मित्रांनो हि कविता किती जबरदस्त, मार्मिक आहे पहा
आवडली म्हणून शेयर करतोय
" बाबांच्या गद्दार लेकरांसाठी ".....
" छप्पन सालीच केले
माझ्या बापाने आमचे धर्मांतर...
पण काहींना अजून कळाले नाही धर्म आणि धम्म यातील अंतर....
मिळतायत सुखसोयी
म्हणून धम्मात येऊन बसले,
पण ३३ कोटी देवांच्या चिखलात
फसले ते फसलेच...
दर वर्षी देवी - देवतांना
नारळ चढवतात आधी,
आठवतय का रे
माझ्या बापाने ५ रुपयांचा
हार मागितलेला कधी...
अरे एवढे सगळे देऊन
त्याने कसलीच मागणी केली नाही,
फक्त २२ प्रतिज्ञा पाळा म्हणाला
त्या शिवाय तुम्ही सुधारणार नाही...
त्या एका मागणीची पुर्तता
तुम्ही करु नाही शकला,
पहिल्या पासून शेवट पर्यंत
प्रत्येक प्रतिज्ञा चुकला...
दगडधोंड्याचा देव डोक्यावर
घेउन मिरवतोस आज,
मागचा इतिहास आठव जरा
तुला कशी काय वाटत नाही रे लाज...
जिवघेण्या गुलामीतुन तुला
कोणी बाहेर काढले,
तुझा देव बसला बघत
बाबासाहेब मात्र धावले...
त्यानी केलेल्या या उपकारांची
ही अशी परतफेड करतोयस,
२२ प्रतिज्ञा लाथाडून आज
आरती करायला, दहीहंडी लावायला धावतोयस...
विसरलास तू त्या बापाला
ज्याने तुझे दुःख जाणले,
रक्ताचे पाणी करुन
ज्याने तुला माणसात आणले...
केलीस ना गद्दारी बापाशी
आता परत आमच्यात येऊ नको,
कोणाचा उधो उधो करायचाय
तो कर
पण इथून पुढे
जय भिम मात्र करु नकोस
No comments:
Post a Comment