आस्तिक - नास्तिकतेपलीकडील वाद ....
देऊळबंद चिञपट .....उत्तम नट, उत्तम अभिनय आणि अर्थात उत्तम कथानक....!!! देवभोळ करण्याचा एक उत्तम प्रयत्न .....एका शास्ञज्ञाचा नास्तिकतेकडुन आस्तिकतेकडचा प्रवास ..... देव नावाच्या खुळचट कल्पना न मानण्याचे संस्कार बालमनावर होत गेले ....आज पर्यंत कित्तेकांच्या घरातले देव माझे वडील आणि त्यांचे दोन स्नेही यांनी स्वत: च्या हाताने काढुन टाकलेत ....पण, आज पर्यंत घरातले देव काढुन टाकले म्हणुन काही अपाय झाला नाही ..... याउलट मिळत गेलं तर आंतरीक समाधान ....
रोजच्या वर्तमानपञात हमकास येणारी बातमी .....देवदर्शनाला जाताना अपघात ७ लोक मृत्युमुखी, दोन जण गंभीर जखमी ....मृतांमध्ये २ वर्षीय बालकाचा ही समावेश ......खरचं प्रश्न पडतो, जर देव आहेच तर त्याच्या दर्शनाला येणार्यांचा बळी का जातो ....??? का नाही वाचवु शकत तो ....???
परिक्षेत पास होऊदे, लग्न ठरुदे, घर घेता य़ेऊ दे म्हणुन सतत पैसे, नारळांची चिरीमिरी देऊन जर काम होत असती तर दिवस राञ मरमर करायची काय गरज .....????
जगात वरचेवर वाढत जाणारी गुन्हेगारी थांबवु शकत नाही तो ......बर बाकी जाऊद्या ...जर देवाच अस्तित्व आहेच तर स्वत: च्या मंदिरात होणारी चोरीही तो थांबवु शकत नाही .....जो देव स्वत: चे मुकुट सोन्याचे दागिने वाचवु शकत नाही तोच देव आपल्याला संकटातुन मुक्त करु शकतो का ???
देवाच्या जन्मकथाच मुळात हास्यास्पद वाटतात .....मळातुन जन्मलेला गणपती ....!! सुर्यपुञ, पवनपुञ ....!!! विज्ञानापलीकडील, कल्पनेपलीकडील आणि विशेष म्हणजे बुद्धिला पटण्यापलीकडील देव आणि त्यांच्या कल्पना ....
- सुकेशनी विमल दिगंबर कदम
No comments:
Post a Comment