Buy books of DR BR Ambedkar, Buddhism, Dalit, Adiwasi & Bahujan Topics

Powered by Blomming for nikhilsablania

Saturday, November 26, 2016

नोटबंदीवर मनमोहन सिंग यांचं म्हणणं काय आहे हे

नोटबंदीवर मनमोहन सिंग यांचं म्हणणं काय आहे हे जाणून घ्यायची सगळ्यांनाच उत्सुकता होती. ४ दिवसांपूर्वी आरबीआयचे माजी डेप्युटी गव्हर्नर डॉ. के सी चक्रवर्ती यांनी युपीए २ च्या काळातसुद्धा नोटबंदीचा निर्णय घ्यावा म्हणून अनौपचारिक प्रस्ताव आला होता असं 'द हिंदू'च्या मुलाखतीत  सांगितलं. त्यानंतर तर मनमोहन सिंग यांना अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी मुलाखतीसाठी विनंती केली होती. पण, अत्यंत विनम्रपणे सिंग यांनी ती नाकारली होती.

अधिवेशन सुरु असताना कोणत्या व्यासपीठाचा उपयोग आपलं म्हणणं मांडण्यासाठी करायचा याचं लोकतांत्रिक भान त्यांना होतं !

आज अखेर ते बोलले. पूर्वी बोलायचे तसेच. मुद्दा न सोडता. आवाज न वाढवता. ( किंवा कंठ दाटून आलाय वगैरे न दाखवता !)

देशात या निर्णयानंतरच्या आजच्या सोळाव्या दिवशीही जनजीवन पूर्वपदावर आलेले नाही. ग्रामीण काय शहरी भागातले लोकही त्रस्त आहेत. लोक शांत आहेत म्हणजे त्यांनी पाठींबा दिलाय असा सोयीस्कर आणि प्रचारी अर्थ सरकारने काढलाय. लोकांचे प्रश्न ऐकू येऊ नयेत म्हणून सगळ्या माध्यमांतून आपल्या राखीव फौजेच्या जीवावर वातावरण विखारी बनवले जात आहे. या सगळ्याचा सामाजिक पर्यावरणावर आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असतो हे समजण्याचा अभ्यास डॉ मनमोहन सिंग यांच्याकडे आहे.

पण, इतर जवळपास सगळेच वक्ते आणि राजकीय पक्ष हे बोलत असताना मनमोहन सिंग मुद्दा सोडून इकडे तिकडे सरकले नाहीत. संयत ! भूतकाळात प्रत्येक स्फोटक आणि नाजूक परिस्थितीत समोरच्या बाकांवरून काय आक्रस्ताळी विधाने केली गेली होती ते त्यांनाही आठवत नसेल असे नाही. पण डॉक्टरसाब मागच्या विरोधकांसारखे टीका करताना मतलबी झाले नाहीत !!

ते देशाच्या जीडीपीबद्दल बोलले. शेतकरी, असंघटित क्षेत्र हे भरडून जात आहेत त्याबद्दल बोलले. नियोजन शून्यता आहे हे स्पष्ट शब्दांत त्यांनी सुनावले. संघटित लूट चालली आहे असा गंभीर आरोप केला. बँका पैसे कसे नाकारू शकतात असा संवैधानिक प्रश्न त्यांनी विचारला. आरबीआय, अर्थ मंत्रालय आणि पीएमओ या तिन्ही संस्थाच्या ( ज्या तिन्हींशी भूतकाळात थेट संबंध आलेली एकमेव व्यक्ती ते आहेत !!)  प्रतिष्ठेबद्दल त्यांनी आवाज उठवला. आणि "भविष्यासाठी हा निर्णय आहे" असा जो एकमेव पोकळ दावा उरला होता त्याचाही समाचार केवळ एका 'कोट'मध्ये घेतला.

हे करताना कुठे अभिनिवेश होता ?
हे करताना त्यांनी नाहक टोमणे मारलेले ऐकलेत ?
राजकीय कुरघोडी करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न कुठे दिसला ?

सभ्यता, ऋजुता हि व्यक्तीची अंगभूत वैशिष्ट्ये असतात.

इतिहास माझे मूल्यमापन करेल असं ते नेहमी म्हणतात. संधी असूनसुद्धा आणि सभोवतालचे सगळेच त्या संधीमध्ये बेभान होत असताना असंस्कृत आणि बेजबाबदार होणं कसोशीने टाळलेला, वैयक्तिक मूल्यांना कधीही निसटू न दिलेला नेता हि त्यांची ओळख वर्तमानातसुद्धा ठाशीव आहे !

बाकी अर्थतज्ज्ञ म्हणून तुम्ही अजोड आहातच हे तुम्हाला ऐकायला विरोधकसुद्धा सभागृहात हजर होते यावरूनच सिद्ध होतं !!!


I support one of the finest brain on the planet  economics professor Manmohan singh

paytm कंपनीचे सत्य

नोटबंदीनंतर जो तो paytm ने पैसे भरा, वर्तमानपत्रात मोठमोठ्या paytm च्या जाहिराती. पण paytm कंपनी कुणाची आहे ह्याचा भारतीयांनी कधी विचार केला आहे का?

वाचा मग समजेल paytm कंपनीचे सत्य काय आहे.

पेटीएम (paytm) ह्या कंपनीमध्ये चीनची जवळपास ४५% (२५% अलीबाबा ग्रुप + २०% दुसऱ्या कंपन्या).  म्हणजेच जवळजवळ ४५% फायदा चीनला मिळणार. मग तोच पैसे चीन आपल्याविरुद्ध लढण्यात म्हणजेच चीन आणि पाकिस्तान दोघे मिळून आपल्या जवानांवर गोळ्या झाडणार. ते हि आपल्याच पैश्यात.

दुसरे म्हणजे ह्या *पेटीएममुळे कोण, कुठे, कधी, काय कशी आणि किती खरेदी करतो हे चीनला समजणार* आणि ते त्या जास्तीत जास्त वस्तूंचे उत्पादन करणार आणि स्वस्तात आपल्याला विकणार. म्हणजेच आपल्या देशातले उद्योग पण बंद आणि पैसा चीनला. पटत नाही ना? पण ह्यावर्षी गणपती मूर्तीपण चीनमधून आल्या होत्या, दिवाळीला पणत्या, फटाके, होळीला रंग, पतंग  पण चीनमधून येतात. माहिती कमी तेव्हा हे आणि विस्तृत माहिती मिळाल्यावर काय? पूर्ण बाजारपेठ ताब्यात. मग बसा बोंबलत.

माहिती खरी का खोटी हि खाली दिलेल्या लिंकवर तपासून पहा.
https://en.wikipedia.org/wiki/Paytm


प्रत्येक भारतीयांनी हा संदेश जास्तीत जास्त भारतीयांना पाठवला पाहिजे.

धन्यवाद.

Friday, October 21, 2016

माझे बाबासाहेब बहुजनासाठी लढले

 माझे बाबासाहेब बहुजनासाठी लढले
---------------------------------------   संकल्प भिमटायगर रत्नदिप
   कोणी ताज साठी लढले
   कोणी राज साठी लढले
    स्वभिमान आहे मला
    माझे बाबासाहेब या
     बहुजनासाठी लढले

जे होते जवळ ते भिमाने पेरले
       नेत्याने ते फक्त
    आपलेच घर भरले
      वाघ असुन स्वता
       घरा मध्ये दडले
   स्वभिमान आहे मला
    माझे बाबा साहेब
  बहुजनासाठी लढले

जे पाईक होते भिमाचे टी.व्ही
        बीवी आन
     खोलीसाठी लढले
    सुंदर ही बाग भिमाची
  तिचे पानोना पान झडले
    स्वभिमान आहे मला
     माझे बाबासाहेब
   बहुजनासाठी लढले

निवडणुकिच्या रिगनात
 जरी बाबासाहेब पडले
  घटना लिहुनी भीमाने
    सारे रेकार्ड तोडले
   स्वभिमान आहे मला
    माझे बाबासाहेब या
    बहुजनांसाठी लढले

     लिंगच्या युध्दात
   कित्येक ध्येय पडले
 आई बहीनीना आमच्या
    कित्येकांनी छळले
हक्क आणि शांतसाठी
फक्त बाबासाहेब लढले
 स्वभिमान आहे मला
  माझे बाबासाहेब या
  बहुजनांसाठी लढले

  विश्वामध्ये झाले आहे
    एकचं गोष्ट सिध्द
आचार विचार ऋनितीने
बुध्दांचा धम्म आहे शुध्द
पाहीजे फक्त भगवान बुध्द
  स्वभिमान आहे मला
    माझे बाबासाहेब
   बहुजनांसाठी लढले

     !!  जय भिम  !!

करोडपती असलेले *महात्मा फुले*

 🌋
*कृपया वेळ काढून अवश्य वाचा*

संदर्भ- *""किशन सूर्यवंशी""*
 यांच्या *महात्मा फुले* यांचे खरे वारसदार कोण?
या पुस्तकातून

1 - करोडपती असलेले *महात्मा फुले*
हे 1890 साली मरण पावतात ;
तेव्हा त्यांचे पार्थिव स्मशानभूमीत घेऊन जातात पण त्यांच्या चितेला अग्नी कोणीच देत नाहीत; याचे कारण म्हणजे या *महात्मा फुले* यांना जो मुलगा असतो तो दत्तक घेतलेला असतो त्या मुळे समाजातील काही कर्मठ लोक अग्नी देवू देत नव्हते;

यशवंत मुलगा अग्नी देण्यास पुढे जायचा पण पुरोहित व जातभाई लोक यशवंताला मागे ढकलून देत ;
हा खेळ बराच वेळा चालला;
*महात्मा फुले* यांचा पार्थिव पडून आहे ;
तर त्याला शेवटच्या क्षणी देखील धर्मग्रंथ आडवा आला शेवटी *सावित्रीबाई फुले* पुढाकार घेऊन प्रेताला अग्नी दिला

विचार करा जीवंतपणी फुल्यांच्या शरीराची विटंबना अपमान बामनांनी केला पण मेल्यावरही जातीतील लोकं देखील ब्राह्मणी विचाटधारेच्या प्रभावाने विटंबना करतात. यावर *फुले* अनुयायी विचार करतील काय?

2 - दुसरी एक घटना अशी की *महात्मा फुले* यांची सून म्हनजे यशवंताची पत्नी पुण्यात राहत होती ;
अतिशय गरीब अवस्थेत खायला अन्न नाही राहायला घर नाही ;
अशाच वेळेस एक दिवस असा आला घरातील सर्व अन्न संपले घरात कपाळावर लावायला एक रुपया नाही;

अशा वेळी त्या माऊलीने आपले घर शंभर रुपयात विकून टाकले व फुले यांनी लिहिलेले पुस्तके रद्दीत विकून दिवसाची गुजराण केली व दुसऱ्या दिवशी सकाळी मरण पावली;

तर मग तीचे प्रेत तसेच पडून आहे;
पण दफन करायला पुढे कोणीही आले नाही ;
दिवसभर ते प्रेत सडत आहे त्याचा वास येतोय; जातीचे लोक कोणीच तिकडे गेले नाही;
शेवटी पुणे महानगर पालिका ने ते प्रेत बेवारस म्हनून जाहीर केले व अंत्यसंसकार केला

विचार करा त्या काळात या फुल्यांच्या वडीलांचे मासिक उत्पन्न बारा लाख रुपये होते;

तर रतन टाटा यांच्या उत्पन्न फक्त वीस हजार रुपये होते म्हणजे *फुलेनकडे दोनशे एकर शेती होती* व काही प्रमाणात फुलझाडे लावत; संदर्भ (हरी नरके लिखित पुस्तक )

विचार करा आम्ही शिकून साहेब बनावे यासाठी *फुलेनी*
जीवनाची माती केली पण त्यांचा शेवट हा पशु प्रमाणे व्हावा ही बहुजनांना साठी शरमेची गोष्ट आहे;
जगाच्या पाठीवर फुले हालहाल होवून मेले मग आम्ही घरात त्यांचा फोटोदेखील लावत नसू तर हा किती कृतघ्नपणा करत आहोत याचा विचार केला पाहिजे;

एकदा *सावित्रीबाई फुले* आपल्या पतीला म्हणाल्या की आपण मेल्यावरही बहुजन समाजाचे कसे होईल? ही चळवळ पुढे कोण चालवणार? तेव्हा *फुले* उत्तर देताना
सांगितले की "" माझ्या शरीरात असलेल्या प्रत्येक *रक्ताच्या थेंबातून बहुजनाच्या घरात *महात्मा फुले* *जन्म घेतील* ""

विचार करा *फुलेनी* बहुजनावर किती विश्वास ठेवला
मग सांगा आतापर्यंत किती फुले जन्मले? एकही नाही

मग *महात्मा फुले* चुकीचे बोलले की त्यांचे अनुयायी चुकीचे वागले याचा आम्ही विचार केला पाहिजे

जर उदयोगपती असलेले हे *फुले*
यांनी  समाजाचा विचार केला नसता तर त्यांचे वारस जीवंत राहिले असते व आजचे रतन टाटा ;बिर्ला; अंबानी; सचिन तेंडुलकर व अमिताभ बच्चन या साऱ्या श्रीमंत लोकांना *महात्मा फुले* यांच्या वारसदाराने विकत घेऊन घरी पाणी भरायला लावले असते एवढे गर्भश्रीमंत राहीले असते
पण *फुलेंनी* समाज हितासाठी स्व वडीलोपार्जित सम्पत्तिचा त्याग केला आज आम्ही त्यांचे अनुयायी त्यांचा विचार देखील जोपासत नाही........

आणि यावर विचार ही करू नये

 🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
🏵येड्या गबाळ्याने वाचू नये🏵
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵

आणि यावर विचार ही करू नये

👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻
आपल्या देशातील लबाड माणसांचे प्रमाण अधिक आहे.. .


👶🏻ज्यांनी उत्तम *शेती* सांगितली त्यांनी कधीही शेती केली नाही.

👶🏻ज्यांनी *गाय* पवित्र आहे सांगितले त्यांनी कधीही गाय सांभाळली नाही की तीचे *शेण* काढले नाही.

👶🏻 ज्यांनी  *सत्यनारायण* सांगितला त्यांनी कधीही सत्यनारायण घातला नाही.

👶🏻ज्यांनी *अन्नदान* महादान सांगितले त्यांनी कधीही पुढ्यातला घास दुसर्‍याला भरवला नाही.

👶🏻ज्यांनी *शांती* सांगितली
त्यांनी कधीही शांती केली नाही.

👶🏻ज्यांनी *चारोधाम* सांगितले
त्यांनी कधीही चारोधाम केले नाहीत.

👶🏻ज्यांनी *फुले-सावित्रीमाई, डॉ. बाबासाहेब* यांच्या *महिला* शिक्षणाला विरोध केला
त्यांच्याच महिला सर्वात जास्त शिकल्या आहेत.

👶🏻ज्यांनी पोथ्यांमध्ये
*सिमोल्लंगन, परदेशगमनाला जाणे धर्मद्रोह किंवा पाप* आहे असे सांगितले आणि विरोध केला तेच सर्वात जास्त *एन आर आय* आहेत.

👶🏻 ज्यांनी सदा कनिष्ठ *नोकरी* म्हटले तेच सर्वात जास्त नोकरीत आहेत.

👶🏻 *मातृ-पितृ देवो भव* म्हणणाऱ्यांचेच *माता-पिता* अनाथ आश्रमात आहेत.

👶🏻 *एकादशी*ला अन्न खावू नका म्हणणारे चिवडा खावून टुम्म होतात.

👶🏻कधीही *मंदिर* न बांधणारे
कायम मंदिरात असतात आणि तिथे कायम *हक्क* गाजवित असतात.

👶🏻इतरांना *पारायण* सांगणारे
कधीही पारायण ऐकत नाहीत.

👶🏻 *परशुरामाला* माननारे
*श्रीरामाच्या* मंदिराचा वाद घालतात.

👶🏻शिवरायांची जन्मतारीख उपलब्ध असताना मुद्दामहुन शिवजयंतीचा तिथी आणि तारीख असा वाद पेटवितात व पावलोपावली शिवरायांचा अवमान करतात.

पण स्वतः मात्र आपल्या बापजाद्यांचे जन्मदिवस तारखेप्रमाणेच करतात.

👶🏻वारकऱ्यांना *दिंडीत* पायी पाठवणारे स्वतः *कार*ने प्रवास करतात.

👶🏻 *छत्रपतींना* राजा होण्यास विरोध करणारे यवनांचे पाय चाटतात.

👶🏻हिंदु राजा होण्यास *विरोध* करणारेच हिंदू राष्ट्राची मागणी करतात.

👶🏻धर्मांद पोपनी सॉक्रेटीस, कोपरनिकपस, गॅलीलिओ, येशू या विवेकवादी (विज्ञानवादी) महापुरुषांना सुळावर चढविल्याचे चूक आहे हे हळ-हळ व्यक्त करीत सांगतात.

स्वतः मात्र इथल्या विवेकवादचा चार्वाक, तुकोबा, रविदास, बसवेश्वर, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी करतात.

😳भारतातील लोक शिकले पण कधी बहुतांशी शहाणे झाले नाहीत
किंबहुना, शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांनीच शाळेत देवपूजा व तत्सम गोष्टींना प्राधान्य देऊन चेष्टा मांडली.

आपला धम्म हा चिखलात अडकलेला आहे

 🌹"मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे..........."🌹

🌹 "मनोगत"🌹

                  -------मित्रांनो मला आज आपल्याशी थोडं बोलायचं आहे. आपला धम्म हा चिखलात अडकलेला आहे,,,,असे मी समाजात वावरतांना भरपूर लोकांच्या तोंडातून ऐकले......
खुपदा लोकांशी संवाद साधल्यानंतर त्यांची प्रतिउत्तरे ऐकून मला थोडा धक्काचं बसला,,,,
"समाजातील लोकांची प्रच्च्युत्तरे पुढीलप्रमाणे आहेत.
1)आपला धम्म हा चिखलात अडकलेला आहे,,मग त्याला बाहेर काढून आपण स्वत:वर कशाला चिखल उडवायचा.....

2)आपल्या समाजातील व्यक्ति कधीचं सुधारणार नाही..........

3) धम्म काय आपल्याला दोन वेळचे जेवण आणून देतात का??????

4) मंगेश धम्माचा नाद सोडून दे,,,,तुला शेवट पर्यंत काहीचं मिळणार नाही.......

5) अरे आमच्या कुटूंबाला सोडून आम्ही जर धम्माचे कार्य केले
तर उद्या उघड्यावर आमचे कुटूंब येणार..........

6) धम्माचे कार्य फक्त बाबासाहेबचं करु शकतात. ते आपल्या सारख्या सामान्य व्यक्तीचे काम नाही.......

7) धम्माचे कार्य करतांना खूप पैसे लागतात,,,मग आम्हांला पैसे कोण देणार,,,,गावागावात जाऊन धम्माचे कार्य करण्याचा मुर्खपणा कोण करेल,,,

8) आम्ही बाबासाहेब नाही आणि आम्हांला बाबासाहेब सुद्धा बनायचे नाही........

9) पाटील देशमुख लोकांमध्ये आम्हांला किंमत आहे,,,,हे धम्माचे कार्य करुन आम्हांला आमची किंमत वाया घालवायची नाही........

10) या जगात धम्मापेक्षा  पैसा जास्त महत्वाचा आहे मंगेश,,,,,
"पैसा करे भल कैसा"

मित्रांनो गावागावात धम्माचा प्रचार आणि प्रसार करतांना समाजा सोबत धम्मा बद्दल चर्चा करतांना आपल्या बुद्धिजीवी समाजाने मला वरील उत्तरे दिली.
ही उत्तरे ऐकूण प्रत्येकाला आश्चर्यचं वाटेल. पण ही सर्व उत्तरे खरी असून माझ्या सोबत प्रत्यक्षात घडलेली आहे,,,
ही विचित्र उत्तरे ऐकून मला एका गोष्टीचा अनुभव आला की,,,,आपला समाज बाबासाहेबांवर आणि तथागतांवर केवळ भावनिक प्रेम करतोय,,,भावनेच्या आहारी जाऊन त्यांनी बाबासाहेबांना आणि तथागतांना सिमेंटच्या पुतळ्यांमध्ये कैद करून ठेवले.
आणि समाजाने त्यांचे एक ब्रीद वाक्य तयार केले की
"अन्याय,,अत्याचार व गुलामगिरीत जिवन जगणे हाच आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आम्ही मिळवणारचं"
अन्याय अत्याचारात जिवन जगण्याची जणूकाही त्यांना सवयचं जडलेली आहे.

🌹"बुद्ध धम्मावरील प्रबोधन"🌹

              ----------अखंड विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे महाकारुणीक बोधिसत्व सिद्धार्थ गौतम बुद्ध,,,,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,,महामानव,,युगपुरुष,,युगप्रवर्तक,,,विश्वरत्न बोधिसत्व परमपुज्य डाँ.बाबासाहेब उर्फ भिमराव रामजी आंबेडकर,,,,,थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले,,क्रांतीज्योती सावित्री बाई फुले,,माता रमाई,,धम्मप्रवर्तक सम्राट अशोक,,संत कबीर,,,आरक्षणाचे जनक छत्रपति शाहू महाराज ,,स्वराज्याचे जनक शिवाजी महाराज या महान विभूतींना सर्वप्रथम मी त्रिवार वंदन करतो आणि माझ्या भाषणास प्रारंभ करतो.

जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर जीवंत होते,,तोपर्यंत या समाजाला एक वैचारिक दिशा होती,,,,परंतू बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्या नंतर हा संपूर्ण समाज विविध गटातटामध्ये विभागला गेला...
समाजाच्या संकुचित विचारसरणीला गती मिळण्याची प्रक्रिया सुरु झाली....

लहानपणापासून जातीभेदाचे चटके अनुभवत असतांना बाबासाहेब आपल्या आईला विचारतात,,,आई हा संपूर्ण समाज माझे शोषण करते आहे,,माझा तिरस्कार आणि अपमान करत आहे,,,माणूसकी नावाची बाब नेस्तनाभूत झालेल्या लोकांसाठी मी जगायचे का???????
बाबांच्या मनाची तळमळ लक्षात घेऊन माता भिमाई बाबांना म्हणतात की,,"भिमा" नेमका तु कोणासाठी जगशीलं??????
"जन्मदात्या आईसाठी की पालनकर्त्या पित्यासाठी"
"ममतेचा हात फिरवणार्या बहिणीसाठी की नेहमी मानसिक आधार देणार्या भावासाठी"
"प्रेमाच्या वेलीसाठी की त्या वेलींमधून बहरलेल्या फुल्यांसाठी"
"नेमकं कुणासाठी??????
"अरे भिमा,,,हे संपूर्ण जग स्वार्थासाठी"
"आपण जगावं आपल्या माणसांसाठी"

मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण आयुष्य आपल्या माणसांसाठी जगले..........

या संपूर्ण समाजाला विशिष्ट दिशा देऊन त्यांच्या निरागस आयुष्याला सद् धम्माची जोड देऊन त्यांचे आयुष्य प्रकाशमय करण्याचे सार्थक कार्य बाबांनी केले....
या संपूर्ण समाजाला बुद्ध धम्माची दिक्षा देण्या अगोदर बाबांनी जगातील सर्व धर्मांचा सतत 21 वर्ष सखोल अभ्यास करुन शेवटी 14आँक्टोंबर 1956 ला नागपूर येथे बुद्ध धम्माचा परिपक्व विचारांनी स्वीकार केला....

परंतू बुद्ध धम्माचा स्वीकार करण्या अगोदर बाबांनी पहीला ग्रंथ वाचला,,,त्याचे नाव होते "बायबल"
बायबलामध्ये येशू ख्रीस्त सांगतात की मी कोण आहे??????

मी देवाचा पुत्र आहे,,,पहिला आणि शेवटचा,,,
येशूंचे स्वत: बद्दलचे उत्तर ऐकून बाबासाहेब विचार करतात की,,,येशु सुद्धा मला कुठे नेतोय????? परमेश्वराकडेचं नेतोय...

बाबासाहेब दुसरा ग्रंथ वाचतात,,त्याचे नाव होते "कुराण"

या कुराणाच्या आयातामध्ये हजरत अली मोहम्मद पैगंबर म्हणतात की,,मी कोण आहे????????

तर मी अल्लाचा प्रेषित आहे
पहिला आणि शेवटचा.....

बाबासाहेब तिसरा ग्रंथ वाचतात,,,त्याचे नाव होते "भगवदगीता"
या भगवदगीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की,,,मी कोण आहे??????
तर मी देवाचा देव आहे.......मी मोक्षदाता आहे,,,,

बाबासाहेब श्रीलंकेमध्ये असतांना तथागतांचे त्रीपठीके वाचतात,,,त्या त्रिपठीकांमध्ये तथागत स्वत:ची सुंदर अशी ओळख करुन देतात,,,,

"तथागत" म्हणतात की,,,मी कोण आहे?????
🌹"मी एका स्त्री आणि पुरुषांपासून जन्माला आलेलं एक बाळ आहे.......मी केवळ मार्गदाता आहे"🌹

मित्रांनो एक स्त्री आणि पुरुष ही दोघे जर का एकत्र आलीचं नाही,,,तर या संततीची निर्मिती होऊ शकते का?????????

नाही होऊ शकत..
हा सत्यावर आधारित असलेला परिसा समान सुंदर असा बुद्ध धम्म बाबांनी आम्ही दिला..
बुद्ध धम्म तर दिलाचं
पण त्याच बरोबर त्रिशरण आणि पंचशील सुद्धा दिले.
हे पंचशील असे आहे मित्रांनो,,,,जर भारताने बुद्ध धम्माचा नव्याने स्वीकार करुन आपल्या दररोजच्या नित्य दिनक्रमात पंचशील अनुकरणात आणले,,,,तर या देशातील संपूर्ण समस्या क्षणार्धात नाश पावेल........

येथील ब्राम्हणांनी,,हिंदूंनी,,कुणबी,,पाटील,,देशमुख,,मराठा,,माळी बुद्धिष्ट समुदायाने आपल्या घराच्या तथागतांची मुर्ति बसवून,,,दररोज त्या मुर्तीपुढे नतमस्तक होऊन पंचशील धारण करायला हवे...
"अन्ना हजारे" खूप दिवसांपासून ओरडून सांगत आहे की या देशातील भ्रष्टाचार मिटला पाहीजे,,,
पण देशातील भ्रष्टाचार कसा मिटला पाहीजे,,हे मात्र अन्ना हजारे सांगत नाही.....

परंतू तथागतांना पंचविशसे(2500) वर्षांपुर्वी सांगितले की भ्रष्टाचार कसा मिटवायला हवा ...........
त्यासाठी तथागतांनी एक पंचशील दिले आहे,,,
"मुसावादा वेरमणी सिख्खा पदम समादी यामी"
"मी खोट बोलणार नाही,,अशी प्रतिज्ञा ग्रहण करतो....
तुम्ही खोटचं बोलू नका,,भ्रष्टाचार वाढणार नाही......

देशात दररोज स्त्रियांवर अन्याय अत्याचार वाढत आहे,,,
त्यांचे मानसिक व शारीरिक शोषण केले जातात,,
त्याच्यावर बलात्कार केले जातात...!
हे सर्व अनिष्ट आणि माणूसकीला काळीमा फासणारे प्रकार आपण एका दिवसात खांबवू शकतो..

"कामेसुमेच्चचारा वेरमणी सिख्खा पदम समादी यामी"
मी कामवासनेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो.

जर देशातील प्रत्येक मनुष्याने दररोज हे
पंचशील ग्रहण केले तर देशातील एकाही मुलीवर अन्याय अत्याचार आणि बलात्कार होणार नाही...
ऐवढे सामर्थ्य या पंचशीलांमध्ये आहे,,,पण हे तेव्हाच शक्य आहे,,जेव्हा संपूर्ण भारत या पंचशीलेचे वास्तविकरित्या अनुकरण करेल....

परंतू येथे बाबासाहेबांची फसगत झाली,,,संपूर्ण मानवी समाज बाबासाहेबांच्या विचारांना बेईमान झाला...कारण बाबासाहेबांना जो समाज अभिप्रेत होता,,,तो समाज म्हणजे काय?????
"what means by society?????

बाबासाहेबांना जो समाज अभिप्रेत होता तो समाज पुढीलप्रमाणे आहे.
"स" म्हणजे सदगुणी
"मा" म्हणजे माणूसकीला
"ज" म्हणजे जपणारा.........

असा असतो समाज.
हा समाज बाबासाहेबांना अभिप्रेत होता. पण असं म्हणतात की,,बुद्ध धम्म हा परिवर्तनशील धम्म आहे...
म्हणून समाजाच्या व्याख्ये मध्ये सुद्धा परिवर्तन झाले. आणि आताच्या आधुनिक काळात समाजाला परिपक्व सुट होणारी व्याख्या पुढीलप्रमाणे आहे.

"स" म्हणजे सडलेला
"मा" म्हणजे मागासलेला
"ज" म्हणजे जंग चढलेला

असा आहे आपला समाज.....

ज्या भारता बद्दल आम्हांला ऐवढा अभिमान वाटतो,,,,
तो भारत म्हणजे काय?????
"what means by india?????

भारताची खरी ओळख पुढीलप्रमाणे आहे.....
"भा" म्हणजे भाकरीसाठी
"र" म्हणजे रयत(शिवाजी महाराजांच्या काळात जनतेला रयत म्हणत असे आणि
"त" म्हणजे तरसणारा.....

मित्रांनो असा आहे आपला खरा भारत.
माझा भारत महान म्हणण्यापेक्षा
माझा भारत महाग म्हटलेले बरे........

मित्रांनो बाबासाहेब बोलायचे की,,,
"जन्माला येणं माझ्या हातात नव्हतं,,म्हणून मी जन्माला आलो" परंतु मरणं माझ्या हातात आह,,,कदापि मी हिंदू म्हणून मरणार नाही"
ही सिंहाची गर्जना फोडणारे परमपुज्य  डाँ.बाबासाहेब आंबेडकर होते. परंतू आपल्या लोकांवर हिंदू धर्माचा जबरदस्त पगडा आहे. ते आज हिंदू धर्मांचे सण साजरे करतात,,मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेला बळी पडतात.

हिंदू समाज सत्यनारायणाची पुजा करतात आणि आपला समाज त्यांच्यांच प्रमाणे परित्राणपाठ करतात.
"मित्रांनो तथागतांनी अख्ख्या आयुष्यात कधी परित्राणपाठ केले नाही,,पण आपला समाज मात्र परित्राणपाठ करायला सुरुवात केली.

हिंदू धर्मातील जनता हाताला भगवा किंवा लाल धागा हाताला बांधतात आणि बुद्धिष्ट समुदाय हाताला पंचशीलेचा पांधरा धागा बांधतात.
पंचशीलेचा धागा हाताला बांधतांना हा पण विचार करत नाही की,,पुढचा व्यक्ति खरच पंचशीलानुसार आचरण करतो की पंचशीलाच्या विरुद्ध करतो,,याचा मात्र विसर पडतो...

म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझे भाग्य जर का आकाशातील ग्रह आणि तारे ठरवित असतील,,,तर माझ्या या बुद्धिचा आणि मनगटाचा काय फायदा?????
बाबांनी स्वतच्या बुद्धिचा आणि मनगटाचा वापर करुन जगात वैचारिक क्रांती घडवून आणली. परंतू आपला समाज मात्र त्याच अंधश्रद्धेच्या पगड्यामध्ये गुरफटतांना दिसतोय..

आपल्या प्रबळ शत्रू पेक्षाही
आपले तथ्यहीन विचार
आपल्यासाठी आणि समाजासाठी
अपायकारक व हानिकारक ठरतात.

आज हा धम्माचा गाढा पुढे नेण्यासाठी आम्हांला तो अगोदर पूर्णपणे समजावून घ्यावा लागेल..
कारण कुठल्याही गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी त्या सारखे सामर्थ्य या मनात निर्माण करावे लागतात...तेव्हा त्या गोष्टीची जाणीव या मनाला होणार........!

परंतू हे कार्य आम्हांला इतरांवर अवलंबून न राहता,,स्वतच पुढाकार घेऊन करावे लागणार,,कारण
"इतरांच्या सावलीत उभे राहून आपण आपल्या सावलीचे
स्वतंत्र अस्तित्व गमावतो
परंतु प्रत्येकाला आपल्या
सावलीचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी
एकदातरी त्या कडकडत्या सूर्याच्या प्रखर उष्णतेत
स्वतंत्र उभे रहावेच लागते.....

म्हणून आम्हांला आता नविन सुरुवात करावी लागेल,,,नवनविन माणसांना या कार्यात सहभागी करावे लागेल.....
"जे एका दिवसाचा विचार करतात
ते लोकांसोबत बोललात
जे एका वर्षाचा विचार करतात
ते रोपटं लावतात
जे दहा वर्षांचा विचार करतात
ती झाडी लावतात
जी संपूर्ण आयुष्याचा विचार करतात  ती माणसे जोडतात
आणि जी माणसे जोडतात
ती बहुतांश व्यक्ति आयुष्यात यशस्वी होतात......

आम्हांला खरा बुद्ध धम्म संपूर्ण भारतात रुजवायचा आहे..
"दिव्याला दिवा लावत गेला की
दिव्यांची एक दीपमाळ तयार होते
फुलाला फुल जोडत गेलं की
फुलांचा एक फुलहार तयार होतो
हाराला हार जोडत गेलं की
हारांची एक माळ तयार होते
आणि जर का
माणसाला माणूस जोडतं गेलं की
माणूसकीचं एक सुंदर नातं तयार होतं"

आमचा धम्म आम्हांला हाक मारत आहे,,तो आम्हांला म्हणत आहे की,,
"मी एका पडीत जमिनीप्रमाणे
तुम्हां सर्वांच्या सुखद आधाराची आतुरतेने वाट बघत आहे.
जर का माझ्यावर एकदा
तुम्हां सर्वांच्या आधाराचा सुखद पाऊस पडला तर,,, मी पुन्हा हिरवागार होणार आणि बहरायला सुरुवात करेल.
म्हणून तुमच्या आधाराच्या सुखद पावसाला माझ्या वर लवकरात लवकर सुखद वर्षाव करायला सांगा,,,कारण मला तुमच्याच केवळ तुमच्याच आधाराची गरज आहे....

धम्माशी एकनिष्ठ होऊन संपूर्ण भारत सत्य बुद्ध धम्माचे बुद्धमय करुया..
पण हे वाटते तेवढे सोपे काम नाही
धम्माचे कार्य करत असतांना आपणा सर्वांना भरपूर संकटांचा सामना करावा लागेल,,,,
परंतू पुढील प्रेरणादायी ओळी मी आपणा सर्वांसाठी लिहत आहे.

"आयुष्य हे नेहमीच सुखाने भरलेले नसतात
थोडे दु:खही असतात
पण आयुष्याच्या रात्रीनंतर
सकाळ मात्र सोनेरी किरणांनी सजून येते
जर आयुष्यात अशी कधी कठीन वेळ आलीच कि
जेव्हा आपलं म्हणून काळजी घेणारं कोणीचं नसेल
तेव्हा अगदी मनापासून हाक मारा
आपला बुद्ध धम्म आणि त्याची वैचारिक विचारधारा तिथेचं असेल"

आम्ही जर का धम्माच्या कार्याची सुरुवात केली,,तर आपण नक्कीच परिवर्तन घडवून आणनारचं,,,,कारण आपण या जगाचा इतिहास लिहिणार्या बाबांची मुलं आहोत,,

"सूर्याची गर्जना आमची
आम्ही वाघाची रं पिलं
चिरत नेऊ अंधार सारा
आम्ही क्रांतीसूर्याची लेकरं "

मित्रांनो मला आज आपल्याशी  थोडं बोलायचं होतं म्हणून या लेखाद्वारे मी स्वतचे विचार आपणा सर्वांपुढे मांडलेत.
मित्रांनो जर आपल्याला धम्माच्या कार्याची आवड असेल तर कृपया मला पुढील क्रमांकावर काँल करा.
कारण 2020 पर्यंत आपल्याला अर्ध्या पेक्षा जास्त महाराष्ट्र बौद्धमय करायचा आहे,,हे सकारात्मक उद्धिष्ट डोळ्यापुढे ठेऊनचं धम्माचे कार्य करण्याचा संकल्प केलेला आहे.
परिपक्व विचारांनी एकत्र येऊन बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करुया.......
वैचारिक क्रांतीच्या बुद्धिजीवी विचारांचा सर्वांना क्रांतिकारी जय भिम

🌹"मंगेश नाईक" 🌹
🌺"महाराष्ट्र राज्य प्रवक्ते"🌺
🌷"आक्रमण युवक संघटना"🌷

Tuesday, October 18, 2016

नाशिक मध्ये बौद्ध समाजावऱ झालेल्या सामूहिक हल्ल्यात पीड़ित असलेल्या बऱ्याच पीडित कुटुंब

 नाशिक मध्ये बौद्ध समाजावऱ झालेल्या सामूहिक हल्ल्यात पीड़ित असलेल्या बऱ्याच पीडित कुटुंब, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिस Atrocities victims शी आज adv गुणरतन सदावरते सर, डॉ. जयश्री पाटिल, सम्राट चे मुम्बई रिपोर्टर पाइकराव आणि मी सागर झेंडे यांनी भेट घेऊन सर्व झालेला अन्याय समजावून घेतला व सर्व सत्य परस्थिती समजावून घेतली आणि facts collect करण्यात आले. परिस्थिति भीषण आहे. पुढील case follow up साठी directions निश्चित झाले...

Brief points-

1) Atrocities च्या 500 (approx) च्या जवळपास cases होतील.

2) काहि बौद्ध तरुण अजुन ही missing आहेत..

3) 4 व्हीलर cars, 40-50 bikes, tractors, घरे असे प्रोपेर्टी damage करोडांच्या वर झालेले आहे..

4) पोलिसांची भूमिका ही तरुण बौद्ध तरुणांना खोट्या गुन्हयात  गोवण्याचे आहे.. शिक्षित तरुण यांच्यावर मोठ्या प्रमाणात cases दाखल केल्या आहेत..आई वडील न्यायासाठी वण वण करत आहे.. (सर्वांना सोडवण्याचा मार्ग उपलब्ध आहे, काम सुरु झाले आहे या दिशेने, काहि दिवस जातील..)

5) भीम नगर area त वस्तीत जाउन घरात घुसून बौद्ध महिलांना ही मार हांन झाली आहे.. मराठा समाजाने 4 दिवस अमानुष अत्याचार केला, रस्ते आडवले, जाळपोळ केली तरीही त्यांच्या गावात/ वस्तीत त्यांच्या महिलांना मारहाण पोलिस करत नाही..असे का घडते याचा विचार करायला हवा.. आणि अजुन किती पिढ़या आपन हेच सहन करनार आहोत? हे थांबू शकेल पण समूह तयार व्हायला हवा..परिस्थिति बदलू शकते..

6) हल्लेखोर हे सर्व एकजातिय मराठा जातीचे आहेत, व सर्व सूत्रधार हे Shivsena, Congress, NCP, BJP, MNS या पक्षाचे मराठा जातीचे नेते आहेत..(बौद्ध समाजाने पुन्हा या पक्षाना मत द्यावे का ? विचार करावा..जर हल्ले होउन ही यांन मत आपन दिले तर आपला अंत निश्चित आहे)

7) पवन पवार यांच्या सारख्या नगरसेवक असताना पोलिसांनी घरावर हल्ला करुण मार हान केलि आहे घरातील महिलांना ही..( यांनी 2 महीन्या पूर्वी BJP त प्रवेश करत पोट निवडणुकीत 2 नगरसेवक शिवसेने विरोधात निवडून आनले BJP नी बौद्ध पवार यांच्या militancy चा वापर केला आहे आणि आज पोलिसानी यांच्या कुटुंबावर हल्ला केलाय BJP कडे गृह मंत्रालय असून पवारानि ताकत वाढवूनBJP मदतीला येत नाहि..यातुन जातीयवादी पक्षातील बौद्ध लोकांनी गंभीर विचार करावा..) (अजुन बरेच काहि..)

8) नाशिक मधिल हल्ला हा बौद्ध अस्मितेवर हल्ला आहे..बुद्ध विहार, आपली श्रद्धा स्थाने यांच्या वर हल्ला आहे..याचे गांभीर्य ओळखून बौद्ध समाजाने आपली शक्ति unite consolidate करायला हवी.आपले सरक्षण आपन करायला सरसवाले पाहिजे.हया असल्या पोकळ आणि अत्याचारी दहशतीला जराही न घाबरता स्व सरक्षना साठी चळवळ करावी.. आणि सर्वांना दाखवून द्यावे की कोणी कितीही दडपन्याचा प्रयत्न केला तरीही बौद्ध समाज दबणार नाहीं तर अजुन ताकदीने संघटित होऊन बाबासाहेबांच्या vision मधील Constitutional and Democratic भारत निर्माण करेल.. अशी आशा नाशिक मधिल पीड़ित लोकांना भेटून वाटते, अजुन ही नाशिक मधिल बांधवांची आणि भगिनींची लढण्याची उमेद जशी च्या तशि आहे कोणत्याही  हल्ल्यामुळे  त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला नाहि..हे पाहून अजुन बळ प्राप्त झाले संघर्षांसाठी प्रेरणा मिळाली बळ मिळाले..

9) समूह म्हणजे शक्ति आहे ती लवकरात लवकर विधायकतेने निर्माण करण्यासाठी सर्व समाजाने यंत्रणा निर्माण करायला पुढे यावे.. नमो बुद्धाय,जय भीम!!!

सागर झेंडे ( Permanent Representative of United Nations

Thursday, January 28, 2016

संविधान लिहिल्या नंतर आंबेडकरांच्या डोळ्यात आले अश्रु

संविधान लिहिल्या नंतर आंबेडकरांच्या डोळ्यात आले अश्रु



संविधान  म्हणजे भारताचा आत्मा ;
 
1📘📖 - विश्वरत्न  डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान 395 कलमाचे का लिहले ??  ; 
394 किंवा 396 कलमाचे का लिहले नाहीत? तर त्याला कारण महात्मा फुले हे गुरू कारणीभूत आहेत ते कसे ?? तर  
2📘📖- महात्मा फुले यांनी  बहुजन समाजाला  शिक्षण  ज्या पुण्यातील भिडे वाडयातून दिले ; शाळा चालू केले ; त्या शाळेचा क्रमांक 395 होता ; त्याची व आपल्या गुरूविषयी कृतज्ञता म्हणून संविधान 395 कलमाचे लिहले   

3 📘📖- संविधानाच्या या मसूदा समितीवर  सात लोकांची निवड करण्यात आली होती 
त्यापैकी दोघांनी राजीनामा दिला ; एकाचा मृत्यू झाला; एक विदेशात गेला ; एकाची तब्येत ठीक नव्हती;  एक राजकारणात अडकला  

4📖- त्या मुळे मसुदा समिती अध्यक्ष या म्हणून  संविधान लिहण्याची सर्वस्वी जबाबदारी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर येवून पडलीय व ती त्यांनी समर्थपणे एकट्यानेच  पार पाडली म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे "संविधानाचे शिल्पकार" आहेत   

5📘-संविधानाची सुरूवात कशी करावी ? यावरून वाद चालू होता 
त्यात मौलाना हजरत मोहली म्हणून लागले की ;संविधान "अल्लाहच्या "नावाने सुरू करावे 
पंडीत मालवीय म्हणाले की; "ओम नम शिवाय" यां नावाने सुरू करा 
एच :पी :कामत म्हणाले की -"ईश्वर "नावाने सुरू करा 
 
मग शेवटी बाबासाहेब आंबेडकर म्हणाले " लोक" नावाने सुरू करा 
 मग
  यावर मतदान झाले  
मग बाबासाहेब आंबेडकर यांना 68 मते पडली 
तर देवाच्या नावाने 41 मते पडलीय 
संविधानाची सुरुवात  "आम्ही भारताचे लोक "
या नावाने झाली ; 

पहिल्याच मतदानात देव हरले व माणूस जिंकला 
 
6📘 - संविधानाचा कच्चा मसूदा बाबासाहेब आंबेडकर घरी लिहत बसले होते ; 
त्या वेळी  बॅ: पंजाबराव देशमुख हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी आले 
 
7📘- यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यां चे स्वागत केले ; 
तसेच संविधानाचा लिहत असलेला कच्चा मसूदा  बॅ: पंजाबराव देशमुख  यांना दाखवून  म्हणाले ; "की दादा यावर थोडी नजर मारा व काही सूचना असतील तर सूचवा " मी थोडयावेळात येतो" 
 असे म्हणून बाबासाहेब बाहेर गेले  

8📘- परत आले तर बॅ :देशमुख यांच्या डोळ्यात अश्रू पाहून बाबासाहेब  म्हणतात की दादा तुम्ही का रडताय ? 
 यावर देशमुख यांनी सांगितले की  बाबासाहेब  " माझ्या मराठा कुणबी(obc) समाजाच्या आरक्षणाची तरतूद करा " हे सांगण्यासाठी बाबासाहेब मी तुमच्याकडे  आलो होतो;  
पण तुम्ही किती महान आहात की मी येण्याच्या अगोदरच तुम्ही तो मसूदा तयार करून ठेवलाय ; यामुळे मला आनंदाश्रू आवरत नाहीत  

9📕- महात्मा फुले यांनी असे भाकित केले होते की ज्या वेळी बहुजन समाज मनुवादी धर्मग्रंथ वाचेल ;त्यादिवशी तो जाळल्याशिवाय राहणार नाही ; 
पहा बाबासाहेबानी मनुस्मृती नावाचा विकृत ग्रंथ जाहीरपणे जाळला व फुलेचा विश्वास खरा केला व फुले यांनी म्हटले होते की दुसरा राजग्रंथ निर्माण करेल ;
मग तो राजग्रंथ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान  लिहून पूर्ण केला   

10 📙- अमेरिकेतील कोलंबिया विदयापीठाने एक अहवाल तयार केला की त्या कालेजमधे शिकुन गेलेल्या 200 वर्षाच्या इतिहासात जगात सर्वात विदवान कोण ?  त्यांनी जाहीर केले होते की जगात  डाॅ :बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न ; विदवान आहेत ; father of modern India is Dr  ambedkar

11📕- कोलंबिया विद्यापीठाच्या मैदानात बाबासाहेब आंबेडकर यांचा ब्रांझ धातूचा पुतळा बनविला आहे व त्यात खाली लिहले होते की    "SYMBOL OF KNOWLEDGE "

12-📙 तेथील  कुलगूरूच्या कार्यालयात बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे 
व खाली लिहिले आहे की "आम्हाला गर्व आहे की आमच्या काॅलेजमधे शिकून गेलेला आमचा विद्यार्थी एका देशाचा संविधान शिल्पकार ठरला  " 

13-📙 नेल्सन  मंडेला म्हणतात की भारताकडून घेण्यासारखा एकच गोष्ट ती म्हणजे आंबेडकर यांनी लिहलेले संविधान   

14 📕- संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर  एका पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला की डाॅ बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला संविधान लिहताना काही अडचण येत होती का ? यावर बाबासाहेब आंबेडकर यांनी लगेच उत्तर दिले, की माझ्या  डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य उभे होते  
म्हणून मला अडचण आली नाही  "

15📙-बाबासाहेब म्हणाले की संविधान कितीही चांगलेच असू दया पण राबवणारे हात वाईट असेल तर ते संविधान  कुचकामी ठरते  ; म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांच्या हताश मनाचा मानबिंदू म्हणजे संविधान   

16📕- संविधान  लिहून झाल्यावर  बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोळ्यात अश्रू आले त्या वेळी तेथील पत्रकाराने विचारले की बाबासाहेब तुम्ही मनासारखे संविधान लिहून तुम्ही नाराज का आहात ? यावर बाबासाहेब आंबेडकर त्या पत्रकाराला उत्तर देताना सांगितले की ;" मी बहुजनाच्या  कल्याणाचा जाहीरनामा लागू करण्यासाठी ज्यांच्या हातात देत आहे ते लोक माझे बहुजन नाहीत " ;  
मला यांच्यावर विश्वास बसत नाही  की ते संविधान  जशाच्या तसे लागू करतील  

संविधान  निर्मितीची वरील घडामोडी व कर्मकहाणी सगळी कडे पोहचवा व संविधान विषयी कृतज्ञता बाळगा.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

नक्कि वाचा १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला.

नक्कि वाचा
१५ ऑगस्ट १९४७ रोजी
देश स्वतंत्र झाला.
२६ जानेवारी,१९५० रोजी
देशाचे बारसे करण्यात आले.
भारतीय संविधानाच्या माध्यमातून,
बुद्धांच्या देशाला
सम्राट अशोकाच्या देशाला
नव्या रुपात
घटनेचे शिल्पकार
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
जगासमोर मांडले.
भारताची जी ओळख
जगाला ठाऊक होती,
तीच ओळख
भारतीय संविधानाने
जगासमोर पुनर्स्थापित केली.
आपल्या देशाची संपूर्ण ओळख,
बुद्ध धम्माची ओळख झाली.
उदा...
*बुद्ध धम्माचे प्रतिक
आकाशी निळ्या रंगाला
राष्ट्रीय रंगाची मान्यता देण्यात आली,
*धम्माचे प्रतिक
कमळाचे फूल
आपले राष्ट्रीय फूल झाले,
*बोधीवृक्ष अर्थात पिंपळाच्या वृक्षाला
राष्ट्रीय वृक्षाची मान्यता मिळाली.
*बुद्धधम्माच्या धम्मचकाला
राष्ट्रीय चिन्ह घोषित करुन
राष्ट्रीय ध्वजावर अंकीत करण्यात
आले.
*सम्राट अशोकाची राजधानी सारनाथ
येथील चारसिंह ही राजमुद्रा,
भारताची राजमुद्रा घोषित झाली.
*समता, स्वातंत्र्य, न्याय व विश्व बंधुत्व हे
बुद्ध धम्माचे तत्त्व
भारतीय संविधानाचे तत्त्व
म्हणून स्विकारण्यात आले,
*`सत्यमेव जयते' हे
सम्राट अशोकाचे घोषवाक्य,
भारतीय शासनव्यवस्थेचे
ब्रीद वाक्य म्हणून मानांकीत झाले.
एवढेच नाही तर
आपल्या देशाची प्रत्येक ओळख ही
बौद्ध संस्कृतीशी संबंधित झाली.
*आपल्या राष्ट्रीय ध्वज तिरंग्यातील
सर्वात पहिला रंग ज्याला आपण
लाल, केशरी, भगवा, लाल, नारंगी म्हणतो.
त्या रंगाला
भारतीय घटनेचे एका विशेष नावाने
वर्णित केले आहे.
इंग्रजीत त्याला
`ओशर' असे नाव आहे.
ओशर म्हणजे-
लालसर पिवळ्या मातीचा रंग,जो
बौद्ध भिक्षुंच्या चिवराचा रंग असतो.
चिवर हे बौद्ध भिक्षुंचे वस्त्र आहे.
जे त्यागाचे प्रतिक आहे.
*दुसरा रंग पांढरा
ज्या रंगाला बुद्ध धम्मात विशेष महत्त्व
आहे.
पांढरा रंग हा शांती व सत्याचा प्रतिक
म्हणून बौद्ध उपासक शील ग्रहण करताना
पांढरे वस्त्र परिधान करतात.
*तिसरा रंग हिरवा जो
निसर्गावर, प्राणीमात्रावर प्रेम
करण्याचा बुद्ध धम्माचा
पंचशीलेची शिकवण देणारा रंग
*तिरंग्याच्या मधोमध
बुद्ध धम्मतेचे प्रतिक
निळे धम्मचक आहे.
जे
सार्या विश्वाला
बुद्ध धम्माची ओळख देते.
असा सर्वांगीण बुद्ध
धम्माची प्रचिती देणारा
आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा,
राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
देशाला बहाल केला.
भारताच्या सर्वोच्च नागरीक
पुरस्काराचे नावही
बुद्ध धम्माशी संबंधित आहे.
*`भारतरत्न'
रत्नही बुद्ध धर्माची पदवी.
बुद्ध, धम्म, संघ
म्हणजे बुद्ध धम्मातील त्रिरत्न.
बुद्ध धर्मात
सर्वश्रेष्ठ व्यक्तीला "रत्न "
ही पदवी बहाल केली जाते.
अनेक बौद्ध भिक्षूंच्या नावात
रत्न ह्या शब्दाचा उल्लेख असतो.
उद...भन्ते ज्योतीरत्न, भन्ते संघरत्न, भन्ते
शांतीरत्न वगैरे.
रत्न ह्या महान शब्दाचा
बाबासाहेबांवर खूप प्रभाव होता.
बाबासाहेबांनी आपल्या एक
लाडक्या मुलाचे नावदेखील रत्न
शब्दांशी संबंधित राजरत्न ठेवले होते.
त्या रत्न महान शब्दावरुनच
देशाच्या सर्वोच्च नागरीक पुरस्काराचे
नाव भारतरत्न ठेवण्यात आले आहे.
त्या पुरस्काराचे
चिन्ह स्वरुप देखील
बुद्ध धम्माशी निगडीत आहे.
बोधीवृक्षाच्या पिंपळाचे सोनेरी पान,
ज्यावर
पुरस्कार स्विकारणाऱया व्यक्तीचे
सोनेरी अक्षरात नाव कोरले जाते
व दुसऱया बाजूला
चार सिंह ही राजमुद्रा
व धम्मचक असते.
*बुद्ध धम्माचे
मैत्री, प्रेम व करुणेचे प्रतिक असलेल्या
कमळाचे फुलाला
घटनाकारांनी राष्ट्रीय फुलाची
मान्यता दिली.
थायलंड, श्रीलंका, बर्मा इ.
बौद्धराष्ट्रात भगवान बुद्धांच्या चरणी
कमळाचे फूल अर्पण करतात.
कमळाच्या फुलाला
पाली भाषेत `पदम' असे म्हणतात.
*भारतरत्न पुरस्काराच्या
खालोखाल तीन प्रमुख पुरस्कार आहेत,त्या
पुरस्कारांची नावे
पद्म म्हणजे कमळाचे चिन्ह असते,
कमळाच्या एका बाजूस
पद्म व दुसऱया बाजूस
विभूषण, भूषण किंवा श्री
लिहिले असते.
*युद्ध शौर्यातील
तीन प्रमुख पुरस्कार
परमवीर चक व वीरचक
या पुरस्कारांवर देखील
कमळाचे फूल प्रामुख्याने असते.
*युद्ध शौर्यातील
प्रमुख पुरस्काराचे नाव
अशोक चक्र आहे.
*भारताच्या राष्ट्रपती भवनातील
प्रमुख दिवाणखान्याचे नाव
अशोक हॉल आहे.
*आपल्या केंद्रियमंत्री मंडळाच्या
निवासस्थान परीसराचे नाव देखील
बुद्ध संस्कृतीवर ठेवले आहे.
सम्राट अशोकाच्या
मंत्री मंडळाच्या नगरीचे नाव
जनपथ होते.
तेच जनपथ नाव आपल्या
केंद्रिय मंत्री निवास स्थानाचे आहे.
उदा... ७ जनपथ,१० जनपथ,११ जनपथ.
अशी
भारताची ओळख असणाऱया
प्रत्येक गोष्टीचा
बुद्ध धम्माशी संबंध आहे.
बुद्ध संस्कृतीशी नातं आहे.
घटना समितीच्या सदस्यांपैकी
प्रत्येकाने ती मान्य केली.
कारण ते सत्य आहे आणि
जे सत्य असते ते
कधीच अमान्य होऊ शकत नाही.
अशाप्रकारे बाबासाहेबांनी
सर्व भारत बौद्धमय केला.
हा
बुद्ध धम्माचा विजय.
सम्राट अशोकाचा विजय.
बोधीसत्व भारतरत्न
डॉ. बाबासाहेबांचा विजय.
हाच
भारतीय सविधानचा विजय
With 
आकाश साखरे

26 जानेवारी 1950 पासुन भारतात संविधान लाजु करण्यात आले. संविधान लिहिले कुणी..?

[1/26, 10:09 PM] ‪+91 82377 71979‬: 26 जानेवारी 1950 पासुन भारतात संविधान लाजु करण्यात आले.
संविधान लिहिले कुणी..?? भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
यांनी 2 वर्षे 11 महीने 18 दिवस सतत सखोल अभ्यास करुन
भारतीय संविधानाची निर्मिती केली. संविधान लिहितांना
डाॅ. बाबासाहेबांना आपल्या स्वतःच्या तब्बेतीची काळजी
घेतली नाही. आणि त्यामुळे त्यांचे आयुष्य कमी होऊन 6 डिसेंबर
1956 ला त्यांचे महापरिनिर्वाण झाले. तरीही देखिल 26
जानेवारी च्या दिवशी काही शिक्षक विद्यार्थ्यांना खरी
माहिती देत नाही. किंवा डाॅ. बाबासाहेब आंबेडकराचा
जयघोष करायला सांगत नाही हे मोठे दुर्देव आहे.
26 जानेवारी 1950 पासुन भारत देश प्रजासत्ताक झाला.
म्हणजेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील प्रत्येकाला
एक मत देण्याचा अधिकार देवून त्या मताच्या आधारेच प्रजेची
सत्ता निर्माण केली. स्वातंञ्यापूर्वी भारतात राजा हा
राणीच्या पोटातुन जन्म घेत असे. परंतु प्रजासत्ताक दिनापासुन
राजा हा मताच्या पेटीतुन निघतो. एवढ्या मोठ्या
परिवर्तनाच्या जनकाचे आपण 26 जानेवारी च्या दिवशी
जयघोष करीत नाही. हे खेदजनक आहे.
परिवर्तवादी जबाबदार शिक्षकाने, अधिका-याने प्रत्येक 26
जानेवारीला राष्ट्रध्वजाखाली डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची
प्रतिमा ठेवुनच ध्वजारोहण करावे. हि विनंती.
सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....जय भिम
[1/26, 10:09 PM] ‪+91 82377 71979‬: ताश के पत्तो से महल नही बन सकता,
नदी को रोकने से समंदर नही बन सकता,
दुनिया मेँ अभी भी बहुत कलम चलाने वाले है,
लेकीन कोई कलम चलाने वाला संविधान नही लिख सकता,
हो गया एक ही शेर,
अभी कोई भी,
डॉ.भीमराव आंबेडकर नही बन सकता...
..........................................
भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्त संविधान निर्माते,
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी
प्रणाम...!!!

जर रस्त्यावरील दुकानात शिवाजी आणि बाबासाहेबांचा फोटो असता तर मी त्यातून बाबासाहेबांचा फोटो उचलला असता.आपणही माझ्या मताशी सहमत असावे अशी माझी जबरदस्ती नाही

🙏जय भिम🙏

 जर रस्त्यावरील दुकानात शिवाजी आणि बाबासाहेबांचा फोटो असता तर मी त्यातून बाबासाहेबांचा फोटो उचलला असता.आपणही माझ्या मताशी सहमत असावे अशी माझी जबरदस्ती नाही.

🙏जय भिम🙏

मी शिवाजी पेक्षा बाबासाहेबांचाच फोटो उचलला असता आणि उचलनारच.100%

का ? की शिवाजीबद्दल मला आदर नाही. आहे तर तो कितपत असावा ? का तो आदर बाबासाहेबांपेक्षा जास्त असावा का ? आणि असावा तर तो का असावा?
असल्या प्रश्नाना माझे उत्तर असे आहे की, शिवाजीना मी सम्राट अशोक पेक्षा महान समजत नाही.माझ्यासाठी शिवाजी फक्त एक उत्तम राजे होते. एक राजे म्हणून त्यांची जनतेबद्दलची जागृकता नक्कीच चांगली होती.पण या जागृतीचा फायदा कुनाला झाला.?  महारांची स्थिती तर शिवाजीच्या काळात तशीच होती.ब्राम्हणाचे वर्चस्वही तेच होते.?

प्रश्न हा आहे की, आमचे दैवत कोन ? कुनी आमच्या दु:खाला वाचा फोडली.?  कोण आमच्या दु:खासाठी लढले ? कुनी आमची हजारो वर्षाची गुलामी नष्ट केली ? तेली ,कुनबी, माळ्याना कुनी हक्क अधिकार आणि हक्क प्राप्त करुन दिले ? कोन होते ते ज्यानी आमच्या दु:खासाठी स्वत:च्या पत्नीचा आणि मुलाचाही बळी दिला ? कोन होते ते ज्यांच्या  नजरेसमोर क्षण आणि क्षण आमचे भुकेले चेहरे ,उघडे अंग ,भिकारी अवस्था रात्रंदिवस रेंगाळत होते.

काय ते शिवाजी होते ? 

नाही ते बाबासाहेब होते.शिवाजीच्या कोणत्याच लढ्याने आमचे दु:ख दुर झाले नाही.उलट शिवाजीच्या राज्यात महारांची स्थिती भिकारीच होती. 
ज्या बाबासाहेबानीच शिवाजीला नाकारले तिथे तुम्ही आम्ही कोन चिल्लर लागलोत शिवाजीला स्विकारायला. शिवाजी एक उत्तम राजे होते याव्यतिरिक्त आम्ही त्यांच्याकडून काय घ्यायचे. ते लढले मुस्लीमांविरुद्ध.त्यात ते जिंकलेही.पण ब्राम्हणाला तर ते अधिनच गेले. ब्राम्हणांच्या पायाच्या अंगठ्याने स्वत:चा राज्यभिषेक करुन घेणे याला काय आम्ही संबोधावे.असो त्या विषयी मला बोलायचे नाही.कारण त्यांची तितकी समिक्षा करने हेही माझी लायकी नाही.

असे असले तरी माझे आदर्श बाबासाहेब आहेत.कारण मी आणि माझा समाज आज त्यांच्यामुळे आहोत.बाबासाहेब नसते तर आमच्या अंगावर आज कुत्रही मुतलं नसतं.हे मी डंकेच्या चोट वर म्हणू शकतो.

तुम्हाला वाटते तर तुम्ही खुशाल बाळगा आदर्श हवे त्यांचे.अभिव्यक्ती आहे तुम्हास.पण माझ्या अभिव्यक्तीवर तुम्हाला चारान्याचाही प्रश्न उभा करन्याचा अधिकार नाही हे तुम्ही नक्कीच ध्यानात घ्यावे.

शेवटी हेच बाबासाहेबानी कधीच त्यांच्या लढ्यात, कार्यात, राजकारणात शिवाजींचा उदो केला नाही.बाबासाहेबांचे आदर्श तत्वझान फक्त बुद्ध होते याशिवाय काहीच नाही.

तरुणपणी बाबासाहेबांनी त्यांच्या समोरच्या रुम मध्ये शिवाजींचा फोटो लावला होता.अधिक अभ्यासानंतर तो त्यानी उतरुन खाली ठेवला. काय कारण असावे याला ? कारण बाबासाहेबाना कळले होते अस्पृष्यांच्या कल्यानासाठी लढन्याचा शिवाजींचा कोनताच इतिहास नाही. अस्पृष्याना हिनतेचे जीवन देनारया ब्राम्हणांच्या विरोधात शिवाजीने काहीच केले नव्हते.
स्वता बाबासाहेब म्हणतात," शिव छत्रपतीला ब्राम्हण्य नष्ट करता आले नाही.आपल्या राज्यभिषकासाठी सोने देउन काशीहून गागाभट्टाला आनावे लागले.ब्राम्हणांची नांगी शिवाजीला तोडता आली नाही. त्यामुळे ब्राम्हण्य नष्ट केल्याशिवाय समाजाची उन्नती नाही.

मला शिवाजीप्रिय आहे पण त्यापेक्षाही एक राजे  म्हणून सम्राट अशोक प्रिय आहे. 
बाकी आता आपली व्यभिव्यक्ती....
🔵एक कट्टर भिम योद्धा🔵

🙏जय भिम🙏

"मी संपूर्ण भारत बुध्दमय करीन"-: डाँ.बाबासाहेब आंबेडकर

🔹"मी संपूर्ण भारत बुध्दमय करीन"-: डाँ.बाबासाहेब आंबेडकर,

     -:१५ ऑगस्ट १९४७ रोजी
देश स्वतंत्र झाला.
२६ जानेवारी,१९५० रोजी
देशाचे बारसे करण्यात आले.

भारतीय संविधानाच्या माध्यमातून,
बुद्धांच्या देशाला
सम्राट अशोकाच्या देशाला
नव्या रुपात
घटनेचे शिल्पकार
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
जगासमोर मांडले.

भारताची जी ओळख
जगाला ठाऊक होती,
तीच ओळख
भारतीय संविधानाने
जगासमोर पुनर्स्थापित केली.

आपल्या देशाची संपूर्ण ओळख,
बुद्ध धम्माची ओळख झाली.
उदा...

🔵*बुद्ध धम्माचे प्रतिक
आकाशी निळ्या रंगाला
राष्ट्रीय रंगाची मान्यता देण्यात आली,

🌷*धम्माचे प्रतिक
कमळाचे फूल
आपले राष्ट्रीय फूल झाले,

🌳*बोधीवृक्ष अर्थात पिंपळाच्या वृक्षाला
राष्ट्रीय वृक्षाची मान्यता मिळाली.
*बुद्धधम्माच्या धम्मचकाला
राष्ट्रीय चिन्ह घोषित करुन
राष्ट्रीय ध्वजावर अंकीत करण्यात
आले.

*सम्राट अशोकाची राजधानी सारनाथ
येथील चारसिंह ही राजमुद्रा,
भारताची राजमुद्रा घोषित झाली.

*समता, स्वातंत्र्य, न्याय व विश्व बंधुत्व हे बुद्ध धम्माचे तत्त्व
भारतीय संविधानाचे तत्त्व
म्हणून स्विकारण्यात आले,

*`सत्यमेव जयते'हे
सम्राट अशोकाचे घोषवाक्य,
भारतीय शासनव्यवस्थेचे
ब्रीद वाक्य म्हणून मानांकीत झाले.

एवढेच नाही तर
आपल्या देशाची प्रत्येक ओळख ही
बौद्ध संस्कृतीशी संबंधित झाली.

*आपल्या राष्ट्रीय ध्वज तिरंग्यातील
सर्वात पहिला रंग ज्याला आपण
लाल, केशरी, भगवा, लाल, नारंगी म्हणतो.
त्या रंगाला
भारतीय घटनेचे एका विशेष नावाने
वर्णित केले आहे.
इंग्रजीत त्याला
`ओशर'असे नाव आहे.
ओशर म्हणजे-
लालसर पिवळ्या मातीचा रंग,जो
बौद्ध भिक्षुंच्या चिवराचा रंग असतो.
चिवर हे बौद्ध भिक्षुंचे वस्त्र आहे.
जे त्यागाचे प्रतिक आहे.

*दुसरा रंग पांढरा
ज्या रंगाला बुद्ध धम्मात विशेष महत्त्व आहे.
पांढरा रंग हा शांती व सत्याचा प्रतिक म्हणून बौद्ध उपासक शील ग्रहण करताना पांढरे वस्त्र परिधान करतात.

*तिसरा रंग हिरवा जो
निसर्गावर, प्राणीमात्रावर प्रेम करण्याचा बुद्ध धम्माचा
पंचशीलेची शिकवण देणारा रंग

*तिरंग्याच्या मधोमध
बुद्ध धम्मतेचे प्रतिक
निळे धम्मचक आहे.
जे
सार्‍या विश्वाला
बुद्ध धम्माची ओळख देते.

असा सर्वांगीण बुद्ध
धम्माची प्रचिती देणारा
आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा,
राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
देशाला बहाल केला.

भारताच्या सर्वोच्च नागरीक पुरस्काराचे नावही
बुद्ध धम्माशी संबंधित आहे.

*`भारतरत्न'
रत्नही बुद्ध धर्माची पदवी.
बुद्ध, धम्म, संघ
म्हणजे बुद्ध धम्मातील त्रिरत्न.
बुद्ध धर्मात
सर्वश्रेष्ठ व्यक्तीला"रत्न"
ही पदवी बहाल केली जाते.
अनेक बौद्ध भिक्षूंच्या नावात
रत्न ह्या शब्दाचा उल्लेख असतो.
उद...भन्ते ज्योतीरत्न, भन्ते संघरत्न, भन्ते शांतीरत्न वगैरे.
रत्न ह्या महान शब्दाचा
बाबासाहेबांवर खूप प्रभाव होता.
बाबासाहेबांनी आपल्या एक
लाडक्या मुलाचे नावदेखील रत्न
शब्दांशी संबंधित राजरत्न ठेवले होते.
त्या रत्न महान शब्दावरुनच
देशाच्या सर्वोच्च नागरीक पुरस्काराचे
नाव भारतरत्न ठेवण्यात आले आहे.
त्या पुरस्काराचे
चिन्ह स्वरुप देखील
बुद्ध धम्माशी निगडीत आहे.
बोधीवृक्षाच्या पिंपळाचे सोनेरी पान,
ज्यावर
पुरस्कार स्विकारणाऱया व्यक्तीचे सोनेरी अक्षरात नाव कोरले जाते
व दुसऱया बाजूला
चार सिंह ही राजमुद्रा
व धम्मचक असते.

*बुद्ध धम्माचे
मैत्री, प्रेम व करुणेचे प्रतिक असलेल्या कमळाचे फुलाला
घटनाकारांनी राष्ट्रीय फुलाची मान्यता दिली.
थायलंड, श्रीलंका, बर्मा इ.
बौद्धराष्ट्रात भगवान बुद्धांच्या चरणी
कमळाचे फूल अर्पण करतात.

कमळाच्या फुलाला
पाली भाषेत `पदम'असे म्हणतात.

*भारतरत्न पुरस्काराच्या
खालोखाल तीन प्रमुख पुरस्कार आहेत,त्या पुरस्कारांची नावे
पद्म म्हणजे कमळाचे चिन्ह असते,
कमळाच्या एका बाजूस
पद्म व दुसऱया बाजूस
विभूषण, भूषण किंवा श्री
लिहिले असते.

*युद्ध शौर्यातील
तीन प्रमुख पुरस्कार
परमवीर चक व वीरचक
या पुरस्कारांवर देखील
कमळाचे फूल प्रामुख्याने असते.

*युद्ध शौर्यातील
प्रमुख पुरस्काराचे नाव
अशोक चक्र आहे.

*भारताच्या राष्ट्रपती भवनातील
प्रमुख दिवाणखान्याचे नाव
अशोक हॉल आहे.

*आपल्या केंद्रियमंत्री मंडळाच्या
निवासस्थान परीसराचे नाव देखील
बुद्ध संस्कृतीवर ठेवले आहे.
सम्राट अशोकाच्या
मंत्री मंडळाच्या नगरीचे नाव
जनपथ होते.
तेच जनपथ नाव आपल्या
केंद्रिय मंत्री निवास स्थानाचे आहे.
उदा... ७ जनपथ,१० जनपथ,११ जनपथ.

अशी
भारताची ओळख असणाऱया
प्रत्येक गोष्टीचा
बुद्ध धम्माशी संबंध आहे.
बुद्ध संस्कृतीशी नातं आहे.
घटना समितीच्या सदस्यांपैकी
प्रत्येकाने ती मान्य केली.
कारण ते सत्य आहे आणि
जे सत्य असते ते
कधीच अमान्य होऊ शकत नाही.

अशाप्रकारे बाबासाहेबांनी
सर्व भारत बौद्धमय केला.
हा

बुद्ध धम्माचा विजय.
सम्राट अशोकाचा विजय.
बोधीसत्व भारतरत्न
डॉ. बाबासाहेबांचा विजय.
हाच
भारतीय संविधानाचा विजय.
💐🙏जय भीम.🙏💐
"आवडल्यास पुढे शेयर करा"

रोहित वेमुलाचं शेवटचं पत्र

रोहित वेमुलाचं शेवटचं पत्र
गुड मॉर्निंग,
तुम्ही जेव्हा हे पत्र वाचत असाल तेव्हा मी नसेल, माझ्यावर नाराज होऊ नका, कारण अनेकांना माझी परवा होती, तुम्ही माझ्यावर प्रेम करत होते, आणि माझी काळजीही घेत होते. माझी कुणाबद्दलही तक्रार नाही. मला नेहमीच माझ्याबद्दल अडचण होती. मी माझा आत्मा आणि शरीर यांच्यात निर्माण झालेली दरी वाढताना पाहतोय. मी एक राक्षस झालो आहे. मी एक लेखक होऊ इच्छीत होतो. विज्ञानावर लिहिणारा, कार्ल सगान सारखा. शेवटी अखेर मी एक पत्र लिहितोय.

माझं विज्ञानावर प्रेम होतं, ताऱ्यांवर, निसर्गावर, लोकांवरही मी प्रेम केलं, पण हे समजलं नाही, त्यांनी कधी निसर्गाला फारकत दिली. आपल्या भावना दुय्यम दर्जाच्या झाल्या आहेत. आपलं प्रेम नकली आहे, आपल्या मान्यता खोट्या आहे. आपली मूल्य वैध आहेत फक्त कृत्रिम कलेच्या माध्यमातून. हे फार कठीण झालं आहे, आपण प्रेम करावं आणि दु:खी होऊ नये.

एका व्यक्तीची किंमत त्याची तत्कालीन ओळख आणि जवळच्या शक्यतेवर मर्यादीत करण्यात आली आहे. एका मतापर्यंत. माणूस एक आकडा झाला आहे. फक्त एक वस्तू. कधीही माणसाला त्याच्या मेंदूनुसार मोजलं गेलं नाही. एक अशी वस्तू जी स्टारडस्टपासून तयार झाली होती. प्रत्येक क्षेत्रात, अभ्यासाने, गल्ल्यांमध्ये, राजकारणात, मरणात आणि जगण्यात.

मी पहिल्यांदा अशा प्रकारचं पत्र लिहित आहे, पहिल्यांदा शेवटचं पत्र लिहित आहे, मला माफ करा, जर याचा कोणताही अर्थ निघत असेल. 

असं होऊ शकतं की मी चुकीचा असेल, जग समजून घेण्यासाठी, प्रेम, जीवन, यातना आणि मृत्यू समजून घेण्यात. मी कोणत्याही गडबडीत नव्हतो, पण मी नेहमीच घाईत होतो. बेचैन होतो, जीवन सुरू करण्यात. या संपूर्ण कार्यकाळात जीवन माझ्यासारख्या लोकांसाठी एक अभिशाप होता. माझा जन्म एक भीषण दुर्घटना होती. मी जन्मापासून एकटेपणातून बाहेर येऊ शकलो नाही. बालपणाचं प्रेम मला कुणापासूनही मिळालं नाही.

मी दु:खी नाहीय. मी फक्त खाली-खाली आहे. मला स्वत:ची चिंता नाही. हे दयनीय आहे, आणि याचचं कारण आहे की मी आत्महत्या करतोय.

लोक मला कायर संबोधतील. स्वार्थीही, मूर्ख सुद्धा, जेव्हा मी निघून गेलो असेल, मला काहीही फरक पडणार नाही, मला लोक काय म्हणतायत. मेल्यानंतर भूत-प्रेताच्या गोष्टींमध्ये मी विश्वास करत नाही. जर कोणत्या गोष्टीत माझा विश्वास आहे, तर तो म्हणजे, मी ताऱ्यांपर्यंत प्रवास करू शकेल, आणि जाणून घेऊ शकेल की दुसरं जग कसं आहे.

जर तुम्ही माझं पत्र वाचत असाल, तर माझ्यासाठी एवढंच करा, माझी सात महिन्याची फेलोशीप मिळणे बाकी आहे. १ लाख ७५ हजार रूपये. कृपया ते माझ्या परिवारापर्यंत पोहोचवा. मला रामजी यांना ४० हजार रूपये द्यायचे होते, त्यांनी पैसे कधीच परत मागितले नाहीत. पण कृपया त्यांना फेलोशीपच्या पैशातून पैसे द्या.

माझी इच्छा आहे की, माझी शेवटची प्रेतयात्रा शांततेत निघावी. असं वाटू द्या की मी आलो होतो, आणि निघून गेलो. माझ्यासाठी अश्रू गाळू नका, फक्त एवढं ध्यानात ठेवा, मी आनंदी आहे जगण्यापेक्षा मरणाने.

उमा अन्ना मी हे काम तुमच्या रूममध्ये केलं म्हणून मी माफी मागतो. आंबेडकर स्टुंडंट असोसिएशन परिवार, तुम्हाला सर्वांना निराश करतोय, मला माफ करा. तुम्ही सर्वांनी माझ्यावर नितांत प्रेम केलं, सर्वांना भविष्यासाठी शुभेच्छा!

सर्वांना शेवटचा...

जय भीम!
मी काही औपचारीक गोष्टी लिहिणं विसरलो, मी स्वत:ला संपवतोय, या कृत्यासाठी कुणीही जबाबदार नाहीय.
कुणीही मला असं करण्यासाठी भडकवलेलं नाही, कुणीही असं कृत्य केलेलं नाही, किंवा शब्द वापरले नाहीत, ज्यामुळे मी असं केलं.
हा माझा निर्णय आहे, आणि यासाठी मी जबाबदार आहे. मी गेल्यानंतर माझ्या मित्रांना आणि शत्रुंनाही त्रास देऊ नका.

रोहित वेमूला हत्याप्रकरण हि स्टोरी प्रत्येकाने काळजीपूर्वक वाचा,ज्यांना प्रश्नपडले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे यात आहेत

: 🇮🇳आजचा दैनिक मी मराठी live 🇮🇳

    रोहित वेमूला हत्याप्रकरण हि स्टोरी प्रत्येकाने काळजीपूर्वक वाचा,ज्यांना प्रश्नपडले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे यात आहेत.... वाचा शेअर करा..लाईक करू नका..माहिती जास्तीतजास्त लोकांना शेअर होऊ द्या.
आता पेटून उठले पाहिजे !!

हैदराबाद केंद्रीय विद्यापीठात विज्ञान हा विषय घेऊन पीएचडी करत असलेल्या २८ वर्षीय रोहित वेमूला या स्कॉलर विद्यार्थ्यावर २१व्या शतकातही सामाजिक बहिष्कृततेला सामोरे जावे लागल्याने मानसिकदृष्ट्या खचून जाऊन वसतीगृहातील खोलीतच रविवारी रात्री गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपविले आहे.रोहित वेमूला आणि इतर चार विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासन आणि सरकारमधील काही मंत्री,हिंदुत्ववादी विद्यार्थ्यी संघटना यांच्यामार्फत जातीयद्वेषातून अन्यायकारक अशी सामाजिक बहिष्कृतता लादून विद्यापीठाची प्रशासकीय इमारत, वसतीगृह, कॅन्टिन, ग्रंथालयासह विद्यापीठातील अनेक ठिकाणी प्रवेशास बंदी करण्यात आली होती.या घटनेमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थी संघटनांनी आक्रमक होत सोमवारी सकाळपासून यास जबाबदार असलेल्या विद्यीपीठ प्रशासन आणि भाजपचे केंद्रीय श्रममंत्री व आरएसएस सदस्य बंडारु दत्तात्रय यांच्यावर कारवाईसाठी निदर्शने सुरु केली असून तेलंगणा बंदची हाक देण्यात आली आहे.
प्रकरण काय आहे पाहूया.
रोहित वेमूला हा (ASA) आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचा अध्यक्ष होता.
३० जुलैला याकुब मेननला फाशी देण्यात आली तेव्हा देशात फाशीची शिक्षा असावी कि नसावी हा वाद बराच रंगला होता,त्यानिमित्ताने एक चर्चासत्र हैदराबाद विद्यापीठात आयोजित करण्यात आले होते.सदर चर्चासत्रात ASA आंबेडकर स्टुडंट असोसिएशन आणि ABVP अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,हि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थ्यीविंग आहे.यांच्यात फाशीच्या मुद्यावरून मतभेद झाले होते.आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचे असे म्हणने होते कि याकुबला सश्रम कारावास जन्मठेप दिली जावी.त्याच्याकडून आणखी काही माहिती धागे-दोरे मिळतात का हे पाहिले जावे.तर दुसरीकडे ABVP चे म्हणने होते याकुबला फाशीच व्हायला हवी.गुन्हेगारांना फाशी द्यावी कि न द्यावी याविषयी देशात अनेक वेगवेगळी मते आहेत.याकूबची फाईल दहाव्या नबंरवर असताना सरकारने याकुबला फासावर लटकाविण्याची घाई केली.ABVP संघटना हि भाजपासरकारचाच एक भाग असल्यामुळे त्यांनी याकूबच्या फाशीवर जोर देणे स्वाभाविक आहे.देशातील सत्तांतरामुळे देशात असहिष्णुतेचे वातावारण असल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील काही विद्यार्थ्यांनी आंबेडकर स्टुडंट असोसिएशनवर फाशीला विरोध करतात म्हणून देशद्रोही असल्याची टिप्पणी केली.यामुळे दोघांमध्ये खटका उडाला होता.
याविषयीचा वाद विद्यार्थ्यांच्या फेसबुकवरपेजवरही काही दिवस पहायला मिळत होता.पुढे ऑगस्ट 03/08/2015 आणि 04/08/2015 ला दिल्ली विद्यापीठात "मुझ्झफरनगर अभी बाकी है" ह्या बहुचर्चित माहितीपटाचे प्रदर्शन आंबेडकर स्टुडंट असोसिएशनने आयोजित केले होते,ते होऊ नये यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी विरोध करत हिंसक निदर्शने केली होती.हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा होता.त्यामुळे पुन्हा दोघांत संघर्षाची ठिणगी उडाली.
माहितीपटाचे प्रदर्शन झाल्यामुळे चिडलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष सुशीलकुमार याने आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या विद्यार्थ्यांना फेसबुकपेजवर अपशब्द वापरले.त्याची तक्रार विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केली.सदर प्रकाराबाबत विद्यापीठ सुरक्षा प्रशासन अधिकार्यांच्यासमोर सुशीलकुमारने माफी मागितली खरी परंतु तो राग मनात ठेवून सुशीलकुमारने त्याच रात्री स्वत:ला हैद्राबादमधील अर्चना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले.पोलिसांत आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याची खोटी तक्रार दाखल केली.यात ज्या पाच विद्यार्थ्यांची नावे नोंदवली गेली ते या प्रकरणात कुठेच हजर देखील नव्हते.विद्यापीठ सुरक्षा प्रशासन अधिकारी प्रा.आलोक पांडे यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून सुशीलकुमारवर कुणीही शारीरिक मारहाण किंवा हल्ला केला नसल्याचा अहवाल दिला.परंतु तरीही अनाकलनीयपद्धतीने संबंधित विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रशासनाकडून निलंबनाचे आदेश दिले गेले.या आदेशाच्या विरोधात सर्व पुरोगामी आणि लोकशाहीवादी विद्यार्थ्यी संघटनानी विद्यापीठ प्रशासनाचा निषेध केला.तेव्हा माजी कुलगुरू प्रा.पि शर्मा यांनी सदर विद्यार्थ्यांचे निलंबन रद्द केले पुन्हा नव्याने चौकशीसाठी आणखी एक समिती नेमली.
याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थ्यी केंद्रीय श्रममंत्री बंडारु दत्तात्रय यांच्याकडे गेले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हि भाजापाचीच विद्यार्थ्यी विंग असल्यामुळे बंडारु दत्तात्रय यांनी यात जातीने लक्ष घालून ताबडतोब केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री स्मृती इराणी यांना १७/०८/२०१५ ला पत्र लिहून विद्यापीठाला सदर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावेत अशा आशयाचे पत्र पाठवले, त्यानुसार केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने सदर विद्यापीठाला तत्काळ स्पष्टीकरण मागत चौकशी करून कारवायी करण्याचे आदेश पत्रात दिले.यावर पुन्हा अगोदरच्या समिती बरखास्त करत नविन दोन सदस्यीय समिती नेमली गेली.दोन पोलीस दोन सुरक्षा रक्षक आणि दोन तक्रारदार यांच्या जबानीवर विद्यार्थ्यांचे म्हणने ऐकून न घेता एकतर्फी निर्णय घेत विद्यापीठ प्रशासन सदर विद्यार्थ्यांना अन्यायकारकरित्या सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत केले.विद्यापीठाची प्रशासकीय इमारत, वसतीगृह, कॅन्टिन, ग्रंथालय यासह विद्यापीठातील अनेक ठिकाणी प्रवेशास बंदी करण्यात आले. विद्यापीठ प्रशासन,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,भाजपाचे मंत्री यांच्या संगनमताने या विद्यार्थ्यांना रस्त्यावर दिवस काढावे लागले.विद्यापीठीय राजकारणाने निरपराध विद्यार्थ्याना उध्वस्त करत त्यांच्या करिअरचा बळी घेतलाच त्यात एकाचे आयुष्यही हिरावून घेतले गेले. याविरोधात आता तेलंगणाच्या सर्व विद्यार्थी संघटनांनी बंद पुकारला आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थींनी संघटनांनीही रोहितच्या आत्महत्येचा निषेध केला आहे.
सर्वच स्तरातून शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रात गलीच्छ राजकारण दंडेली आणि दहशत निर्माण करणाऱ्या ABVP म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेवर बंदी घालण्याची जोरदार मागणी होत आहे.सदर संघटना हि घटना विरोधी कृत्यात अनेकदा सहभागी असल्याचे दिसून येते. काही ठळक घटना पाहिल्या तर चेन्नई मधील IIT संस्थेत एका कार्यक्रमात मोदी सरकारच्या गोमांस भक्षण आणि हिंदीप्रभुत्ववादाच्या धोरणाबद्दल चर्चा झाली आणि त्यातून या मुद्द्यांना विरोध झाला आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कल या विध्यार्थी संघटनेविरुद्ध ABVP संघटनेने बंदीची मागणी घातली सदर कार्यक्रमाचे रिपोर्टिंग थेट मनुष्यबळ मंत्रालयाला केले गेले आणि तिथून ताबडतोब बंदीचे आदेश निघाले या बंदीला झालेल्या जोरदार विरोधामुळे सरकारने शेवटी माघार घेतली.त्यानंतर एफटीआयआयमध्ये सरकारपुरस्कृत गजेंद्र चौहान आणि अजून पाच सदस्यांच्या नियुक्तीवर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत उपोषण केले,त्यांना धमकावण्याचे काम या संघटनेने केले आहे. मागे मुंबईतील सेंटझेवियर्समध्ये शाहीर शितल साठेचा कार्यक्रम होता तो धमक्या मनगटशाहीच्या जोरावर ABVP संघटनेने होऊ दिला नाही. त्यानंतर तीन तारखेला सोलापूर येथील सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमातही अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घालून कार्यक्रम उधळून लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.तेथील उपस्थित कार्यकर्त्यांनीच चोप देवून त्यांना पळवून लावले. यावरून सदर संघटना शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत धोकादायक आहे हे स्पष्ट होते.घटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य या संघटनेला मान्य नाही.तसेच तीला सत्ताधारी सरकारचे पाठबळ असणे हे अत्यंत घातक आहे.या सर्वांचा नीट विचार केला तर असे दिसून येते कि भाजपासरकार पद्धतशीरपणे इथे विशिष्ट विचारसरणी रूजवू पहात आहे.
आणि मागासवर्गांना शिक्षणापासून तोडण्याचे उद्योग करत आहे.
एकीकडे सबका साथ विकासच्या गप्पा करायच्या आणि दुसरीकडे सामाजिक बहिष्कृततेच्या प्रथा शिक्षणक्षेत्रात राबवायच्या,आरक्षणाला विरोध नाही म्हणायचे आणि आरक्षणाची समीक्षा करण्याचा आग्रह धरायचा,मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला कात्री लावायची आणि दुसरीकडे शिक्षणक्षेत्रात गुंड संघटना वाढवून मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर दहशत निर्माण करायची त्रास द्यायचा हिंदुत्ववादी अजेंडे राबवत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे उद्योग करायचे.रोहित वेमूला आणि इतर चार विद्यार्थ्यांवर विद्यापीठाच्या प्रोक्टोरियल चौकशीत कोणत्याही प्रकारचा गुन्हा सिद्ध झालेला नसताना त्यांना गुंड म्हणायचे त्यांनी याकूबला समर्थन दिले म्हणून देशद्रोही म्हणायचे असे खोटेच प्रचार आता हि संघटना करत असून त्यांच्या राजकारणाने झालेल्या खुनाचे एक प्रकारे समर्थन करण्याचा उद्योग चालू झाला आहे.भाजपा आरएसएसचे धार्मिक आणि जातीय धृवीकरण देशाला नविन नाही.हे सर्व पाहता हि ब्राह्मण्यवादी विचारसरणी आहे असे म्हणता येते. हिंदुत्ववाद हाच राष्ट्रवाद आहे. आणि जे घटक विचारसरणी यास विरोध करेल ते राष्ट्रद्रोही आहेत.हि भाजपा संघ परिवार आणि हिंदुत्ववादी संघटना यांची संकल्पना आहे.याच खुळचट भावनेतून आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या विद्यार्थ्यांवर अन्यायकारक कारवायी केली गेलीय.त्यामुळे विद्यापीठ प्रशासन आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमधील नेत्यांच्या संगनमताने घडवून आणलेला हा खून आहे असे विविध पुरोगामी डाव्या आणि मागासवर्गीय संघटनाचे म्हणने आहे. भाजपासरकार संबंधित नेत्यांचे राजीनामे घेऊन त्यांना शासन करणार कि नाही? त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नोंदवला जाऊ नये? अशा संघटनावर बंदी घालून शिक्षणक्षेत्र दहशतमुक्त करणार कि नाही?
चंद्रशेखर आझाद इंग्रजांशी लढताना जेव्हा त्यांच्या तटबंदीत सापडले तेव्हा त्यांनी शेवटची गोळी स्वत:च्या मस्तकात झाडून घेऊन ते शहिद झाले,चन्द्रशेखर आझाद यांची हि आत्महत्या नाही. रोहित वेमूलाने हेच केले.अशी भावना आता देशभरातील विद्यार्थ्यांच्या मनात जोर धरू लागली आहे.भडकलेली हि तरुणांची आग सरकारला अडचणीचे ठरेल यात शंका नाही.
सोशल मीडियातही तरुण वर्गाने तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध केला आहे. ‪#‎universityofhyderabad‬ ‪#‎Rohit_Vemula‬ ‪#‎BanABVP‬ हे हॅशटॅग ट्रेंड दिवसभर दिसत होते, त्यामुळे तरुणांची भावना लक्षात येते. दिल्ली युनिव्हर्सिटी मुंबई कलिना युनिव्हर्सिटीसह देशभरात ठिकठिकाणी निदर्शने करण्यासाठी तरुण एकवटले आहेत.
एका निरपराध विद्यार्थ्याला अशा प्रकारे आपले जीवन संपावायला लागणे हे तरूणांची संख्या जास्त असलेल्या देशासाठी लाजिरवाणे आहे.

‪#‎SAYNOTOBJP‬ #BANABVP ‪#‎BANBJP‬ ‪#‎RIP_RohitVemula‬ #banABVP #universityofhyderabad #Rohit_Vemula 
मित्रांनो उदया आहे २६ जानेवारी, म्हणजेच आपला प्रजासत्ताक दिन.
आता हा प्रजासत्ताक दिन म्हणजे काय. 
नक्की वाचा आपल्या देशासाठी आणि आपल्या पुढील पीढ़ीसाठी


प्रजासत्ताक म्हणजे काय ओ  ?

प्रजासत्ताक म्हणजे एक प्रकारचे स्वातंत्र्य. ते स्वातंत्र्यदिनाशी संबंधित आहे…… 
हे उत्तर मिळाले जेव्हा वरील प्रश्न विचारला. बर हे उत्तर देणारा कोण ? तर तो होता IIT चा एक विद्यार्धी.

प्रजासत्ताक दिन म्हणजे आपल्या साठी आणखीन एक सुट्टी एवढाच संबंध उरलाय की काय अस वाटू लागल आहे

त्याच प्रमाणे अनेक तरुण नागरिकांची उत्तर आश्चर्यकारक नव्हे तर लाजिरवाणी होती.

एका खाजगी कार्यालयात काम करणारा म्हाणाला या दिवशी स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशाबरोबर कोणता तरी करार झाला होता.

तर एकाला विचारले आपण किती दिवस झाले प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत ? तर त्याने उलट अस विचारलं माझा फोटो छापून येणार असेल तर सांगतो.

तर आजून एकाला प्रश्न विचारला तर त्याने सांगितले हा दिवस गांधीजीच्या संबंधित आहे.

एकजण वन्दे मातरम गात होता, त्याला विचारले वन्दे मातरम  गातो आहेस मग २६ जानेवारीला काय झाले, त्याने सांगितले २३ जानेवारी आहे म्हणून गातोय, 
आता बोला.     

आणखी एकाला विचरले, तर त्याने तो प्रश्न आपल्या सहकाऱ्या मित्रावर टोलवला.

तर आणखी एकाने सांगितलं या दिवशी असहकार चळवळ सुरु झाली होती.

पेशाने शिक्षक असलेल्या एका तरुणाने सांगितल भाषण स्वाततांत्र्याचा हक्क मिळाला म्हणून हा दिवस साजरा केला जातो. 

एकाने सांगितले मला असले फालतू प्रश्न नका विचारू.

तर एकाने सांगितलं हा काय सामान्य ज्ञानाचा तास आहे का ?     

तर अस आहे आजच्या तरुण भारताच्या दृष्टीने आपल्या प्रजासत्ताक दिनाच महत्व. 

ठीक आहे, चला आपण पाहूया प्रजासत्ताक म्हणजे काय ? आणि तो का साजरा केला जातो ? 

१५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. परवशतेचे पाश तुटले… आणि स्वतंत्र भारताच्या पुढील योजना काय असतील, देश कोणत्या वाटेनं वाटचाल करेल. लोकांच्या कल्याणाच्या कोणत्या योजना राबवल्या जातील हे सारं ठरवण्यासाठी तत्कालीन नेते, पुढारी सुपुत्र ह्यांनी आपल्या देशाची एक राज्यघटना बनवली. ह्या राज्य घटनेची आखणी मांडणी करण्यासाठी एक समिती नेमली होती. जवाहरलाल नेहरू,

डॉ राजेन्द्र प्रसाद, सरदार वल्लभ भाई पटेल, मौलाना अबुल कलाम आजाद  हे या समितीचे प्रमुख सदस्य होते.त्या समितीचे अध्यक्ष होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर. या समितीचे काम २९ऑगस्ट १९४७ रोजी सुरु झाले आणि अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ ला मंजूर झाला.या समितीने हि राज्य घटना २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसात पूर्ण केली, संविधानात मुख्य भाग आणि १२ परीशिष्टे आहेत तसेच २२ उपविभाग आहेत. सध्या राज्यघटनेत ४४७ कलमे असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते. या साठी ११४ वेळा समितीच्या वेग वेगळ्या बैठका झाल्या. या बैठका मध्ये पत्रकार तसेच सामान्य जनतेला देखील सहभागी करून घेतले होते. राज्यघटना तयार करण्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सिहांचा वाटा आहे, म्हणूनच स्वतंत्र भारताच्या राज्य घटनेचे शिल्पकार हा बहुमान त्यांना आम जनतेने बहाल केला आहे. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम (Sovereign) , समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular), लोकशाही (Democratic) प्रजासत्ताक(Republic) गणराज्य आहे. 

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा दरवर्षी जानेवारी २६ रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. भारताची राज्यघटना घटना समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी अंमलात आली. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला. देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.२६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवसांपैकी एक आहे. (इतर दोनः स्वातंत्र्य दिवस: ऑगस्ट १५ व गांधी जयंती: ऑक्टोबर २). ह्या दिवशी भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते.

भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी)समवेत संचलन करतात. भारतीय राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात.या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात.

दरवर्षी २६ जानेवारीला लालकिल्ल्यावरून भारताचे पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करतात. त्यात गतवर्षाचा आढावा घेत नववर्षाच्या नव योजना जाहीर केल्या जातात. देखणं संचलनही सादर केले जाते. स्वातंत्र्यासाठी बलीदान दिलेल्या राष्ट्रवीरांना आदरांजली वाहिली जाते. हा राष्ट्रीय सण प्रत्येक भारतवासीय मोठा अभिमानाने आणि आनंदाने साजरा करतो.

कृपया हि माहिती जास्ती जास्त लोकांना पाठवा जेणे करून पुढील वर्षी कोणी हि विचारणार नाही कि प्रजासत्ताक म्हणजे काय ओे ?

धन्यवाद ………. 
भारत माता की जय ,🇮🇳🇮🇳
जय जवान जय किसान 🇮🇳🇮🇳

चला... किरकोळ जबाबदारी पार पाडू !

चला... किरकोळ जबाबदारी पार पाडू !

 शेवटच्या श्वासापर्यंत जातीयवाद्यांशी रोहितने एकाकी झुंज दिली. अखेर लढाईचे सर्व सूत्रे आपल्याकडे सोपऊन तो गेला आहे. लढताना आपल्यावर कुटुंबाची जबादारी आहे, हा विचार त्याच्या कधी  मनालाही शिवला नाही. ती एक अजिब दिवानगी होती. पण आपल्याला आता तरी शुद्धीवर यावे लागेल. रोहितने स्वतःचे बलिदान देऊन मरगळलेल्या आंबेडकरी चळवळीला नवी चेतना, नवी उर्जा ,नवी दिशा दिली आहे. आंबेडकरी समाज त्याच्या या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकणार नाही. पण त्याचे हे ऋण आपण मनोभावे अधोरेखित जरूर करू शकतो. समाजासाठी तो घर दार सोडून गेला. त्याच्या घराची जबाबदारी आता समाजावर आहे. रोहितच्या स्वाभिमानी आईने कुठलीही शासकीय आर्थिक मदत घेण्यास नकार दिला आहे. अशावेळी  समाजाने सामाजिक बांधिलकीचा परिचय देण्याची गरज आहे. प्रत्येकाने शंभर - दोनशे रुपये जरी रोहितच्या आईच्या बॅन्क खात्यात जमा केले तरी तिचा आयुष्यभराचा प्रश्न मिटू शकतो. आणि एव्हढी कुवत आणि दानत आंबेडकरी समाजामध्ये निश्चितच आहे. रोहितच्या आईला मुलाच्या मृत्यूस जबाबदार असणारांपुढे हात पसरण्याची वेळ येऊ नये एवढेच अंतःकरणापासून वाटते. 'भीक नको पण कुत्रा आवर' हे मनुवादी सरकारला ठासून सांगण्याचे बळ तिला मिळाले पाहिजे. यानिमित्ताने आणखी एक होऊ शकतं. तिच्या बॅन्क खात्यात जमा झालेली रक्कम पाहून सरकारचे डोळे विस्फारू शकतात. त्याचे धाबे दणाणू शकतात. पायाखालची वाळू सरकू शकते. आणि म्हणून चालून आलेली ही संधी आपण घेऊ या. रोहितला सच्ची श्रद्धांजली अर्पण करू या...! 
जय जय जय जय 
जय भीम !!
 खालील खात्यात आपण आपली कुवत आणि इच्छेनुसार रक्कम जमा करू शकता-

Name : Vemula Radhika
A/C No :20328905704
YFSC Code No :0844
State Bank of India,
Commercial Branch
Guntur 522004.

कृपया जास्तीत जास्त शेअर करा...संवेदनशीलतेचा परिचय द्या !

Monday, January 25, 2016

बडं सो पापी आहि गुमानी ! पाखण्ड रूप छलेउ नर जानी!!

बडं सो पापी आहि गुमानी ! पाखण्ड रूप छलेउ नर जानी!!
बाबन रूप छलेउ बलि राजा !
ब्राहम्ण कीन्ह कौन को काजा!!(२)
ब्राहम्ण ही सब कीन्ही चोरी! 
ब्राहम्ण ही को लागत खोरी!! (३)
ब्राहम्ण कीन्हों वेद पुराना ! 
कैसेहु कै मोहि मानुष जाना !!(४)
एक से ब्रम्हौ पन्थ चलाया !
एक से हंस गोपालहि गाया !!(५)
एक से शम्भू पन्थ चलाया! 
एक से भूत-प्रेत मन लाया!! (६)
एक से पूजा जैनि विचारा! 
एक से निहुरि निमाज गुजारा!! (७)
कोई काहू का हटा न माना !
झूठा खसम कबीरन जाना!! (८)
तन मन भजि रहु मोरे भक्ता !
सत्य कबीर सत्य है वक्ता !!(९)
आपुहि देव आपु है पाँती!
आपुहि कुल आपू है जाती!! (१०) 
सर्व भूत संसार निवासी!
आपुहि खसम आपु सुखवासी!! (११)

कहइत मोहिं भयल युगचारी!
काके आगे कहों पुकारी!! (१२)
 साखी-  
सॉचहि कोई न माने ,
       झूठहिं के संग जाय ! 
झूठेहि झूठा मिलि रहा ,
      अहमक खेहा खाय !!

Wednesday, January 20, 2016

मकर 'संक्रात' नव्हे, तर मकर 'संक्रमण'! बौद्ध लोकांनी वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासावा..

मकर 'संक्रात' नव्हे, तर मकर 'संक्रमण'!  बौद्ध लोकांनी वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासावा.. 


सूर्य या दिवशी मकर राशीत प्रवेश होण्याच्या क्षणाला मकर संक्रमण म्हणतात.मकर संक्रात नाही. २२ डिसेंबरच्या सुमारास अवष्टंभ बिंदूवर वसंतसंपात बिंदूपासून २७० अंशांवर सूर्य येतो. त्यावेळी सूर्याची दक्षिण क्रांती (खगोलीय विषुववृत्तापासूनचे कोनीय अंतर) सर्वांत अधिक म्हणजे २३° २७' असते. या वेळी सूर्य खगोलीय विषुववृत्ताच्या जास्तीत जास्त दक्षिणेस दिसतो, त्यानंतर तो उत्तरेकडे सरकू लागतो म्हणजे ⇨उत्तरायण सुरू होते म्हणून यास मकर संक्रमण म्हणतात. ,बाकी हिंदुस्थानात ,मकर संक्रात,किंक्रांत, भोगी हे जे काय सण म्हणून साजरे करतात याला मनुवादी महा षड्यंत्र म्हणतात. केवळ "बडव्या" ना दान,देण्याकरिता बहुजनांनी महायज्ञ, असंख्य देवांची सत्यनारायण, पूजा अर्चा करून द्यावे. यासाठीच हा उपक्रम आणि दुसरं काय? केवळ श्रद्धेच्या नावाखाली मानसिक गुलामी अंधश्रद्धेचीच,हाच कायम विळखा हिंदुस्थानातच? देवांच्या नावावर भिक (दान) मागून गरीब मागसालेल्या श्रदाळू लोकांना लुबाडणारे.मात्र आधुनिक भारतात असं हीन प्रकार होत नाहीत. कारण आता सुजाण, विज्ञान,बुद्धिवादी लोक भारतात वास्तव्य करत असून तो चंद्रावर पाऊल ठेवत आहे...अर्थात पोहचलं आहे.  

भारतातील मागील शतकात लोक पावसाळ्यात शेती करून अमाप पिक घेत सुगीच्या हंगामात अन्नधान्याची कोठारे पूर्ण भरून ठेवलेली असत. पुढील वर्षभर मेहनतीनं घामानं केललं रुजविलेल पिकं, अन्न आनंदानं पोटाची खळगी भरेल एवढं साठा निर्माण केलेला असे. त्यामुळे कुटुंब आनंदानं वर्षभर अन्न धन्यानं सुखी राहून नाच गाणी करीत कुटुंबातील पुरुषमंडळी, अधिक विशेषतः तरुण पुरुष, शक्यतो एक नदी जवळ, शेतावर जाऊ सुगीच्या हंगामानंतर एका छोट्याशा झोपडी कॉटेज तयार करून रात्री ते अन्न तयार करून सर्व कुटुंबाना खाण्यापिण्या करिता तयार करून आनंद उत्सव साजरा करीत असत. यावेळी गोड आणि एकमेकांना शुभेच्छा देवाण-घेवाण करीत असत संपूर्ण रात्री ढोल, ड्रम किंवा मैदानी खेळ करून  लोक संगीत गात,दिवसा या दिवशी बैल यांची पूजा करीत असत. नागराची,पिकवलेल्या अन्नाची  पूजा करीत असत.

आज याला मनुवादी पंडितांनी पैशाच्या अमिषापायी नको तो उद्योग निर्मिला असून सामान्यांना ब्राम्हण बडव्यांनी मकर संक्रातीचा प्रवेश हत्ती वरून होत आहे ती लाल रंगाची वस्त्र व हातात धनुष्य घेवून येणार आहे .ती दुध पिवून अगदी तरुण दिसणार आहे असणार आहे व ती आपल्या करिता शुभ असून  आपण दान पुण्य करा असा संदेश देणारी आहे असा बिनबुडाचा संदेश पोथी वाचून देतात. यात सामान्य बिन अकलेचा कांदा भरडला जातो.हे मात्र हिंदुस्थानातील बहुजनाच्या टाळक्यात काही जात नाही.बहुजन सावकार आहे ना तो? देतो या भविष्य पोथी पुराण सांगणाऱ्या बडव्याला मागील तेवढे दक्षिणा, दान ? केवळ हा लुटांरु टोळ्यांचाच भाग आहे.पहा दरोडे टाकणारे अस्सल गुन्हेगार रात्री दरोडे घालतात.मात्र मानव बुद्दीवंत प्राणी ब्राम्हण हा सामान्यांना अगदी पोथी माध्यमांतून रात्री दिवसा कधी लुटतो, डाका टाकतो. अगदी उघड्या डोळ्यानं नाही का? तरी बहुजन समाज जागृत होत नाही.बेडर कुटला? 

शेवटी बहुजन बेअकलेचा कांदाच म्हणायला हव. तो स्वतः रडतो कमावतो,मेहनत करतो घाम गाळतो व तो दुसरांच्या हातात स्वताचा हात ठेवत पोथीनुसार भविष्य सांगणाऱ्याच्या अगदी 'भरभरून' ठेवतो.आणि मरेपर्यंत अगदी सरणावर चढवे पर्यंत दक्षिणा देत असतो.असाच प्रकार मकरसंक्रातीचा आहे.हे संक्रमण असून सूर्य यादिवशी मकर राशीत प्रवेश होण्याच्या क्षणाला मकर संक्रमण म्हणतात.परंतु या बडव्यांनी बहुजन लोकावर भोग(भोगी), आयुष्याची कायम संक्रांत करून ठेवली ,टाकली आहे.त्यामुळे बौद्ध लोकांनी वैज्ञानिक दृष्टीकोन पहावा, जोपासावा. हळदी मकर संक्रांत साजरी करू नये.तिळगुळ,गोडधोडची गरज अनाथ आश्रमातील लोकांना आहे. भविष्य, पोथिपुराण सांगणाऱ्या बडव्यांना नाही .तुमचीच संक्रात किंक्रात करून टाकतील.हातातील रेषेवरून घरातील धागेदोरे तिजोरीतून अगदी बुद्धीनं क्षणात खाली करतील एवढी खात्री नक्की.बहुजन लोक विचार करा चालताना वावरताना पाऊल डोळसपणे उचला...अन्यतः 'संक्रांत' .... भोग …. येणारच,कोसळणारच अगदी कोपणारच …..

सावित्रीबाई फुले यांची एक फार छान कविता

सावित्रीबाई फुले यांची एक फार छान कविता...
तयास मानव म्हणावे का?
ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेची गोडी नाही
बुद्धी असुनि चालत नाही
तयास मानव म्हणावे का?
दे रे हरी पलंगी काही
पशूही एेसे बोलत नाही
विचार ना आचार नाही
तयास मानव म्हणावे का?
पोरे घरात कमी नाहीत
तयांच्या खाण्यासाठीही
ना करी तो उद्योग काही
तयास मानव म्हणावे का?
सहानुभूती मिळत नाही
मदत न मिळे कोणाचीही
पर्वा न करी कशाचीही
तयास मानव म्हणावे का?
दुसऱ्यास मदत नाही
सेवा त्याग दया माया नाही
जयापाशी सदगुण नाही
तयास मानव म्हणावे का?
ज्योतिष रमल सामुद्रीकही
स्वर्ग नरकाच्या कल्पनाही
पशुत नाही त्या जो पाही
तयास मानव म्हणावे का?
बाईल काम करीत राही
एेतोबा हा खात राही
पशू पक्षात एेसे नाही
तयास मानव म्हणावे का?
पशु-पक्षी माकड माणुसही
जन्ममृत्यु सर्वा नाही
याचे ज्ञान जराही नाही
तयास मानव म्हणावे का?

" बाबांच्या गद्दार लेकरांसाठी "

मित्रांनो हि कविता किती जबरदस्त, मार्मिक आहे पहा 
आवडली म्हणून शेयर करतोय

" बाबांच्या गद्दार लेकरांसाठी ".....

" छप्पन सालीच केले 
माझ्या बापाने आमचे धर्मांतर...
पण काहींना अजून कळाले नाही धर्म आणि धम्म यातील अंतर....

मिळतायत सुखसोयी
म्हणून धम्मात येऊन बसले,
पण ३३ कोटी देवांच्या चिखलात
फसले ते फसलेच...

दर वर्षी देवी - देवतांना
नारळ चढवतात आधी,
आठवतय का रे
माझ्या बापाने ५ रुपयांचा 
हार मागितलेला कधी...

अरे एवढे सगळे देऊन 
त्याने कसलीच मागणी केली नाही,
फक्त २२ प्रतिज्ञा पाळा म्हणाला 
त्या शिवाय तुम्ही सुधारणार नाही... 

त्या एका मागणीची पुर्तता
तुम्ही करु नाही शकला,
पहिल्या पासून शेवट पर्यंत 
प्रत्येक प्रतिज्ञा चुकला...

दगडधोंड्याचा देव डोक्यावर
घेउन मिरवतोस आज,
मागचा इतिहास आठव जरा
तुला कशी काय वाटत नाही रे लाज...

जिवघेण्या गुलामीतुन तुला
कोणी बाहेर काढले,
तुझा देव बसला बघत
बाबासाहेब मात्र धावले...

त्यानी केलेल्या या उपकारांची
ही अशी परतफेड करतोयस,
२२ प्रतिज्ञा लाथाडून आज
आरती करायला, दहीहंडी लावायला धावतोयस...

विसरलास तू त्या बापाला
ज्याने तुझे दुःख जाणले,
रक्ताचे पाणी करुन
ज्याने तुला माणसात आणले...

केलीस ना गद्दारी बापाशी
आता परत आमच्यात येऊ नको,
कोणाचा उधो उधो करायचाय
तो कर
पण इथून पुढे
जय भिम मात्र करु नकोस

बाबासाहेब समजले नाही म्हणून

📎 जगणं 📎

बाबासाहेब समजले नाही म्हणून 
एकत्र कधी येत नाही  
एकाच घरात राहून आम्ही,
एकमेकांस दिसत नाही.

           हरवला तो आपसांतला,
           जिव्हाळ्याचा संवाद.
           एकमेकांस दोष देऊन, 
           नित्य चाले वादविवाद.

धाव धाव धावतो आहे,
दिशा मात्र कळत नाही.
ह्रदयाचे �पाऊल कधी,
ह्रदयाकडे ��वळत नाही.

            इतकं जगून झालं पण, 
            जगाय�ला �वेळ नाही.
            जगतो आहोत कशासाठी, 
            कशालाच कशाचा मेळ नाही. 

क्षण एक येईल असा,
घेऊन जाईल हा श्वास.
अर्ध्यावरच �थांबलेला, 
असेल जीवन प्रवास.

             अजूनही वेळ आहे,
             बाबासाहेंबाना समजुन घ्या,
            बा भिमाचे स्वप्न साकार करण्यास निळ्या वादळाचा आरंभ, 
या परिवारात सामिल व्हा, 
भिम सैनिकाने एक व्हावे 
भिम सैनिकाने एक व्हा!!!!
     
   ll  🙏🏼 जयभिम 🙏🏼 ll

शिवाजी ने बहुजनांच्या उद्धारासाठि काय केले?

1.शिवाजी ने बहुजनांच्या उद्धारासाठि काय केले.? 

2: बाबासाहेबांनी कधी शिवाजीचा गौरव केला आहे का? 

3: आजच्या काळात शिवाजीचा एवढा  उदो उदो करायला हवा का?

4: शिवाजीच्या काळात अस्पृश्यता होती का? 

5: शिवाजीने एकाही महाराला जहागिरी दिली होती का?

6: शिवाजीचे स्वराज्य हिंदूंचे होते की बहुजनांचे?

7: शिवाजीने राज्यभिषेकाच्यावेळी  ब्राह्मणाला एवढी का दक्षिणा दिली होती? 

8: शिवाजीच्या स्वराज्यात बहुजनांना काय स्थान होते?

9: शिवाजी तलवार शिकवतो त्याचा आजच्या काळात उपयोग आहे का? 

10: गनिमी कावा म्हणजे काय?

11: शिवाजीने सुरतेची लूट केली हे कोणत्या तत्वात बसते? 

12: किल्ले बांधताना किती  महार मांगाचा बळि दिला होता? 

13: शिवाजी संत तुकारामांना गुरु मानत होते कि समर्थ रामदासांना?

14: शिवाजी ने किती बायका केल्या? आणि शिवाजी गेल्या वर त्या सती का गेल्या?

15: महात्मा फुलेंनी शिवाजीची समाधि शोधली होती का?

16: महात्मा फुलेंनी शिवजयंती साजरी केली होती का?

17: महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांना गुरु मानले होते का?

18: शिवाजीने ब्राह्मणांना विरोध करण्याचे धैर्य का दाखवले नाही? 

19: शिवाजीने राज्यभिषेक  ब्राह्मणेतर माणसाकडून का करवून घेतला नाही? 

20: शिवाजीचे राज्य मराठ्यांसाठी होते काय?

21: शिवकाळात अस्पृश्यता होती काय?

22: आजच्या काळात शिवाजी कडून कोणत्या गोष्टी शिकल्या पाहीजेत? 

23: खरा इतिहास सांगितला जातो काय? किंवा एका समाजाला अपेक्षित असा?

24: संभाजी ब्रिगड, मराठा सेवा संघ , जिजाऊ संघटना यांना शिवधर्म स्थापन करण्याची का गरज पडली?

25: मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार झाले असता संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ यांची काय भूमिका असते?

26: आता पर्यंत दलितांवर फक्त मराठा समाजच का अन्याय अत्याचार करत आलाय?

27: महाराष्ट्रातली 95 टक्के जमीन आणि 90% पैसा फक्त मराठा समाजाकडेच का आहे?

28: गेल्या साठ वर्षात महाराष्ट्रतली सत्ता कोणाकडे होती? 

29: भारतीय संविधान लिहीताना बाबासाहेबांनी शिवाजीचे स्वराज्य डोळ्यासमोर ठेवले होते काय?

30: शिवाजी महाराज कोणत्या व्याख्येच्या, गोष्टींच्या आधारे महापुरुष ठरतात?

31:शिवाजी महाराज आपले आदर्श ठरू शकतात का?

32: संभाजी महाराजांनी "बुध भूषण" ग्रंथ लिहीला, तो ग्रंथ बुध्द धम्माशी निगडीत आहे का?

33: शिवाजीने ब्राह्मणेतरा कडून राज्यभिषेक का करवून घेतला नाही? 

या व्यतिरिक्त प्रश्न असल्यास सांगा.

नकोय बाबासाहेब नोटेवर

मला आलेला छान msg

!!---------"नकोय बाबासाहेब नोटेवर"----------!!
नकोय बाबासाहेब 
आम्हा नोटेवर |
विकला जाईल 
तो वाटेवर ||

आहेत समाजात 
काही दरिद्रे |
नाहीत ते
कुठलेच परिंदे ||

घेऊन जातील बाबासाहेब 
दारुच्या अडयावर |
लावतील त्यालाही
सटयावर ||

म्हणतील,
बाबासाहेब घ्या
अन् 
दारू दया ||

होतील ते 
पिऊन तराट |
माजवतील कल्लोळ 
घरात ||

नाचनारींनवर जाईल
पैसा उधळला |
नाचता-नाचता तोही
जाईल तुडवला ||

फोफावला आहे
भ्र्ष्टाचार |
नाही उरलेला
शिष्टाचार ||

भाटाच्या ताटी
जाईल थोपवला |
गणीकांच्या हाती
जाईल सोपवला ||

खाटीकाच्या दुकानात
जातील घेऊन त्याला |
मंदिरात येतील
देवासमोर ठेवुन त्याला ||

नाही विकणाऱ्यान
मधला तो |
नाही मांडायचा
आम्हाला त्याचा शो ||

फाटुन जाईल
हृदय आमच |
नाही एकणार
आम्ही तुमच ||

राहुदया तुमचा
गांधीच नोटवर |
बाबासाहेब आमचा 
शोभतोय फोटोवर ||

Saturday, January 16, 2016

१४ जानेवारी नामांतर दिन

🔵१४ जानेवारी नामांतर दिन🔵

       "भीमरायाच्या नावासाठी रक्त सांडले राव .....असेल कोणी माईचा लाल तर पुसून दावा नाव .....पाहून भीमाची क्रांती, ती क्रांती सलत होती.....ज्ञानाचे पेरले मोती त्याचे नावच नव्हते वरती ....नामांतराने विद्यापीठाला जगात आला भाव ......असेल कोणी माईचा लाल तर पुसून दावा नाव .....गौतमने प्राण गमावला.....पोचीरामने लढा लढविला ...सुहासिनी आणि प्रतिभाने .....जातिवाद्यांना धडा बडवला .....बलिदानाचा महिमा गाईल इथले गाव अन गाव .....असेल कोणी माईचा लाल तर पुसून दावा नाव .....भीम नाव कमानी वरती ....पाहून भटोबा झुरती .......झुरता झुरता अर्धे मरती ....दवाखान्यात होती भरती ....नाव पुसाया येतील त्यांच्या वर्णी बसतील घाव ......असेल कोणी माईचा लाल तर पुसून दावा नाव ......आनंदी किशोर झाला......त्या नामांतर दिनाला आनंद भिडे गगनाला....सांगे पटवून दिन जनाला .....भीमरावांनी असा जिंकला हा नामांतर डाव .....असेल कोणी माईचा लाल तर पुसून दावा नाव ....नामांतर लढ्यात शहीद झालेल्या सर्व भीमसैनिकांना विनम्र अभिवादन व नामांतर दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा....

डॉं. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ, औरंगाबाद 22 व्या नामविस्तार वर्धापन
दिनाच्या आपणा सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा....

मराठवाड्याकड मन हे कुनाचं वळालं नसतं,
कधी त्या सरकाराला कळालं नसतं.
आरे लेकरु भिमाचं जर का जळालं नसतं,
नाव विद्यापिठाला बाबाचं कधिच मिळालं नसतं.

नामांतर लढ्यात शहीद झालेल्या सर्व
भीमसैनिकांना व या आंदोलनात सक्रीय सहभाग
घेणाऱ्या सर्व भीमसैनिकांना मानाचा जय भीम ...

नामांतर आंदोलनातील शहीद भीमसैनिक ...
1) गौतम वाघमारे, 
2) पोचिराम कांबळे, 
3) अविनाश डोंगरे,
4) दिलीप रामटेके, 
5) रोशन बोरकर, 
6) ज्ञानेश्वर साखरे,
7) डोमाजी कुत्तरमारे,
8) चंदर कांबळे, 
9) जनार्दन मवाळे,
10) शब्बीर अली काजल हुसैन,
11) रतन मेंढे,
12) सुहासिनी बनसोड,
13) नारायण गायकवाड, 
14) अब्दुल सत्तार, 
15) दिवाकर थोरात,
16) जनार्दन मस्के, 
17) भालचंद्र बोरकर,
18) शीला वाघमारे,
19) प्रतिभा तायडे, 
20) गोविंद भुरेवार,
21) शरद पाटोळे, 
22) मनोज वाघमारे 
23) कैलास पंडित, 
24) रतन परदेसी

महाराष्ट्रातील मराठी माणसांनी उत्तरे द्या अथवा उत्तरे शोधा

महाराष्ट्रातील मराठी माणसांनी उत्तरे  द्या अथवा उत्तरे शोधा .

1. जे मराठी माणसे पिंपरी मधील RSS च्या कार्यक्रमात सहभागी झाले ते जिजाऊ मातेच्या जयंतीला सिंधखेड राजा मधे गेले होते का . . 

2. RSS च्या कार्यक्रमात शिवाजी महाराज हे आमचे आदर्श म्हणणारे किती नेते सिंधखेडला गेले होते?

3. 12 जानेवारी ला स्वामी विवेकांनंद यांच्या जयंतीची  जाहिरात सरकारने शासकीय खर्चाने केली पण जिजाऊ जयंती ची जाहिरात कुणी पाहिली का?

4. RSS चा कार्यक्रम सगळ्या चॅनेल नी Live दाखवला पण जिजाऊंचा कार्यक्रम कुणी कुठल्या चॅनेल वर पाहिला का?

5. RSS च्या कार्यक्रमात दीड  लाख लोक आल्याची आकडा फुगवुन त्याची Breaking News केली  पण सिंधखेड राजा येथे त्याच्या दहा  पट मावळे आले होते त्याची Break News कुणी पाहिली का?

6. Shiv Sena & BJP च्या पक्ष कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी केल्याचे फोटॊ कुणी पाहिले का?किंवा जिजाऊ जयंतीच्या शुभेच्छा यांच्या मुख्य कार्यालयातुन दिलेल्या कोणि ऐकल्या का?

मराठी लोकांनो अता तरी डोळे उघडा तुम्ही नक्की कुणाच्या मागे धावताय . . .

संक्रात या सणाचा खरा इतिहास माहिती करुन घ्या.

संक्रात या सणाचा खरा इतिहास माहिती करुन घ्या..

प्राचीन  काळी संक्रात आणि किंक्रात नावाच्या ब्राह्मण सख्या बहिणी होत्या. या दोन मुलींच्या वाढदिवसानिमित्त ब्राम्हणांनी राजा शंकेसुराला (बळी राजाचा नातु) आमंत्रित केले. दोघी बहिणी गायन , नृत्यकलेत खूप प्रवीण होत्या. नृत्यगृहात प्रवेश करताक्षणीच नृपूराच्या मंद आणि तबल्याच्या तालबद्द ध्वनिवर नृत्य करीत होत्या. राजासह सारेजण मंत्रमुग्ध झाले होते. नृत्यगृहाच्या दोन्ही कोपरयात  अगोदरच दोन भाले आणून ठेवलेले होते. नृत्याने गुंग झालेल्या राजाला पाहून संक्रांत आणि किंक्रात या दोन्ही मुलींनी कोपरयात ठेवलेले भाले उचलले आणि दांडपट्टा खेळतात त्याप्रमाणे भाले घेऊन त्याच्या सहभोवताली फिरत असता एकीने पोटातुन दुसरीने पाठीतून भाले खुपसले अन दोघी बहिणींनी रक्ताचा टीळा कपाळी लावला. कुंकू हे शंकेसुराच्या रक्ताचे चिन्ह आहे. 

अशा प्रकारे नागांचे पूर्वज ब्राह्मणांनी कट करून मारले व त्या  प्रित्यर्थ आनंदोत्सव साजरा करतात.  

बरयाच लोकांना राक्षस , असुर , दास हे कुणीतरी वेगळे असे लोक वाटतात .
आणि ते देवांचे वैरी होते ... लोकांना त्रास देत होते असे ब्राम्हणी इतिहास संशोधकांनी इतिहासात लीहुन ठेवले आणि तेच बहुजन समाजतील शिक्षित लोकांनी वाचले आणि त्याचाच स्विकार केला. खरे काय नी खोटे काय याची साधी समिक्षा , चिकित्सा वा तर्क करण्याचा प्रयत्न केला नाही ... आज आम्ही टी. वी. वर दाखवल्या जाणारया मालिका दररोज पाहतो. त्यात देव ,  देवी , लक्ष्मी या सारख्या पात्राद्वारे राक्षस , असुर अश्या पात्रांचा वध केल्याचे पाहतो आणि टाळ्या ही वाजवतो ... कारण वध हा राक्षसाचा असुराचा झालेला असतो ... आता राक्षस हे खरे पाहता आपलेच  नागवंशीय पुर्वज आहेत ... हे खरा इतिहास वाचला तर समजते नाहीतर आपणच आपल्या पुर्वजांचे मृत्यु दिवस सण म्हणुन साजरे करीत राहतो. 

ही एक परंपरा म्हणून आपण करीत आहोत पण त्यामागील कारण काय याचा विचार करीत नाही ... याचा अर्थ आपण आपली गुलामी आनंदोत्सव म्हणून साजरी करीत आहोत याचे भान ना समाजातील लोकांना आहे ना समाजातील लोकांना आहे ...शंकेसुर हा बळी राजाचा नातु जो नागवंशीय होता .... आपण म्हणजेच बहुजन समाज ; म्हणजेच ब्राम्हणेत्तर सारा समाज हा नागवंशीय आहे ... पाहीजे तर खात्री करा ...आपली जन्म पत्रिका तपासुन पहा. त्यात आपला वर्ण क्षुद्र ... गण राक्षस ... योनी अंत्यज आणि वंश नाग असेल .... 

टिप :आपणांस विश्वास नसेलतर पंचागामध्ये असलेले शंकेसुराचे चित्र अवश्य पाहावे. 

 जय शिवराय जय भिमराय 
जय मूलनिवासी ...
शिवरायांचा खून  का व  कसा झाला :--

 हजारो वर्षांची ब्राह्मनी दादागिरी शिवाजीराजे व संभाजीराजे यांनी संपवली त्यामुळे ब्राह्मण आतून प्रचंड चिडले. म्हणून त्यांनी राज्यांचे कुटुंबात भांडण लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

अपयश आले तरी मोरोपंत, अण्णाजी, राहुजी सोमनाथ थांबले नाहीत. शिवरायांना संपवायचेच हा पक्का निश्चय त्यांनी केला होता. आण्णाजी दत्तो  रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला थांबला होता. गडावर राहुजी सोमनाथ हा ब्राह्मण अधिकारी होता. रायगडाची संपूर्ण  नाकाबंदी करण्यात आली. कसल्याही प्रकारचा सुगावा लागणार नाही याची दक्षता या तिघांनी घेतली. म्हणून या कटाचा संशय येऊ नये यासाठी मोरोपंत आणि अण्णाजी दत्तो घटनास्थळा पासून दूर थांबले होते. हत्त्या करण्याचा कट रचणारे, प्रवृत्त करणारे जवळ थांबत नसतात. या प्रसंगी राज्यातील अत्यंत महत्वाची माणसे गडावर नव्हती. संभाजीराजे पन्हाळा गडावर होते. सेनापती हंबीरराव माहिते हे तळबीड या ठिकाणी होते. ते राजगड    पासून २५० किलोमीटर आहे. शिवाजी महाराज यांचे कुटुंबातील सर्व नातेवाईक हे पाचाडला होते. असा स्पष्ट उल्लेख शिवभारतमध्ये आहे. (  संदर्भ :- वा.सी.बेंद्रे लिखित श्री. छ. संभाजी महाराज ) 
  
 तीन एप्रिलचा दिवस उजाडला तेव्हा शिवरायांचे भोवती ब्राहामानांचेच वलय होते. राहुजी सोमनाथने गडावरचे सर्व दरवाजे बंद केले. गडाची सर्व सूत्रे सोमनाथच्या ताब्यात होती. या सार्या परिस्थितीचा फायदा घेऊन  शिवरायांवर विषप्रयोग झाला. संभाजीराजे व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना राज्यांचे खुनाची माहिती समजणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. राज्यांचा अंत्यविधी हा घाई घाईत उरकण्यात आला. 


दहा  वर्षाच्या राजारामला सिंहासनावर बसउन ब्राह्मण मंत्री सत्ता ताब्यात घेउ इच्छित होते. म्हणून त्यांनी दहा वर्षाच्या राजारामाच्या राज्याभिषेकाची बातमी फुटू न देता राज्याभिषेक उरकला. शिवरायांचा खून व राजाराम यांचा झालेला राज्याभिषेक चोरून लपउन केला गेला. हि बातमी रायगडावरून फुटणार नाही याची दखल घेतली गेली. लगेच ब्राह्माण मंत्र्यांनी संभाजीराजे यांना पकडण्याचे ( अटक) करण्याचे आदेशपत्र हंबीरराव मोहिते यांना दिले.... पण हंबीरराव यांना शिवरायांनी खाजगीत संभाजीला छत्रपती करा असे सांगितले होते. राजाराम हा दहा वर्षाचा आहे त्याला राजाकरणे हे स्वराज्य ब्राह्मण मंत्र्यांचे हातात देणे होईल अशी सूचना शिवरायांनी पूर्वीच " राजारामाचे सख्खे मामा सेनापती हंबीरराव मोहिते " यांना केली होती. हंबीरराव यांना ब्राह्माण मंत्र्यांचे पत्रं मिळताच त्यांनी संभाजीराजे यांना त्याची माहिती कळवली. 

वरील प्रसंग सिद्ध करतो कि सोयराबाई यांचा सख्खा भाऊ हा स्वतःच्या भाच्याला छत्रपती करायची संधी डावलून स्वराज्याचे हित पाहतो. पहा नीट पहा विचार करा सोयराबाईया संभाजी विरोधक नव्हत्या याचा हा पुरावा नव्हे काय ? तरीही हा खून सोयराबाई यांनी केला अशी अफवा  ब्राह्मणी इतिहासकारांनी नंतर उठवली. 
  
जेव्हा शिवरायांचा खून झाला तेव्हा राज्यांचे वय हे अवघे ५०  वर्ष होते. राज्यांना कोणताही असाध्य रोग नव्हता. ते प्रधीर्ग आजारी नव्हते. राज्यांची प्रकृती निरोगी होती. वयाचे ५० व्या वर्षी राज्यांना अनैसर्गिक मृत्त्यू येणे कदापीही शक्य नाही. 




शिवरायांच्या मृत्त्यू बाबद संशय निर्माण करणाऱ्या काही बाबी :--१. शिवरायांचे धर्म परिवर्तनाचे कार्य. 
२. शिवरायांनी  ब्राह्मणी वर्चस्वाला दिलेला शह. 
३. रायगडावरील ब्राह्मण मंत्र्यांचा अंतर्गत विरोध.
४. तीन एप्रिलचे गडावरील संशयास्पद वातावरण. 
५. शिवरायांचा घाई घाईत उरकण्यात आलेला अंत्यविधी.
६. पराक्रमी, विद्वान,चारित्र्यसंपन्न, जेष्ठपुत्र संभाजीराजे यांना धोका देऊन कोणतीही चूक नसताना कैद करायचे आदेश देऊन.... दहा वर्षाच्या कनिष्ठ राजारामला घाई घाईत छत्रपती करण्यामागचा ब्राह्माण मंत्र्यांचा हेतू काय असावा ? 
७. शिवरायांच्याखुनाची, राजारामाच्या राज्याभिषेकाची, माहिती गोपनीय  ठेवण्या माघे ब्राह्माण मंत्र्यांचा  काय हेतू होता ?
८. संभाजी महाराजांचे सांत्वन  करण्यापेक्षा त्यांना अटक करायला गेलेले ब्राह्मणमंत्री यांचा हेऊ काय होता ?
9. या सार्या प्रकारा नंतर संभाजीराजे यांनी सोयराबाई यांना मान दिला, गौरवले व राजाराम महाराज यांना प्रेमाने वागवले....... तर ब्राह्माण मंत्री यांना कैद केले व पुढे त्यांना हातीचे पायाखाली देऊन ठार केले. हे काय दर्शवते 


               संभाजी महाराज यांना अटक करा व आम्हाला वाटेत भेटा असे आदेश ब्राह्माण मंत्र्यांनी हंबीरराव मोहिते यांना दिले होते .पण संभाजी महाराज यांना कपटाने   कैद करायला निघालेल्या मंत्र्यांना ( मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत..) हंबीरराव यांनी वाटेतच अटक केले ! त्यानंतर संभाजीराजे हे रायगडावर आले त्यांनी सर्व मातांचे सांत्वन केले. 


सोयराबाई या निर्दोष होत्या हे सिद्ध करणारा एक भक्कम पुरावा म्हणजे  संभाजीराजे २४ ऑगस्ट १६८० रोजी म्हणतात कि ' सोयराबाई या स्फटिका सारख्या निर्मल मनाच्या आहेत'. याचा अर्थ सोयराबाई या निर्दोष तर होत्याच पण त्या संभाजीराजे यांना आदर स्थानी होत्या. कुमंत्र्यांनीच सोयराबाई यांना संभाजी विरोधात भडकवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. [संधर्भ छ. संभाजी (पान २२१ ) वा. सी बेंद्रे.]

  आता आपण शिवरायांचे मृत्युबाबत देशी आणि परदेशी साधनांचा विचार करू :-- 

पुढील संदर्भ साधनांची चिकित्सा करताना त्या साधनांचा काळ व कर्ता याचा विचार केलेला आहे. मराठी आणि संस्कृत साधनांचे लेखक हे ब्राह्मण या एकाच जातीचे असल्याने सत्यशोधनात अडचणी येतात. तरी देखील अपराधीपणाची जाणीव त्या साधनात सापडते. 

सुरवातीला आपण अमराठी साधने पाहूयात ......

१. इंग्रजांचे पत्र " शिवाजी महाराज यांचा मृत्यू रक्तातीसाराने झाला. "
२. पारसी कागदपत्र ( मासिरे आलमसिगरी - साकीमुस्तेखान ) " शिवाजी हे घोड्यावरून उतरले त्यांना अतिउष्णतेमुळे दोन वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला "
३. निकोलोमनुची ( असे होते मोगल ) - " शिवाजीराजे यांना रक्ताच्या उलट्या होऊन मरण आले "
४. दाघ रजिस्टर ( डच कागदपत्र - १६८० (पृष्ठ ७२४.२९) संदर्भ परयीच्या दृष्ठी. ) - " राज्यांवर विषप्रयोग केला असावा " 

                   शिवाजीराज्यांनी राजारामाचा विवाह १५ मार्च १६८० रोजी प्रतापराव गुजर यांचे मुलीशी लाऊन दिला आणि अवघ्या १८ दिवसात शिवाजीराजे यांचा खून झाला. शिवाजीराजे रक्ताच्या उलट्या होऊन मरण पावले हे सारे जाणतात पण त्यांना रक्ताच्या उलट्या का झाल्या ? हे मात्र सारेच जाणत नव्हते कारण ब्राह्माण मंत्र्यांनी रायगडावरून वाराही बाहेर जाणार नाही याप्रकारे बंदोबस्त केला होता.

आता आपण मराठी -संस्कृत साधने पाहू :----

१. शिवदिग्विजय - " सोयराबाईंकडून राज्यांना विषप्रयोग झाला "
२. चिटणीस बखर - " सोयराबाईवरच आरोप ठेवते "
३. जेधे शकावली - " चैत्र शुद्ध शनिवार दिवसा दोन प्रहरी रायगडावर शिवरायांचे निधन झाले हंबीरराव मोहिते यांनी मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत यांना कैद केले." 

चिटणीस बखर,शिवदिग्विजय या १८१८ सालच्या असल्याने समकालीन नाहीत. पण त्या विषप्रयोग झाल्याचे बोलतात. ब्राह्माण मंत्र्यांनी विषप्रयोग केला पण सोयराबाई यांच्या नावाने अफवा पसरवली. हे वरील साधनांवरून लक्षात येते. 

जेधे शकावली हि दैनंदिनी असल्याने स्पष्टीकरण नाही पण त्यात निधनानंतर लगेच मंत्र्यांना अटक केल्याचे स्पष्ट होत आहे. मंत्र्यांनी खून केला म्हणून त्यांना अटक केली असा स्पष्ट अर्थ निघतो. 
  
बहुजन सामाज्याची दिशाभूल करण्यासाठी नंतर काही ब्राह्माण इतिहासकरांनी शिवरायांचा मृत्यू हा " गुडघी रोगामुळे " झाला अशी अफवा पसरवली. (पण मित्रहो जगाच्या इतिहासात पूर्वी आणि आजही गुडघीरोग कोणालाही झाल्याचे उदाहरण नाही..) तर काही इतिहासकारांनी शिवरायांचा खून हा सोयराबाई यांनी केला असा कुप्रचार सुरु केला. 

याचा स्पष्ट अर्थ काय निघतो ब्राह्माण हे अफवा पसरवण्यात, दिशाभूल करण्यात, कपटकारस्थानात, खून पचवण्यात जगात एक नंबर आहेत. 

राज्यांचा खून पचावायासाठी ब्राह्मण कंपूने अनेक अफवा पसरवल्या. जनतेला खरे गुन्हेगार समजू नयेत खरे आरोपी सुटावेत यासाठी आजही ब्राह्माण खोटा प्रचार, दिशाभूल करत असतात. 

शिवरायांचा खून पचउन स्वराज्य हस्तगत करायचा ब्राह्माण मंत्र्यांचा डाव होता त्यासाठी त्यांनी राजाराम यांचा राज्यभिषेक घाई घाईत उरकला. 

कारण राजाराम हे १० वर्षाचे बालक होते. राजारामला नामधारी राजा करायचे व राज्यकारभाराची सर्व सूत्रे आपल्या हातात घ्यायची असा ब्राह्मण मंत्र्यांचा डाव होता. तसेच संभाजीराजे हे हुशार, धाडसी,पराक्रमी, होते म्हणून संभाजीराजे यांना अटक करायला मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत हे पन्हाळागडाकडे निघाले पण वाटेतच या कपटी, स्वराज्यद्रोही, नरपशूना.... स्वराज्यप्रेमी, शिवभक्त, राजाराम यांचे सख्खे मामा हंबीरराव मोहिते यांनी अटक केली आणि संभाजीराजे यांचा रायगडावर अभीषेक केला. !

तात्पर्य :-
                  विषप्रयोग झाला हे सारे जाणतात. काही ब्राह्मणी विचारांना बळी पडून सोयराबाई ही यात सामील होत्या असे समजतात. पण त्याच वेळी शंभूराज्यांनी सोयराबाई यांना कधीच अटकही केले नाही व कोणताही त्रास दिला नाही उलट खुणानंतर ५-६ महिन्यांनी संभाजीयांनी सोयराबाई यांना गौरवले त्याचा सन्मान केला  ! याचा वर पुरावा दिलेला आहे.म्हणजेच सोयराबाई या निर्दोष होत्या हे कोणीही खरा शिवप्रेमी कबुल करेल. म्हणजेच शिवरायांचा खून हा केवळ स्वराज्य बळकावण्यासाठी ब्राह्माण मंत्र्यांनी केलेला ब्राह्मणीकावा होता हे सिद्ध होते....
तरी आजही आपण ब्राम्हणवादी संस्कृतीचे पालन करतो... किती लाजिरवानी गोष्ट आहे... खरं म्हणजे आपण ब्राम्हणांचा निषेध करायला हवा की त्यांनी आपल्याला लाभलेल्या सूर्याचा घात स्वतःच्या फायद्यासाठी केला.... वेगवेगळ्या जाती निर्माण करुन आपल्याला त्यात अडकवल अणि स्वतःचा फायादा करून घेतला.... डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला ब्राम्हणांनापासून दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आडव जाऊन देशाला गुलाम बनवल....
 "अरे खूप झाल आता ...!! गप्प नाही बसनारच....
शिवाचा  वाघ आहे...
सगल हादरवून टाकणारच....!!!
ही माहिती इतकी शेअर करा कि प्रत्येकाला मिहिती झाली पाहिजे.. 

लेखक 📝📝📝📝
प्रा.मोहन दादाजी पवार
     इतिहास संशोधक

T-shirt of Dr. Ambedkar

T-shirt of Dr. Ambedkar

Dr. Ambedkar's Books in Hindi

Dr. Ambedkar's Books in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Blog Archive

Popular Posts