🙏 ब्राम्हण, श्रमण व प्रव्रज्जित कोणाला म्हणावे?
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌞 वाहितपापोति ब्राम्हणो, समचरिया समणोति वुच्चति|
🌞 पब्बाजयमत्तनो मलं, तस्मा पब्बजितोति वुच्चति||
भावार्थ:-
🌿 ज्याने पापांना नष्ट केले तो ब्राम्हण आहे,जो समभावाने आचरण करतो तो श्रमण आहे, तसेच ज्याने आपले चित्तविकार दूर केले तोच प्रव्रज्जित समजला जातो.
------------------------------------
🌿 ब्राम्हण, श्रमण, परिव्राजक.बुध्दांच्या समकालीन निरनिराळ्या पंथामध्ये राहून जे घरदार सोडून किंवा संन्यास घेऊन अध्यात्मिक लाभासाठी प्रयत्न करत असत अशा व्यक्तींसाठी हे शब्दप्रयोग केले जात होते.
🌿 श्रावस्ती येथे एक ब्राम्हण परिव्राजक झाला.मात्र त्याने बुध्द, धम्म व संघ ह्या त्रिरत्नांना शरण न जाता इतर पंथाकडून परिव्राजकाची दिक्षा ग्रहण केली.एके दिवशी त्याच्या मनात विचार आला की, बुध्द आपल्या शिष्यांना प्रव्रज्जित असे म्हणतात, म्हणुन मला सुध्दा त्यांनी प्रव्रज्जित असेच म्हटले पाहीजे.असा विचार करून तो बुध्दांकडे गेला व म्हणाला........
🌿 भगवान आपण आपल्या शिष्यांना प्रव्रज्जित असे म्हणतात मग मला सुध्दा आपण प्रव्रज्जित का म्हणत नाहीत? त्यावर भगवंत म्हणतात.........
🌞 ब्राम्हण! नुसते प्रव्रज्जित होणाऱ्याला मी प्रव्रज्जित म्हणत नाही, परंतु ज्याने आपल्या चित्तमळांना दुर केले,त्याला मी प्रव्रज्जित म्हणतो.
🌞 ज्याने पापांना नष्ट केले त्याला मी ब्राम्हण म्हणतो.
🌞 आणि जो समतेचे आचरण करतो त्याला मी श्रमण असे म्हणतो.
असा उपदेश करून भगवंतांनी वरील गाथा म्हटली.
🙏🙏🙏
नमो बुध्दाय! जय भिम!
🌿🌹 मंगल मैत्री 🌿🌹
No comments:
Post a Comment