तुम्हांला तुमचा मोठेपणा मिरवायचाय की बाबासाहेबांचा
***************************
***************************
मित्रहो आपण २०१६ हे वर्ष आपण विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करीत आहोत . त्यामुळेच यावेळी सर्वच आंबेडकरी जनतेत मोठा उत्साह असेल यात शंकाच नाही पण मला आपणास काही गोष्टीं मुद्दामहून सांगाव्या वाटतात . आपण आपल्या छातीवर हात ठेवून सांगा की आपण बाबासाहेब किती समजून घेतले आहेत .
💎बाबासाहेबांना येणाऱ्या भावी पिढीकडून काय अपेक्षा होत्या ?
💎आपण त्या अपेक्षांना कितपत खरे उतरलो आहोत ? 💎केवळ एखाद्या नेत्याचा , पक्षाचा संघटनेचा मोठे पणा मिरवण्यासाठी तर आपण बाबासाहेबांना डोक्यावर घेत नाहीत ना ?
💎कितपत आपण बाबासाहेबांचे विचार मानता आणि आचरणात आणता ? ?
💎त्यांनी आपल्या साठी केलेल्या त्यागाची कितपत जाणीव आहे ?
अरे त्यांच्या मुळेच आपण माणसात आलो . आपल्याला आपल्या माणूसपनाची ओळख करुन दिली . आपल्याला जगण्याचे अधिकार दिले.चातुर्वर्णा तुन बाहेर काढले . शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी खुले केले . स्वतःच्या जीवाची देखील त्यांनी कधी पर्वा केली नाही . शूद्र समजला जाणारा समाज कित्येक वर्षे अंधारात खितपत पडला होता त्यास प्रकाशात आणण्याचे महान कार्य बाबासाहेबांनी केले .
तरीही आपण क्रुतघ्न का वागतो हेच समजत नाही . फक्त सोशियल मीडिया वर उदोउदो करायचा . एकदम कट्टर पणाचा आव आणायचा . पण प्रत्यक्षात मात्र येरे माझ्या मागल्या ! गल्लीबोळात वेगवेगळ्या नावाने संघटना बनवायच्या मग निळा झेंडा हाती घेऊन गुंडगिरी करायची . दुसऱ्या गटाबरोबर (टोळी बरोबर ) भांडण - मारामारी करायची समाजात दहशत निर्माण करायची . वरून कट्टर बौद्ध ,कट्टर जय भीम असल्याचे दावे करायचे . बौद्ध विहारांचा गैरवापर करायचा . फक्त १४ एप्रिल व ६ डिसेंबर ला जागे व्हायचे , मग खरे कट्टर भीम अनुयायी असल्याचे जगाला प्रदर्शन करायचे . आणि बाबासाहेब फक्त आमचेच असल्याचे दाखवायचे . ते महार जातीत जन्मले म्हणजे ते फक्त आपलेच करुन टाकले आपण . डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ भारतच नव्हे तर जग मानतय . ज्ञानाचे प्रतीक म्हणून जगाने त्यांचा गौरव केलाय . पण आम्ही मात्र त्यांना संकुचित विचाराने छोट करुन टाकले . बाबासाहेब फक्त आमचेच असा कॉपी राईट करुन टाकला . आणि त्यामुळे इतर समाजाने ते महारांचे म्हणून अव्हेर केला .
मग आम्ही सुधारणार तरी कधी ? का जे आलंय मागून तेच चालू ठेवायचं ? डोक्यावर घेतलेले बाबासाहेब डोक्यात कसे येतील याचा विचार कधी करणार आपण ? मग चला संकल्प करु या आजपासूनच एक नव्या विचाराचा , एक नव्या वाटचालीचा . जगाला एक नवीन आदर्श दाखवून देऊ .बुद्धांच्या धम्माचे अनुकरण नव्हे तर अनुसरण करुयात . बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारे भीम सैनिक बनुया .
१४ एप्रिल २०१६ चा बाबांचा सोहळा अभूतपूर्व साजरा करुयात . त्यांच्या विचारांचा प्रचार , प्रसार करु या. भपकेबाज पणा , -शक्तिप्रदर्शन वगैरे करण्याऐवजी विचारांचे प्रदर्शन घडवून अनुयात . आपल्या आचार विचारातून बौद्ध धम्म व बाबासाहेब बनून जगुयात , शुभेच्छा फलकाऐवजी तथागत गौतम बुद्ध , बाबासाहेब आंबेडकर , राजर्शी शाहू महाराज , महात्मा ज्योतीबा फुले , छत्रपती शिवराय , राष्ट्रसंत गाडगे महाराज इ . महान व्यक्तींचे विचार प्रदर्शित करुयात . हेच खरे अभिवादन ठरेल . जय भीम
लेखक - : माणिक गोर्डे - अहमदनगर
बुद्ध धम्म अनुसरण संघ
सदर लेख सर्व मित्र व ग्रुप वर जास्तीत जास्त शेअर करा . नावाशिवाय शेअर केले तरी काही हरकत नाही . पण विचार जरूर पुढे पाठवा .
🌿🌿🌸🌿🌿🌸🌿🌿🌸🌿🌿🌸
No comments:
Post a Comment