प्रगतीचा सहज सुलभ मार्ग बुद्ध मार्ग
🌿🌿 🌿🌿 🌿🌿 🌿🌿
जी व्यक्ती बुद्धाच्या तत्त्वज्ञाना प्रमाणे वागते, आचरण
करते ती स्वत:चा विकास साधू शकते. बुद्धाचे तत्त्वज्ञान जर
प्रत्येक नागरिकाने आचरण्याचा प्रयत्न केला तर ह्या
जगातील किती तरी दु:खे कमी होतील व विश्वात शांतता नांदेल.
बुद्धाचा धम्म हा विज्ञानवादी आहे व नीतिमत्ता त्याचा पाया
आहे. त्यातूनच समाजाला वेगळी दिशा मिळू शकते.
जो समाज नीतिमान आहे, तो समाज प्रज्ञावंत आहे. तो
यशवंत आहे, तो समाज बलवंत आहे, तो समाज धनवंत आहे
आणि ह्या सर्व गोष्टी आचरणातूनच निर्माण होणार आहेत.
कौटुंबिक, सामाजिक नीतिमत्तेच्या आचरणातूनच धार्मिक
नीतिमत्ता साधता येते. तोच बौद्ध धर्माचा पाया आहे.
धर्मांतरित बौद्धांच्या प्रगतीतला मुख्य अडसर आहे तो या
नीतिमत्तेचा अभाव. त्यातूनच सामाजिक अभिनिवेश उदयाला
येताना दिसतोय.
मात्र अत्यंत खेदपूर्वक नमूद करावेसे वाटते की अजूनही
बहुतांश धर्मातरित बौद्ध हा बुद्धाच्या शिकवणीनुसार वागत
नाही. त्यामुळे या समाजास समाज व्यवस्थेत किंमत नाही, मान
नाही किंवा अनीतिमान मार्ग अनुसरल्यामुळे तो त्यांची
आर्थिक, धार्मिक किंवा राजकीय प्रगती करू शकत नाही.
त्याच्या चुकीच्या वागण्यामुळे तो स्वत:चे उत्थानाचे सर्व
मार्ग बंद करत आहे. कौटुंबिक, सामाजिक नीतिमत्तेच्या
आचरणातूनच धार्मिक नीतिमत्ता साधता येते. तोच बौद्ध
धर्माचा पाया आहे. धर्मांतरित बौद्धांच्या प्रगतीतला मुख्य
अडसर आहे तो या नीतिमत्तेचा अभाव. त्यातूनच सामाजिक
अभिनिवेश उदयाला येताना दिसतोय.
जागतिकी करणाच्या आणि उदारीकरणाच्या झपाटय़ामुळे
मोठं खासगीकरण घडून येतंय. त्यात तमाम गोरगरीब देशोधडीला
लागलेले दिसून येतायत. मोठय़ा संख्येने बौद्ध बांधव अजूनही
विकासाच्या वाटेवर आलेले नाहीत.कारण बुद्ध तत्वज्ञान
त्यांच्या अजून पचनी पडलेले नाही म्हणुन
नमो बुद्धाय
No comments:
Post a Comment