात.परंतु या बडव्यांनी बहुजन लोकावर भोग(भोगी), आयुष्याची कायम संक्रांत करून ठेवली ,टाकली आहे.त्यामुळे बौद्ध लोकांनी वैज्ञानिक दृष्टीकोन पहावा, जोपासावा. हळदी मकर संक्रांत साजरी करू नये.तिळगुळ,गोडधोडची गरज अनाथ आश्रमातील लोकांना आहे. भविष्य, पोथिपुराण सांगणाऱ्या बडव्यांना नाही .तुमचीच संक्रात किंक्रात करून टाकतील.हातातील रेषेवरून घरातील धागेदोरे तिजोरीतून अगदी बुद्धीनं क्षणात खाली करतील एवढी खात्री नक्की.बहुजन लोक विचार करा चालताना वावरताना पाऊल डोळसपणे उचला...अन्यतः 'संक्रांत' .... भोग …. येणारच,कोसळणारच अगदी कोपणारच …..
No comments:
Post a Comment